📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. २४ मार्च, २०१९) (पृष्ठ 3)

MPSC Group B (2019) Prelims Official Paper (Held On: 24 Mar 2019) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. २४ मार्च, २०१९)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 71 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 3 / 4
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 आरोग्य विभाग 🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 महानगरपालिका 🎯 एसटी महामंडळ

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 60 (एकूण 71)
प्रश्न #41 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
नॉन-शेड्युल्ड बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व बँक कायदा 1934 च्या _______ सूचीमध्ये समाविष्ट नाहीत.
EN Non-Scheduled banks are those which have not been included in the _______ schedule of RBI Act 1934.
  • (A) दुसऱ्या
  • (B) पहिल्या
  • (C) तिसऱ्या
  • (D) वरीलपैकी कोणत्याही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) दुसऱ्या

योग्य उत्तर दुसऱ्या आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • नॉन-शेड्युल्ड बँका अशा आहेत ज्या RBI च्या नियमांचे पालन करत नाहीत. • RBI कायदा, 1934 च्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये त्यांचा उल्लेख नाही आणि म्हणून ते ठेवीदारांच्या हिताची सेवा आणि संरक्षण करण्यास...

प्रश्न #42 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
मध्यावधी राजकोषिय सुधारणा अंतिम उद्देश:

(a) कर्ज चिरस्थायी पातळी पर्यंत घटविणे

(b) राजकोषिय तुटीत वाढ करणे

(c) चालू खात्यावरील तूट कमी करणे

(d) अर्थसाहाय्य कमी करणे
EN The ultimate aim of the Medium Term Fiscal Reforms is to :

(a) Bring down debt to a sustainable level.

(b) Increase Fiscal Deficit.

(c) Reduce current account deficit.

(d) Reduce subsidies.
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (a), (b), (c)
  • (C) फक्त (c)
  • (D) फक्त (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (c)

प्रश्न #43 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे?

(a) अपवर्तन

(b) अपस्करण

(c) अंतर्गत परावर्तन

(d) बाह्य परावर्तन

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा:
EN The beautiful rainbow seen in the sky in rainy season is the result of which of the following natural phenomenon ?

(a) Refraction

(b) Dispersion

(c) Internal Reflection

(d) External Reflection
  • (A) (a) व (b) फक्त
  • (B) (a), (b) व (c) फक्त
  • (C) (a), (b), (c) व (d)
  • (D) (a), (b) व (d) फक्त
अचूक उत्तर: पर्याय (B) (a), (b) व (c) फक्त

योग्य उत्तर फक्त (a), (b) आणि (c) आहे. • इंद्रधनुष्य ही एक हवामानशास्त्रीय घटना आहे. • प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन आणि अपस्करण यामुळे घटना घडते. 📌 Key Points संकल्पना: अपस्करण: • प्रकाशाचे त्याच्या घटक रंगांमध्ये विभाजन होण्याला अपस्करण म्हणतात...

प्रश्न #44 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधाने ध्वनीसाठी योग्य नाही/नाहीत?

(a) ध्वनी तरंग हे अवतरंग असतात

(b) श्रवणीय ध्वनी तरंगांची वारंवारिता 20 kHz आणि त्यापेक्षा अधिक असते.

(c) ध्वनी तरंगांच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते.

(d) अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ (Noise) म्हटले जाते.
EN Which of the following statements are not true for sound ?

(a) Sound waves are transverse waves.

(b) Audible sound waves have frequency range of 20 kHz and above.

(c) Sound waves require medium for propagation.

(d) Non-periodic sound waves are termed as ‘Noise’.
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (a) आणि (c)
  • (C) (b) आणि (c)
  • (D) (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) आणि (b)

पर्याय 1 सत्य नाही. 📌 Key Points • ध्वनी हा एक ऊर्जेचा एक प्रकार आहे जो आपल्या कानात ऐकण्याची संवेदना उत्पन्न करतो. • कंपन हा ध्वनी निर्मितीस जबाबदार असणारी भौतिक घटना आहे. • कंपन म्हणजे एखाद्या वस्तूची मागे आणि पुढे गतिमानता. • ध्वनीच्या...

प्रश्न #45 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
खलील विधाने विचारात घ्या:

(a) प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो.

(b) वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो.

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा:
EN Consider the following, statements :

(a) Light ray changes its direction when it passes from one transparent medium to another,

(b) The velocity of light is different in different media.

Select the correct option :
  • (A) विधान (a) सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण (b) होय.
  • (B) विधाने (a) व (b) दोन्ही सत्य आहेत पण (b) हे त्याचे योग्य स्पष्टीकरण नाही.
  • (C) विधान (a) सत्य आहे व (b) असत्य आहेत.
  • (D) विधाने (a) व (b) दोन्ही असत्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान (a) सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण (b) होय.

योग्य उत्तर विधान (a) सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण (b) होय आहे. 📌 Key Points • प्रकाशाचे अपवर्तन: जेव्हा एका माध्यमात पसरणारा प्रकाशकिरण दुसऱ्या माध्यमात (पारदर्शक माध्यम) प्रवेश करतो तेव्हा तो त्याच्या मार्गापासून दूर जातो. (विधान 1 योग्य आहे)...

प्रश्न #46 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त ______ इलेक्ट्रॉन असू शकतात.
EN The third shell of an atom can have a maximum of ______ electrons.
  • (A) 3
  • (B) 18
  • (C) 8
  • (D) 32
अचूक उत्तर: पर्याय (B) 18

📐 वापरलेले सूत्र: बोहर-बारी नियमानुसार कक्षेतील कमाल इलेक्ट्रॉन क्षमता (Maximum Electrons in a Shell): $N = 2n^2$ येथे तिसऱ्या कक्षेसाठी (M-कक्षा, $n = 3$): $N = 2 \times (3)^2 = 2 \times 9 = 18\text{ इलेक्ट्रॉन}$. योग्य उत्तर 18 आहे. 📌 Key Points...

प्रश्न #47 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठाचे मिलर निर्देशांकाचे परिगणन करा:

2a, 3b, 4c
EN Calculate the Miller Indices of the Face having the following intercepts with the three axes perpendicular to each other :

2a, 3b, 4c
  • (A) 6, 4, 3
  • (B) 2, 3, 4
  • (C) 4, 6, 8
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) 6, 4, 3

📐 वापरलेले सूत्र: मिलर निर्देशांक परिगणन पद्धती (Miller Indices Calculation): १. स्फटिक अक्षांवरील अंतःछेद (Intercepts) $= 2a, 3b, 4c \implies 2, 3, 4$ २. छेदांचे व्यस्तांक (Reciprocals) $= \frac{1}{2}, \frac{1}{3}, \frac{1}{4}$ ३. अपूर्णांक...

प्रश्न #48 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराइड मधून 100 A विद्युत प्रवाह 965 से, करिता प्रवाहित केला, तर (Na = 23, Cl = 35.5)
EN When a current of 100 A is passed through molten sodium chloride for 965 s, then( Na=23, Cl=35.5)
  • (A) 23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा कॅथोडवर निकास होईल.
  • (B) 23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा एनोड निकास होईल.
  • (C) 23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 17.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा एनोड निकास होईल.
  • (D) 23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 71 ग्रॅ. क्लोरीन वायुचा एनोड निकास होईल
अचूक उत्तर: पर्याय (C) 23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 17.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा एनोड निकास होईल.

📐 वापरलेले सूत्र: फॅराडेचा विद्युत अपघटनाचा पहिला नियम (Faraday's First Law of Electrolysis): विद्युतभार $Q = I \times t$ येथे, $I = 100\text{ A}, \; t = 965\text{ s}$ $Q = 100 \times 965 = 96,500\text{ C} = 1\text{ Faraday (F)}$ • कॅथोडवरील...

प्रश्न #49 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
प्लेटिहेल्मिंथसचे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे:
EN Platyhelminthes are best described as :
  • (A) फ्लॅटवर्म्स, ट्रिपलोब्लास्टिक, असिलोमेट प्राणी
  • (B) फ्लॅटवर्म्स, डिप्लोब्लाटिक, असिलोमेट प्राणी
  • (C) फ्लॅटवर्म्स, ट्रिपलोब्लास्टिक, सिलोमेट प्राणी
  • (D) फ्लॅटवर्म्स, ट्रिपलोब्लास्टिक, स्यूडोसिलोमेट प्राणी
अचूक उत्तर: पर्याय (A) फ्लॅटवर्म्स, ट्रिपलोब्लास्टिक, असिलोमेट प्राणी

योग्य उत्तर पर्याय 1 आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • संघ प्लेटिहेल्मिंथस हे ॲनिमॅलिया राज्याचे आहे. • जीवांना फ्लॅटवर्म्स असेही म्हणतात. • हे एकोलोमेट्स आहेत आणि त्यात अनेक मुक्त-जिवंत आणि परजीवी जीवन प्रकारांचा समावेश आहे...

प्रश्न #50 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
कुप्फरच्या पेशी यामध्ये आढळतात:
EN Kupffer’s cells occur in
  • (A) मेंदू
  • (B) मुत्रपिंड
  • (C) यकृत
  • (D) प्लीहा
अचूक उत्तर: पर्याय (C) यकृत

योग्य उत्तर यकृत आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • यकृतामध्ये असलेल्या कुप्फरच्या पेशी अमीबॉइड आकाराच्या असतात, ते साइनसॉइडल एंडोथेलियल पेशींशी संलग्न असतात. त्यामुळे पर्याय 3 योग्य आहे. • कुप्फरच्या पेशींच्या पृष्ठभागावर स्यूडोपोडिया...

प्रश्न #51 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
किटकनाशकांचा वापर करतांना खलीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा?

(a) किटकनाशक प्रकाराची योग्य निवड

(b) किटकनाशकाची कार्यक्षमता

(c) किटकनाशकाची मात्रा

(d) किटकनाशकाचा रंग

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?
EN Which of the following things should be considered important while using insecticides?

(a) Choice of insecticide’s type

(b) Efficiency of insecticides

(c) Dose of insecticides

(d) Colour of insecticides

Which of the given above statement/s is/are correct?
  • (A) (a) फक्त
  • (B) (a) आणि (b) फक्त
  • (C) (a), (b) आणि (c) फक्त
  • (D) (a), (b), (c), (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) आणि (c) फक्त

प्रश्न #52 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता घटक आणि त्याचे वनस्पतींमधील कार्य चुकीच्या पद्धतीने जोडलेले आहे?
EN Which of the following element and its function in plants is paired incorrectly ?
  • (A) नायट्रोज (नत्र) - केंद्रकाम्ले, प्रथिने, संप्रेरके आणि सहविकरे यांचा घटक
  • (B) मॅग्नेशियम - हरित द्रव्याचा घटक
  • (C) फॉस्फोरस -केंद्रकाम्ले, ATP, सहविकरे यांचा घटक
  • (D) गंधक - केंद्रकाम्लांचा घटक
अचूक उत्तर: पर्याय (D) गंधक - केंद्रकाम्लांचा घटक

योग्य उत्तर गंधक - केंद्रकाम्लांचा घटक हे आहे.📌 Key Points • वनस्पतींना अनेक असेंद्रिय पोषक तत्वांची आवश्यकता असते. यापैकी काही बृहतपोषक द्रवे आहेत, ज्यांची वनस्पतींना तुलनेने मोठ्या प्रमाणात गरज असते, आणि इतर सूक्ष्म पोषक द्रवे असतात, ज्यांची अल्प...

प्रश्न #53 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
_______ हे सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे.
EN _______ microorganism is useful for asymbiotic nitrogen fixation in monocot plants.
  • (A) अॅझोटोबॅक्टर
  • (B) रायझोबियम
  • (C) दोन्ही (1) आणि (2)
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) अॅझोटोबॅक्टर

योग्य उत्तर अझोटोबॅक्टर आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): नायट्रोजन निर्धारण - • ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्याद्वारे वायुमंडलीय नायट्रोजन सेंद्रिय संयुगेमध्ये मिसळले जाते, विशेषत: नायट्रोजन चक्राचा भाग म्हणून काही सूक्ष्मजीवांद्वारे होते...

प्रश्न #54 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास ________ प्रदान करतात.
EN Nutrient Dense Foods are those that provide body with _____.
  • (A) कॅलरिज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक
  • (B) कमी कॅलरिज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज (सूक्ष्म पोषक घटक)
  • (C) काही प्रमाणात जीवनसत्व आणि जास्त कॅलरिज
  • (D) फक्त कॅलरिज
अचूक उत्तर: पर्याय (B) कमी कॅलरिज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज (सूक्ष्म पोषक घटक)

योग्य उत्तर पर्याय 2 आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): पौष्टिक-दाट अन्न - • जे अन्न ते पुरवतात त्या कॅलरीजच्या तुलनेत एक किंवा अधिक पोषक तत्वांचा उदार प्रमाणात पुरवठा करतात त्यांना पोषक-दाट म्हणतात. • पौष्टिक-दाट पदार्थांच्या याद्या आहेत, जे...

प्रश्न #55 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
DOTS कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे?
EN DOTS programme is an important component of which of the following national programme ?
  • (A) राष्ट्रीय धनुर्वात नियंत्रण कार्यक्रम
  • (B) राष्ट्रीय विषमज्वर नियंत्रण कार्यक्रम
  • (C) राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
  • (D) राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
अचूक उत्तर: पर्याय (C) राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

योग्य उत्तर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे. 📌 Key Points • राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम: राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम (NTP) हा भारत सरकारने 1962 मध्ये BCG लसीकरण आणि क्षयरोग उपचारांसह जिल्हा क्षय केंद्र मॉडेलच्या रूपात सुरू केला...

प्रश्न #56 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंवेदनावाहक म्हणून प्रमाणित केले आहेत?

(a) अॅसीटाईल कोलीन व गॅमा अमीनो ब्यूटीरीक अॅसीड

(b) डोपामाईन व नॉरअॅड्रीनॅलीन

(c) लायसीन व हिस्टामाईन

(d) पायरुव्हीक अॅसिड व अॅसीटाईल कोए
EN Which of the following chemical substances are authenticated as Neurotransmitters?

(a) Acetylcholine and Gamma-aminobutyric acid

(b) Dopamine and noradrenalin

(c) Lysine and Histamine

(d) Pyruvic acid and Acetyl CoA
  • (A) केवळ (a)
  • (B) केवळ (c)
  • (C) (a) आणि (b)
  • (D) (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a) आणि (b)

योग्य उत्तर (a) आणि (b) आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): न्यूरोट्रांसमीटर- • न्यूरोट्रांसमीटरला रासायनिक ट्रान्समीटर किंवा रासायनिक संदेशवाहक देखील म्हणतात. • शेजारच्या न्यूरॉन्स किंवा स्नायू किंवा ग्रंथी पेशींना उत्तेजित करण्यासाठी न्यूरॉन्स...

प्रश्न #57 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
राम आणि शाम दोघेही 'A' बिंदुपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहे. 'A' बिंदुपासून राम 3 मी. व शाम 4 मी. चालले. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मी. चालला आणि शाम सुद्धा डावीकडे वळून 5 मी. चालला. आता त्यांच्यामधिल अंतर किती?
EN Ram and Shyam both are walking in opposite direction from point ‘A’, Ram walked 3 m and Shyam walked 4 m from point A. Then Ram turned left & walked 4 m and Shyam too turned left & walked 5 m. What is the distance between them now ?
  • (A) 19.5 मी.
  • (B) 10 मी.
  • (C) 16 मी.
  • (D) 11.40 मी.
अचूक उत्तर: पर्याय (D) 11.40 मी.

📐 वापरलेले सूत्र: पायथागोरस प्रमेयानुसार दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर (Shortest Displacement): $d = \sqrt{(\Delta x)^2 + (\Delta y)^2}$ येथे क्षैतिज अंतर $\Delta x = 3 + 4 = 7\text{ मी.}$ उभ्या दिशेतील अंतर $\Delta y = 4 + 5 = 9\text{ मी.}$...

प्रश्न #58 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
वरील आकृतीत कोपऱ्यातील आयताचे मापन 4 सेमी × 8 सेमी आहे. तर वर्तुळाची सेमी मध्ये त्रिज्या दर्शवणारा पर्याय निवडा.
EN In above figure the rectangle at the corner measures 4 cm × 8 cm. Select the option which indicates the radius of the circle in cm.
  • (A) 20
  • (B) 24
  • (C) 16
  • (D) 08
अचूक उत्तर: पर्याय (A) 20

📐 वापरलेले सूत्र: काटकोन त्रिकोणात पायथागोरस प्रमेय किंवा वर्तुळाचे समीकरण: $(x - h)^2 + (y - k)^2 = r^2$ येथे वर्तुळाच्या केंद्रापासून आयताच्या कोपऱ्यातील बिंदूचे अंतर $= r$: $(r - 4)^2 + (r - 8)^2 = r^2$...

प्रश्न #59 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
खलील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या:

P, Q, R, S, T, U आणि V हे सात प्राध्यापक आहेत. प्रत्येकजण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र व भूगोल यापैकी परंतु वेगवेगळी विषय शिकवितात तथापि याच क्रमाने शिकवितील असे नाही. प्रत्येकजण सोमवार ते रविवारपर्यंत एका-एका दिवशी शिकावितात परंतु याच क्रमाने शिकवतात असे नाही. R हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवितो, जो प्राध्यापक भौतिकशास्र हा विषय शिकवितो, त्याच्या आदल्या दिवशी, Q हा गणित शिकवितो. V हा रविवारी शिकवितो परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवित नाही. U हा ज्या दिवशी शिकवितो, त्याच्या आदल्या दिवशी S हा अर्थशास्त्र शिकवितो. P हा मंगळवारी भूगोल शिकवितो. T हा इंग्रजी शिकवत नाही. तर 'T' हा कोणता विषय शिकवितो?
EN Read the information carefully and answer the question based on it.

The seven lecturers P, Q, R, S, T, U and V, teach seven subjects viz. Physics, Chemistry, Biology, English, Mathematics, Economics and Geography. These seven lecturers teach different subjects but not necessarily in the same order. Every teacher teaches only one day from Monday to Sunday but not necessarily in the same order. R teaches Biology on Friday. One who teaches Physics immediate on previous day of which, Q teaches Mathematics. V teaches on Sunday but not Chemistry or English. U teaches on which day, immediate on previous day of which S teaches Economics, P teaches Geography on Tuesday. T does not teach English.

Which subject does 'T’ teach ?
  • (A) रसायनशास्त्र
  • (B) भौतिकशास्त्र
  • (C) रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र
  • (D) गणित
अचूक उत्तर: पर्याय (A) रसायनशास्त्र

प्रश्न #60 📅 Combine Group B Pre 2019
+1.0 / -0.25
P, Q. R, S, T, U, V आणि W हे मध्याकडे तोंड करुन वर्तुळाकार बसलेले आहेत. खलील विधाने लक्षात घेऊन प्रश्नाचे उत्तर निवडा:

(a) P हा T च्या उजवीपासून दुसरा आहे तसेच तो R आणि V चा सलग शेजारी आहे.

(b) S हा P चा शेजारी नाही.

(c) V हा U चा शेजारी आहे.

(d) 'Q' हा S आणि W च्या मध्ये नाही, 'W' हा U आणि S च्या मध्ये नाही.

खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाहीत?
EN P, Q, R, S, T, U, V and W are sitting around a circle and are facing at the centres.

Read the following statements and answer the questions:

(a) P is second to the right of T. Also, he is immediate neighbour of R and V.

(b) S is not a neighbour of P

(c) V is a neighbour of U.

(d) ‘Q' is not in between S and W, ‘W’ is not in between U and S.

Which of the two are not immediate neighbour ?
  • (A) UV
  • (B) RP
  • (C) SW
  • (D) RV
अचूक उत्तर: पर्याय (D) RV

📐 वापरलेले सूत्र / तार्किक नियम: वर्तुळाकार बैठक व्यवस्था नियम (Circular Seating Arrangement Rule): केंद्राकडे तोंड करून बसताना: उजवी बाजू = घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा (Anti-clockwise), डावी बाजू = घड्याळाच्या काट्याची दिशा (Clockwise)...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स