⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC / BNSS) (पृष्ठ 2)

Code of Criminal Procedure / BNSS — Indian Polity & Constitution

'फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC / BNSS)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 255 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 2 / 13
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 255)
प्रश्न #21 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
कलम 55A, फौजदारी प्रक्रिया संहितानुसार आरोपीचा ताबा असणाऱ्या व्यक्तीची खालीलपैकी कोणती जवाबदारी आहे ?
EN Under Section 55A of the Code of Criminal Procedure, what is the duty of the person having the custody of an accused?
  • (A) आरोपीला अटक केल्यापासून 24 तासाच्या आत दंडाधिकाऱ्या समोर हजर करणे
  • (B) आरोपीच्या आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घेणे
  • (C) आरोपीला मोफत कायदेशीर सल्ला देण्या संबंधीची मदत करणे
  • (D) आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासंबंधीत मदत करणे
अचूक उत्तर: पर्याय (B) आरोपीच्या आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घेणे

अचूक उत्तर: पर्याय (२) आरोपीच्या आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घेणे सविस्तर विश्लेषण: - फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम 55A (अटक केलेल्या व्यक्तीचे आरोग्य व सुरक्षितता): - कलम 55A हे CrPC सुधारणा कायदा, 2008 द्वारे समाविष्ट करण्यात आले. - या...

प्रश्न #22 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
बळींना नुकसान भरपाई योजनेतंर्गत अपराधामुळे बळीला झालेले नुकसान किंवा दुखापतीसाठी नुकसान भरपाई रक्कमेचा निवाडा कोण देऊ शकतो ?
EN Under the Victim Compensation Scheme, who determines the quantum of compensation to be awarded to a victim for loss or injury caused by an offence?
  • (A) राज्य सरकार
  • (B) केंद्र सरकार
  • (C) जिल्हा/राज्य कायदेविषयक सेवा प्राधिकरण
  • (D) न्यायालय
अचूक उत्तर: पर्याय (C) जिल्हा/राज्य कायदेविषयक सेवा प्राधिकरण

अचूक उत्तर: पर्याय (३) जिल्हा/राज्य कायदेविषयक सेवा प्राधिकरण सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 357A (बळींना नुकसानभरपाई योजना - Victim Compensation Scheme): - कलम 357A(1) नुसार, राज्य शासन केंद्र सरकारच्या समन्वयाने पीडितांना किंवा त्यांच्या वारसांना...

प्रश्न #23 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील कलम _______ मध्ये नागरी बळाचा वापर करून जमाव पांगवण्या संदर्भातील तरतूद दिलेली आहे.
EN Under Section ...... of the Code of Criminal Procedure, 1973, dispersal of an assembly by use of civil force is provided.
  • (A) 125
  • (B) 127
  • (C) 128
  • (D) 129
अचूक उत्तर: पर्याय (D) 129

अचूक उत्तर: पर्याय (४) 129 सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 129 (नागरी बळाचा वापर करून जमाव पांगवणे): - कलम 129 नुसार, कोणताही कार्यकारी दंडाधिकारी (Executive Magistrate) किंवा पोलीस ठाण्याचा अंमलदार (किंवा उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नसलेला पोलीस...

प्रश्न #24 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन होऊ शकतो ?
EN Under which of the following sections of the Code of Criminal Procedure is a police control room established in every district?
  • (A) कलम 41A
  • (B) कलम 41B
  • (C) कलम 41C
  • (D) कलम 41D
अचूक उत्तर: पर्याय (C) कलम 41C

अचूक उत्तर: पर्याय (३) कलम 41C सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 41C (जिल्हा व राज्य पातळीवर नियंत्रण कक्ष - Control room at districts): - कलम 41C हे 2008 च्या सुधारणा कायद्यानुसार समाविष्ट करण्यात आले. - कलम 41C(1) नुसार, राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यात...

प्रश्न #25 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
जेव्हा तपास चोवीस तासात संपविणे शक्य नसेल तेव्हा अनुसरायची प्रक्रिया फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ________ मध्ये नमूद केली आहे.
EN The procedure to be followed when investigation cannot be completed in twenty-four hours is provided under Section ...... of the Code of Criminal Procedure.
  • (A) 166
  • (B) 169
  • (C) 167
  • (D) 168
अचूक उत्तर: पर्याय (C) 167

अचूक उत्तर: पर्याय (३) 167 सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 167 (चोवीस तासांत तपास पूर्ण न झाल्यास प्रक्रिया - रिमांड): - कलम 167(1) नुसार, जेव्हा कलम 57 अन्वये विहित केलेल्या 24 तासांच्या आत तपास पूर्ण करणे शक्य नसते आणि आरोपीविरुद्ध आरोप सयुक्तिक...

प्रश्न #26 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील कलम 6 नुसार, उच्च न्यायालय व या संहितेहून अन्य कोणत्याही कायद्याद्वारे गठित झालेल्या न्यायालयांशिवाय फौजदारी न्यायालयाचे प्रत्येक राज्यात एकूण ______ वर्ग दिलेले आहेत.
EN Under Section 6 of the Code of Criminal Procedure, 1973, besides the High Courts and courts constituted under any law other than this Code, there are ...... classes of Criminal Courts in every State.
  • (A) 4
  • (B) 5
  • (C) 6
  • (D) 8
अचूक उत्तर: पर्याय (A) 4

अचूक उत्तर: पर्याय (१) 4 सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 6 (फौजदारी न्यायालयांचे वर्ग - Classes of Criminal Courts): - कलम 6 नुसार, उच्च न्यायालये आणि या संहितेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कायद्याखाली गठित झालेली न्यायालये वगळता, प्रत्येक राज्यात खालील...

प्रश्न #27 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील कलम _________ मध्ये साक्षीदारावर डाकेने समन्सची बजावणी करण्याची प्रक्रिया दिलेली आहे.
EN Under Section ...... of the Code of Criminal Procedure, 1973, the procedure for service of summons on witness by post is provided.
  • (A) 66
  • (B) 67
  • (C) 68
  • (D) 69
अचूक उत्तर: पर्याय (D) 69

अचूक उत्तर: पर्याय (४) 69 सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 69 (साक्षीदारावर डाकेने समन्सची बजावणी - Service of summons on witness by post): - कलम 69 नुसार, साक्षीदाराला समन्स बजावताना न्यायालय समन्सची एक प्रत नोंदणीकृत डाकेने (Registered Post)...

प्रश्न #28 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील कलम _____ मध्ये 'दखलपात्र अपराध करण्याचा बेत रचण्यात आल्याची खबर' देण्या संबंधीची तरतूद दिलेली आहे.
EN Under Section ...... of the Code of Criminal Procedure, 1973, provision is made regarding 'information of design to commit cognizable offences'.
  • (A) 149
  • (B) 150
  • (C) 151
  • (D) 152
अचूक उत्तर: पर्याय (B) 150

प्रश्न #29 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
कलम 41D, फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत खालीलपैकी कोणता अधिकार हा अटक झालेल्या व्यक्तिला दिलेला आहे ?
EN Under Section 41D of the Code of Criminal Procedure, which of the following rights is given to an arrested person?
  • (A) आपल्या पसंतीच्या वकिलाला भेटण्याचा अधिकार
  • (B) मोफत कायदेविषयक मदत घेण्याचा अधिकार
  • (C) आपल्या नातेवाईकानां स्वतःच्या अटके संबंधी सांगण्याचा अधिकार
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) आपल्या पसंतीच्या वकिलाला भेटण्याचा अधिकार

अचूक उत्तर: पर्याय (१) आपल्या पसंतीच्या वकिलाला भेटण्याचा अधिकार सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 41D (चौकशीदरम्यान पसंतीच्या वकिलाला भेटण्याचा अटक व्यक्तीचा अधिकार): - कलम 41D हे CrPC सुधारणा कायदा, 2008 द्वारे समाविष्ट करण्यात आले. - या कलमानुसार...

प्रश्न #30 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या तरतूदीं अनुसार एखाद्या व्यक्तीची अटक ही :
अ. फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 तील प्रावधानानुसार असावी.
ब. कोणताही अन्य कायद्यातील प्रावधानानुसार असावी जो कायदा अटकेची तरतूद करतो.
क. न्यायालयाचा संमतीने असावी.
वरीलपैकी कोणते/ती विधान बरोबर आहे/त ?
EN Under the provisions of the Code of Criminal Procedure, 1973, an arrest of a person must be:
(a) In accordance with the provisions of the Code of Criminal Procedure, 1973.
(b) In accordance with the provisions of any other law providing for arrest.
(c) With the consent of the Court.
Which of the above statements is/are correct?
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) अ, ब आणि क
  • (C) फक्त अ
  • (D) फक्त अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ आणि ब

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ आणि ब सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 60A (अटक काटेकोरपणे संहितेनुसारच केली जाणे): - कलम 60A हे CrPC सुधारणा कायदा, 2008 द्वारे समाविष्ट करण्यात आले. - या कलमानुसार, कोणतीही अटक ही केवळ: (अ) फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973...

प्रश्न #31 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत अंगझडती अथवा जागेची झडती घेण्यात येते. त्याबाबत खाली काही पर्याय दिलेले असून कंसामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम नमूद करण्यात आले आहे. नमूद पर्यायामधून फौजदारी प्रक्रिया संहिता प्रमाणे योग्य कलमाचा समावेश नसलेला पर्याय निवडा.
EN Under the Code of Criminal Procedure, personal search or search of a place is conducted. Options are given below with the respective section of the Cr.P.C. in brackets. Choose the option that does not correctly match the section:
  • (A) संशयित व्यक्ती स्वतः चे अस्तित्व लपवित असेल अशावेळी अटक करताना [CrPC कलम 46]
  • (B) अंगझडती तपासणीमध्ये शस्त्र आहे किंवा कसे याबाबतची झडती घेणे [CrPC कलम 52]
  • (C) व्यक्तीला बेकायदेशीर डांबून ठेवले असल्यास घेतलेली जागेची झडती [CrPC कलम 97]
  • (D) बंद जागेच्या ठिकाणी जागा मालकाकडे झडती घ्यावयाची असल्यास (सर्वसाधारण झडती प्रक्रिया) [CrPC कलम 100]
अचूक उत्तर: पर्याय (A) संशयित व्यक्ती स्वतः चे अस्तित्व लपवित असेल अशावेळी अटक करताना [CrPC कलम 46]

अचूक उत्तर: पर्याय (१) संशयित व्यक्ती स्वतः चे अस्तित्व लपवित असेल अशावेळी अटक करताना [CrPC कलम 46] सविस्तर विश्लेषण: - कलमांचा अचूक ताळमेळ आणि विसंगती: - पर्याय (१) विसंगत आहे: कलम 46 हे 'अटक कशी करावी' (Arrest how made) याविषयी आहे. जर संशयित...

प्रश्न #32 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 176 आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मार्गदर्शक तत्त्वांनुसार दंडाधिकारी चौकशी अनिवार्य आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 176 प्रमाणे न्यायिक दंडाधिकारी चौकशी बाबत खालीलपैकी अयोग्य पर्यायाची निवड करा.
EN Magisterial inquiry is mandatory under Section 176 of the Code of Criminal Procedure and guidelines of the NHRC. Select the incorrect option regarding mandatory judicial inquiry under Section 176 of the Cr.P.C.:
  • (A) पोलीस अधिकारी रजेवर असताना त्याचे हातून मालमत्तेच्या वादातून नागरिकाचा खून होणे.
  • (B) पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेली केस.
  • (C) पोलीस कोठडीमध्ये असताना महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप होणे.
  • (D) कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीस कार्यवाही दरम्यान मनुष्याचा मृत्यू होणे.
अचूक उत्तर: पर्याय (A) पोलीस अधिकारी रजेवर असताना त्याचे हातून मालमत्तेच्या वादातून नागरिकाचा खून होणे.

अचूक उत्तर: पर्याय (१) पोलीस अधिकारी रजेवर असताना त्याचे हातून मालमत्तेच्या वादातून नागरिकाचा खून होणे. सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 176(1A) आणि NHRC मार्गदर्शक तत्त्वे (अनिवार्य दंडाधिकारी चौकशी): - कलम 176(1A) नुसार, जेव्हा: 1. पोलीस कोठडीत किंवा...

प्रश्न #33 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
कलम 41B, फौजदारी प्रक्रिया संहितानुसार अटक पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून कमीत कमी किती व्यक्तींची सही असावी ?
EN Under Section 41B of the Code of Criminal Procedure, the memorandum of arrest shall be attested by at least how many witnesses?
  • (A) एक
  • (B) दोन
  • (C) तीन
  • (D) शून्य
अचूक उत्तर: पर्याय (A) एक

अचूक उत्तर: पर्याय (१) एक सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 41B (अटक पंचनाम्यावर साक्षीदार): - कलम 41B(b) अन्वये अटक करणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने अटकेचा मेमो (Memorandum of Arrest) तयार केला पाहिजे. - हा मेमो किमान एका साक्षीदाराद्वारे (at least...

प्रश्न #34 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता च्या खालीलपैकी कोणत्या तरतूदी अंतर्गत बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीचे वैद्यकीय तपासणी होते ?
EN Under which of the following provisions of the Code of Criminal Procedure is the medical examination of a person accused of rape conducted?
  • (A) 53A
  • (B) 50A
  • (C) 55A
  • (D) 54A
अचूक उत्तर: पर्याय (A) 53A

अचूक उत्तर: पर्याय (१) 53A सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 53A (बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी): - CrPC सुधारणा कायदा, 2005 द्वारे कलम 53A समाविष्ट करण्यात आले. - जेव्हा एखाद्या व्यक्तीला बलात्काराच्या किंवा बलात्काराचा प्रयत्न...

प्रश्न #35 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
न्यायालय देशविरोधी अपराधांची दखल फक्त _______ च्या पूर्व संमंती ने घेऊ शकते.
EN A court can take cognizance of offences against the State only with the prior sanction of:
  • (A) सर्वोच्च न्यायालय
  • (B) उच्च न्यायालय
  • (C) निःपक्ष सल्लागार (ॲमिकस कुरिया)
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी कोणतेही नाही

प्रश्न #36 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
लोकसेवका विरुद्ध खटला चालविण्या करीता लागणारा कलम 197 फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गतचा शासन पूर्व संमंतीचा आदेश ही ________ कृती आहे.
EN An order of prior sanction of the Government under Section 197 of the Code of Criminal Procedure for prosecuting a public servant is an act of:
  • (A) प्रशासकीय
  • (B) न्यायिक
  • (C) जणू काही न्यायिक
  • (D) वैधानिक
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रशासकीय

अचूक उत्तर: पर्याय (१) प्रशासकीय सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 197 मधील शासन संमतीचे स्वरूप: - कलम 197 अन्वये लोकसेवकावर खटला चालवण्यासाठी शासनाची पूर्व संमती आवश्यक असते. - सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्थापित न्यायनिर्णयानुसार, शासनाकडून खटला...

प्रश्न #37 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
प्रत्येक सत्र न्यायालय, ________ ने नियुक्त करावयाचा अशा न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली असेल.
EN Every Court of Session shall be presided over by a Judge, to be appointed by the:
  • (A) सर्वोच्च न्यायालय
  • (B) उच्च न्यायालय
  • (C) महानगर न्यायालय
  • (D) राज्यपाल
अचूक उत्तर: पर्याय (B) उच्च न्यायालय

अचूक उत्तर: पर्याय (२) उच्च न्यायालय सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 9 (सत्र न्यायालय): - कलम 9(1) नुसार, राज्य शासन प्रत्येक सत्र विभागासाठी एक सत्र न्यायालय स्थापन करते. - कलम 9(2) नुसार, प्रत्येक सत्र न्यायालय अशा न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली असेल...

प्रश्न #38 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील प्रकरण _______ मध्ये वस्तू हजर करण्याची सक्ती करण्याच्या आदेशांच्या तरतूदी दिलेल्या आहेत.
EN In Chapter ...... of the Code of Criminal Procedure, 1973, provisions for processes to compel the production of things are given.
  • (A) VI
  • (B) VII
  • (C) VIII
  • (D) IX
अचूक उत्तर: पर्याय (B) VII

अचूक उत्तर: पर्याय (२) VII सविस्तर विश्लेषण: - CrPC प्रकरण VII (वस्तू हजर करण्याची सक्ती करण्याचे आदेश): - प्रकरण VII मध्ये कलम 91 ते 105 चा समावेश होतो. - यामध्ये दस्तऐवज किंवा वस्तू सादर करण्यासाठी समन्स (कलम 91), शोध वॉरंट (कलम 93 ते 98) आणि...

प्रश्न #39 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
कलम 41B, फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत अटक पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून खालीलपैकी कोण सही करु शकतो ?
EN Under Section 41B of the Code of Criminal Procedure, who among the following can sign as a witness on the memorandum of arrest?
  • (A) अटक व्यक्तीच्या परिवारातील सदस्य
  • (B) केंद्रशासनाच्या कार्यालयातील कर्मचारी
  • (C) उच्च न्यायालयातील कारकून
  • (D) कोणताही कार्यकारी दंडाधिकारी
अचूक उत्तर: पर्याय (A) अटक व्यक्तीच्या परिवारातील सदस्य

अचूक उत्तर: पर्याय (१) अटक व्यक्तीच्या परिवारातील सदस्य सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 41B(b) नुसार अटक पंचनाम्यावर साक्षीदार: - कलम 41B(b) नुसार अटक पंचनामा किमान एका साक्षीदाराद्वारे साक्षांकित केला जाईल. - हा साक्षीदार अटक केलेल्या व्यक्तीच्या...

प्रश्न #40 📅 Dept PSI Mains 2021
+1.0 / -0.25
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 172 मध्ये _________ ची तरतूद दिलेली आहे.
EN Under Section 172 of the Code of Criminal Procedure, provision is made for:
  • (A) पुरावा
  • (B) पुरेसा पुराव्या अभावी आरोपीस सोडून देणे
  • (C) अन्वेषण
  • (D) अन्वेषण कार्यवाहीची रोजनीशी (केस डायरी)
अचूक उत्तर: पर्याय (D) अन्वेषण कार्यवाहीची रोजनीशी (केस डायरी)

अचूक उत्तर: पर्याय (४) अन्वेषण कार्यवाहीची रोजनीशी (केस डायरी) सविस्तर विश्लेषण: - CrPC कलम 172 (केस डायरी): - कलम 172 नुसार प्रत्येक तपास अधिकाऱ्याने तपासातील दैनंदिन कामकाजाची नोंद रोजनीशीमध्ये (Case Diary) ठेवली पाहिजे. - न्यायालय तपासाला मदत...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स