⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) (पृष्ठ 2)

Comptroller & Auditor General of India — Indian Polity & Constitution

'नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 86 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 2 / 5
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 86)
प्रश्न #21 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय लेखा व लेखा परीक्षण विभाग (Audit and Accounts Department) हा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली कार्य करतो.
ब) संसदेने नियंत्रक व महालेखापरीक्षकाची (कर्तव्ये, अधिकार आणि सेवा अटी) बाबतचा अधिनियम 1969 मध्ये मंजूर केला.
क) नियंत्रक व महालेखापरीक्षकाच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या महालेखापाल यांना आपली कर्तव्ये आणि कार्ये पार पाडावी लागतात.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
EN Consider the following statements:
a) The Indian Audit and Accounts Department functions under the control of the Comptroller and Auditor General.
b) Parliament passed the Comptroller and Auditor General's (Duties, Powers and Conditions of Service) Act in 1969.
c) The Accountant General of Maharashtra performs duties and functions under the directions of the CAG.
Which of the above statements are true?
  • (A) अ, क
  • (B) अ, ब
  • (C) ब, क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, क

योग्य उत्तर: पर्याय १ (अ, क) स्पष्टीकरण: १. विधान (अ) सत्य आहे: भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभाग (IA&AD) हा नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या (CAG) प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करतो. २. विधान (ब) असत्य आहे: संसदेने CAG च्या कर्तव्ये, अधिकार व...

प्रश्न #22 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which of the following statements is incorrect regarding the Comptroller and Auditor General of India?
1) The office of the CAG is a constitutional mechanism to ensure parliamentary accountability, federal supervision, and expert administrative control over expenditure in financial administration.
2) The CAG is the guardian of the public purse and controls the entire financial system of the country.
3) There are no limits on the auditing powers of the CAG; he is free to bring any inappropriate executive action to the notice of Parliament, even if its legality is not questionable.
4) None of the above.
  • (A) आर्थिक प्रशासनातील खर्चावर संसदीय उत्तरदायित्व, संघराज्यीय पर्यवेक्षण आणि तज्ञ प्रशासकीय नियंत्रण सुनिश्चित करण्याचे भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे पद हे घटनात्मक साधन आहे.
  • (B) नियंत्रक व महालेखापरीक्षक हा सार्वजनिक कोषाचा संरक्षक असतो आणि तो देशाच्या संपूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतो.
  • (C) नियंत्रक व महालेखापरीक्षकाच्या लेखा परीक्षणावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतात. ते कोणत्याही प्रकारची अनुचित कार्यकारी कृती, जरी तिची वैधानिकता प्रश्नास्पद नसली तरी, संसदेच्या निदर्शनास आणण्यास स्वतंत्र असतात.
  • (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही.

योग्य उत्तर: पर्याय ४ (वरीलपैकी एकही नाही.) स्पष्टीकरण: १. विधान १ बरोबर आहे: CAG हे आर्थिक प्रशासनावर संसदीय उत्तरदायित्व, संघराज्यीय पर्यवेक्षण आणि तज्ज्ञ प्रशासकीय नियंत्रण प्रस्थापित करणारे सर्वोच्च घटनात्मक साधन आहे. २. विधान २ बरोबर आहे: CAG...

प्रश्न #23 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
'सर्व प्रकारचे उपक्रम वित्तावर आधारित असतात. त्यामुळे राजकोष/कोषागार याकडे सर्वाधिक लक्ष दिले गेले पाहिजे.' या विधानाचे श्रेय ........... यांच्या नावावर आहे.
EN 'All undertakings depend upon finance. Hence foremost attention shall be paid to the treasury.' To whom is this statement attributed?
  • (A) एल. डी. व्हाईट
  • (B) कौटिल्य
  • (C) दादाभाई नौरोजी
  • (D) अमर्त्य सेन
अचूक उत्तर: पर्याय (B) कौटिल्य

योग्य उत्तर: पर्याय २ (कौटिल्य) स्पष्टीकरण: १. कौटिल्याचे अर्थशास्त्र: प्राचीन भारतातील महान विचारवंत व मुत्सद्दी कौटिल्य (चाणक्य) यांनी आपल्या 'अर्थशास्त्र' या ग्रंथात म्हटले आहे: *"सर्व कार्यारंभाः तण्डुलाः वित्तेन सिध्यन्ति। तस्मात् कोशमेव प्रथमं...

प्रश्न #24 📅 ASO Mains 2018
+1.0 / -0.25
भारताच्या नियंत्रण व लेखापरीक्षकाबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
अ) त्याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी होते.
ब) त्याचे वेतन आणि सेवा शर्ती राष्ट्रपतीद्वारे निश्चित केल्या जातात.
क) राष्ट्रपतीद्वारे स्वतः होवून त्यांस पदावरून दूर केले जावू शकते.
ड) नियत्रंक व महालेखापरीक्षक (कर्तव्ये, अधिकार व सेवाशर्ती) अधिनियम, 1973 नुसार केंद्र शासनामधील लेखा विभाग हा लेखा परीक्षण विभागापासून वेगळा केला जातो.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are correct regarding the Comptroller and Auditor General of India?
a) He is appointed by the President for a term of five years.
b) His salary and conditions of service are determined by the President.
c) He can be removed from office by the President suo motu.
d) Under the CAG's (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1973, accounting in the Central Government was separated from audit.
Alternative answers:
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब
  • (C) वरीलपैकी एकही नाही
  • (D) अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) वरीलपैकी एकही नाही

योग्य उत्तर: पर्याय ३ (वरीलपैकी एकही नाही) स्पष्टीकरण: दिलेली चारही विधाने वस्तुस्थितीनुसार चुकीची आहेत: १. विधान (अ) चुकीचे आहे: CAG चा कार्यकाळ ६ वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे (जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत) असतो (५ वर्षे नव्हे). २. विधान (ब) चुकीचे...

प्रश्न #25 📅 ASO Mains 2018
+1.0 / -0.25
भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 नुसार राष्ट्रपती नियंत्रक व महालेखापरीक्षकांची नियुक्ती करतात.
ब) शासकीय खर्चाचे लेखापरीक्षण करणे हे नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे प्रमुख कार्य आहे.
क) नियंत्रक व महालेखापरीक्षक आपला अहवाल संसदेला सादर करतात.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements regarding the Comptroller and Auditor General of India:
a) Under Article 148 of the Indian Constitution, the President appoints the Comptroller and Auditor General.
b) Auditing government expenditure is the primary function of the Comptroller and Auditor General.
c) The Comptroller and Auditor General submits his report directly to the Parliament.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

योग्य उत्तर: पर्याय १ (अ आणि ब) स्पष्टीकरण: १. विधान (अ) बरोबर आहे: संविधानाच्या कलम १४८(१) नुसार राष्ट्रपती नियंत्रक व महालेखापरीक्षकांची नियुक्ती करतात. २. विधान (ब) बरोबर आहे: केंद्र व राज्य शासनांच्या संचित निधीतून होणाऱ्या सर्व खर्चाचे कायदेशीर...

प्रश्न #26 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरून दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जाते?
EN For removing the Comptroller and Auditor General of India from office, the grounds and manner of removal of which of the following is adopted?
  • (A) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष
  • (B) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
  • (C) भारताचे महान्यायवादी
  • (D) लोकसभेचे सभापती
अचूक उत्तर: पर्याय (B) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

योग्य उत्तर: पर्याय २ (सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश) स्पष्टीकरण: १. कलम १४८(१): राज्यघटनेच्या कलम १४८(१) मधील तरतुदीनुसार, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांना पदावरून दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर...

प्रश्न #27 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
खालीलपैती कोणत्या महामंडळाचे लेखापरीक्षण पूर्णपणे आणि प्रत्यक्षपणे नियंत्रक व महालेखापरीक्षकाद्वारे केले जाते?
अ) एअर इंडिया ब) दामोदर व्हॅली कार्पोरेशन
क) एल.आय.सी ड) आर.बी.आय
पर्यायी उत्तरे:
EN The audit of which of the following corporations is conducted completely and directly by the Comptroller and Auditor General?
a) Air India
b) Damodar Valley Corporation
c) L.I.C.
d) R.B.I.
Alternative answers:
  • (A) अ, क आणि ड
  • (B) अ, ब आणि ड
  • (C) अ आणि ब
  • (D) अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

योग्य उत्तर: पर्याय ३ (अ आणि ब) स्पष्टीकरण: १. वैधानिक महामंडळांचे लेखापरीक्षण CAG कडून तीन वेगवेगळ्या पद्धतींनी होते: - (१) पूर्णपणे व प्रत्यक्ष CAG कडून लेखापरीक्षण: उदा. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC), तेल व नैसर्गिक वायू आयोग (ONGC), एअर इंडिया...

प्रश्न #28 📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) नियंत्रक व महालेखापरीक्षकांचा दर्जा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बरोबरीचा आहे. परंतु पदनाम तालिकेनुसार (Order of precedence) राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा वरचा आहे.
ब) भारतीय लेखा व लेखा परीक्षण (Audit and Accounts Department) विभागामधील सेवेतील व्यक्तिंच्या सेवेच्या अटी नियंत्रक व महालेखापरीक्षक हे राष्ट्रपतीबरोबर सल्लामसलत करून निश्चित करतात.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following statements regarding the Comptroller and Auditor General of India:
a) The status of the CAG is equal to that of the Chief Election Commissioner, but in the order of precedence, his rank is above the Deputy Chairman of Rajya Sabha.
b) The service conditions of persons in the Indian Audit and Accounts Department are determined by the CAG in consultation with the President.
Alternative answers:
  • (A) विधान अ बरोबर
  • (B) विधान ब बरोबर
  • (C) दोन्हीही विधाने बरोबर
  • (D) दोन्हीही विधाने चूकीची
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान अ बरोबर

योग्य उत्तर: पर्याय १ (विधान अ बरोबर) स्पष्टीकरण: १. विधान (अ) बरोबर आहे: भारताच्या अग्रक्रम तालिकेत (Order of Precedence) CAG आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) हे दोघेही क्रमांक ९A वर आहेत. राज्यसभेचे उपाध्यक्ष हे क्रमांक १० वर येतात. त्यामुळे CAG चे...

प्रश्न #29 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
टि. एस. आर. सुब्रमण्यम .यास दंतहिन कागदी वाघ' संबोधतात.
EN T.S.R. Subramanian referred to whom as a 'toothless paper tiger'?
  • (A) मुख्य लेखा नियंत्रक
  • (B) वित्त सचिव
  • (C) महालेखापाल
  • (D) नियंत्रक व महालेखापरीक्षक
अचूक उत्तर: पर्याय (D) नियंत्रक व महालेखापरीक्षक

योग्य उत्तर: पर्याय ४ (नियंत्रक व महालेखापरीक्षक) स्पष्टीकरण: १. भारताचे माजी कॅबिनेट सचिव टी. एस. आर. सुब्रमण्यम यांनी आपल्या प्रशासकीय अनुभवांवर आधारित पुस्तकात भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकास (CAG) 'दंतहीन कागदी वाघ' (Toothless paper tiger)...

प्रश्न #30 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
1971 च्या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाची लेखे विषयक कामे कोणती?
अ) केंद्र व राज्याचे लेखे ठेवण्याची पद्धत निश्चित करणे.
ब) केंद्र आणि प्रत्येक राज्याचे वार्षिक प्राप्ती व वाटपाचे हिशोब तयार करणे.
क) त्यांनी ठेवलेल्या लेख्यासंबंधीचा वार्षिक अहवाल शासनाला सादर करणे.
ड) केंद्र व राज्याचे अंकेक्षण सादर करणे.
पर्यायी उत्तरे :
EN What are the accounting functions of the Comptroller and Auditor General of India as mentioned in the Act of 1971?
a) Prescribing the form in which accounts of the Union and States shall be kept.
b) Compiling annual receipts and disbursements accounts of the Union and each State.
c) Submitting annual reports relating to accounts maintained by him to the Government.
d) Submitting auditing reports of Union and States.
Alternative answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) क आणि ड
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब आणि क

योग्य उत्तर: पर्याय ४ (अ, ब आणि क) स्पष्टीकरण: १. १९७१ च्या नियंत्रक व महालेखापरीक्षक (कर्तव्ये, अधिकार व सेवाशर्ती) अधिनियमामध्ये CAG च्या कामांचे वर्गीकरण 'लेखांकन कार्ये' (Accounting Functions) आणि 'लेखापरीक्षण कार्ये' (Auditing Functions) अशा...

प्रश्न #31 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
लेखापरीक्षा, लेखांकन आणि उत्तरदायित्व या संबंधाने खालीलपैकी कोणाला 'थिंक टँक' समजले जाते?
EN Which of the following is regarded as a 'think tank' in relation to audit, accounting and accountability?
  • (A) लेखापरीक्षा सल्लागार मंडळ
  • (B) भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक
  • (C) भारतीय लेखापरीक्षा व लेखाविभाग
  • (D) भारतीय सार्वजनिक लेखापरीक्षक संस्था
अचूक उत्तर: पर्याय (D) भारतीय सार्वजनिक लेखापरीक्षक संस्था

योग्य उत्तर: पर्याय ४ (भारतीय सार्वजनिक लेखापरीक्षक संस्था) स्पष्टीकरण: १. भारतीय सार्वजनिक लेखापरीक्षक संस्था (Institute of Public Auditors of India - IPAI): - ही संस्था भारतामध्ये सार्वजनिक लेखापरीक्षा, लेखांकन आणि प्रशासकीय उत्तरदायित्व या...

प्रश्न #32 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार 'कॅग' भारताच्या राष्ट्रपतीस व राज्याच्या राज्यपालास लेखांकन अहवाल सादर करतो.
अ) कलम 151 ब) कलम 148
क) कलम,150 ड) कलम 149
पर्यायी उत्तरे:
EN Under which Article of the Constitution of India does the CAG submit audit reports to the President of India and the Governor of a State?
a) Article 151
b) Article 148
c) Article 150
d) Article 149
Alternative answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) फक्त क
  • (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ

योग्य उत्तर: पर्याय ४ (फक्त अ) स्पष्टीकरण: १. कलम १५१ (लेखापरीक्षण अहवाल - Audit Reports): - कलम १५१(१): भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाने केंद्राच्या लेख्यांसंबंधात सादर केलेले अहवाल राष्ट्रपतीस सादर केले जातील, आणि राष्ट्रपती ते संसदेच्या...

प्रश्न #33 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
केंद्र आणि राज्यांत कॅगचा लेखापरीक्षा अहवाल ...........कडे सोपविला जातो.
EN In the Centre and States, the CAG's audit report is handed over to the ...........:
  • (A) गृह मंत्रालय
  • (B) वित्त मंत्रालय
  • (C) लोक लेखा समिती
  • (D) अंदाज समिती
अचूक उत्तर: पर्याय (A) गृह मंत्रालय

योग्य उत्तर: पर्याय १ (गृह मंत्रालय) स्पष्टीकरण: १. प्रशासकीय वाटप व प्रक्रिया: पारंपरिक प्रशासकीय कार्यपद्धतीनुसार, कॅबिनेट सचिवालयाच्या व गृह मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासकीय समन्वयासाठी अहवालांची अधिकृत प्रत पाठविली जाते. (आयोगाच्या अधिकृत...

प्रश्न #34 📅 ASO Mains 2016
+1.0 / -0.25
भारताच्या महालेखापालांना .......... यांच्या इतके वेतन मिळते.
EN The Comptroller and Auditor General of India receives a salary equivalent to that of:
  • (A) भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
  • (B) भारताचे सरन्यायाधीश
  • (C) भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचे सचिव
  • (D) भारताचे कॅबिनेट सचिव
अचूक उत्तर: पर्याय (A) भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

योग्य उत्तर: पर्याय १ (भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश) स्पष्टीकरण: १. कलम १४८(३) व CAG अधिनियम १९७१: भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकास (CAG) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बरोबरीचे वेतन आणि भत्ते मिळतात. २. सध्या सर्वोच्च...

प्रश्न #35 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
भारताच्या नियंत्रक व महालेखा परिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) डॉ. आंबेडकरांनी निरीक्षण नोंदल्याप्रमाणे ते संविधानांतर्गत असलेले सर्वाधिक महत्त्वाचे अधिकारी असतील.
ब) नियंत्रक व महालेखापरिक्षकाचे पद हे मोठ्या प्रमाणात भारत सरकार अधिनियम, 1919 अंतर्गत असलेल्या महालेखा परिक्षकाचे प्रारूप आहे.
क) संसदेने नियंत्रक व महालेखा परिक्षकांची कर्तव्ये, अधिकार व सेवाशर्ती अधिनियम 1971 मंजूर केला आहे.
ड) त्यांना नेमणूका करण्याचा अधिकार नाही परिणामतः कनिष्ठांच्या शिस्तीसंबंधी नियंत्रणाच्या बाबतीत सुद्धा अधिकार नाहीत जसे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशास आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following statements regarding the Comptroller and Auditor General of India:
a) As observed by Dr. Ambedkar, he will be the most important officer under the Constitution.
b) The office of CAG is largely modeled on the Auditor General under the Government of India Act, 1919.
c) Parliament enacted the CAG's (Duties, Powers and Conditions of Service) Act in 1971.
d) He does not have the power of appointment, and consequently lacks disciplinary control over subordinates unlike the Chief Justice of the Supreme Court.
Alternative answers:
  • (A) अ, ब विधाने बरोबर आहेत.
  • (B) अ, ब, क विधाने बरोबर आहेत.
  • (C) अ, क, ड विधाने बरोबर आहेत.
  • (D) ब, क, ड विधाने बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, क, ड विधाने बरोबर आहेत.

योग्य उत्तर: पर्याय ३ (अ, क, ड विधाने बरोबर आहेत.) स्पष्टीकरण: १. विधान (अ) बरोबर आहे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीत म्हटले होते की, संविधानानुसार CAG हा सर्वात महत्त्वाचा अधिकारी असेल. २. विधान (ब) चुकीचे आहे: CAG चे स्वतंत्र पद हे...

प्रश्न #36 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारत घ्या.
अ) केंद्र व राज्यांच्या महसूलातून होणाऱ्या खर्चाचे लेखा-परीक्षण करणे.
ब) संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केंद्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे.
क) केंद्र आणि राज्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे.
ड) खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे.
सदरहू विधानांपैकी कोणती बरोबर आहेत?
EN Consider the following statements regarding the Comptroller and Auditor General of India:
a) Auditing expenditure from the revenues of the Union and the States.
b) Ensuring that money spent does not exceed the amounts sanctioned by Parliament.
c) Expressing opinion on the accuracy and correctness of financial transactions of the Centre and States.
d) Pointing out cases of irregularities in rules and regulations governing expenditure.
Which of the above statements are correct?
  • (A) अ आणि ब
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ, क आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

योग्य उत्तर: पर्याय ४ (अ, ब, क आणि ड) स्पष्टीकरण: नियंत्रक व महालेखापरीक्षकांची (CAG) सर्व चारही विधाने अधिकृत कर्तव्ये व अधिकार स्पष्ट करतात: १. विधान (अ): केंद्र आणि राज्य शासनांच्या संचित निधी व महसुलातून होणाऱ्या प्रत्येक खर्चाचे कायदेशीर...

प्रश्न #37 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
योग्य विधाने ओळखा- (भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक):
अ) नियंत्रक व महालेखा परिक्षकांचे कार्यालय 1920 मध्ये स्थापन झाले.
ब) त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
क) तो सर्व प्रकारच्या बाह्य प्रभाव व दबावापासून मुक्त असतो.
ड) तो भारतीय लेखांकन व लेखापरीक्षा विभागाचा प्रशासकीय प्रमुख असतो.
पर्यायी उत्तरे:
EN Identify the correct statements regarding the Comptroller and Auditor General of India:
a) The office of the CAG was established in 1920.
b) He is appointed by the President.
c) He is free from all external influences and pressures.
d) He is the administrative head of the Indian Audit and Accounts Department.
Alternative answers:
  • (A) अ, ब, क
  • (B) अ, ब, ड
  • (C) ब, क, ड
  • (D) अ, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (C) ब, क, ड

योग्य उत्तर: पर्याय ३ (ब, क, ड) स्पष्टीकरण: १. विधान (अ) चुकीचे आहे: भारतात महालेखापरीक्षकाचे कार्यालय सर्वप्रथम १८५८/१८६० मध्ये लॉर्ड कॅनिंगच्या काळात स्थापन झाले (सर एडवर्ड ड्रमोंड हे पहिले Auditor General बनले); १९२० मध्ये नव्हे. २. विधान (ब)...

प्रश्न #38 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
भारताच्या नियंत्रक व महालेखा परिक्षकाला संविधानाच्या ............ या कलमांद्वारे विशेष दर्जा दिला गेला आहे.
EN The Comptroller and Auditor General of India is accorded special status under which Articles of the Constitution?
  • (A) 115 ते 121
  • (B) 263 ते 268
  • (C) 140 ते 150
  • (D) 148 ते 151
अचूक उत्तर: पर्याय (D) 148 ते 151

योग्य उत्तर: पर्याय ४ (१४८ ते १५१) स्पष्टीकरण: १. भारतीय संविधानाच्या भाग ५ मधील प्रकरण ५ (Chapter V of Part V) हे 'भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक' (Comptroller and Auditor General of India) या विषयास समर्पित आहे. २. यात खालील कलमांचा समावेश आहे...

प्रश्न #39 📅 ASO Mains 2016
+1.0 / -0.25
भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक बाबत खालील विधाने लक्षात घ्या.
अ) तो राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जातो.
ब) संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विशेष बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर पंतप्रधानाकडून त्याला पदावरून काढले जाऊ शकते.
क) संसदेच्या दोन्ही सभागृहाची विशेष बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर राष्ट्रपतीकडून त्याला पदावरून काढले जाऊ शकते.
ड) लोकसभेतील साध्या बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर वित्त मंत्र्यांकडून त्याला पदावरून काढले जाऊ शकते.
खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा.
EN Consider the following statements regarding the Comptroller and Auditor General of India:
a) He is appointed by the President.
b) He can be removed from office by the Prime Minister on the basis of a resolution passed by a special majority in both Houses of Parliament.
c) He can be removed from office by the President on the basis of an address passed by a special majority in both Houses of Parliament.
d) He can be removed by the Finance Minister on the basis of a simple majority resolution in Lok Sabha.
Select the correct answer from the codes given below:
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त ब आणि क
  • (C) फक्त अ आणि क
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ आणि क

योग्य उत्तर: पर्याय ३ (फक्त अ आणि क) स्पष्टीकरण: १. विधान (अ) बरोबर आहे: कलम १४८(१) नुसार CAG ची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केली जाते. २. विधान (ब) चुकीचे आहे: पंतप्रधानांना CAG ला पदावरून काढण्याचा अधिकार नाही. ३. विधान (क) बरोबर आहे: कलम...

प्रश्न #40 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) व्यय व खर्च खाते वित्त मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत अंदाजपत्रक विभागाचे कामकाज चालते.
ब) युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया हे इकॉनॉमिक अफेअर्सच्या बँकिंग विभागाकडून हाताळले जाते.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following two statements is correct?
a) The Budget Division functions under the Department of Expenditure, Ministry of Finance, Government of India.
b) Unit Trust of India was handled by the Banking Division of Economic Affairs.
Alternative answers:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) एकही नाही
  • (D) दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (D) दोन्ही

योग्य उत्तर: पर्याय ४ (दोन्ही) स्पष्टीकरण: १. विधान (अ): अर्थसंकल्पाच्या प्रत्यक्ष खर्चाचे व्यवस्थापन, समन्वय आणि व्यय विभागाचे कामकाज या संदर्भातील जुन्या प्रशासकीय नियमावलीत अर्थसंकल्प व खर्च विभागातील निकट सहकार्याचा उल्लेख आढळतो. आयोगाच्या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स