📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२ (पृष्ठ 4)

MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 80 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 4 / 4
🎯 MPSC राज्यसेवा

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 80)
प्रश्न #61 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
२, ३, ५, ६, ७ आणि ९ या अंकापांसून ५ ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता, अशा तीन अंकी किती संख्या तयार होऊ शकतील ?
EN How many 3-digit numbers can be formed from the digits 2, 3, 5, 6, 7 and 9 which are divisible by 5 and none of the digits is repeated?
  • (A) 5
  • (B) 10
  • (C) 15
  • (D) 20
अचूक उत्तर: पर्याय (D) 20

योग्य उत्तर पर्याय (४) म्हणजेच २० आहे. सविस्तर स्पष्टीकरण : दिलेले अंक: २, ३, ५, ६, ७, ९ (एकूण ६ अंक). ५ ची विभाज्यता कसोटी: कोणत्याही संख्येला ५ ने पूर्ण भाग जाण्यासाठी तिच्या एकक स्थानी ० किंवा ५ असणे अनिवार्य असते. दिलेल्या अंकांत ० नसल्याने एकक...

प्रश्न #62 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
A व B या दोन राशींतील संबंधाचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा :

लालू आणि जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत. लालू २ तासात ३/४ शर्यत पूर्ण करतो. लालूला ९/१० शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या ५/८ वेळेत जॉन २/३ शर्यत पूर्ण करतो.

राशी Aराशी B

लालूचा वेगजॉनचा वेग
EN Select the appropriate option that describes the relation between quantities A and B :

Lalu and John are competing in a road race. Lalu completes 3/4th of the race in 2 hours. John completes 2/3rd of the race in 5/8th of the time which Lalu takes to complete 9/10th of the race.

Quantity AQuantity B

Lalu's SpeedJohn's Speed
  • (A) दोन्ही राशी समान आहेत
  • (B) राशी A लहान आहे
  • (C) राशी B लहान आहे
  • (D) राशींतील संबंध निश्चित करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) राशी A लहान आहे

योग्य उत्तर पर्याय (२) म्हणजेच राशी A लहान आहे आहे. सविस्तर स्पष्टीकरण : समजा शर्यतीचे एकूण अंतर = $D$. लालूचा वेग (राशी A): लालू २ तासांत $ rac{3}{4}D$ अंतर धावतो. $$ ext{लालूचा वेग } (v_L) = rac{ rac{3}{4}D}{2} = rac{3}{8}D = 0.375 D ext{ प्रति...

प्रश्न #63 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ३ : ४ आहे. ५ वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ४ : ५ होईल, तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा.
EN The present ages of Savita and Kavita are in the ratio 3 : 4. After five years the ratio of their ages will be 4 : 5. Find the present ages of Savita and Kavita.
  • (A) सविता २० वर्षे आणि कविता १५ वर्षे
  • (B) सविता १५ वर्षे आणि कविता २० वर्षे
  • (C) सविता २० वर्षे आणि कविता २५ वर्षे
  • (D) सविता २५ वर्षे आणि कविता २० वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (B) सविता १५ वर्षे आणि कविता २० वर्षे

योग्य उत्तर पर्याय (२) म्हणजेच सविता १५ वर्षे आणि कविता २० वर्षे आहे. सविस्तर स्पष्टीकरण : समीकरण मांडणी: सविताचे आजचे वय = $3x$ वर्षे कविताचे आजचे वय = $4x$ वर्षे ५ वर्षांनंतरची वये अनुक्रमे $(3x + 5)$ आणि $(4x + 5)$ होतील. दिलेल्या गुणोत्तरावरून...

प्रश्न #64 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
३ मी, ५ मी १० सेमी, १२ मी ९० सेमी अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी, हे शोधा.
EN Find the greatest possible length of a scale that can be used to measure exactly, three pieces of cloth of the following lengths :

3 m, 5 m 10 cm, 12 m 90 cm
  • (A) 30 सेमी
  • (B) 60 सेमी
  • (C) 45 सेमी
  • (D) 35 सेमी
अचूक उत्तर: पर्याय (A) 30 सेमी

योग्य उत्तर पर्याय (१) म्हणजेच ३० सेमी आहे. सविस्तर स्पष्टीकरण : एककांचे रुपांतर (सेंटीमीटरमध्ये): ३ मीटर = $3 imes 100 = 300$ सेमी ५ मीटर १० सेमी = $500 + 10 = 510$ सेमी १२ मीटर ९० सेमी = $1200 + 90 = 1290$ सेमी अचूक मोजण्यासाठी 'जास्तीत जास्त...

प्रश्न #65 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
आकृती A व B ही चौरस क्षेत्रे आहेत. A चौरसाची बाजू ८ सेमी लांब आहे, तर B चौरसाचा कर्ण ८ सेमी लांबीचा आहे. या दोन क्षेत्रफळांतील फरक किती ?
EN Figures A and B are square areas. Side of square A is 8 cm long and diagonal of square B is 8 cm long. What is the difference between the two areas?
  • (A) १६ चौरस सेमी
  • (B) ३२ चौरस सेमी
  • (C) ८ चौरस सेमी
  • (D) शून्य चौरस सेमी
अचूक उत्तर: पर्याय (B) ३२ चौरस सेमी

योग्य उत्तर पर्याय (२) म्हणजेच ३२ चौरस सेमी आहे. सविस्तर स्पष्टीकरण : चौरस A चे क्षेत्रफळ: बाजू ($s$) = ८ सेमी $$ ext{चौरस A चे क्षेत्रफळ} = ( ext{बाजू})^2 = 8^2 = 64 ext{ चौ. सेमी}$$ चौरस B चे क्षेत्रफळ: कर्ण ($d$) = ८ सेमी चौरसाच्या कर्णावरून...

प्रश्न #66 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
एका रांगेमध्ये ‘A’ डाव्या बाजूने ११ व्या स्थानावर आहे आणि 'B' उजव्या बाजूने १० व्या स्थानावर आहे. जर ‘A' आणि ‘B’ यांच्या जागांची अदलाबदल केली, तर 'A' डाव्या बाजूने १८ व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये 'A' आणि 'B' खेरीज किती व्यक्ती असतील ?
EN In a row, ‘A’ is on the 11th position from the left and 'B' is on the 10th position from the right. If the positions of 'A' and 'B' are interchanged, then 'A' becomes 18th from the left. How many persons are there in the row other than 'A' and 'B'?
  • (A) 27
  • (B) 26
  • (C) 25
  • (D) 24
अचूक उत्तर: पर्याय (C) 25

योग्य उत्तर पर्याय (३) म्हणजेच २५ आहे. सविस्तर स्पष्टीकरण : जागांची अदलाबदल: 'A' सुरुवातीला डावीकडून ११ वा आहे, आणि 'B' उजवीकडून १० वा आहे. अदलाबदल केल्यानंतर 'A' हा 'B' च्या मूळ जागेवर जातो. त्यामुळे B ची मूळ जागा आता: डावीकडून = १८ वी उजवीकडून =...

प्रश्न #67 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
रीनाने व्याजाच्या दराइतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने ₹ १२०० कर्ज घेतले. जर तिने कर्ज फेडताना ₹ ४३२ व्याज दिले, तर व्याजाचा दर किती होता ?
EN Reena took a loan of ₹ 1200 with simple interest for as many years as the rate of interest. If she paid ₹ 432 as interest at the end of the loan, what was the rate of interest?
  • (A) 3.6
  • (B) 6
  • (C) 18
  • (D) 20
अचूक उत्तर: पर्याय (B) 6

योग्य उत्तर पर्याय (२) म्हणजेच ६% आहे. सविस्तर स्पष्टीकरण : दिलेली माहिती: मुद्दल ($P$) = ₹ १२०० सरळ व्याज ($SI$) = ₹ ४३२ काळ ($T$) = व्याजाचा दर ($R$) म्हणजेच $T = R$. सरळ व्याजाचे सूत्र: $$SI = rac{P imes R imes T}{100}$$ $$432 = rac{1200 imes R...

प्रश्न #68 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
जर a हे b च्या ६०% आहे, b हे c च्या ४०% आहे, c हे d च्या २०% आहे, तर ६d हे २०a च्या किती टक्के आहे ?
EN If a is 60% of b, b is 40% of c, and c is 20% of d, then what percent of 20a, is 6d?
  • (A) 550
  • (B) 500
  • (C) 600
  • (D) 625
अचूक उत्तर: पर्याय (D) 625

योग्य उत्तर पर्याय (४) म्हणजेच ६२५ आहे. सविस्तर स्पष्टीकरण : समीकरण मांडणी: समजा $d = 100$. $c$ हे $d$ च्या २०% आहे ⇒ $c = 20$. $b$ हे $c$ च्या ४०% आहे ⇒ $b = rac{40}{100} imes 20 = 8$. $a$ हे $b$ च्या ६०% आहे ⇒ $a = rac{60}{100} imes 8 = 4.8$. आता...

प्रश्न #69 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
राम आणि श्याम हॉकी व व्हॉलीबॉलमध्ये चांगले आहेत. सचिन व राम हॉकी आणि बेसबॉलमध्ये चांगले आहेत. गौरव आणि श्याम व्हॉलीबॉल व क्रिकेटमध्ये चांगले आहेत. सचिन, गौरव आणि सागर बेसबॉल व फुटबॉलमध्ये चांगले आहेत. तर बेसबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आहे ?
EN Ram and Shyam are good in hockey and volleyball. Sachin and Ram are good in hockey and baseball. Gaurav and Shyam are good in volleyball and cricket. Sachin, Gaurav and Sagar are good in baseball and football. Then who is good in all baseball, cricket, volleyball and football ?
  • (A) सचिन
  • (B) श्याम
  • (C) गौरव
  • (D) सागर
अचूक उत्तर: पर्याय (C) गौरव

प्रश्न #70 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
एका सांकेतिक भाषेत 'KAMAL' हे ‘1626142615' असेल, तर 'NO' साठी कोणता संकेत राहील ?
EN If the code for 'KAMAL' is '1626142615', then find the code for 'NO'.
  • (A) 1312
  • (B) 1415
  • (C) 1213
  • (D) 1514
अचूक उत्तर: पर्याय (A) 1312

योग्य उत्तर पर्याय (१) म्हणजेच 1312 आहे. सविस्तर स्पष्टीकरण : सांकेतिक तर्क (उलटा वर्णमाला क्रम / Reverse Positional Value): येथे प्रत्येक इंग्रजी मुळाक्षराला उलट्या क्रमाने (Z = १ ते A = २६) क्रमांक दिला आहे, म्हणजेच...

प्रश्न #71 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
जर A $ B चा अर्थ A हे B चे वडील आहेत; A # B चा अर्थ A ही B ची बहीण आहे; A * B चा अर्थ A ही B ची मुलगी आहे; आणि A @ B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे, तर R, T व M ही भावंडे आहेत हे दर्शवणारी नातेसाखळी निवडा :
EN If A $ B means A is the father of B; A # B means A is the sister of B; A * B means A is the daughter of B; and A @ B means A is the brother of B, then select the relation chain that indicates R, T and M are siblings?
  • (A) Q $ R @ T * M
  • (B) Q @ R $ T # M
  • (C) Q $ R * T # M
  • (D) Q $ R @ T # M
अचूक उत्तर: पर्याय (D) Q $ R @ T # M

योग्य उत्तर पर्याय (४) म्हणजेच Q $ R @ T # M आहे. सविस्तर स्पष्टीकरण : संकेतांचा अर्थ: $ : वडील (Father) # : बहीण (Sister) * : मुलगी (Daughter) @ : भाऊ (Brother) पर्याय (४) चे विश्लेषण (Q $ R @ T # M): $Q \$ R$ → Q हे R चे वडील आहेत. $R @ T$ → R हा...

प्रश्न #72 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
X या पारदर्शक कागदाची घडी दाखवणारा पर्याय निवडा :
EN Select the fold of transparent paper sheet X from the given options :
अचूक उत्तर: पर्याय (A)

प्रश्न #73 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
दिलेल्या पर्यायी आकृत्यांमधून अशी आकृती निवडा की ज्या आकृतीमुळे आकृती (X) पूर्ण होईल :
EN Select a figure from the options which will complete figure (X) :
अचूक उत्तर: पर्याय (C)

योग्य उत्तर पर्याय (३) आहे. सविस्तर स्पष्टीकरण : आकृती पूर्ण करण्याची संकल्पना (Pattern Completion): दिलेली आकृती X ही आडव्या रेषेच्या संदर्भात वरच्या आणि खालच्या भागात सममित (Symmetrical) आहे. वरच्या भागातील घटकांचे खालच्या भागात परावर्तन...

प्रश्न #74 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
दिलेल्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ?

४A६C२E

६P१३R७T

८N१०P?
EN In the given square, which option will replace the question mark?

4A6C2E

6P13R7T

8N10P?
  • (A) 2T
  • (B) 2R
  • (C) 4T
  • (D) 4R
अचूक उत्तर: पर्याय (B) 2R

योग्य उत्तर पर्याय (२) म्हणजेच 2R आहे. सविस्तर स्पष्टीकरण : संख्यांचा आकृतीबंध (Number Pattern): प्रत्येक आडव्या ओळीत (Row): पहिल्या आणि तिसऱ्या स्तंभातील संख्यांची बेरीज = मधल्या स्तंभातील संख्या. ओळ १: $4 + 2 = 6$ ओळ २: $6 + 7 = 13$ ओळ ३...

प्रश्न #75 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
खाली दोन विधाने आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष दिलेले आहेत. निष्कर्षाबाबतचा योग्य पर्याय निवडा :

विधाने :

I. काही झाडे फांद्या आहेत.

II. सर्व फांद्या टोप्या आहेत.

निष्कर्ष :

A. काही झाडे टोप्या आहेत.

B. काही टोप्या झाडे आहेत.

C. सर्व टोप्या फांद्या आहेत.

D. सर्व फांद्या टोप्या आहेत.
EN Study the statements and the conclusions given below. Select logically the valid option of conclusions with respect to the statements.

Statements :

I. Some trees are branches.

II. All branches are hats.

Conclusions :

A. Some trees are hats.

B. Some hats are trees.

C. All hats are branches.

D. All branches are hats.
  • (A) फक्त A, B व D बरोबर आहेत
  • (B) फक्त B, C व D बरोबर आहेत
  • (C) फक्त A व B बरोबर आहेत
  • (D) सर्व बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त A, B व D बरोबर आहेत

प्रश्न #76 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) परीक्षण करताना एका गृह वसाहतीतील इमारतीवर तुम्हाला ITI चा भक्कम नामफलक आढळला. या केंद्राने संपूर्ण जागा व्यापली आहे असे हा फलक सुचवत होता. कोपऱ्यातल्या एका खोलीत असलेल्या जागेतून संस्था चालवली जात आहे हे संस्थेत तुम्ही पाऊल ठेवताच आढळले. जेव्हा कचेरी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला साहाय्य देण्यासाठी अनिवार्य असलेल्या प्रयोगशाळेबाबत विचारणा केली, तेव्हा प्रभारी व्यक्तीने संस्थेची प्रयोगशाळा असल्याचा दावा करून तुम्हाला तळमजल्यावरील एका स्कूटर दुरुस्ती गॅरेजमध्ये नेले. या व्यक्तीने तुम्हाला आदर्श ITI साठी आवश्यक असणाऱ्या प्रशस्त सुविधांची सर्व प्रमाणपत्रे दाखवली. तुम्ही :
EN While inspecting an Industrial Training Institute you found that the building in one housing colony had a massive board for the ITI, suggesting that the centre occupied the entire space. When you stepped inside the institute, you found that it is operating from a one room flat in the corner. When asked about their office and laboratory that is mandatory for assisting students to get hands-on experience, the person in charge claimed that the institute has a lab, and guided you to a scooter garage on the ground floor. This person showed you all certificates of massive infrastructure that are mandatory for an ideal ITI. You will
  • (A) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, म्हणून संस्थेला मान्यता मिळवण्यासाठी कबूल केलेल्या भौतिक सुविधा तीन वर्षांच्या कालावधीत जुळवून आणण्यास सांगाल.
  • (B) आवश्यक क्षमता प्राप्त केल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळणे टाळण्यासाठी संस्थेची शासन मान्यता रद्द कराल.
  • (C) काम मिळण्यासाठी आवश्यक अनुभवाधारित कौशल्ये प्राप्त करण्यासंबंधातील समस्या सोडवण्यासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांचे नियमन करणारी समिती नेमण्यासाठी विद्यार्थी, पालक, अध्यापक आणि व्यवस्थापक यांची बैठक बोलवाल.
  • (D) व्यवस्थापनाला अतिरिक्त शुल्क न लादता काम मिळवण्यासाठी आवश्यक असे प्रत्यक्ष अनुभव घ्यायला विद्यार्थ्यांना साहाय्य देण्यासाठी व्यवस्था करण्याचा आदेश द्याल.
अचूक उत्तर: पर्याय (C) काम मिळण्यासाठी आवश्यक अनुभवाधारित कौशल्ये प्राप्त करण्यासंबंधातील समस्या सोडवण्यासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांचे नियमन करणारी समिती नेमण्यासाठी विद्यार्थी, पालक, अध्यापक आणि व्यवस्थापक यांची बैठक बोलवाल.

योग्य उत्तर पर्याय (३) आहे. सविस्तर स्पष्टीकरण : प्रशासकीय निर्णय निर्धारण (Decision Making & Problem Solving): एका सक्षम आणि समतोल अधिकाऱ्याने केवळ एकांगी कारवाई (उदा. थेट मान्यता रद्द करून विद्यार्थ्यांचे नुकसान करणे किंवा ३ वर्षांची अवाजवी मुदत...

प्रश्न #77 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
तुम्ही विविध कामांसाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) वापरण्याचे निर्णय घेण्यासाठी जबाबदार असणाऱ्या विभागाचे प्रमुख आहात. जरी तुमच्या हाताखालील बहुसंख्य लोक स्मार्टफोन्सचा वापर करत असले, तरी ते जनतेचे सेवक म्हणून त्यांच्या अडीअडचणींचा परिचय होण्यासाठी त्यांच्या थेट संपर्कात असणे आवश्यक आहे या बहाण्याखाली सामान्य नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरवण्याच्या विरोधात आहेत. तुम्ही याच्याशी संबंधित त्यांच्या पळवाटांशी परिचित आहात; पण तरीही तुम्ही भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, लोकांची शक्ती व पैसे वाचवण्यासाठी आणि लोकांना विविध स्वरूपाच्या छळापासून मुक्त करण्यासाठी जनतेला ऑनलाइन सेवा देण्याचा निर्धार केलेला आहे. तुम्ही :
EN You are heading the department that is responsible for taking decisions concerned with employing Information and Communications Technology for various purposes. Though most of your subordinates use smartphones, they are against providing online services to general public under the pretext that they should be in touch with them to be familiar with their problems as public servants. You are familiar with their excuses related to this but you are determined to give online public services to reduce corruption, save energy and money, and relieve people from different kinds of harassment. You will
  • (A) तुमच्या कनिष्ठांची मते विचारात न घेता तुमचे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेली सर्व व्यवस्था कराल.
  • (B) पुढाकार घेऊन जनतेच्या सेवकांच्या आडमुठेपणामुळे तोंड द्याव्या लागणाऱ्या अडचणींबाबत संवेदनशील व्हायला तुमच्या हाताखालील लोकांना मदत द्याल.
  • (C) सामान्य व्यक्तींना आपण पदाधिकाऱ्यांच्या दयेवर अवलंबून आहोत व त्याचा मोबदला आपण द्यायला हवा अशी भावना निर्माण करणाऱ्या प्रत्येकाला लेखी ताकीद द्याल.
  • (D) बऱ्याच अनौपचारिक बैठकी घेऊन तुम्ही तुमच्या कनिष्ठांचे एक जबाबदार आणि प्रामाणिक जनता सेवक म्हणून सेवा देणारे मंडळ स्थापण्यासाठी प्रयत्नशील राहाल.
अचूक उत्तर: पर्याय (D) बऱ्याच अनौपचारिक बैठकी घेऊन तुम्ही तुमच्या कनिष्ठांचे एक जबाबदार आणि प्रामाणिक जनता सेवक म्हणून सेवा देणारे मंडळ स्थापण्यासाठी प्रयत्नशील राहाल.

योग्य उत्तर पर्याय (४) आहे. सविस्तर स्पष्टीकरण : प्रशासकीय नेतृत्व आणि बदल व्यवस्थापन (Change Management): डिजिटलायझेशन आणि ई-प्रशासनासारखे सुधारणावादी बदल राबवताना केवळ हुकूमशाही किंवा ताकीद देण्याने कनिष्ठांमधील अंतर्गत विरोध संपत नाही. पर्याय (४)...

प्रश्न #78 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
क्षणाचाही वेळ न लागता दंगली उसळणाऱ्या भागात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची कामगिरी तुमच्यावर आहे. या भागात राहणाऱ्या एकाच धर्माच्या दोन पंथांत धार्मिक वास्तूच्या मालकीसंबंधाने वाद आहे. त्यापैकी मोठ्या संख्येने असलेल्या एका गटाचे सदस्य खूपच आक्रमक असून ते दुसऱ्या अल्पसंख्येने असलेल्या गटावर दादागिरी करू पाहतात. सकाळीच दादागटाने त्या जागेवर जबरदस्तीने मालकी मिळवली आणि याच्या परिणामी तेथील परिस्थिती गंभीर बनली. संख्येने अल्प असलेल्या गटाने या गटाविरोधात तक्रार नोंदवली. गुंतागुंत टाळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही पोलिस अधिकाऱ्याला या गटाच्या नेत्याला अटक करण्याचा आदेश दिला. पोलीस पथक या नेत्याला बनावट चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी त्या गटाच्या सदस्यांची समजूत झाली. सायंकाळी लाठ्या व पलिते घेतलेला मोठा जमाव ठाण्यावर हल्ला करून नेत्याची सुटका करण्यासाठी चाल करून येत आहे. तुम्ही :
EN You are in charge of maintaining peace and order in one area where occasional violence erupts in no time. Two factions residing in this area belonging to one religion have a dispute over ownership of the religious structure there. One of the groups having a large number of followers residing in the area is very aggressive and tries to dominate the other faction having a lesser number of members. In the morning the dominant group grabbed ownership of the place and as a result the situation suddenly became very critical. The faction with minority lodged a complaint against the dominating group. To avoid complications you ordered the police officer to arrest the leader of the faction in order to maintain peace. Members of this faction thought that the police force wants to kill their leader in a fake encounter. In the evening a large mob with sticks and flambeaus started walking towards the police station for making an attack to free their leader. You will
  • (A) जमाव आक्रमक असल्यामुळे तो ठाण्याची इमारत जाळण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने पोलीस दलाला गोळीबार करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगाल.
  • (B) कोणत्याही प्रकारे चकमक होणार नाही, त्यांचा नेता सुरक्षित आहे याची जमावाला खात्री द्याल आणि काही सदस्यांना त्यांच्या नेत्याशी बोलण्याची विनंती कराल.
  • (C) अटक केलेल्या नेत्याशी बोलून त्याने स्वतः तो सुरक्षित असून त्याच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे घोषित करावे यासाठी त्याची समजूत घालाल.
  • (D) त्या भागातील नगरसेवक, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य यांना ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला मदत करण्याची विनंती कराल.
अचूक उत्तर: पर्याय (C) अटक केलेल्या नेत्याशी बोलून त्याने स्वतः तो सुरक्षित असून त्याच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे घोषित करावे यासाठी त्याची समजूत घालाल.

योग्य उत्तर पर्याय (३) आहे. सविस्तर स्पष्टीकरण : संकट निवारण व जमाव नियंत्रण (Crisis De-escalation): येथे जमावाचा रोष हा 'नेत्याला बनावट चकमकीत मारले जाईल' या अत्यंत धोकादायक अफवेतून निर्माण झालेला आहे. नेत्याच्या स्वतःच्या घोषणेचे महत्त्व...

प्रश्न #79 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
तुम्ही शहराच्या प्रदूषण नियंत्रणावर देखरेख करणाऱ्या विभागाचे प्रमुख आहात. 'ग्लोबल (जागतिक) हवा २०१७' अहवाल वाचताना तुमच्या लक्षात आले की भारतातील ओझोनशी संबंधित बालमृत्यूंत वाढ होत आहे. तुम्ही :
EN You are heading the department that looks after control of pollution in the city. While reading the report, 'State of Global Air 2017' it was evident to you that ozone related early deaths are increasing in India. You will
  • (A) या समस्येबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आवश्यक माहिती गोळा कराल आणि गरज असल्यास आरोग्य विभागाच्या सहकार्याने उपक्रम कार्यान्वित करण्याचा निर्णय घ्याल.
  • (B) शहराच्या वाहतूक विभागाच्या साहाय्याने वाहन प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भरवशाची सार्वजनिक वाहतूक पुरवण्याची योजना आखाल.
  • (C) वाहन प्रदूषण नियंत्रणाची रणनीती आखण्याबरोबरीने शहरात तसेच शहराभोवती आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची प्रणाली मिळवाल.
  • (D) वाहतूक विभागाच्या मदतीने दर दिवशी रस्त्यावर येणारी वाहने नियंत्रित कराल आणि शहरापासून दूरवर असलेल्या ठिकाणी कचरा वाहून नेण्यासाठी उत्तम सेतूजाल संघटित कराल.
अचूक उत्तर: पर्याय (B) शहराच्या वाहतूक विभागाच्या साहाय्याने वाहन प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भरवशाची सार्वजनिक वाहतूक पुरवण्याची योजना आखाल.

योग्य उत्तर पर्याय (२) आहे. सविस्तर स्पष्टीकरण : पर्यावरणीय विज्ञान आणि समस्या निराकरण: पृष्ठभागावरील ओझोन (Ground-level Ozone) हा प्राथमिक प्रदूषक नसून तो दुय्यम प्रदूषक (Secondary pollutant) आहे. वाहनांच्या धुरातील नायट्रोजन ऑक्साईड्स (NOx) आणि...

प्रश्न #80 📅 MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018
+1.0 / -0.25
तुमच्या कचेरीत तुम्ही सर्वात उच्च पदावर आहात. तुमच्या हाताखालील दोन व्यक्तींना वेगवेगळ्या प्रसंगी कचेरीत येत असताना अपघात होऊन त्यांना किरकोळ दुखापतींचा त्रास झाला. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी अनुभवांना टाळण्यासाठी त्यांच्या संघटनेचा नेता तुमच्याकडे एका प्रसिद्ध वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेऊन कचेरीच्या परिसरात योग्य ते बदल करून घेण्याची विनंती करत आहे. या क्षेत्राच्या हवामानासंबंधीची व भौगोलिक परिस्थितीची काळजी घेणाऱ्या वास्तुविद्याविशारदाने (आर्किटेक्ट) हे माणूसस्नेही व पर्यावरण संवेदनशील परिसर रचले आहे. तुम्ही :
EN You are occupying the topmost position in your office. Recently two of your subordinates met with accidents and suffered minor injuries on their way to office on different occasions. The leader of their union came to you requesting you to consult a famous vastu expert and make necessary changes in the office premises and avoid these kinds of evil experiences in the future. You know the fact that the human-friendly and eco-sensitive premises are designed by an architect who has taken care of climatic and geographical conditions of the area. You will
  • (A) तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची त्याची विनंती स्वीकाराल आणि भविष्यात अशा अपघातांमुळे खर्च वाचवाल.
  • (B) या गोष्टीसंबंधातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वृत्तीचा परिचय करून घेण्यासाठी व त्याच्या विनंतीबाबत समंजसपणे निर्णय घ्यायला मदत देण्यासाठी त्यांची बैठक आयोजित कराल.
  • (C) कर्मचाऱ्यांना वस्तुस्थितीचा परिचय करून देऊन असे सल्ले निरुपयोगी असतात हे समजून घ्यायला मदत देणारी कार्यशाळा मालिका आयोजित कराल.
  • (D) तुमचा अशा शास्त्रांवर विश्वास नसल्याचे सांगत त्याची विनंती तत्काळ धुडकावून लावाल.
अचूक उत्तर: पर्याय (C) कर्मचाऱ्यांना वस्तुस्थितीचा परिचय करून देऊन असे सल्ले निरुपयोगी असतात हे समजून घ्यायला मदत देणारी कार्यशाळा मालिका आयोजित कराल.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स