हरितक्रांतीचे प्रतिकूल परिणाम
स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सततचे दुष्काळ व अन्नधान्याचा तुटवडा यातून देशाला सावरण्यात पहिल्या हरितक्रांतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली यात शंकाच नाही. वेगाने वाढणारी लोकसंख्या व अन्नधान्याचा तुटवडा यामुळे अतिशय भयावह स्थिती निर्माण झाली होती. परंतु अशा परिस्थितीत हरितक्रांतीमुळे कृषी उत्पादकतेत वाढ करून अन्नसुरक्षेसारखी गंभीर समस्या हाताळणे सहज शक्य झाले.
तरीही हरितक्रांतीचे काही प्रतिकूल परिणाम झाले आणि ते दीर्घकाळ अनुभवास येत आहेत. हरितक्रांतीमुळे केवळ गहू व तांदूळ यासारख्या तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीवर अधिक भर देण्यात आला. परंतु याचवेळेस इतर कडधान्य पिके, फळे, भाजीपाला यांचे उत्पादन मात्र घटले. फळे व भाजीपाला उत्पादन वाढीचा सद्यस्थितीतील दर पाहता भविष्यकालीन वाढती मागणी व लोकसंख्येत होणारी वाढ यांचा मेळ घालणे कठीण आहे.
तथापि, एकाच प्रकारच्या तृणधान्य पिकांचे (तांदूळ, गहू) सातत्याने उत्पादन घेतल्याने मृदेची सुपीकता कमी होत आहे. नापीक होणाऱ्या मृदेत कडधान्ये व भाजीपाला पिके उत्पादित करणे अधिक कठीण होत आहे. एकपीक पद्धतीमुळे (वर्षानुवर्षे सतत एकाच जातीच्या पिकाचे उत्पादन होणे) पिकांची रोगप्रतिकारक्षमता कमी होते व ते विविध प्रकारच्या रोगांना आणि कीटकांना लवकर बळी पडतात. हेच तर पहिल्या हरितक्रांतीचे सर्वात मोठे प्रतिकूल फलीत आहे.
पहिल्या हरितक्रांतीचा दुसरा दोष म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके व बुरशीनाशकांचा स्वैर वापर होय. यांच्या अतिजास्त वापराचा देशाच्या कृषीव्यवस्थेच्या भवितव्यात फार मोठा धोका आहे. अतिरिक्त आणि अप्रस्तुत असा रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर विविध प्रकारच्या पर्यावरणीय विनाशास कारणीभूत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण, जलस्त्रोतांचे प्रदूषण, कृषी क्षेत्रातील कामगारांना होणारी विषबाधा ही गंभीर समस्या आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून उपयुक्त कीटकांचा व इतर वन्यजीवांचा ऱ्हास होत आहे.
पहिल्या हरितक्रांतीने शेतीशी संबंधित इतर घटकांकडे पुरेसे लक्ष दिले नाही. यामध्ये मुख्यत्वे जिरायती व कोरडवाहू शेती, डोंगरी प्रदेश, किनारी प्रदेश, शुष्क व वाळवंटी प्रदेश इत्यादींचा समावेश होतो. हे प्रदेश देखील फलोत्पादन, मध उत्पादन, आळंबे (मशरूम), दूध, मांस इत्यादींच्या निर्यातीकरिता सक्षम म्हणून विकसित झाले असते. हरितक्रांतीचे समीक्षक असाही युक्तिवाद करतात की फक्त मोठे शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात कारण त्यांच्याकडे जलसिंचनाच्या सुविधा असतात. रासायनिक खते व बी-बियाणांकरिता त्यांना सहज वित्तपुरवठा होतो. लहान व अल्पभूधारक शेतकरी एकतर हरितक्रांतीपासून दूर राहिले किंवा त्यांचा उत्पादन खर्च अधिक होता व त्या तुलनेत कमी उत्पन्न मिळते. याचबरोबर जमीनदार लोक सतत जमिनीचा दंड वाढवतात किंवा दंडाने दिलेल्या जमिनी परत घेतात. हरितक्रांतीमुळे शेतीमध्ये अनावश्यक यांत्रिकीकरण आले. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार कमी होऊन मजुरीचे दरही कमी झाले.
जलसिंचनाच्या सदोष पद्धतींमुळे कृषियोग्य सुपीक जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढले व त्यामुळे शेतीयोग्य चांगल्या जमिनी नापीक झाल्या. जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर भूजलाचा उपसा झाल्याने भूजल पातळी प्रचंड प्रमाणात खालावली.
पहिल्या हरितक्रांतीत खालीलपैकी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली नाही ?
अ. कोरडवाहू प्रदेश
ब. किनारी प्रदेश
क. सुपीक जमिनीचे प्रदेश
ड. वाळवंटी प्रदेश
Adverse Impacts of Green Revolution
There can be no doubt that the first Green Revolution lifted the country out of a situation immediately after independence when the prospects of famine and scarcity of food commodities loomed large. The rapidly expanding population could have made matters all the more worse. It was the Green Revolution that helped tackle the food security issue with increased agricultural productivity.
However, the Green Revolution did have some adverse impacts too which are being felt in the long run. Since the emphasis was mainly on cereals like rice and wheat, there was a loss of productivity as far as pulses, fruits and vegetables were concerned. The present rate of fruit and vegetable production will not be able to cope with the future demand as the population is increasing rapidly.
Besides, production of the same type of cereals such as rice and wheat year after year gradually decreased soil fertility making it difficult for pulses and other vegetables to grow. Monoculture (the cultivation of same crop variety for a prolonged period) also led to breakdown of the plant's resistance to pests and diseases which is an unwelcome offshoot of the first Green Revolution.
Another criticism often directed at the first Green Revolution is the indiscriminate use of fertilizers and pesticides that is today threatening the agri-future of the country. Excessive and inappropriate use of fertilizers and pesticides led to widespread environmental damage polluting waterways, poisoning agricultural workers and killing beneficial insects and other wildlife.
The first Green Revolution also did not take care of certain areas like rainfed, hilly, coastal, dry land and arid zones which could be developed properly for production of exportable items like fruits, honey, mushroom, milk, meat, etc. Critics of the Green Revolution have also argued that owners of large farms were the main adopters of new technologies because of their better access to irrigation water, fertilizers, seeds and credit. Small farmers were either unaffected or harmed because the Green Revolution resulted in lower product prices, higher input prices and efforts by landlords to increase rent or force tenants off the land. The Green Revolution also encouraged unnecessary mechanization, thereby pushing down rural wages and employment.
Faulty irrigation practices also led to salt build-up and eventual abandonment of some of the best farming lands. Groundwater levels have retreated in areas where more water is being pumped for irrigation than can be replenished by the rains.
The first Green Revolution did not take care of which of the following areas?
a. Rainfed areas
b. Coastal areas
c. Fertile soil areas
d. Arid areas
- (A) फक्त अ आणि क
- (B) फक्त क आणि ड
- (C) फक्त अ, ब आणि ड
- (D) वरील सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, ब आणि ड
योग्य उत्तर पर्याय (३) म्हणजेच फक्त अ, ब आणि ड आहे. स्पष्टीकरण : उताऱ्यातील पाचव्या परिच्छेदानुसार: "पहिल्या हरितक्रांतीने शेतीशी संबंधित इतर घटकांकडे पुरेसे लक्ष दिले नाही. यामध्ये मुख्यत्वे जिरायती व कोरडवाहू शेती (rainfed), डोंगरी प्रदेश (hilly)...