📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानवी हक्क: वैश्विक जाहीरनामा, आयोग, कायदे व सामाजिक संरक्षण (पृष्ठ 5)

Human Rights: Universal Declaration, Commissions & Protections — Indian Economy & Planning

'मानवी हक्क: वैश्विक जाहीरनामा, आयोग, कायदे व सामाजिक संरक्षण' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 900 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 5 / 45
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 81 ते 100 (एकूण 900)
प्रश्न #81 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ?
a. ज्या प्रक्रियेद्वारा त्याच्या किंवा तिच्या संस्कृतीत योग्य मानले जाणारे वर्तनप्रकार आणि नियमने व्यक्ति शिकून घेते आणि त्याचा अवलंब करते, त्या प्रक्रियेला सामाजिकीकरण असे म्हणतात.
b. सामाजिकरणात व्यक्ति संस्कृतीतील विविध नियमने, मुल्ये व वर्तनप्रकार आत्मसात करते.
c. सामाजिक नियंत्रणाचे एक प्रभावी साधन म्हणुन सामाजिकीकरणाकडे पाहिले जाते.
EN Which of the following statements is/are correct?
a. The process through which an individual learns and adopts behavior patterns and norms considered appropriate in their culture is called socialization.
b. In socialization, an individual internalizes various norms, values, and behavioral patterns of culture.
c. Socialization is seen as an effective instrument of social control.
  • (A) फक्त c
  • (B) b आणि c
  • (C) a, b आणि c
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) a, b आणि c

सामाजिकीकरणाची प्रक्रिया - विधानांचे विश्लेषण: 1. विधान a (सत्य): सामाजिकीकरण म्हणजे अशी जीवनव्यापी प्रक्रिया ज्याद्वारे व्यक्ती आपल्या संस्कृतीतील योग्य व समाजमान्य वर्तनप्रकार आणि नियमने शिकून घेते आणि त्यांचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब करते. 2. विधान...

प्रश्न #82 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
a. मुल्ये हीच वर्तन विषयक नियमांचे वा सामाजिक नियमांचे आधार असतात.
b. मुल्ये ही व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनलेली असतात.
c. कोणत्याही समाजाची मुल्ये ही संघटित स्वरूपात असतात व परस्पर संबंधित मुल्यांची मिळूनच मुल्य व्यवस्था बनलेली असते.
वरीलपैकी कोणती विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ?
EN Consider the following statements:
a. Values are the foundation of behavioral rules or social norms.
b. Values become an integral part of an individual's personality.
c. The values of any society exist in an organized structure, and interrelated values constitute a value system.
Which of the above statements is/are correct?
  • (A) a आणि b
  • (B) a, b आणि c
  • (C) फक्त c
  • (D) b आणि c
अचूक उत्तर: पर्याय (B) a, b आणि c

मूल्यांचे स्वरूप (Nature of Values) - विधानांचे विश्लेषण: 1. विधान a (सत्य): मूल्ये (Values) हीच समाजमान्य वर्तनविषयक नियमांचे आणि सामाजिक नियमनांचे (Norms) मूळ आधार असतात; मूल्यांवरूनच नियमने आकारास येतात (उदा. 'जीवनाची पवित्रता' हे मूल्य आहे, तर...

प्रश्न #83 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा. सृजनशील व्यक्तीचे मानसशास्त्रानुसार वैशिष्ट्ये -
अ. भिन्न विचार करण्याची क्षमता
ब. दूरदृष्टी
क. लवचिकता आणि कल्पनांची मौलिकता
ड. चांगली स्मृती आणि बुद्धिमत्ता
इ. नैतिक संवेदनशीलता
फ. समस्या निराकरणासाठी उत्साही वृत्ती
ग. योजनेचे तपशील तयार करण्याची अक्षमता
EN Identify the correct option. Characteristics of a creative person according to psychology:
a. Divergent thinking ability
b. Vision / Foresight
c. Flexibility and originality of ideas
d. Good memory and intelligence
e. Moral sensitivity
f. Enthusiastic attitude towards problem solving
g. Inability to prepare project details
  • (A) अ, ब, क, ड, इ, फ, ग अचूक आहेत
  • (B) अ, ब, क, ड, इ, फ अचूक आहेत
  • (C) अ, क, ड, फ अचूक आहेत
  • (D) ड, इ, फ, ग अचूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, क, ड, इ, फ अचूक आहेत

सृजनशील व्यक्तीची वैशिष्ट्ये (Characteristics of a Creative Person): मानसशास्त्रानुसार (उदा. टॉरेन्स, गिलफोर्ड) सृजनशील व्यक्तीमध्ये खालील गुणवैशिष्ट्ये आढळतात: 1. अ. भिन्न विचार करण्याची क्षमता (Divergent Thinking): एकाच समस्येवर अनेक नाविन्यपूर्ण...

प्रश्न #84 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
अर्भक मृत्यर्ता म्हणजे
अ) मृत बाळ जन्मने
ब) गर्भपातामुळे होणारा मृत्यू
क) जन्मलेले बाळ एका वर्षाच्या आत मृत पावणे
ड) गर्भ मृत्यू
वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत ?
1: फक्त अ
2: फक्त ब
3: फक्त क
4: वरीलपैकी नाही
EN Infant Mortality refers to:
a) Stillbirth
b) Death due to abortion
c) Death of a live-born baby within one year of age
d) Foetal death
Which of the above options is/are correct?
1: Only a
2: Only b
3: Only c
4: None of the above
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त क
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क

योग्य उत्तर फक्त क (जन्मलेले बाळ एका वर्षाच्या आत मृत पावणे - पर्याय 3) आहे. - अर्भक मृत्यू दर (Infant Mortality Rate - IMR): - जनसांख्यिकी आणि आरोग्य विज्ञानातील प्रमाणित व्याख्येनुसार, एखाद्या विशिष्ट वर्षात जिवंत जन्मलेल्या प्रति 1,000 बालकांमागे...

प्रश्न #85 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधान/विधाने योग्य आहे / आहेत ?
अ) प्रसारमाध्यमे समाजीकरणाचे प्रभावी माध्यम आहे.
ब) प्रसारमाध्यमांकडे माहितीचा साठा असतो त्याला ज्ञानाची जोड दिल्यास मूल्यसंवर्धन घडू शकते.
क) लोकशाहीचा दूसरा स्तंभ प्रसारमाध्यमे आहेत.
पर्यायी उत्तरे :
1: अ आणि ब
2: ब आणि क
3: अ आणि क
4: वरीलपैकी सर्व
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) Mass media is an effective agency of socialization.
b) Media possesses reservoirs of information that, when blended with knowledge, foster value inculcation.
c) Mass media is the second pillar of democracy.
1: a and b
2: b and c
3: a and c
4: All of the above
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

योग्य उत्तर अ आणि ब (पर्याय 1) आहे. - विधानांचे विश्लेषण: - अ) सत्य: आधुनिक काळात वर्तमानपत्रे, दूरदर्शन, रेडिओ व इंटरनेट ही प्रसारमाध्यमे मुलांवर व नागरिकांवर प्रभाव टाकणारे समाजीकरणाचे (Socialization) अत्यंत प्रभावी साधन बनले आहेत. - ब) सत्य...

प्रश्न #86 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
वयोगट 15 35 व्यक्तींमधील निरक्षरतेचे पूर्णत: उच्चाटन करण्यावर.........या पंचवार्षिक योजनेमध्ये भर दिला गेला.
1: दूसरी पंचवार्षिक योजना ( 1956 1960)
2: आठवी पंचवार्षिक योजना (1992-1997)
3: पाचवी पंचवार्षिक योजना (1974-1979)
4: सातवी पंचवार्षिक योजना (1985-1990)
EN Total eradication of illiteracy among individuals in the age group 15-35 years was emphasized in which Five-Year Plan?
1: Second Five-Year Plan (1956-1961)
2: Eighth Five-Year Plan (1992-1997)
3: Fifth Five-Year Plan (1974-1979)
4: Seventh Five-Year Plan (1985-1990)
  • (A) दूसरी पंचवार्षिक योजना ( 1956 1960)
  • (B) आठवी पंचवार्षिक योजना (1992-1997)
  • (C) पाचवी पंचवार्षिक योजना (1974-1979)
  • (D) सातवी पंचवार्षिक योजना (1985-1990)
अचूक उत्तर: पर्याय (B) आठवी पंचवार्षिक योजना (1992-1997)

योग्य उत्तर आठवी पंचवार्षिक योजना (1992-1997 - पर्याय 2) आहे. - आठवी पंचवार्षिक योजना (1992-1997) आणि मानव विकास: - या योजनेचे सूत्रच 'मानव संसाधन विकास' (Human Resource Development) हे होते. - राष्ट्रीय साक्षरता मिशन (NLM) अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या...

प्रश्न #87 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
मनुष्य बळ विकास मंत्रालयाची पंडीत मदन मोहन मालवीय योजना.......साठी आहे.
1: संपूर्ण देशामध्ये हिंदी भाषेचा प्रसार
2: सांस्कृतिक शिक्षण उन्नत करणे
3: महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा विकास
4: संस्कृत शिक्षणातील संशोधन
EN The Pandit Madan Mohan Malaviya Mission of the Ministry of Human Resource Development is intended for:
1: Propagation of Hindi language across the country
2: Upgrading cultural education
3: Development and training of teachers at college and university levels
4: Research in Sanskrit education
  • (A) संपूर्ण देशामध्ये हिंदी भाषेचा प्रसार
  • (B) सांस्कृतिक शिक्षण उन्नत करणे
  • (C) महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा विकास
  • (D) संस्कृत शिक्षणातील संशोधन
अचूक उत्तर: पर्याय (C) महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा विकास

प्रश्न #88 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
जागतिकीकरणाचा शिक्षकांवरील परिणाम........हा आहे. अ) शिक्षकांकडे काही विशेष कौशल्य व कार्यनितींची आवश्यकता आहे. ब) अध्ययनार्थी बरोबर संवाद साधण्यासाठी नवीन मार्ग शिक्षकांजवळ असणे गरजेचे आहे. क) शिक्षक विद्यार्थ्यांना उपलब्ध असणे गरजेचे आहे. ड) शिक्षकांनी समुहामध्ये काम करणे गरजेचे आहे. पर्यायी उत्तरे :
1: अ अचूक आहे
2: अ आणि ब अचूक आहेत
3: फक्त क अचूक आहे
4: सर्व अचूक आहेत.
EN The impact of globalization on teachers includes:
a) Teachers require specialized skills and strategies.
b) Teachers need new communication pathways to interact with learners.
c) Teachers must be accessible to students.
d) Teachers need to work in groups/teams.
Answer options:
1: a is correct
2: a and b are correct
3: Only c is correct
4: All are correct
  • (A) अ अचूक आहे
  • (B) अ आणि ब अचूक आहेत
  • (C) फक्त क अचूक आहे
  • (D) सर्व अचूक आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व अचूक आहेत.

योग्य उत्तर सर्व अचूक आहेत (पर्याय 4). - जागतिकीकरण आणि शिक्षक भूमिकेतील बदल: - जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे शिक्षकांची भूमिका केवळ माहिती देणाऱ्या पारंपरिक शिक्षकाकडून ज्ञान सुलभकर्ता (Facilitator) म्हणून बदलली आहे. - अ) आधुनिक...

प्रश्न #89 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
योग्य कथन/ने ओळखा. अ) दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या 'पॉवर्टी अॅण्ड अनब्रिटिश रूल इन इंडिया' ग्रंथात 1867-68 मध्ये दारिद्र्य रेषेचा सर्वात जुना अंदाज रु. 16 ते रु. 35 दरडोई दर वर्ष केला आहे. ब) 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीने दरडोई दरमहा रु. 15 ते रु. 20 दारिद्र्य रेषा सुचविली आहे. पर्यायी उत्तरे
1: फक्त अ
2: फक्त ब
3: अ व ब दोन्ही
4: वरीलपैकी नाही
EN Identify the correct statement(s):
a) Dadabhai Naoroji in his book 'Poverty and Un-British Rule in India' formulated the earliest poverty line estimate for 1867-68 at Rs. 16 to Rs. 35 per capita per year.
b) In 1938, the National Planning Committee suggested a poverty line of Rs. 15 to Rs. 20 per capita per month.
Answer options:
1: Only a
2: Only b
3: Both a and b
4: None of the above
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब दोन्ही

योग्य उत्तर अ व ब दोन्ही सत्य (पर्याय 3) आहे. - विधानांचे विश्लेषण: - विधान अ सत्य आहे: भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांनी 1867-68 च्या किमतींवर आधारित 'जेल कॉस्ट ऑफ लिव्हिंग' (Jail cost of living) चा वापर करून भारतातील दारिद्र्य रेषेचा पहिला...

प्रश्न #90 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
1: ती संविधानात्मक यंत्रणा आहे.
2: संसदेने मंजूर केलेल्या मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 अंतर्गत ते स्थापन करण्यात आले.
3: आयोगाच्या अध्यक्षाची नेमणुक ही सहा वर्षाच्या कालावधीसाठी होते.
4: निवृत्तीनंतर अध्यक्ष पुढील नोकरीसाठी पात्र असतात.
EN Which of the following statements regarding the National Human Rights Commission (NHRC) is correct?
1: It is a constitutional body.
2: It was established under the Protection of Human Rights Act, 1993 passed by Parliament.
3: The Chairperson of the Commission is appointed for a term of six years.
4: After retirement, the Chairperson is eligible for further employment under the government.
  • (A) ती संविधानात्मक यंत्रणा आहे.
  • (B) संसदेने मंजूर केलेल्या मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 अंतर्गत ते स्थापन करण्यात आले.
  • (C) आयोगाच्या अध्यक्षाची नेमणुक ही सहा वर्षाच्या कालावधीसाठी होते.
  • (D) निवृत्तीनंतर अध्यक्ष पुढील नोकरीसाठी पात्र असतात.
अचूक उत्तर: पर्याय (B) संसदेने मंजूर केलेल्या मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 अंतर्गत ते स्थापन करण्यात आले.

योग्य उत्तर पर्याय 2 आहे. - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC): - स्थापना: 12 ऑक्टोबर 1993 रोजी संसदेने संमत केलेल्या 'मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993' (Protection of Human Rights Act, 1993) अन्वये करण्यात आली. - इतर विधानांमधील चुका: - विधान 1 चूक...

प्रश्न #91 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
योग्य कथने ओळखा: अ) मानवी हक्काच्या सार्वत्रिकतेच्या तत्वाचा अर्थ असा आहे की आपण सर्वजण आपल्या मानवी हक्कासाठी समान हकदार आहोत. ब) अविभाज्यताच्या तत्वांचा अर्थ असा आहे की, विशिष्ट परिस्थितीशिवाय व योग्य प्रक्रियेशिवाय अधिकार काढून घेऊ नये. क) मानवी हक्काच्या वैश्विक जाहिरनामाच्या अनुच्छेद 2 नुसार "सर्व मानव जन्माने स्वतंत्र आणि सन्मान व अधिकाराने समान असतात". पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ, ब
2: फक्त अ, क
3: फक्त ब, क
4: वरील सर्व
EN Identify the correct statement(s):
a) The principle of universality of human rights means that all human beings are equally entitled to human rights.
b) The principle of inalienability means that rights cannot be taken away except in specific situations and through due process.
c) According to Article 2 of the Universal Declaration of Human Rights, "All human beings are born free and equal in dignity and rights."
Answer options:
1: Only a and b
2: Only a and c
3: Only b and c
4: All of the above
  • (A) फक्त अ, ब
  • (B) फक्त अ, क
  • (C) फक्त ब, क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब

योग्य उत्तर फक्त अ आणि ब (पर्याय 1) आहे. - विधानांचे विश्लेषण: - विधान अ सत्य आहे: सार्वत्रिकता (Universality) म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग किंवा राष्ट्रीयतेचा भेद न करता जगातील सर्व मानवांना हे हक्क समानतेने मिळतात. - विधान ब सत्य आहे: अविभाज्यता /...

प्रश्न #92 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
मानवी हक्कांसाठी उच्चायुक्ताची भूमिका आहेत : अ) सर्व मानवी हक्कांचा प्रचार व संरक्षण करणे. ब) मानवी हक्कांबाबत सरकारांना मदत करणे. क) सर्व संयुक्त राष्ट्र कार्यक्रमामध्ये मानवी हक्काचा दृष्टिकोण रुजविणे. ड) नैतिक व आध्यात्मिक मूल्य रुजविणे. पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ, ब, ड
2: फक्त ब, क, ड
3: फक्त अ, क, ड
4: फक्त अ, ब, क
EN The role/mandate of the UN High Commissioner for Human Rights includes:
a) Promoting and protecting all human rights.
b) Assisting governments with human rights matters.
c) Mainstreaming a human rights perspective across all UN programs.
d) Inculcating moral and spiritual values.
Answer options:
1: Only a, b and d
2: Only b, c and d
3: Only a, c and d
4: Only a, b and c
  • (A) फक्त अ, ब, ड
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त अ, क, ड
  • (D) फक्त अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ, ब, क

योग्य उत्तर फक्त अ, ब, क (पर्याय 4) आहे. - संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त (UN High Commissioner for Human Rights - OHCHR): - 1993 च्या व्हिएन्ना मानवाधिकार परिषदेनंतर संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठराव 48/141 द्वारे हे पद निर्माण करण्यात आले...

प्रश्न #93 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
योग्य कथन /ने ओळखा (राज्य मानवाधिकार आयोग ) अ) आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना राज्याचे राज्यपाल पदावरून हटवू शकतात. ब) अध्यक्ष व सदस्यांचे वेतन व भत्ते राज्य सरकार द्वारे निर्धारित केले जातात. पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ
2: फक्त ब
3: अ व ब दोन्ही
4: यापैकी नाही
EN Identify the correct statement(s) regarding the State Human Rights Commission:
a) The Governor of the State can remove the Chairperson and members of the Commission from office.
b) The salaries and allowances of the Chairperson and members are determined by the State Government.
Answer options:
1: Only a
2: Only b
3: Both a and b
4: None of these
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

योग्य उत्तर फक्त ब (पर्याय 2) आहे. - राज्य मानवाधिकार आयोग (SHRC) - मानवी हक्क संरक्षण कायदा 1993: - विधान अ असत्य आहे: राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात, परंतु त्यांना पदावरून हटवण्याचा (दूर करण्याचा) अधिकार...

प्रश्न #94 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ? अ) लोकांची मानवी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार ही सर्वात महत्वाची संस्था आहे. ब) गैर-सरकारी संस्था मानवी सुरक्षेच्या उपक्रमांसाठी अनेक विशेष महत्वाची संसाधने आणतात. पर्यायी उत्तरे :
1: अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.
2: अ आणि ब दोन्ही चूक आहेत.
3: अ बरोबर आहे आणि ब चूक आहे.
4: अ चूक आहे आणि ब बरोबर आहे.
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) The government is the most crucial institution for ensuring human security of people.
b) Non-governmental organizations (NGOs) bring crucial specialized resources to human security initiatives.
Answer options:
1: Both a and b are correct.
2: Both a and b are incorrect.
3: a is correct and b is incorrect.
4: a is incorrect and b is correct.
  • (A) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.
  • (B) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.
  • (C) अ बरोबर आहे आणि ब चूक आहे.
  • (D) अ चूक आहे आणि ब बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत.

योग्य उत्तर अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत (पर्याय 1). - मानवी सुरक्षा (Human Security) संकल्पना: - मानवी सुरक्षा म्हणजे केवळ देशाच्या सीमांचे रक्षण नसून नागरिकांना भूक, रोगराई, गरिबी, नैसर्गिक आपत्ती आणि हिंसाचारापासून संरक्षण मिळणे होय ('भयापासून...

प्रश्न #95 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
जागतिक बँकेने सप्टेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेचा (अत्यंतिक दारिद्र्य रेषा) निकष सुधारून______प्रती व्यक्ती प्रती दिनाच्या ऐवजी______प्रती व्यक्ती प्रती दिन इतका वाढवला.
1: 1 डॉलर, 2 डॉलर
2: 1.85 डॉलर, 2.50 डॉलर
3: 1.75 डॉलर, 2.25 डॉलर
4: 1.90 डॉलर 2.15 डॉलर
EN In September 2022, the World Bank revised the international extreme poverty line criterion from ______ per person per day to ______ per person per day.
1: $1, $2
2: $1.85, $2.50
3: $1.75, $2.25
4: $1.90, $2.15
  • (A) 1 डॉलर, 2 डॉलर
  • (B) 1.85 डॉलर, 2.50 डॉलर
  • (C) 1.75 डॉलर, 2.25 डॉलर
  • (D) 1.90 डॉलर 2.15 डॉलर
अचूक उत्तर: पर्याय (D) 1.90 डॉलर 2.15 डॉलर

योग्य उत्तर 1.90 डॉलर वरून 2.15 डॉलर प्रती व्यक्ती प्रती दिन (पर्याय 4) आहे. - जागतिक बँकेची आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा (International Poverty Line): - सप्टेंबर 2022 मध्ये जागतिक बँकेने 2017 च्या क्रयशक्ती समता (Purchasing Power Parities - PPP)...

प्रश्न #96 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
अ) भारतीय संविधानानुसार 14 वर्षाहुन कमी वयाची व्यक्ती बालक होय.
ब) भारतीय जनगणनेतही 14 वर्षाहुन कमी वयाच्या व्यक्तीला बालक मानले जाते.
क) बाल अधिकार कन्वेशन (सी.आर.सी.) नुसार 18 वर्षाहुन कमी वयाची व्यक्ती बालक आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे / आहेत ?
EN a) According to the Constitution of India, a person below the age of 14 years is a child.
b) In the Census of India, a person below the age of 14 years is considered a child.
c) According to the Convention on the Rights of the Child (CRC), a person below the age of 18 years is a child.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क

बालक (Child) या संज्ञेच्या व्याख्या: 1. विधान 'अ' बरोबर आहे: भारतीय संविधानातील बालकांविषयक विशेष तरतुदींमध्ये 14 वर्षांखालील व्यक्तीला बालक मानले आहे: - कलम 24: 14 वर्षांखालील कोणत्याही बालकाला कारखान्यात वा खाणीत कामावर ठेवण्यास मनाई. - कलम 21A व...

प्रश्न #97 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
'पोक्सो' कायदा 2012 मधील तरतुदीनुसार मुलांचे खालीलपैकी कोणते हक्क आहेत ?
अ) मुलगा/मुलगी यांचा 'जबाब' अथवा ' म्हणणे' त्यांच्या घरी किंवा त्यांच्या पसंतीने निवडलेल्या ठिकाणी प्राधान्याने नागरी पोशाखातील महिला पोलीस अधिकारी अथवा उप-निरीक्षक पदापेक्षा खालच्या श्रेणीतील नसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यामार्फत नोंदविण्यात यावे.
ब) चौकशीच्या काळात मुलगा/मुलगी आरोपीच्या संपर्कात येणार नाही याची खात्री पोलीस अधिकाऱ्यांनी केली पाहिजे.
क) मुलगा/मुलगी यांना रात्री पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतले जाऊ शकते.
पर्यायी उत्तरे :
EN Under the provisions of the 'POCSO' Act 2012, which of the following are rights of children?
a) The statement of a child should be recorded at their residence or at a place of their choice, preferably by a woman police officer in civil clothes not below the rank of sub-inspector.
b) The police officer must ensure that the child does not come into contact with the accused during inquiry.
c) A child can be detained at a police station overnight.
Answer options:
  • (A) अ आणि ब
  • (B) अ, ब आणि क
  • (C) ब आणि क
  • (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

पोक्सो कायदा, 2012 (POCSO Act) अंतर्गत बालकांचे हक्क: बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO Act), 2012 च्या कलम 24 नुसार: 1. विधान 'अ' बरोबर आहे (कलम 24(1)): मुलाचा जबाब त्याच्या घरी किंवा त्याच्या पसंतीच्या ठिकाणी घेतला जावा, आणि तो शक्यतो...

प्रश्न #98 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
एकात्मीक बालविकास योजने (आय.सी.डी.एस.) संदर्भात खालीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे/आहेत ?
अ) ही योजना 2 ऑक्टोबर 1975 पासून सुरु करण्यात आली.
ब) ही योजना महात्मा गांधी यांच्या 108 व्या जयंती दिनी सुरु करण्यात आली.
क) या योजनेचा उद्देश बालकांच्या योग्य मानसीक, शारीरिक व सामाजिक विकासासाठी पाया घालणे हा आहे.
ड) सहा वर्षांखालील वयाच्या बालकांच्या पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणने.
पर्यायी उत्तरे :
EN Regarding the Integrated Child Development Services (ICDS), which of the following statement(s) is/are correct?
a) This scheme was launched on 2 October 1975.
b) This scheme was launched on the 108th birth anniversary of Mahatma Gandhi.
c) The objective of this scheme is to lay the foundation for proper psychological, physical, and social development of the child.
d) To bring about improvement in the nutritional and health status of children under six years of age.
Answer options:
  • (A) फक्त ड
  • (B) फक्त ब
  • (C) ब, क आणि ड
  • (D) अ, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, क आणि ड

एकात्मिक बाल विकास योजना (ICDS) - विधानांची पडताळणी: 1. विधान 'अ' बरोबर आहे: ICDS योजना 2 ऑक्टोबर 1975 रोजी प्रायोगिक तत्त्वावर 33 विकास प्रकल्पांमध्ये सुरू करण्यात आली. 2. विधान 'ब' चूक आहे: महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 चा आहे. त्यामुळे 2...

प्रश्न #99 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
अ) मुलांमधील पोषण पातळी सुधारणे हे मध्याह्न भोजन योजनेचे उद्दिष्ट्य आहे.
ब) मध्याह्न भोजन ही योजना जगातील सर्वांत मोठी शालेय आहार योजना आहे.
क) दारिद्र्य रेषेखालील मुलांसाठीची ही योजना आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
EN a) Improving nutritional levels among children is the objective of the Mid-Day Meal Scheme.
b) The Mid-Day Meal Scheme is the world's largest school feeding program.
c) This scheme is meant only for children living below the poverty line.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) अ, ब आणि क
  • (B) अ आणि क
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

प्रश्न #100 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
बालमजुरी समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणता कायदा केला ?
अ) फॅक्टरी कायदा
ब) खाण कायदा
क) बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा
ड) सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा हक्क कायदा
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following laws were enacted by the Government of India to address the problem of child labour?
a) Factories Act
b) Mines Act
c) Child Labour (Prohibition and Regulation) Act
d) Right to Free and Compulsory Education Act
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) क आणि ड
  • (C) अ, क आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स