📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानवी हक्क: वैश्विक जाहीरनामा, आयोग, कायदे व सामाजिक संरक्षण (पृष्ठ 33)

Human Rights: Universal Declaration, Commissions & Protections — Indian Economy & Planning

'मानवी हक्क: वैश्विक जाहीरनामा, आयोग, कायदे व सामाजिक संरक्षण' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 900 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 33 / 45
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 641 ते 660 (एकूण 900)
प्रश्न #641 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
अनुसूचित जमातीसाठी काम करणाऱ्या सुप्रसिद्ध संस्थाः
अ) भारतीय आदिमजाती सेवक संघ, नवी दिल्ली.
ब) निलगिरी आदिवासी कल्याण संघटना, कोट्यगिरी (तामिळनाडू)
क) समतोल फाऊंडेशन, मुंबई.
ड) बनस्थळी विद्यापीठ (राजस्थान)
इ) रामकृष्ण मिशन, शिलाँग
पर्यायी उत्तरे:
EN Prominent organizations working for Scheduled Tribes:
a) Bharatiya Adimjati Sevak Sangh, New Delhi
b) Nilgiris Adivasi Welfare Association, Kotagiri (Tamil Nadu)
c) Samatol Foundation, Mumbai
d) Banasthali Vidyapith (Rajasthan)
e) Ramakrishna Mission, Shillong
Answer options:
  • (A) अ, ब, ड विधाने योग्य आहेत.
  • (B) क, ड, इ विधाने योग्य आहेत.
  • (C) अ, ब, ड, इ विधाने योग्य आहेत.
  • (D) अ, ब, क, ड विधाने योग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, ड, इ विधाने योग्य आहेत.

अनुसूचित जमातींसाठी कार्यरत प्रमुख संस्था: 1. संस्थांचे विश्लेषण: - अ) भारतीय आदिमजाती सेवक संघ, नवी दिल्ली: 1948 मध्ये थोर समाजसेवक ठक्कर बाप्पा यांनी स्थापन केलेली आदिवासी कल्याणाची राष्ट्रीय शिखर संस्था (योग्य). - ब) निलगिरी आदिवासी कल्याण संघटना...

प्रश्न #642 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
अ) प्रस्तावित समान संधी मंडळ/आयोगाने, वंचित गटांच्या तक्रारींच्या संदर्भात काम करावे, अशी अपेक्षा होती.
ब) सर्व शिक्षा अभियान (सर्वांसाठी शिक्षण) 2000 ने, सिमांकित दुर्लक्षित मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.
क) भारतीय वन कायदा 1927 व वनसंरक्षण कायदा 1980 यामध्ये अनुसूचित जमातींना अधिकार व त्यांना संरक्षण दिलेले आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statements is not correct?
a) The proposed Equal Opportunity Commission was expected to address grievances of deprived groups.
b) Sarva Shiksha Abhiyan (Education for All) 2000 focused on the education of marginalized and neglected children.
c) Under the Indian Forest Act, 1927 and Forest Conservation Act, 1980, rights and protection are given to Scheduled Tribes.
Answer options:
  • (A) अ
  • (B) ब
  • (C) क
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

विधानांचे विश्लेषण - चुकीचे विधान ओळखणे: 1. विधान अ: न्यायमूर्ती सच्चर समितीने शिफारस केलेले 'प्रस्तावित समान संधी आयोग/मंडळ' (Equal Opportunity Commission) हे धर्म, जात, लिंग यावर आधारित वंचितांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अपेक्षित होते (बरोबर...

प्रश्न #643 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रम प्रधानमंत्री म्हणून श्री. व्ही. पी. सिंग यांनी बनविला.
ब) 15 कलमी कार्यक्रमात नेमणुकीत/भरतीत अल्पसंख्यांकांचा विशेष विचार करण्याचा सल्ला देण्यात आला.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is correct?
a) The 15-Point Programme for the welfare of minorities was formulated by Shri V. P. Singh as Prime Minister.
b) In the 15-Point Programme, special consideration was advised for minorities in appointments/recruitment.
Answer options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब

अल्पसंख्याकांसाठी 15 कलमी कार्यक्रम (15-Point Programme): 1. विधान अ: अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठीचा प्रसिद्ध '15 कलमी कार्यक्रम' (15-Point Programme for Minorities) हा सर्वप्रथम मे 1983 मध्ये पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी तयार केला होता...

प्रश्न #644 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
i) 60 व त्या वरच्या वयस्क व्यक्तींमधील अनैसर्गिक कारणांनी होणारे अपघाती मृत्यू, हे भारतातील काळजीचे कारण आहे.
ii) इतरांशी चर्चा न करण्याची सार्वजनिक घटना मानली जात असल्याने, वयोवृद्धांशी होणारे गैरवर्तन भारतात फारच कमी प्रमाणात नोंदवले जाते. वरील विधानातील कोणते शब्द बदलणे, विधान अचूक होण्यासाठी गरजेचे आहे?
अ) विधान क्र. (i) मधील दुरुस्ती = अनैसर्गिकच्या ठिकाणी नैसर्गिक.
ब) विधान क्र. (ii) मधील दुरुस्ती = सार्वजनिक घटनाच्या ठिकाणी खाजगी घटना.
क) विधान क्र. (ii) मधील दुरुस्ती = फारच कमी प्रमाणात ऐवजी योग्य प्रमाणात.
पर्यायी उत्तरे:
EN i) Accidental deaths due to unnatural causes among elderly persons aged 60 and above is a cause of concern in India.
ii) Elder abuse is rarely reported in India because it is considered a public affair not to be discussed with others.
Which word replacement in the above statements is required to make them accurate?
a) Correction in statement (i) = replace 'unnatural' with 'natural'.
b) Correction in statement (ii) = replace 'public affair' with 'private/family affair'.
c) Correction in statement (ii) = replace 'rarely reported' with 'duly reported'.
Answer options:
  • (A) फक्त ब
  • (B) फक्त क
  • (C) ब व क
  • (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त ब

वृद्धांविषयीच्या विधानांमधील शब्द बदल व विश्लेषण: 1. विधान (i): 60 वर्षांवरील वृद्धांमध्ये अपघाती व अनैसर्गिक मृत्यू ही काळजीची बाब आहे हे विधान मुळातच बरोबर आहे. 2. विधान (ii): मूळ विधानात म्हटले आहे की "इतरांशी चर्चा न करण्याची सार्वजनिक घटना...

प्रश्न #645 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) मूलभूत सुविधा पुरवून वयोवृद्ध नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत सुधार आणणे हा 1992 पासून वयस्क व्यक्तींकरिता लागू असणाऱ्या एकात्मिक कार्यक्रमांचा उद्देश आहे. ब) नवी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना 2007, वयोवृद्धांचा आर्थिक दर्जा विचारात न घेता 65 वर्षे वयावरील सर्वच वयोवृद्धांकरिता कार्यान्वित झालेली आहे.
क) युनो नुसार एखाद्या देशाची “वयस्कांचा देश' अशी व्याख्या तेव्हा केली जाते जेव्हा 60 वर्षे वयावरील लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 7 टक्के पर्यंत पोहोचते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) Improving the quality of life of older persons by providing basic amenities is the objective of the Integrated Programme for Older Persons implemented since 1992.
b) The new National Old Age Pension Scheme 2007 has been implemented for all senior citizens above 65 years of age irrespective of their financial status.
c) According to the UN, a country is defined as an 'ageing country' when the proportion of population aged 60 and above reaches 7 percent of the total population.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) अ, ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) फक्त ब
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क

वृद्धांविषयीची विधाने - सत्यता विश्लेषण: 1. विधान अ: ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवून त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने 1992 पासून 'वृद्धांसाठीचा एकात्मिक कार्यक्रम' (IPOP) सुरू केला (बरोबर आहे). 2. विधान ब: राष्ट्रीय...

प्रश्न #646 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
हेल्पेज इंडिया (HAI) बाबत काय खरे नाही?
अ) तिची स्थापना 1978 मध्ये झाली.
ब) तिचा जन्म इंग्रज पुढाकारामुळे झाला.
क) ती वृद्धांकडे लक्ष पुरविते व आर्थिक सहाय्यही देते. ड) वृद्धामध्ये निराश्रित, वृद्ध अंध, वृद्ध महारोगी, कर्करोगी वृद्ध, जराचिकित्सेच्या दवाखान्यातील वृद्ध सम्मीलित आहेत.
इ) ती वृद्धांना वैयक्तिकरित्या मदत देते तसेच ज्या संघटना त्यांच्यासाठी कार्य करतात त्यांनाही मदत पुरविते.
फ) तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
ग) तिच्या शाखा मुंबई, बंगलोर, कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद व मद्रास येथे आहेत.
पर्यायी उत्तरे:
EN What is not true about HelpAge India (HAI)?
a) It was established in 1978.
b) It originated due to British initiative.
c) It pays attention to the elderly and also provides financial assistance.
d) Elderly includes destitute, blind aged, leprosy-affected aged, cancer-affected aged, and geriatric clinic patients.
e) It provides help to the elderly individually as well as to organizations working for them.
f) Its headquarters is located in New Delhi.
g) It has branches in Mumbai, Bangalore, Calcutta, Delhi, Hyderabad, and Madras.
Answer options:
  • (A) ब
  • (B) ड
  • (C) इ
  • (D) वरील तिन्ही
अचूक उत्तर: पर्याय (C) इ

हेल्पेज इंडिया (HelpAge India - HAI) - वस्तुस्थिती: 1. संस्थेचे धोरण: हेल्पेज इंडिया ही संस्था कोणत्याही वृद्ध व्यक्तीला 'वैयक्तिकरित्या थेट रोख मदत' वाटण्याचे काम करत नाही; उलट ती नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था, वृद्धाश्रम, फिरते दवाखाने आणि सामुदायिक...

प्रश्न #647 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
वयोवृद्ध नागरिक व पालक कल्याण व देखरेख कायदा 2007 द्वारे खालीलपैकी कशाची तजवीज केली गेलेली आहे आणि ह्या कायद्याच्या अखत्यारित काय येते?
अ) वयोवृद्ध नागरिक आणि पालकांकरिता गरजेवर आधारित प्रतिपाळ व त्यांचे कल्याण
ब) वयोवृद्ध नागरिकांच्या संपत्तीचे संरक्षण
क) वयोवृद्ध नागरिकांना वृद्धाश्रमात ठेवणे.
पर्यायी उत्तरे:
EN What has been provided under the Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007 and what falls within its purview?
a) Need-based maintenance and welfare for senior citizens and parents
b) Protection of property of senior citizens
c) Placing senior citizens in old age homes
Answer options:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) फक्त अ
  • (C) अ आणि ब
  • (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब आणि क

ज्येष्ठ नागरिक कायदा, 2007 ची व्याप्ती व तरतुदी: 1. विधान अ - गरजाधारित प्रतिपाळ व कल्याण: कलम 4 अन्वये आई-वडिलांना व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी मुलांकडून दरमहा भरणपोषण मिळवण्याचा अधिकार आहे (बरोबर...

प्रश्न #648 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
.................ह्यांच्या एकत्रीकरणामुळे वृद्धांसाठी फार गंभीर समस्या उद्भवली आहे.
अ) संयुक्त कुटुंब पद्धतीचे विघटन
ब) वेगाने होत असलेले औद्यौगीकरण आणि नागरीकरण
क) बदललेली सामाजिक मूल्य व्यवस्था.
ड) महिलांनी नोकरीसाठी घराबाहेर जाण्याचे वाढते प्रमाण
पर्यायी उत्तरे:
EN A very serious problem has arisen for the elderly due to the confluence of .................
a) Breakdown of the joint family system
b) Rapid industrialization and urbanization
c) Changed social value system
d) Increasing trend of women working outside home
Answer options:
  • (A) अ, ब विधाने योग्य आहेत.
  • (B) ब, क, ड विधाने योग्य आहेत.
  • (C) अ, ब, क विधाने योग्य आहेत.
  • (D) अ, ब, ड विधाने योग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, क विधाने योग्य आहेत.

वृद्धांच्या समस्या उद्भवण्याची सामाजिक कारणे: 1. विधान अ - संयुक्त कुटुंब पद्धतीचे विघटन: पारंपरिक संयुक्त कुटुंबात वृद्धांना आदराचे स्थान, सुरक्षितता आणि भावनिक आधार मिळत असे. कुटुंबाच्या विघटनामुळे वृद्ध एकाकी पडले (बरोबर आहे). 2. विधान ब...

प्रश्न #649 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
वृद्ध नागरिकांना खालीलपैकी कोणत्या सुविधा पुरवल्या जातात?
अ) भारतीय पोस्ट कार्यालयात वरिष्ठ नागरिक बचत योजना
ब) आयातकरात रु. 3 लाख-प्रति वर्षीपर्यंत सवलत
क) रेल्वेच्या सर्व मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यात 50% सवलत
ड) राज्य परिवहन बसेसमध्ये आरक्षित जागा योग्य
पर्याय निवडा:
EN Which of the following facilities are provided to senior citizens?
a) Senior Citizen Savings Scheme in Indian Post Offices
b) Income tax rebate up to Rs. 3 lakh per annum
c) 50% concession in fare of all Mail/Express trains of Railways
d) Reserved seats in State Transport buses
Choose the correct option:
  • (A) अ आणि ड
  • (B) अ, ब, क
  • (C) ब, क, , ड
  • (D) अ, ब, क ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ड

वृद्ध नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सुविधा: 1. विधान अ - वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS): भारतीय टपाल कार्यालयांमध्ये 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी उच्च व्याजदराची 'वरिष्ठ नागरिक बचत योजना' कार्यान्वित आहे (बरोबर आहे). 2. विधान ड - राज्य परिवहन...

प्रश्न #650 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये इंदिरा गांधी वयस्क निवृत्ती वेतन योजनेची नाहीत?
अ) यामध्ये लाभार्थीला योगदान द्यावे लागत नाही.
ब) फक्त ग्रामीण भागातील नागरिकच पात्र आहेत.
क) 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिकच पात्र आहेत.
ड) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांमधील व्यक्ती पात्र आहेत.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following are not features of the Indira Gandhi National Old Age Pension Scheme?
a) Beneficiary is not required to contribute in this.
b) Only citizens from rural areas are eligible.
c) Only citizens aged above 65 years are eligible.
d) Individuals belonging to below poverty line families are eligible.
Answer options:
  • (A) अ आणि क
  • (B) क आणि ड
  • (C) अ आणि ड
  • (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) ब आणि क

इंदिरा गांधी राष्ट्रीय वयस्क निवृत्तीवेतन योजना (IGNOAPS) - वैशिष्ट्ये: 1. विधान ब (वैशिष्ट्य नाही): ही योजना केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित नसून ती ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील दारिद्र्यरेषेखालील वृद्धांसाठी लागू आहे (त्यामुळे हे वैशिष्ट्य...

प्रश्न #651 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पूर्वीच्या कामगार हिताच्या योजनांपेक्षा मनरेगा ही महिलांसाठी अधिक अनुकूल अशी योजना म्हटली जाते कारण :
EN MGNREGA is considered a more women-friendly scheme compared to previous labour welfare schemes because:
  • (A) एकूण कामगारांच्या किमान एक तृतीयांश कामगार महिला असाव्यात असे ही योजना नमूद करते.
  • (B) कामाच्या ठिकाणी बालसंगोपनाची सुविधा या योजनेद्वारे उपलब्ध केली जाते.
  • (C) अर्जदाराच्या रहिवासापासून पाच कि.मी अंतराच्या आत या योजनेद्वारे कामाची उपलब्धता करून दिली जाते.
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

मनरेगा (MGNREGA) ही महिलांसाठी अधिक अनुकूल योजना असण्याची कारणे: 1. कथन 1 (किमान 1/3 महिला आरक्षण): मनरेगा कायद्यातील तरतुदीनुसार एकूण लाभार्थ्यांपैकी किमान एक तृतीयांश (33%) कामगार या महिला असाव्यात अशी कायदेशीर सक्ती आहे (प्रत्यक्षात भारतात 50%...

प्रश्न #652 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
प्रधान मंत्री श्रम पुरस्काराबाबत काय योग्य आहे ?
अ) हे पुरस्कार जे विभागीय उपक्रम आणि सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात (केंद्र किंवा राज्य सरकारांच्या) कामगार आहेत त्यांनाच दिले जातात व ते उत्पादन व इतर क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना दिले जातात.
ब) श्रम श्री व श्रम वीर या पुरस्कारांमध्ये श्रम श्री श्रेष्ठ पुरस्कार आहे.
पर्यायी उत्तरे:
EN What is correct regarding the Prime Minister's Shram Awards?
a) These awards are given only to workers in departmental undertakings and public sector undertakings (Central or State Governments) for outstanding work in production and other fields.
b) Among the Shram Shree and Shram Veer awards, Shram Shree is higher in hierarchy.
Answer options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही

प्रश्न #653 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) आपल्याकडील सर्व रिक्त पदांची माहिती सेवायोजन कार्यलयांना देणे सर्व सार्वजनिक उद्योगांना बंधनकारक आहे.
ब) संपूर्ण खाजगी क्षेत्राने सेवायोजन कार्यालयाला अशा रिक्त पदांची माहिती देणे अपेक्षित आहे.
क) औद्योगिक क्षेत्रातील खाजगी उद्योगांना सेवायोजन कार्यालयाला अशा रिक्त पदांची माहिती देणे अपेक्षित आहे.
ड) केवळ 25 पेक्षा अधिक कामगार असलेल्या बिगरशेती खाजगी उद्योगांना सेवायोजन कार्यालयाला अशा रिक्त पदांची माहिती देणे अपेक्षित आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) It is mandatory for all public sector establishments to notify all vacancies to employment exchanges.
b) The entire private sector is expected to notify such vacancies to employment exchanges.
c) Private sector industrial establishments are expected to notify such vacancies to employment exchanges.
d) Only non-agricultural private establishments employing 25 or more workers are required to notify such vacancies to employment exchanges.
Answer options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ अ आणि ड
  • (C) केवळ अ, क आणि ड
  • (D) केवळ अ आणि ब
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ अ आणि ड

रोजगार विनिमय (रिक्त पदांची सक्तीने अधिसूचना) कायदा, 1959: 1. विधान अ (बरोबर): या कायद्यानुसार भारतातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना (Public Sector) आपल्याकडील सर्व प्रकारची रिक्त पदे संबंधित सेवायोजन कार्यालयांना (Employment Exchanges)...

प्रश्न #654 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या केंद्रीय संघटना अकुशल कामगारांना संघटित करणे, त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा घडवणाऱ्या कायद्यांकरिता दबाव गट निर्माण करणे, वेतन, सामाजिक सुरक्षेकरिता कार्य करणे अशा विविध कार्यात गुंतलेल्या असतात?
अ) BMS व INTUC - कामाच्या परिस्थितीत सुधार, त्याकरिता कायदेनिर्मितीकरिता दबाव गट निर्मिती कार्यात गुंतलेल्या असतात.
ब) CITU व AITUC अकुशल कामगारांना संघटित करण्यात गुंतलेल्या असतात.
क) HMS व BMS - वेतन व सामाजिक सुरक्षेसंबंधीच्या कार्यात गुंतलेल्या असतात. ड) वरील सर्व केंद्रीय संघटना, वर नमूद केलेल्या विविध कार्यात गुंतलेल्या असतात.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following central trade union organizations are engaged in various tasks like organizing unskilled workers, creating pressure groups for labour legislation improving working conditions, and working for wages and social security?
a) BMS and INTUC - engaged in improving working conditions and building pressure groups for legislation.
b) CITU and AITUC - engaged in organizing unskilled workers.
c) HMS and BMS - engaged in work related to wages and social security.
d) All the above central organizations are engaged in all the above-mentioned activities.
Answer options:
  • (A) अ
  • (B) अ आणि ब
  • (C) ब आणि क
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ड

केंद्रीय कामगार संघटनांची भूमिका: 1. केंद्रीय कामगार संघटना (Central Trade Union Organisations - CTUOs): भारतातील बीएमएस (BMS), इंटक (INTUC), सीटू (CITU), आयटक (AITUC) आणि एचएमएस (HMS) या सर्व प्रमुख केंद्रीय कामगार संघटना देशातील असंघटित व अकुशल...

प्रश्न #655 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
किमान वेतन कायदा, 1948 संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
अ) या कायद्यात पुरुष व स्त्री यांच्यात भेदभाव नाही.
ब) बदलता महागाई भत्ता हा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित आहे.
क) बदलता महागाई भत्ता वर्षातून तीन वेळा सुधारित केला जातो.
योग्य पर्याय निवडा:
EN With reference to the Minimum Wages Act, 1948, which of the following statement(s) is/are correct?
a) There is no discrimination between men and women in this Act.
b) Variable Dearness Allowance (VDA) is based on the Wholesale Price Index (WPI).
c) Variable Dearness Allowance is revised three times a year.
Choose the correct option:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) फक्त अ
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ

किमान वेतन कायदा, 1948 - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (बरोबर): किमान वेतन कायद्यानुसार पुरुष व स्त्री यांच्यात वेतनाबाबत कोणताही भेदभाव करता येत नाही; दोघांनाही समान किमान वेतन मिळण्याचा हक्क आहे (बरोबर आहे). 2. विधान ब (चूक): बदलता महागाई भत्ता...

प्रश्न #656 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाची सुरुवात 1996 मध्ये झाली.
ब) या कार्यक्रमाचा हेतू सन 2020 पावेतो अंधत्व 0.3% पर्यंत आणावयाचे असा आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following two statements is incorrect?
a) The National Programme for Control of Blindness was launched in 1996.
b) The goal of this programme was to reduce blindness to 0.3% by the year 2020.

Answer options:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम (NPCB) - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (अयोग्य): 'राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम' (National Programme for Control of Blindness - NPCB) हा 1996 मध्ये नव्हे, तर 1976 मध्ये 100% केंद्र पुरस्कृत आरोग्य कार्यक्रम...

प्रश्न #657 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी असलेल्या कार्यक्रमात अंतर्भाव होतो:
अ) शिक्षण चालू ठेवण्यासाठी शिष्यवृत्ती.
ब) सरकारी/सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी 3.5% आरक्षण.
पर्यायी उत्तरे :
EN Programmes for the rehabilitation of persons with disabilities include:
a) Scholarship for continuing education.
b) 3.5% reservation for jobs in government/public sector.

Answer options:
  • (A) अ फक्त
  • (B) ब फक्त
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) अ फक्त

अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यक्रम - शिष्यवृत्ती: 1. विधान अ (समाविष्ट आहे): केंद्र व राज्य शासनाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांचे प्राथमिक, माध्यमिक, उच्च व व्यावसायिक शिक्षण चालू ठेवण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती (Scholarships for Students...

प्रश्न #658 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
अपंग व्यक्ती अॅक्ट 1995 नुसार पुनर्वसनाचे उद्देश कोणते आहेत?
अ) अपंग व्यक्तींना त्यांच्या संघटनात्मक, रचनात्मक व कार्यात्मकतेच्या सर्वोत्कृष्ट पातळीपर्यंत पोहोचण्यास व ते टिकवण्यास सक्षम करणे.
ब) अपंग व्यक्तींचे पुनर्वसन या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वैच्छिक संघटनांना अर्थ सहाय्य पुरविणे.
क) अपंग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक, संवेदनासंबंधी, बुद्धिमत्तेसंबंधी, मानसिक किंवा सामाजिक कार्यात्मकतेच्या सर्वोत्कृष्ट पातळीपर्यंत पोहोचण्यास व ती पातळी कायम ठेवण्यास सक्षम करणे.
पर्यायी उत्तरे:
EN According to the Persons with Disabilities Act, 1995, what is the objective of rehabilitation?
a) To enable persons with disabilities to reach and maintain their optimal level of organizational, creative and functional abilities.
b) To provide financial assistance to voluntary organizations working in the field of rehabilitation of persons with disabilities.
c) To enable persons with disabilities to reach and maintain their optimal physical, sensory, intellectual, psychiatric or social functional levels.

Answer options:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) फक्त क
  • (C) फक्त ब
  • (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त क

अपंग व्यक्ती कायदा 1995 नुसार 'पुनर्वसन' (Rehabilitation) ची व्याख्या: 1. कायद्यातील व्याख्या: 'अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व पूर्ण सहभाग) कायदा, 1995' च्या कलम 2(w) नुसार पुनर्वसनाचा वैधानिक उद्देश पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आला आहे...

प्रश्न #659 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
अ) अपंग व्यक्ती (भेदभाव प्रतिबंध) हा कायदा होण्याआधी मानसिक स्वास्थ कायदा लागू होता.
ब) अपंग व्यक्ती (भेदभाव प्रतिबंध) कायद्यामध्ये कुष्ठरोग बरा झालेल्यांचाही अंतर्भाव आहे.
क) मनाच्या अपूर्ण विकासाला मंदबुद्धित्व हा विशेष गुणधर्म जोडलेला असणे, म्हणजे मनोआजार होय.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
EN a) Before the enactment of the Persons with Disabilities Act, the Mental Health Act was in force.
b) The Persons with Disabilities Act includes leprosy-cured persons.
c) Mental illness means a condition of arrested or incomplete development of mind specially characterized by sub-normality of intelligence.

Which of the statements above are correct?
  • (A) सर्व
  • (B) अ आणि ब
  • (C) ब आणि क
  • (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि ब

अपंगत्वाविषयीचे कायदे - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (बरोबर): 'अपंग व्यक्ती कायदा, 1995' अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी 'मानसिक स्वास्थ कायदा, 1987' (Mental Health Act, 1987) हा स्वतंत्र कायदा लागू होता (बरोबर...

प्रश्न #660 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त.
अ) 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात 2.68 कोटी लोक अपंग आहेत.
ब) त्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण 3.5% आहे.
क) पुरुष-स्त्रिया अपंग व्यक्तींचे गुणोत्तर 3 : 1 आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) According to the 2011 Census, there are 2.68 crore disabled persons in India.
b) Their proportion in the total population is 3.5%.
c) The ratio of male to female disabled persons is 3 : 1.

Answer options:
  • (A) अ आणि ब
  • (B) फक्त अ
  • (C) ब आणि क
  • (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त अ

2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दिव्यांग आकडेवारी: 1. विधान अ (बरोबर): 2011 च्या जनगणनेनुसार भारतात दिव्यांग व्यक्तींची अधिकृत संख्या 2.68 कोटी (26.8 दशलक्ष) इतकी आहे (हे विधान अगदी बरोबर आहे). 2. विधान ब (चूक): अपंग लोकसंख्येचे प्रमाण एकूण...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स