⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB
आणीबाणीविषयक तरतुदी (कलम ३५२, ३५६, ३६०)
Emergency Provisions: National, State & Financial — Indian Polity & Constitution
'आणीबाणीविषयक तरतुदी (कलम ३५२, ३५६, ३६०)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
अधिकृत सराव प्रश्न31 MCQs
विषय विभागराज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक1 / 2
🎯 खात्यांतर्गत PSI🎯 जिल्हा न्यायालय🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO)🎯 महानगरपालिका🎯 BMC मुंबई भरती
📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 1 ते 20 (एकूण 31)
प्रश्न #1📅 Combine Group B Mains 2025
+1.0 / -0.25
भारतीय संविधानातील कोणते कलम राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क निलंबित करण्याचा अधिकार देते ?
ENWhich article of Indian constitution deals with the term of office of President ?
(A)352
(B)356
(C)359
(D)360
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)359
योग्य उत्तर: पर्याय ३ (359) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद ३५९ (मूलभूत हक्क बजावण्याचा अधिकार निलंबित करणे): - राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद ३५९ अन्वये राष्ट्रपती आदेश काढून नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद...
प्रश्न #2📅 MPSC Pre 2024
+1.0 / -0.25
घटकराज्यातील आणीबाणीसंदर्भातील 'बोम्मई खटल्या' बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
(A) बोम्मई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला.
(B) घटकराज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते.
(C) सबळ कारण नसतांना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करु शकते.
(D) घटकराज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते.
पर्यायी उत्तरे :
ENWhich of the following statements are correct regarding the 'Bommai Case' relating to State Emergency?
(A) The Supreme Court delivered the judgment in the Bommai case in 1994.
(B) If President's Rule is imposed in a State, the State can seek remedy from the Supreme Court.
(C) If President's Rule is imposed without proper grounds, the Supreme Court can invalidate the Central Government's decision.
(D) The order dissolving the Legislative Assembly of the State requires approval of Parliament.
Alternative Answers:
(A)फक्त (C) आणि (D)
(B)(A), (B), (C) आणि (D)
(C)फक्त (B), (C) आणि (D)
(D)फक्त (A), (B) आणि (C)
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)(A), (B), (C) आणि (D)
योग्य उत्तर: पर्याय २ ((A), (B), (C) आणि (D)) सविस्तर स्पष्टीकरण: 'एस. आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार (१९९४)' या ऐतिहासिक खटल्यातील ९ न्यायमूर्तींच्या खंडपीठाचे मार्गदर्शक तत्त्वे: - विधान (A) बरोबर आहे: सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल १९९४...
प्रश्न #3📅 Group C Mains 2023
+1.0 / -0.25
केंद्र सरकार राज्यसरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकते ?
ENUnder which Article of the Constitution can the Central Government give directions to State Governments?
(A)कलम 370
(B)कलम 356
(C)कलम 256
(D)कलम 263
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)कलम 256
योग्य उत्तर: पर्याय ३ (कलम 256) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद २५६ (घटकराज्ये आणि संघराज्य यांची बंधने): - संविधानाच्या कलम २५६ नुसार, प्रत्येक राज्याची कार्यकारी सत्ता अशा रीतीने वापरली जाईल ज्यामुळे संसदेने केलेल्या कायद्यांचे पालन सुनिश्चित...
प्रश्न #4📅 STI Mains 2022
+1.0 / -0.25
राष्ट्रपतींना जर वाटले की, युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र उठावामुळे भारताच्या किंवा भारताच्या काही प्रदेशाच्या सुरक्षिततेला भयंकर धोका निर्माण झाला आहे तर ते राज्यघटनेच्या अनुच्छेद क्रमांक_____अन्वये संपूर्ण भारतात किंवा भारताच्या काही भागात आणीबाणी जाहीर करू शकतात.
ENIf the President is satisfied that a grave emergency exists whereby the security of India or any part of its territory is threatened by war or external aggression or armed rebellion, he may proclaim an emergency under Article _____ of the Constitution throughout India or in any part thereof.
(A)123
(B)352
(C)72
(D)359
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)352
योग्य उत्तर: पर्याय २ (352) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद ३५२ (आणीबाणीची घोषणा / Proclamation of Emergency): - "जर राष्ट्रपतींची अशी खात्री झाली की, युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यामुळे भारताच्या किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या...
प्रश्न #5📅 Forest Service Mains 2021
+1.0 / -0.25
योग्य कथन /ने ओळखा.
(a) राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एकावेळेस एक वर्ष वाढविण्याचा अधिकार आहे.
(b) आणीबाणी संपल्याची घोषणा झाल्यानंतर लोकसभेचा कार्यकाळ सहा महिण्यांपेक्षा जास्त वाढविता येत नाही.
पर्यायी उत्तरे :
ENIdentify the correct statement(s):
(a) The President has the power to extend the term of the Lok Sabha by one year at a time during a National Emergency.
(b) After the proclamation of emergency ceases to operate, the term of Lok Sabha cannot be extended beyond six months.
Alternative Answers:
(A)कथन (a) फक्त
(B)कथन (b) फक्त
(C)दोन्ही कथने (a) आणि (b)
(D)यापैकी नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)दोन्ही कथने (a) आणि (b)
योग्य उत्तर: पर्याय ३ (दोन्ही कथने (a) आणि (b)) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद ८३(२) - लोकसभेचा कार्यकाळ वाढवणे: - संविधानाच्या कलम ८३(२) मधील परंतुकानुसार, राष्ट्रीय आणीबाणी अंमलात असताना संसदेला कायद्याद्वारे लोकसभेचा ५ वर्षांचा सामान्य कार्यकाळ...
प्रश्न #6📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यास विधान सभेचा कार्यकाळ वाढविता येवू शकतो.
ब) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात विधानसभेचा कार्यकाळ एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढविण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.
क) विधानसभेचा विस्तारित (वाढविलेला) कार्यकाळ, हा आणीबाणी उठल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त असणार नाही.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
ENConsider the following statements:
(a) If the President proclaims a National Emergency, the term of the Legislative Assembly can be extended.
(b) During a National Emergency, the President has the power to extend the term of the Legislative Assembly by six months at a time.
(c) The extended term of the Legislative Assembly cannot exceed six months after the emergency has ceased to operate.
Which of the above statements is/are correct?
(A)फक्त अ
(B)अ आणि ब
(C)अ आणि क
(D)वरील सर्व
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)अ आणि क
योग्य उत्तर: पर्याय ३ (अ आणि क) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद १७२(१) - विधानसभेचा कार्यकाळ वाढवणे: - विधान (अ) बरोबर आहे: राष्ट्रीय आणीबाणी चालू असताना राज्य विधानसभेचा ५ वर्षांचा सामान्य कार्यकाळ संसदेच्या कायद्याने वाढविला जाऊ शकतो. - विधान (ब)...
प्रश्न #7📅 PSI Mains 2021
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 356 अनुसार घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडण्याच्या कारणास्तव राज्यातील राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत/कारणास्तव एक वर्षापेक्षा जास्त काळ चालू ठेवता येवू शकते ?
अ) संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट चालू ठेवणे आवश्यक आहे असे राष्ट्रपतीस लेखी कळविले तर.
ब) केन्द्रीय कॅबिनेटने राष्ट्रपती राजवट चालू ठेवणे आवश्यक आहे असे राष्ट्रपतीस लेखी कळविले तर.
क) संबंधित राज्यात कांही अडचणींमुळे विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणूका घेणे अवघड आहे असे निर्वाचन आयोगाने प्रमाणित केले तर.
ड) केवळ राष्ट्रीय आणीबाणी चालू असेल तर.
पर्यायी उत्तरे :
ENUnder Article 356 of the Constitution of India, President's Rule imposed due to failure of constitutional machinery in a State can be extended beyond one year under which of the following circumstances/conditions?
(a) If the Governor of the concerned State communicates in writing to the President that continuance of President's Rule is necessary.
(b) If the Union Cabinet communicates in writing to the President that continuance of President's Rule is necessary.
(c) If the Election Commission certifies that there are difficulties in holding general elections to the Legislative Assembly of the State.
(d) If a National Emergency is in operation.
Alternative Answers:
(A)अ, क आणि ड
(B)ब आणि क
(C)क आणि ड
(D)केवळ ड
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)क आणि ड
प्रश्न #8📅 Rajyaseva Pre 2021
+1.0 / -0.25
राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत 'सशस्त्रबंड' हा शब्द कधी जोडला गेला?
ENWhen was the phrase 'armed rebellion' added in the Constitution for declaring a National Emergency?
(A)44 व्या घटनादुरुस्तीने
(B)42 व्या घटनादुरुस्तीने
(C)40 व्या घटनादुरुस्तीने
(D)38 व्या घटनादुरुस्तीने
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)44 व्या घटनादुरुस्तीने
योग्य उत्तर: पर्याय १ (44 व्या घटनादुरुस्तीने) सविस्तर स्पष्टीकरण: १. ४४ वी घटनादुरुस्ती कायदा, १९७८: - १९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारने 'अंतर्गत अशांतता' (Internal Disturbance) या संदिग्ध शब्दाचा गैरवापर करून राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती. - हा...
प्रश्न #9📅 Forest Service Mains 2019
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात.
ब) राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसेदच्या दोन्ही सभागृहांची मान्यता दोन महिन्यांच्या आत घ्यावीच लागते.
क) राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी साध्या बहुमताने मान्यता दिली पाहिजे.
ड) राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात त्यासाठी मान्यतेची गरज नसते.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
ENConsider the following statements:
(a) The President can declare a National Emergency on the advice of the Prime Minister.
(b) The proclamation of National Emergency must be approved by both Houses of Parliament within two months.
(c) The proclamation of National Emergency must be approved by both Houses of Parliament by a simple majority.
(d) The President can revoke a proclamation of National Emergency at any time without requiring parliamentary approval.
Which of the statements given above is/are correct?
(A)फक्त अ
(B)अ, ब आणि क
(C)फक्त ड
(D)क आणि ड
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)फक्त ड
योग्य उत्तर: पर्याय ३ (फक्त ड) सविस्तर स्पष्टीकरण: विधानांचे वस्तुनिष्ठ परीक्षण: - विधान (अ) चूक आहे: ४४ व्या घटनादुरुस्तीनुसार (१९७८) राष्ट्रपती केवळ पंतप्रधानाच्या वैयक्तिक सल्ल्याने आणीबाणी घोषित करू शकत नाहीत; केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union...
प्रश्न #10📅 ASO Mains 2019
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/ने चूकीची आहे/त?
अ) अनुच्छेद-365 देखील राष्ट्रपतीस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार प्रदान करते.
ब) राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत त्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देणे अत्यावश्यक असते.
क) जर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली तर पुढील एक वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहते.
ड) राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय न्यायालय रद्द करू शकतो.
पर्यायी उत्तरे:
ENWhich of the following statement(s) is/are incorrect?
(a) Article 365 also empowers the President to impose President's Rule in a State.
(b) A proclamation of President's Rule must be approved by both Houses of Parliament within one month from its issue.
(c) If approved by both Houses of Parliament, President's Rule continues for one year.
(d) The court can invalidate the decision to impose President's Rule.
Alternative Answers:
(A)फक्त ब
(B)फक्त ब आणि क
(C)फक्त क आणि ड
(D)फक्त अ आणि ड
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)फक्त ब आणि क
योग्य उत्तर: पर्याय २ (फक्त ब आणि क ही विधाने चुकीची आहेत) सविस्तर स्पष्टीकरण: विधानांचे परीक्षण: - विधान (अ) बरोबर आहे: अनुच्छेद ३६५ नुसार केंद्राच्या निर्देशांचे पालन न केल्यासही राज्यात राष्ट्रपती राजवट (अनुच्छेद ३५६) लागू करता येते. - विधान (ब)...
प्रश्न #11📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
अनुच्छेद क्रमांक 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी संबंधी पुढील विधानांपैकी योग्य विधान कोणते ते सांगा :
अ) अनुच्छेद क्रमांक 352 अंतर्गत राज्य सरकार कार्यरत राहतात ते बरखास्त होत नाहीत.
ब) अनुच्छेद क्रमांक 352 च्या प्रभावाखाली केंद्र शासनाला कायदेनिर्मिती आणि प्रश्नासनासंदर्भात घटकराज्यामध्ये एक समयावच्छेदी अधिकार प्राप्त होतात.
क) अनुच्छेद क्रमांक 352 अंतर्गत घटकराज्याची कायदेमंडळे कार्यरत राहू शकतात.
पर्यायी उत्तरे:
ENState which of the following statements regarding National Emergency under Article 352 is/are correct:
(a) Under Article 352, State governments continue to function and are not dismissed.
(b) Under the operation of Article 352, the Central Government obtains concurrent powers in legislation and administration in the constituent states.
(c) Under Article 352, the State Legislatures may continue to function.
Alternative Answers:
(A)अ, ब, क
(B)अ, क
(C)ब, क
(D)अ, ब
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)अ, ब, क
योग्य उत्तर: पर्याय १ (अ, ब, क) सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान (अ) बरोबर आहे: अनुच्छेद ३५२ अन्वये राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाल्यावर राज्य सरकारे बरखास्त केली जात नाहीत, तर ती केंद्राच्या थेट नियंत्रणाखाली राहून कार्यरत राहतात (राष्ट्रपती राजवटीत राज्य...
प्रश्न #12📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१) राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा संमत करू शकते.
२) उपराष्ट्रपतीस पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावाचा आरंभ केवळ राज्यसभेमध्येच होवू शकतो.
३) नवीन अखिल भारतीय सेवांच्या निर्मितीसंबंधी ठरावाचा आरंभ केवळ राज्यसभेमध्येच होवू शकतो.
४) राज्यसभा राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला (लोकसभेला) देऊ शकते.
ENWhich of the following statements is NOT correct?
(1) A resolution disapproving the continuance of a National Emergency can be passed only by the Rajya Sabha.
(2) A resolution for the removal of the Vice-President can only be initiated in the Rajya Sabha.
(3) A resolution for the creation of new All India Services can only be initiated in the Rajya Sabha.
(4) The Rajya Sabha can authorize Parliament to legislate on subjects in the State List.
(A)राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा संमत करू शकते.
(B)उपराष्ट्रपतीस पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावाचा आरंभ केवळ राज्यसभेमध्येच होवू शकतो.
(C)नवीन अखिल भारतीय सेवांच्या निर्मितीसंबंधी ठरावाचा आरंभ केवळ राज्यसभेमध्येच होवू शकतो.
(D)राज्यसभा राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला (लोकसभेला) देऊ शकते.
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा संमत करू शकते.
योग्य उत्तर: पर्याय १ (राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा संमत करू शकते हे विधान बरोबर नाही) सविस्तर स्पष्टीकरण: १. विधान १ का चुकीचे आहे? - ४४ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९७८ मधील कलम ३५२(७) व (८) नुसार, राष्ट्रीय आणीबाणी समाप्त...
प्रश्न #13📅 Rajyaseva Pre 2019
+1.0 / -0.25
1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही?
ENWhich one of the following has not been provided by the 44th Constitutional Amendment Act of 1978 relating to National Emergency?
(A)कॅबिनेटच्या लेखी शिफारशी शिवाय राष्ट्रपती आणीबाणी घोषित करु शकणार नाही.
(B)'अंतर्गत अशांतता' या ऐवजी 'सशस्त्र बंडाळी' हा शब्दप्रयोग करण्यात आला.
(C)अनुच्छेद 19 खाली असलेले सहा मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील, सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत.
(D)जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे.
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे.
योग्य उत्तर: पर्याय ४ (जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे ही तरतूद केलेली नाही) सविस्तर स्पष्टीकरण: १. पर्याय ४ का चुकीचा आहे?...
प्रश्न #14📅 PSI Mains 2019
+1.0 / -0.25
राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित केल्याचे खालीलपैकी कोणते आवश्यक परिणाम होतातच असे नाही?
अ) राज्य विधान सभेचे विसर्जन
ब) राज्य विधान परिषदेचे विसर्जन
क) राज्यातील मंत्री परिषदेची पदच्यूती
खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर द्या :
ENWhich of the following is/are not necessarily the consequence(s) of the proclamation of President's Rule in a State?
(a) Dissolution of the State Legislative Assembly
(b) Dissolution of the State Legislative Council
(c) Dismissal of the State Council of Ministers
Select the correct answer using the options given below:
(A)ब, क
(B)अ, क
(C)अ, ब,
(D)अ, ब, क
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)अ, ब,
योग्य उत्तर: पर्याय ३ (अ, ब) सविस्तर स्पष्टीकरण: १. राष्ट्रपती राजवटीचे तात्काळ व अनिवार्य परिणाम: - राष्ट्रपती राजवट (कलम ३५६) लागू होताच राज्यातील मंत्रिमंडळ तात्काळ बरखास्त होते (Dismissal of Council of Ministers - क). हा राष्ट्रपती राजवटीचा...
प्रश्न #15📅 ASO Mains 2018
+1.0 / -0.25
जर एखादे राज्य केन्द्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात अपयशी ठरले तर राष्ट्रपती काय करतील?
ENIf a State fails to comply with the directions issued by the Central Government, what will the President do?
(A)ते राज्य विधिमंडळात विसर्जित करतील आणि नव्याने निवडणूका घेण्याचे आदेश देतील.
(B)ते राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडल्याचे घोषित करतील आणि राज्य चालविण्याची जबाबदारी स्विकारतील.
(C)ते राज्यात अर्धसैनिक दले पाठवून निर्देशांची पूर्तता करवून घेतील.
(D)वरीलपैकी कोणतेही
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)ते राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडल्याचे घोषित करतील आणि राज्य चालविण्याची जबाबदारी स्विकारतील.
योग्य उत्तर: पर्याय २ (ते राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडल्याचे घोषित करतील आणि राज्य चालविण्याची जबाबदारी स्विकारतील) सविस्तर स्पष्टीकरण: १. अनुच्छेद ३६५ ची तरतूद: भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३६५ नुसार, जेव्हा एखादे घटकराज्य केंद्र सरकारने...
प्रश्न #16📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जावू शकते.
अ) जेंव्हा राज्यशासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळात नामंजूर होते.
ब) जर राज्यघटनेतील तरतूदीप्रमाणे राज्यशासन काम करीत नसेल.
क) जर केंद्राने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल.
ड) जेंव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्त्वाच्या मुद्यावर मतभिन्नता असेल.
पर्यायी उत्तरे :
ENAccording to the Constitution, President's Rule can be declared in a State:
(a) When a bill introduced by the State Government is defeated in the State Legislature.
(b) If the governance of the State cannot be carried on in accordance with the provisions of the Constitution.
(c) If the State Government fails to comply with directions given by the Centre.
(d) When there is a dispute on major issues between the Governor and the Chief Minister.
Alternative Answers:
(A)अ, ब आणि क
(B)ब आणि क
(C)अ, ब, ड
(D)अ, क, ड
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)ब आणि क
योग्य उत्तर: पर्याय २ (ब आणि क) सविस्तर स्पष्टीकरण: संविधानानुसार राष्ट्रपती राजवट (कलम ३५६) लागू करण्याचे अधिकृत घटनात्मक आधार: - विधान (ब) बरोबर आहे (कलम ३५६): जर राज्यपालांच्या अहवालावरून किंवा अन्य मार्गाने राष्ट्रपतींची खात्री झाली की राज्यातील...
प्रश्न #17📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते?
ENUnder Article 360 of the Indian Constitution, which department is responsible for managing a Financial Emergency?
(A)खर्च विभाग
(B)महसूल विभाग
(C)आर्थिक व्यवहार विभाग
(D)संरक्षण विभाग
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)आर्थिक व्यवहार विभाग
योग्य उत्तर: पर्याय ३ (आर्थिक व्यवहार विभाग - Department of Economic Affairs) सविस्तर स्पष्टीकरण: १. केंद्रीय वित्त मंत्रालय रचना: वित्त मंत्रालयामध्ये आर्थिक व्यवहार विभाग (DEA), खर्च विभाग (DoE), महसूल विभाग (DoR), वित्तीय सेवा विभाग (DFS) आणि...
प्रश्न #18📅 ASO Mains 2018
+1.0 / -0.25
राष्ट्रपतीने 'आर्थिक आणीबाणी' घोषित केल्यास त्याचे खालीलपैकी कोणते परिणाम होतील?
अ) राष्ट्रपती नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार निलंबित करू शकतात.
ब) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश वगळून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्यात कपात करू शकतात.
क) राष्ट्रपती आर्थिक व्यहारातील सुज्ञपणाच्या तत्त्वाचे पालन करण्यासंबंधी राज्याला आदेश देवू शकतात.
ड) राज्य विधिमंडळाने संमत केलेली सर्व अर्थ विधेयके राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवली जावू शकतात.
पर्यायी उत्तरे:
ENWhich of the following will be the effects if the President declares a 'Financial Emergency'?
(a) The President can suspend all Fundamental Rights of citizens.
(b) The President can reduce salaries of government employees excluding Supreme Court and High Court Judges.
(c) The President can issue directions to States to observe canons of financial propriety.
(d) All money bills passed by the State Legislature may be reserved for the consideration of the President.
Alternative Answers:
(A)विधाने अ, ब, क बरोबर आहेत.
(B)विधाने ब, क, ड बरोबर आहेत.
(C)विधाने क, ड बरोबर आहेत.
(D)विधाने अ, ब, ड बरोबर आहेत.
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)विधाने क, ड बरोबर आहेत.
योग्य उत्तर: पर्याय ३ (विधाने क, ड बरोबर आहेत) सविस्तर स्पष्टीकरण: आर्थिक आणीबाणीच्या (कलम ३६०) परिणामांचे विश्लेषण: - विधान (अ) चूक आहे: आर्थिक आणीबाणीच्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार निलंबित करण्याचा कोणताही अधिकार राष्ट्रपतींना नसतो (मूलभूत...
प्रश्न #19📅 Combine Group B Pre 2017
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत.
ब) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र. 356 राज्य आणीबाणीशी (राष्ट्रपती राजवट) संबंधित आहे.
क) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र. 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
ENConsider the following statements:
(a) Articles 352 to 360 of the Indian Constitution deal with different types of emergencies.
(b) Article 356 of the Indian Constitution is related to State Emergency (President's Rule).
(c) Article 360 of the Indian Constitution is related to National Emergency.
Which of the above statement(s) is/are correct?
(A)फक्त अ
(B)अ आणि ब
(C)ब आणि क
(D)अ, ब आणि क
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)अ आणि ब
योग्य उत्तर: पर्याय २ (अ आणि ब) सविस्तर स्पष्टीकरण: विधानांचे परीक्षण: - विधान (अ) बरोबर आहे: भारतीय संविधानाचा भाग १८ हा अनुच्छेद ३५२ ते ३६० दरम्यान विविध आणीबाणीविषयक तरतुदींशी संबंधित आहे. - विधान (ब) बरोबर आहे: अनुच्छेद ३५६ हे घटक राज्यातील...
प्रश्न #20📅 Rajyaseva Pre 2017
+1.0 / -0.25
अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणे बाबत विधाने विचारात घ्या.
अ) तिच्या घोषणेपासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येते, जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर.
ब) राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तर.
ENConsider the statements regarding the proclamation of emergency under Article 352:
(a) It ceases to operate at the expiration of one month from its proclamation unless approved by a resolution of the Lok Sabha before the expiration of that period.
(b) The President has the power to proclaim an emergency only if the Union Cabinet communicates to him in writing its recommendation to proclaim it.
(A)विधान 'अ' बरोबर
(B)विधान 'ब' बरोबर
(C)दोन्हीही विधाने बरोबर
(D)दोन्हीही विधाने चूकीची
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)दोन्हीही विधाने चूकीची
योग्य उत्तर: पर्याय ४ (दोन्हीही विधाने चूकीची) सविस्तर स्पष्टीकरण: विधानांचे सूक्ष्म परीक्षण: - विधान 'अ' चूक आहे: राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला एका महिन्याच्या आत केवळ लोकसभेची नव्हे, तर संसदेच्या दोन्ही सभागृहांची (लोकसभा आणि राज्यसभा) विशेष...
Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!
खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग