संत ज्ञानेश्वरांचे पसायदान आणि जीवनमूल्ये
माउलीने पसायदान कशासाठी मागितले आहे? सगळ्या मानवांची प्रकृती हळूहळू संस्कृतीकडे वळावी. लोककल्याणाचा काहीतरी चांगले घडवायचा मार्ग त्यांना दिसावा म्हणून पसायदान सांगितलेले आहे. जावे ते सन्मार्गाकडे जावे, जावे ते सात्विकतेच्या मार्गाकडे जावे आणि म्हणावे, 'आमच्या हातून कृत्ये अशी घडोत, आमच्या हातून कर्मे अशी घडोत की ती परोपकारार्थ केलेली असोत' आणि म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाची धडपड सज्जन व्हावे यासाठी असावी. मग आमची प्रकृती कशी असावी? आमचा प्रवृत्तिधर्म कसा असावा? तर प्रसिद्धिपराङ्मुख असावा. तो रावणासारखा कधीही नसावा. तो रामासारखा असावा! तो कृष्णासारखा असावा! तो संतांच्यासारखा असावा! तसा पिंड आपला घडावा म्हणून या प्रार्थना सातत्याने आपण केल्या पाहिजेत. मानवाच्या मनामध्ये जोपर्यंत अहंकार असतो ना तो अहंकार जोपर्यंत जिरत नाही तोपर्यंत प्रयत्न आवश्यक आहे. एकदा अहंकार जिरला की 'अवघे देणे रघुनाथाचे' हीच संकल्पना. म्हणून मग अहंकार असावा पण ज्ञानजन्य निरहंकाराकडे त्याला झेपावता आले पाहिजे. म्हणून अहंकाराचे चार स्तर आपल्याकडे सांगितले आहेत ना, ते थोडे समजावून घेतले पाहिजेत.
ज्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय नाही त्यांचा अहंकार हा अज्ञानजन्य अहंकार आहे. म्हणजे तो ज्ञानजन्य नाही. पण ज्यांना आपली ओळख पटायला लागली आहे त्यांचा व्यक्तिगत अहंकार आहे. ज्यांना आणखी व्यापक दृष्टी प्राप्त झालेली आहे त्यांचा व्यापक अहंकार आहे. ज्यांना आत्मतत्त्व प्राप्त झाले त्यांचा अहंकार हा ज्ञानजन्य निरहंकारामध्ये रूपांतरित झालेला आहे. कारण त्याला ज्ञानाची बैठक प्राप्त झालेली आहे. असा ज्ञानजन्य निरहंकार प्राप्त करणे हेच एका दृष्टीने प्रत्येक मानवाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे. तोच मोक्ष आहे. त्यालाच सायुज्यता असे म्हणतात. 'याचि देही याचि डोळा' परमतत्त्वाचा गोमटा लाभ आपण करून घेतलेला आहे, कारण तिथे ज्ञानजन्य निरहंकार प्राप्त झालेला आहे, त्या स्वानंद सुखाची ठेव ही प्रत्येकाला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे. आणि म्हणून त्यागाकडून मध्यम त्यागाकडे, मध्यमाकडून सर्वोच्च त्यागाकडे झेपावता आले पाहिजे कारण सगळ्या व्यक्तिमत्त्वाचा पाया जर कोणता असेल तर तो त्यागाचा आहे. आणि हे त्यागाचे लेणे, हे त्यागाचे मोठेपण, या त्यागाची सूक्ष्म भूमिका, या त्यागाचे जीवनमूल्य आम्हाला कुठे मिळेल तर आई-वडिलांच्या सहवासामध्ये मिळेल. कुटुंब संस्थेमध्ये मिळेल. हे संस्कार करायला कधीही आळशीपणा करू नका. आपण दूरदर्शन पाहत बसावे आणि मुलांनी मात्र अभ्यास करावा अशी भूमिका चित्तात कधीही ठेवू नका. स्वतः त्यागा म्हणजे मुले अभ्यास करतील. स्वतः ज्ञानेश्वरी म्हणायला बसा म्हणजे मुले बसतील. स्वतः गीता म्हणायला बसा म्हणजे मुले बसतील. स्वतः पसायदान म्हणा मुलांच्याकडून म्हणवून घ्या. जेवढा त्याग कराल ना तितके उंच उंच होत जाल!
'अरे! तू स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होशील' असे आश्वासन ज्ञानोबांनी दिले आहे. मला सांगा आणखी कुठले आश्वासन द्यायचे ज्ञानेश्वर महाराजांनी? याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला सांगा. जर तुम्हाला स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती व्हायचे असेल तर काय केले पाहिजे? 'ज्ञानजन्य निरहंकार' वृत्तीचा स्वीकार केला पाहिजे हेच माउलीने पसायदानातून सांगितले आहे.
सर्वोच्च त्यागाचे जीवनमूल्य कोठे प्राप्त होते?
[English Translation for Reference] Sant Dnyaneshwar's Pasayadaan & Spiritual Values
Why did Sant Dnyaneshwar (Mauli) seek 'Pasayadaan' (divine universal blessing)? So that the basic human nature gradually turns towards culture and sublime righteousness. Pasayadaan was bestowed so that humanity finds a path of public benevolence and welfare. One must tread the righteous path of purity and pray: 'May our actions and deeds be dedicated entirely to the service of others (altruism).' Therefore, every person's life pursuit should be to become virtuous. What should our inclination be? It should shy away from cheap fame. It should never resemble Ravana's; it should mirror Rama, Krishna, and the saintly tradition. To mold our character accordingly, these prayers must be continually recited. As long as pride and ego reside in the human psyche, persistent spiritual striving is essential until ego completely dissolves. Once ego dissolves, everything is seen as 'the gift of the Divine Almighty' (अवघे देणे रघुनाथाचे). Hence, if ego exists, it must leap towards knowledge-born egolessness. Thus, the four progressive tiers of ego must be understood:
One who has no self-awareness of one's personality possesses 'ignorance-born ego' (अज्ञानजन्य अहंकार). Those who begin to recognize their identity have 'individual ego' (व्यक्तिगत अहंकार). Those who attain an expansive worldview possess 'broad/cosmic ego' (व्यापक अहंकार). Those who realize the Supreme Self (Atmatattva) have their ego transformed into 'knowledge-born egolessness' (ज्ञानजन्य निरहंकार), anchored upon wisdom. Attaining such knowledge-born egolessness is the ultimate destination of human life—this is liberation (Moksha/Sayujyata). Having experienced the divine supreme truth in this very mortal frame, Sant Dnyaneshwar prayed that this treasure of blissful bliss (स्वानंद सुख) be attained by all. Therefore, one must progress from minor sacrifice to moderate sacrifice, and from moderate to supreme sacrifice, because the bedrock of noble personality is sacrifice. And where do we imbibe this supreme value of sacrifice? In the affectionate company of parents and within the sacred institution of the family. Set a personal example: when you embody self-discipline and recite holy hymns, children naturally follow. The more you sacrifice, the higher you elevate yourself!
'Behold, you shall become the sovereign emperor of the kingdom of inner bliss (स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती)!' was the profound assurance granted by Dnyanoba. What greater assurance could one seek? If one aspires to be the sovereign of inner joy, one must embrace the virtue of 'knowledge-born egolessness'—this is the eternal message of Pasayadaan.
Where is the life-value of supreme sacrifice attained?
- (A) 'याचि देही याचि डोळा' परमतत्वाचा लाभ झाल्यावर
- (B) स्वार्थत्यागाकडून सामान्य त्यागाकडे गेल्यावर
- (C) आईवडिलांच्या सहवासात
- (D) प्रार्थनेद्वारा संतासारखा प्रवृत्तिधर्म स्वीकारल्यावर
अचूक उत्तर: पर्याय (C) आईवडिलांच्या सहवासात
योग्य उत्तर पर्याय ३ [आईवडिलांच्या सहवासात] आहे. उताऱ्यानुसार सविस्तर स्पष्टीकरण : उताऱ्याच्या दुसऱ्या परिच्छेदात स्पष्टपणे नमूद केले आहे : "आणि हे त्यागाचे लेणे, हे त्यागाचे मोठेपण, या त्यागाची सूक्ष्म भूमिका, या त्यागाचे जीवनमूल्य आम्हाला कुठे...