१८६० सालच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. काळ्यांना राजकीय स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन रिपब्लिकन पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेलं होतं. यादवी युद्धामधील प्रतिज्ञा पूर्ण होण्याच्या दिशेने पावलं उचलण्यात आली; काळ्यांना अधिक राजकीय स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी संविधानात विविध दुरुस्त्या करण्यात आल्या. उदाहरणार्थ, १८६३ साली रिपब्लिकन सरकारने गुलामगिरीच्या निर्मूलनाशी संबंधित तेरावी दुरुस्ती मंजूर केली. वंश, रंग, किंवा आधीची गुलामगिरी या निकषांवर मतदानाचे अधिकार नाकारू नयेत, असा आदेश १८६८ सालच्या चौदाव्या दुरुस्तीद्वारे काढण्यात आला.
या सांविधानिक दुरुस्त्या प्रभावी पायंडा पाडणाऱ्या होत्या. १८६५-१८७६ या कालखंडात 'दक्षिणेतील राज्यांच्या पुनर्रचनेसाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या राजकीय मुत्सद्द्यांनी काळ्या लोकांना संपूर्ण नागरिकत्व मिळावं याकरता प्रयत्न सुरू केले.' नागरी अधिकार अधिनियम, १८७५' अनुसार त्यांना इतर अनेक क्षेत्रांमध्ये भेदभावरहित वागणुकीची वाट मोकळी झाली. परंतु, हे यश मर्यादित होतं; कारण 'पुनर्रचने'ची समाप्ती झाली तेव्हा पूर्वाश्रमीचे गुलाम आर्थिक दास्याच्या भीषण स्थितीत पोचले होते. काळ्यांना देण्यात आलेले नागरी अधिकार असंविधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने १८८३ साली जाहीर केलं.
साक्षरता चाचण्यांच्या डावपेचांद्वारे त्यांचे मतदानाचे अधिकार १८९० च्या दशकात काढून घेण्यात आले. इतर वंशद्वेषविरोधी कायद्यांच्या तरतुदींची योग्य अंमलबजावणी झाली नाही. परिणामी, अमेरिकेतील बहुतांश संस्थांमध्ये विभक्तीकरण व भेदभावाच्या पद्धती ठोसपणे प्रस्थापित झाल्या. जिम क्रो कायदे आणि अशा इतर प्रथांनी काळ्यांच्या जीवनातील सर्व अवकाशांमध्ये विभक्तीकरण व भेदभावाला पाठबळ पुरवलं. विभक्तीकरणाशी संबंधित अनेक खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने विभक्तीकरणावर शिक्कामोर्तब केलं. यामुळे मिसिसिपी योजनेद्वारे बंदी, विभक्तीकरण व मताधिकार हिरावून घेणं यांचा कायदेशीर मार्ग पूर्णतः मोकळा झाला, आणि निग्रो लोकांना मताधिकार गमवावा लागला. विभक्तीकरण व मताधिकार काढून घेणं यांची तरतूद करणारा सरकारी कायदा सांविधानिक व कायदेशीर असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं. त्यामुळे काळे विरोधाभासी अवस्थेत अडकले; तांत्रिकदृष्ट्या त्यांना समान स्थान मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती, पण त्यांना विभक्त राहणं बंधनकारक होतं.
बुकर टी. वॉशिंग्टन यांना शांततापूर्ण वाटाघाटींद्वारे व स्वयंसहाय्यता कार्यक्रमांद्वारे काळ्या लोकांच्या समस्या सोडवायच्या होत्या. पण डब्ल्यू.ई.बी. दु बोइ यांना वॉशिंग्टन यांचं म्हणणं पटलं नाही. दु बोइ यांनी काळ्या चळवळीला जहाल, राष्ट्रीयतावादी आणि विभाजनवादी भूमिका दिली.
खालील विधाने वाचा :
(a) काळ्यांना राजकीय स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन रिपब्लिकन पक्षाच्या १८६० मधील जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेलं होतं.
(b) तेराव्या घटनादुरुस्तीमुळे गुलामगिरी नष्ट करण्याची तरतूद झाली.
(c) काळ्यांना देण्यात आलेले नागरी अधिकार असंविधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने १८८३ साली जाहीर केलं.
खालील पर्यायांमधून अचूक परस्परसंबंध निवडा :
In the election of 1860, the Republican candidate Abraham Lincoln was elected as the President. The Republican Manifesto had included a promise of political freedom to the Blacks. Steps were taken to fulfil the pledge taken during the Civil War, and a number of Constitutional Amendments were done so as to give more political freedom to the Blacks. For example, the Thirteenth Amendment passed in 1863 by the Republican government was about the Abolition of Slavery. The Fourteenth Amendment of 1868 ordered that the right to vote should not be denied to anybody on the criteria of race, colour or a history of slavery.
These Constitutional Amendments set a powerful precedent. The political diplomats who had vowed to reconstruct the Southern States during 1865-1876 began to strive towards securing complete citizenship rights for the Blacks. The Civil Rights Act of 1875 opened a number of fields for them where they would not be discriminated against. The success, however, was limited; because towards the end of the period of Reconstruction, the erstwhile slaves had fallen into the grave situation of economic slavery. The Supreme Court in 1883 declared that the Civil Rights conferred upon the Blacks were unconstitutional.
Their voting rights were snatched away during the decade of 1890s using the trap of literacy tests. Other provisions of the Act aimed at fighting racial discrimination were not implemented properly. Consequently, processes of segregation and discrimination became deeply entrenched in most institutions in the United States. Jim Crow Laws and other traditions supported segregation and discrimination against the Blacks in all walks of life. The Supreme Court validated segregation in a number of related cases. This meant that it became legally very easy to entrench prohibition, segregation, and denial of voting rights by the implementation of the Mississippi Plan, and the Negros lost their voting rights. The Government Act which took away their voting rights and legalized segregation was declared to be constitutional and legal by the Supreme Court. This put the Blacks in an ironical situation: technically, they were declared equal, but compelled to remain segregated.
Booker T. Washington wanted to solve the problems of the Blacks through peaceful negotiations and self-support initiatives. However, W.E.B. Du Bois disagreed with Washington, advocating a radical, nationalist, and militant stand for the Black Movement.
Read the statements :
(a) The Republican Manifesto of 1860 had included a promise of political freedom to the Blacks.
(b) The Thirteenth Amendment provided for the Abolition of Slavery.
(c) The Supreme Court in 1883 declared that the Civil Rights conferred upon the Blacks were unconstitutional.
Select the correct relationship :
- (A) (b) हे विधान (a) चा परिणाम आहे.
- (B) (a) हे विधान (b) चा परिणाम आहे.
- (C) (c) हे विधान (a) चे कारण आहे.
- (D) (a), (b) आणि (c) यांचा एकमेकांशी संबंध नाही.