⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

राज्याचा महाधिवक्ता (Advocate General)

Advocate General of the State — Indian Polity & Constitution

'राज्याचा महाधिवक्ता (Advocate General)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 63 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 1 / 4
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 63)
प्रश्न #1 📅 MPSC Pre 2026
+1.0 / -0.25
राज्याच्या महाअधिवक्त्याचे पारिश्रमिक (remuneration) कोण निर्धारित करतात ?
EN Who determines the remuneration of the Advocate General of the State?
  • (A) संसद
  • (B) राष्ट्रपती
  • (C) विधानसभा
  • (D) राज्यपाल
अचूक उत्तर: पर्याय (D) राज्यपाल

योग्य उत्तर: पर्याय ४ (राज्यपाल) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद १६५(३): "महा अधिवक्त्याला राज्यपाल निर्धारित करतील असे पारिश्रमिक मिळेल" (*The Advocate-General shall receive such remuneration as the Governor may determine*). २. घटनात्मक वैशिष्ट्य...

प्रश्न #2 📅 Combine Group B Pre 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
(a) 1 में 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले.
(b) महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल.
(c) बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. (ऑगस्ट 2025)
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct?
(a) The office of the Advocate General of Maharashtra came into existence with the formation of Maharashtra State on 1 May 1960.
(b) The Advocate General is appointed in accordance with the provisions of Article 165 of the Indian Constitution.
(c) Birendra Saraf is the Advocate General of Maharashtra. (August 2025)
Alternative Answers:
  • (A) (a) आणि (c)
  • (B) (b) आणि (c)
  • (C) (a) आणि (b)
  • (D) (a), (b) आणि (c)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a), (b) आणि (c)

योग्य उत्तर: पर्याय ४ ((a), (b) आणि (c)) सविस्तर स्पष्टीकरण: सर्व विधानांचे वस्तुनिष्ठ परीक्षण: - विधान (a) बरोबर आहे: १ मे १९६० रोजी मुंबई पुनर्रचना कायद्यान्वये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय...

प्रश्न #3 📅 Group C Mains 2024
+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
अ. प्रत्येक राज्याचा राज्यपाल, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महा अधिवक्ता म्हणून नियुक्त करील.
ब. महा अधिवक्ता राज्यपालाची मर्जी असे पर्यंत पद धारण करील आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करील असे पारिश्रमिक मिळेल.
EN Identify the correct statement(s):
(a) The Governor of each State shall appoint a person who is qualified to be appointed a Judge of a High Court to be Advocate-General for the State.
(b) The Advocate-General shall hold office during the pleasure of the Governor, and shall receive such remuneration as the State Legislature may determine.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ व ब दोन्ही
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

योग्य उत्तर: पर्याय १ (फक्त अ) सविस्तर स्पष्टीकरण: विधानांचे विश्लेषण: - विधान 'अ' बरोबर आहे: अनुच्छेद १६५(१) नुसार प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र व्यक्तीची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करतो. - विधान...

प्रश्न #4 📅 Combine Group B Pre 2024
+1.0 / -0.25
राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ?
EN Who among the following has the authority to appoint the Advocate General of the State?
  • (A) मुख्यमंत्री
  • (B) राज्यपाल
  • (C) राज्य निर्वाचन आयुक्त
  • (D) राज्य लोकसेवा आयोग
अचूक उत्तर: पर्याय (B) राज्यपाल

योग्य उत्तर: पर्याय २ (राज्यपाल) सविस्तर स्पष्टीकरण: १. कलम १६५(१): संविधानाच्या कलम १६५(१) नुसार राज्याच्या महाधिवक्त्याची निवड/नियुक्ती करण्याचा घटनात्मक अधिकार राज्यपालांना आहे. २. सल्ला: ही नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील...

प्रश्न #5 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
भारतीय संविधानाच्या कलम 165 च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे?
EN With reference to Article 165 of the Indian Constitution, who is the legal advisor of the State Government?
  • (A) सॉलिसिटर जनरल
  • (B) अतिरिक्त सरकारी वकील
  • (C) महाधिवक्ता
  • (D) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
अचूक उत्तर: पर्याय (C) महाधिवक्ता

योग्य उत्तर: पर्याय ३ (महाधिवक्ता) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद १६५: भारतीय संविधानाच्या कलम १६५ अंतर्गत राज्य सरकारचे कायदेशीर सल्लागार आणि सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून महाधिवक्ता (Advocate General) यांची तरतूद आहे. २. इतर पर्याय: - सॉलिसिटर...

प्रश्न #6 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात येते ?
EN Under which Article of the Indian Constitution is the Advocate General appointed?
  • (A) कलम १६१
  • (B) कलम १६३
  • (C) कलम १६५
  • (D) कलम १६७
अचूक उत्तर: पर्याय (C) कलम १६५

योग्य उत्तर: पर्याय ३ (कलम १६५) सविस्तर स्पष्टीकरण: १. कलम १६५: या कलमान्वये राज्याच्या महाधिवक्ता पदाची निर्मिती, पात्रता व नियुक्ती केली जाते. २. इतर कलमांचे स्पष्टीकरण: - कलम १६१: राज्यपालांचा क्षमादानाचा अधिकार (Pardoning powers of the...

प्रश्न #7 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
A. भारतीय राज्यघटनेतील कलम 165 नुसार महाधिवक्त्याची नेमणूक केली जाते.
B. महाधिवक्ता महाराष्ट्र विधान सभा व विधान परिषदेच्या बैठकांना उपस्थित राहू शकतो.
EN Consider the following statements:
A. The Advocate General is appointed under Article 165 of the Indian Constitution.
B. The Advocate General can attend the meetings of Maharashtra Legislative Assembly and Legislative Council.
  • (A) A आणि B सत्य
  • (B) A सत्य आणि B असत्य
  • (C) A असत्य आणि B सत्य
  • (D) A आणि B असत्य
अचूक उत्तर: पर्याय (A) A आणि B सत्य

योग्य उत्तर: पर्याय १ (A आणि B सत्य) सविस्तर स्पष्टीकरण: - विधान A सत्य आहे: भारतीय राज्यघटनेतील कलम १६५ नुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक केली जाते. - विधान B सत्य आहे: संविधानाच्या कलम १७७ (सभागृहांबाबत मंत्र्यांचे व महाधिवक्त्याचे हक्क)...

प्रश्न #8 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
'महाधिवक्ता' या संबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ. महाधिवक्ता व त्यांचे कार्यालय हे राज्यशासनाच्या हितसंबंधाचा बचाव व संरक्षण करते आणि राज्यशासनास आपली धोरणे ठरविण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्याबाबत मौल्यवान असे कायदेशिर मार्गदर्शन करते.
ब. महाधिवक्ता हा फौजदारी खटल्यातील आरोपी व्यक्तिचा बचाव राज्यशासनाच्या परवानगीशिवाय करु शकत नाही.
EN Consider the following statements regarding the 'Advocate General':
(a) The Advocate General and his office defend and protect the interests of the State Government and provide valuable legal guidance in framing and implementing policies.
(b) The Advocate General cannot defend an accused person in criminal proceedings without the permission of the State Government.
  • (A) विधान 'अ' बरोबर
  • (B) विधान 'ब' बरोबर
  • (C) दोन्हीही विधाने बरोबर
  • (D) दोन्हीही विधाने चूकीची
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्हीही विधाने बरोबर

योग्य उत्तर: पर्याय ३ (दोन्हीही विधाने बरोबर) सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान 'अ' बरोबर आहे: महाधिवक्ता हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी (Highest Law Officer) असतात. ते राज्यशासनाच्या हिताचे संरक्षण करतात, न्यायालयात सरकारची बाजू मांडतात आणि...

प्रश्न #9 📅 Combine Group B & C Pre 2023
+1.0 / -0.25
महाधिवक्त्या बद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
EN Which of the following statements about the Advocate General is false?
  • (A) 'महाधिवक्त्याची' नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात
  • (B) राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्यसरकारला सल्ला देतात
  • (C) राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात
  • (D) संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्ये ते पार पाडतात
अचूक उत्तर: पर्याय (A) 'महाधिवक्त्याची' नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात

योग्य उत्तर: पर्याय १ ('महाधिवक्त्याची' नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात हे विधान असत्य आहे) सविस्तर स्पष्टीकरण: १. नियुक्ती (अनुच्छेद १६५(१)): प्रत्येक राज्याचा राज्यपाल, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त...

प्रश्न #10 📅 Industry Inspector Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते कलम राज्याच्या महाधिवक्ताशी संबंधित आहे ?
EN Which of the following Articles is related to the Advocate General of a State?
  • (A) कलम - 194
  • (B) कलम - 177
  • (C) कलम - 197
  • (D) कलम 165
अचूक उत्तर: पर्याय (D) कलम 165

प्रश्न #11 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
EN Which of the following statements is correct regarding the Advocate General of the State?
  • (A) तो राज्याच्या मंत्री परिषदेची ईच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो.
  • (B) त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते.
  • (C) तो राज्यशासना विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो.
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही

योग्य उत्तर: पर्याय ४ (वरीलपैकी एकही नाही) सविस्तर स्पष्टीकरण: दिलेल्या सर्व विधानांचे वस्तुनिष्ठ परीक्षण: - विधान १ चुकीचे आहे: संविधानाच्या कलम १६५(३) नुसार महाधिवक्ता हा राज्यपालाची मर्जी (pleasure of the Governor) असेपर्यंत पद धारण करतो...

प्रश्न #12 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
राज्याच्या महाधिवक्त्याच्या नियुक्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक असते.
ब) न्यायिक पदावर त्याने दहा वर्षे काम केले असले पाहिजे. किंवा
क) उच्च न्यायालयात त्याने दहा वर्षे वकिली केली असली पाहिजे. किंवा
ड) राज्यपालांच्या मते तो निष्णात/अग्रगण्य कायदेपंडीत असला पहिजे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements regarding the appointment of the Advocate General of a State:
(a) He must possess the qualifications required to be appointed as a Judge of a High Court.
(b) He must have held a judicial office for 10 years, or
(c) He must have been an advocate of a High Court for 10 years, or
(d) In the opinion of the Governor, he must be a distinguished jurist.
Which of the above statements are correct?
  • (A) अ, ब, क फक्त
  • (B) ब, क, ड फक्त
  • (C) अ, ब, क, ड
  • (D) अ, ब, ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब, क फक्त

योग्य उत्तर: पर्याय १ (अ, ब, क फक्त) सविस्तर स्पष्टीकरण: १. कलम २१७(२) - उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता: - ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. - (ब) तिने भारताच्या राज्यक्षेत्रात किमान १० वर्षे न्यायिक पदावर (Judicial Office) काम केलेले असावे...

प्रश्न #13 📅 Group C Pre 2020
+1.0 / -0.25
राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्या जवळ असणे आवश्यक असते.
ब) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेषाधिकार व फायदे - संरक्षण त्यास मिळतात.
क) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते.
ड) त्याचा कार्यकाळ पाच वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे / त ?
EN Consider the following statements regarding the Advocate General of the State:
(a) He must possess the qualifications required to be appointed as a Judge of a High Court.
(b) He receives all privileges, benefits and protections available to a High Court Judge.
(c) He receives the remuneration payable to a High Court Judge.
(d) His tenure is for 5 years or until the age of 62 years.
Which of the statements given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ, ब आणि क
  • (D) ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

योग्य उत्तर: पर्याय १ (फक्त अ) सविस्तर स्पष्टीकरण: - विधान (अ) बरोबर आहे: अनुच्छेद १६५(१) नुसार महाधिवक्त्याकडे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक ती सर्व अर्हता असणे गरजेचे असते. - विधान (ब) चूक आहे: त्याला आमदाराप्रमाणे (विधानमंडळ...

प्रश्न #14 📅 Combine Group C Pre 2019
+1.0 / -0.25
राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो?
EN To whom does the Advocate General of a State submit his resignation?
  • (A) राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश
  • (B) संबंधित राज्याचा राज्यपाल
  • (C) भारताचा राष्ट्रपती
  • (D) संबंधित राज्याचा मुख्यमंत्री
अचूक उत्तर: पर्याय (B) संबंधित राज्याचा राज्यपाल

योग्य उत्तर: पर्याय २ (संबंधित राज्याचा राज्यपाल) सविस्तर स्पष्टीकरण: १. घटनात्मक तरतूद: भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६५(३) नुसार, राज्याचा महाधिवक्ता हा राज्यपालाची मर्जी असेपर्यंत (during the pleasure of the Governor) पद धारण करतो. २. राजीनामा...

प्रश्न #15 📅 Tax Assistant Mains 2019
+1.0 / -0.25
महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN Which of the following statements is correct regarding the Advocate General?
  • (A) उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा विचार घेवून राज्यपाल नियुक्ती करतात.
  • (B) मंत्रिमंडळाची इच्छा असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात.
  • (C) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा व्यक्तीस नेमात येईल.
  • (D) भारतातील कोणत्याही न्यायालयात सुनावणीचा त्यास अधिकार आहे.
अचूक उत्तर: पर्याय (C) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा व्यक्तीस नेमात येईल.

योग्य उत्तर: पर्याय ३ (उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा व्यक्तीस नेमात येईल) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद १६५(१): "प्रत्येक राज्याचा राज्यपाल, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास...

प्रश्न #16 📅 Forest Service Mains 2018
+1.0 / -0.25
खालील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
EN Which of the following statements is incorrect?
  • (A) राज्यघटनेचा भाग V मधील प्रकरण I हे राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी आहे.
  • (B) राज्यघटनेचे अनुच्छेद 165 हे राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधात आहे.
  • (C) राज्यघटनेचे अनुच्छेद 177 हे राज्य विधिमंडळाची सभागृहे आणि समिती या संदर्भातील राज्याच्या महाधिवक्त्याच्या अधिकारांशी संबंधित आहे.
  • (D) राज्यघटनेचे अनुच्छेद 194 हे राज्याच्या महाधिवक्त्याचे अधिकार, विशेषाधिकार आणि कायदेशीर संरक्षण या संबंधी आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) राज्यघटनेचा भाग V मधील प्रकरण I हे राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी आहे.

योग्य उत्तर: पर्याय १ (राज्यघटनेचा भाग V मधील प्रकरण I हे राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी आहे हे विधान अयोग्य आहे) सविस्तर स्पष्टीकरण: १. भाग V (संघराज्य / The Union): यात केंद्र शासनाची तरतूद असून प्रकरण १ मध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्रिमंडळ...

प्रश्न #17 📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
राज्यांच्या महाधिवक्त्यांसंबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ) उच्च न्यायालयाचा न्यायधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता असते ती त्याच्याजवळ असणे आवश्यक असते.
ब) उच्च न्यायालयाच्या न्यायधीशास असणारे सर्व विशेषाधिकार फायदे व संरक्षण त्याला असते.
क) उच्च न्यायालयाच्या न्यायधीशास जे मानधन असते ते त्यास मिळते.
ड) राज्य मंत्रिमंडळाची मर्जी असेपर्यंत तो आपल्या पदावर राहतो.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements regarding the Advocate General of a State:
(a) He must possess the qualifications required to be appointed as a Judge of a High Court.
(b) He enjoys all the privileges, benefits, and immunities of a High Court Judge.
(c) He receives the remuneration payable to a High Court Judge.
(d) He holds office during the pleasure of the State Council of Ministers.
Which of the statements given above is/are correct?
  • (A) अ, ब, ड
  • (B) अ, ब, क
  • (C) फक्त ड
  • (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ

योग्य उत्तर: पर्याय ४ (फक्त अ) सविस्तर स्पष्टीकरण: विधानांचे विश्लेषण: - विधान (अ) बरोबर आहे: अनुच्छेद १६५(१) नुसार महाधिवक्ता म्हणून नियुक्त होणाऱ्या व्यक्तीकडे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची आवश्यक अर्हता असणे बंधनकारक आहे...

प्रश्न #18 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
विधान (A) : राज्यघटनेच्या अनुच्छेद 76 मध्ये भारताच्या महालेखापरिक्षकाच्या नेमणुकीबाबत आणि सेवाशर्तीबाबत तरतूदी आहेत.
कारण (R) : त्याला घटनात्मक संरक्षण नसल्यास तो स्वतंत्रपणे कार्य करू शकणार नाही.
EN Assertion (A): Article 76 of the Constitution contains provisions regarding the appointment and conditions of service of the Comptroller and Auditor General of India.
Reason (R): Without constitutional protection, he cannot function independently.
  • (A) विधान A आणि R दोन्हीही बरोबर असून R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे.
  • (B) विधान A आणि R दोन्हीही बरोबर असून R हे A चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  • (C) विधान A बरोबर परंतु R चुकीचे
  • (D) विधान A चुकीचे परंतु R हे बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) विधान A चुकीचे परंतु R हे बरोबर

योग्य उत्तर: पर्याय ४ (विधान A चुकीचे परंतु R हे बरोबर) सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान (A) चुकीचे आहे: - संविधानाचे अनुच्छेद ७६ हे 'भारताचा महान्यायवादी' (Attorney General of India) या पदाशी संबंधित आहे. - भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक...

प्रश्न #19 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
राज्याच्या महाधिवक्त्याविषयी खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.
अ) राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालामार्फत केली जाते.
ब) ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात.
क) त्यांना विधीमंडळ सदस्याप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त असते.
ड) ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात.
पर्यायी उत्तरे :
EN Select the correct statement(s) regarding the Advocate General of the State:
(a) The Advocate General of the State is appointed by the Governor.
(b) He is the highest law officer of the State.
(c) He is entitled to privileges and immunities like a member of the State Legislature.
(d) He is not a full-time counsel for the State Government.
Alternative Answers:
  • (A) अ, ब, ड
  • (B) ब, क, ड
  • (C) अ, ब, क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रश्न #20 📅 PSI Pre 2016
+1.0 / -0.25
घटक राज्याच्या ‘महाधिवक्ता' पदाबाबत खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही?
EN Which of the following statements is NOT correct regarding the post of 'Advocate General' of a State?
  • (A) कलम 165 नुसार राज्याच्या ‘महाधिवक्ता' पदाची तरतुद केली आहे.
  • (B) त्यांच्या कार्यकालाबाबत राज्यघटनेत काही सांगितले नाही.
  • (C) भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन, भत्ते व सवलती मिळतात.
  • (D) राज्य विधानमंडळ सदस्यांना मिळणारे सर्व विशेषाधिकार उपभोगता येतात.
अचूक उत्तर: पर्याय (C) भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन, भत्ते व सवलती मिळतात.

योग्य उत्तर: पर्याय ३ (भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन, भत्ते व सवलती मिळतात हे विधान बरोबर नाही) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद १६५(३): महाधिवक्त्याला राज्यपालांनी निश्चित केलेले पारिश्रमिक मिळते ("shall receive such...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स