📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)

MPSC Rajyaseva Prelims 2023 (GS) Paper-I (Held on 4 June 2023) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 84 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 1 / 5
🎯 MPSC राज्यसेवा 🎯 आरोग्य विभाग

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 84)
प्रश्न #1 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
खालील विधाने कोणासंदर्भात आहेत ?

i. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली.

ii. सती जाणाऱ्या शूर स्त्रीयांच्याबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले.

iii. बालविवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले.

iv. सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला.
EN About whom the following statements are related ?

i. Religion was separated from politics.

ii. Adopted a policy of seclusion towards brave women who followed Sati.

iii. To stop child marriage and widow marriage was encouraged.

iv. Claimed that the final decision regarding the social law will be his.
  • (A) बाबर
  • (B) हुमायुन
  • (C) अकबर
  • (D) औरंगजेब
अचूक उत्तर: पर्याय (C) अकबर

योग्य उत्तर: पर्याय (3) अकबर (Akbar) सविस्तर स्पष्टीकरण: - धर्माची राजकारणापासून फारकत आणि सुलह-इ-कुल: - मुघल सम्राट अकबर (कारकीर्द: 1556-1605) याने धर्माला राजकारणापासून व प्रशासनापासून वेगळे केले. त्याने 'सुलह-इ-कुल' (विश्वव्यापी शांतता व बंधुभाव)...

प्रश्न #2 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण

i. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली.

ii. 1857 च्या उठावाचा फायदा घेवून भागोजी नाईक व काझिसिंग नाईक उठावात सामिल झाले.

iii. काझिसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले.
EN Bhills in Khandesh protested against British rule because

i. The Bhills of the Satpura division got inspiration from the event of the uprising in North India.

ii.Taking advantage of the revolt of 1857 Bhagoji Naik and Kazising Naik joined the revolt.

iii. Kazising and his associates burnt government treasuries and post offices.
  • (A) i व ii
  • (B) ii व iii
  • (C) i व iii
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

योग्य उत्तर: पर्याय (4) वरीलपैकी सर्व सविस्तर स्पष्टीकरण: 1857 च्या उठावात खान्देश आणि सातपुडा परिसरातील भिल्ल समाजाने इंग्रजी सत्तेविरुद्ध पुकारलेल्या एल्गाराची कारणे: - विधान (i) बरोबर आहे: - उत्तर भारतातील 1857 च्या उठावाच्या बातम्या सातपुडा आणि...

प्रश्न #3 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी-बेझंट यांनी होमरूल चळवळी बद्दलचे विचार मांडले ?

अ. न्यू इंडिया

ब. कॉमन वील

क. बॉम्बे गॅझेट

ड. टेलीग्राफ
EN In which of the following newspapers did Annie-Besant present her thoughts about Home Rule Movement?

a. New India

b. Common Weal

c. Bombay Gazette

d. Telegraph
  • (A) अ आणि ब फक्त
  • (B) ब आणि क फक्त
  • (C) अ आणि ड फक्त
  • (D) अ, ब आणि क फक्त
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब फक्त

योग्य उत्तर: पर्याय (1) अ आणि ब फक्त सविस्तर स्पष्टीकरण: - ॲनी बेझंट (Annie Besant) आणि त्यांची वृत्तपत्रे: - ॲनी बेझंट यांनी भारतात 'होमरूल' (स्वराज्य) चळवळीचा प्रसार करण्यासाठी दोन प्रमुख वृत्तपत्रे चालवली: 1. 'न्यू इंडिया' (New India): हे दैनिक...

प्रश्न #4 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
पुढील वाक्ये _______यांच्या विषयी आहेत.

अ. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यानी महत्त्वाची भूमिका बजावली.

ब. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली.

क. गणित आणि शास्त्रावर त्यांनी 'शून्यलब्धी' हे पुस्तक मराठीतून लिहीले.

ड. केशवराव भवाळकरानी त्यांचे चरित्र लिहीले आहे.
EN The following statements are written about

a. He played an important role in the field of education in Maharashtra.

b. He prepared textbooks on various subjects.

c. He wrote a book 'Shunyalabdhi' on Mathematics and Science in Marathi.

d. Keshavrao Bhavalkar has written his biography.
  • (A) दादोबा पांडूरंग तरखडकर
  • (B) आत्माराम पांडूरंग तरखडकर
  • (C) बाळशास्त्री जांभेकर
  • (D) गोपाळ हरि देशमुख
अचूक उत्तर: पर्याय (C) बाळशास्त्री जांभेकर

प्रश्न #5 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा.

अ. पुणे सार्वजनिक सभा

ब. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन

क. मद्रास महाजन सभा

ड. इंडियन असोसिएशन
EN Arrange the following political organizations chronologically.

a. Pune Sarvajanik Sabha

b. Bombay Presidency Association

c. Madras Mahajan Sabha

d. Indian Association
  • (A) ब, अ, ड, क
  • (B) अ, ड, क, ब
  • (C) क, ड, ब, अ
  • (D) ड, ब, अ, क
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ड, क, ब

योग्य उत्तर: पर्याय (2) अ, ड, क, ब सविस्तर स्पष्टीकरण: योग्य उत्तर a, d, c, b हे आहे. Key Points पूना सार्वजनिक सभा: पूना सार्वजनिक सभा ही ब्रिटिश भारतातील एक सामाजिक-राजकीय संघटना होती. भारतातील सरकार आणि लोक यांच्यात मध्यस्थी करणारी संस्था म्हणून...

प्रश्न #6 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
‘मालविकाग्निमित्र' या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे?
EN On which of the following matrimonial relationship between two Royal families, the ancient drama 'Malavikagnimitra' throws light?
  • (A) शुंग आणि विदर्भ (यज्ञसेन) घराणे
  • (B) गुप्त आणि वाकाटक घराणे
  • (C) शक आणि सातवाहन घराणे
  • (D) चालुक्य आणि वर्धन घराणे
अचूक उत्तर: पर्याय (A) शुंग आणि विदर्भ (यज्ञसेन) घराणे

योग्य उत्तर: पर्याय (1) शुंग आणि विदर्भ (यज्ञसेन) घराणे सविस्तर स्पष्टीकरण: - 'मालविकाग्निमित्रम्' (Malavikagnimitra): - हे महाकवी कालिदास यांनी लिहिलेले पहिले संस्कृत नाटक आहे. - या नाटकाचा नायक अग्निमित्र हा शुंग वंशाचा संस्थापक पुष्यमित्र शुंग...

प्रश्न #7 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
वैदीक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते ?

i. निष्क

ii. कृष्णाल

iii. शतमान

iv. गण

v. श्रेणी
EN What was the medium of trade exchange during vedic period?

i. Nishka

ii. Krusnal

iii. Shatman

iv. Gan

v. Shreni
  • (A) i, ii व iii
  • (B) ii, iii व iv
  • (C) i, ii, iv व v
  • (D) i, iii व v
अचूक उत्तर: पर्याय (A) i, ii व iii

योग्य उत्तर: पर्याय (1) i, ii व iii सविस्तर स्पष्टीकरण: योग्य उत्तर i, ii आणि iii हे आहे. Key Points वैदिक काळात व्यापार विनिमयाचे माध्यम वैदिक काळात, व्यापार आणि देवाणघेवाण करण्याची पद्धत औपचारिक चलन प्रणालीवर आधारित नव्हती, जसे आपल्याला आज माहित...

प्रश्न #8 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
सेतु माधवराव पगडी यांच्या मते, नाथ पंथातील कोणत्या संताने 'शहा रमजान' हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दिन यांच्या कडून इस्लाम धर्माची दिक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे.
EN According to Setu Madhavrao Pagadi, of the following saint renamed himself as 'Shaha Ramjan' and got converted to Islam by a Sufi Saint Nizamuddin. It is a mystery of the cultural history of Maharashtra.
  • (A) गोरखनाथ
  • (B) गहिनीनाथ
  • (C) जालन्धरनाथ
  • (D) कानिफनाथ
अचूक उत्तर: पर्याय (D) कानिफनाथ

योग्य उत्तर: पर्याय (4) कानिफनाथ (Kanifnath) सविस्तर स्पष्टीकरण: - सेतु माधवराव पगडी यांचे संशोधन आणि सांस्कृतिक गूढ: - ज्येष्ठ इतिहाससंशोधक, विचारवंत आणि लेखक सेतु माधवराव पगडी (Setu Madhavrao Pagadi) यांनी महाराष्ट्राच्या मध्ययुगीन सांस्कृतिक आणि...

प्रश्न #9 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
पंडीता रमाबाईनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता ?

i. न्यायमूर्ती म. गो. रानडे

ii. डॉ. आर. जी. भांडारकर

iii. न्यायमूर्ती के. टी. तेलंग

iv. बापू हरी शिंदे
EN Pandita Ramabai with the permission of the Ramabai Association, appointed an advisory board to advise her, who among the following was included in this advisory board ?

i. Justice M. G. Ranade

ii. Dr.R.G.Bhandarkar

iii. Justice K. T. Telang

iv. Bapu Hari Shinde
  • (A) केवळ i व ii
  • (B) केवळ ii व iii
  • (C) केवळ i व iv
  • (D) केवळ i, ii व iii
अचूक उत्तर: पर्याय (D) केवळ i, ii व iii

योग्य उत्तर: पर्याय (4) केवळ i, ii व iii सविस्तर स्पष्टीकरण: योग्य उत्तर i, ii, आणि iii फक्त हे आहे. Key Points पंडिता रमाबाई: पंडिता रमाबाई यांनी रमाबाई संघटनेच्या परवानगीने सल्ला व मार्गदर्शन घेण्यासाठी सल्लागार मंडळ नेमले. या सल्लागार मंडळामध्ये...

प्रश्न #10 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
इ. स. 1918, साली मुंबईतील कामगारांना 'पिपल्स युनियन' ही संघटना स्थापना करण्याचा उपदेश कोणी केला होता ?
EN In 1918 A. D., advised the Mumbai workers to establish the organization 'People's Union'?
  • (A) राजश्री शाहु महाराज
  • (B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • (C) नारायण मेघाजी लोखंडे
  • (D) भाई माधवराव बागल
अचूक उत्तर: पर्याय (A) राजश्री शाहु महाराज

योग्य उत्तर: पर्याय (1) राजश्री शाहू महाराज (Rajashree Shahu Maharaj) सविस्तर स्पष्टीकरण: - शाहू महाराज आणि मुंबईतील कामगार चळवळ: - कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाज, अस्पृश्य आणि कष्टकरी कामगारांच्या हक्कांचे खंदे पुरस्कर्ते...

प्रश्न #11 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहुर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला ?
EN Who defended Chiplunkar's attack on Mahatma Jyotirao Phule through his newspaper, considered as the beginning of non Brahmin journalism?
  • (A) नारायण मेघाजी लोखंडे
  • (B) भाऊ दाजी लाड
  • (C) तुकाराम तात्या पडवळ
  • (D) कृष्णाजी भालेकर
अचूक उत्तर: पर्याय (D) कृष्णाजी भालेकर

योग्य उत्तर: पर्याय (4) कृष्णाजी भालेकर (Krushnaji Bhalekar) सविस्तर स्पष्टीकरण: - विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि महात्मा फुले वाद: - विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या 'निबंधमाला' या मासिकातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 'सत्यशोधक समाज' आणि...

प्रश्न #12 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
इ. स. 1934 मध्ये 'कर्षक संघम' एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली ?
EN In 1934 A. D., which of the following region, witnessed the establishment of 'Karshak Sangham' as a peasant organization?
  • (A) आंध्रप्रदेश
  • (B) तामिळनाडु
  • (C) केरळ
  • (D) बंगाल
अचूक उत्तर: पर्याय (C) केरळ

प्रश्न #13 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
दांडीयात्रेचा उल्लेख "रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा" असे कोणी केला ?
EN Who remarked about the 'Dandi Yatra' as, Rama's Historical March to Lanka ?
  • (A) पंडित मोतीलाल नेहरू आणि डी. जी. तेंडूलकर
  • (B) पी. सी. रे आणि डी. पी. मिश्रा
  • (C) शंकरराव देव आणि ग. वि. केतकर
  • (D) अप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नंबीयार
अचूक उत्तर: पर्याय (A) पंडित मोतीलाल नेहरू आणि डी. जी. तेंडूलकर

योग्य उत्तर: पर्याय (1) पंडित मोतीलाल नेहरू आणि डी. जी. तेंडूलकर सविस्तर स्पष्टीकरण: - दांडी यात्रा (मीठ सत्याग्रह - 1930): - महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रम ते दांडी (गुजरात समुद्रकिनारा) अशी 240 मैलांची ऐतिहासिक पदयात्रा 78...

प्रश्न #14 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
0.10M जलिय HCl द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा ?
EN Which of the following mathematical relationships should be used to calculate the pH of a 0.10M aqueous HCl solution?
  • (A) pH = log10(1.0 × 10-1)
  • (B) pH = log10(1.0 × 101)
  • (C) pH = -log10(1.0 × 10-1)
  • (D) pH = -log10(0.10 × 101)
अचूक उत्तर: पर्याय (C) pH = -log10(1.0 × 10-1)

योग्य उत्तर: पर्याय (3) pH = -log10(1.0 × 10-1) सविस्तर स्पष्टीकरण: योग्य उत्तर पर्याय 3 आहे. संकल्पना: द्रावणाचा pH: pH पातळी हे द्रावणातील हायड्रोजन आयनांच्या संख्येचे मोजमाप आहे. pH स्केलवर द्रावण किंवा संयुग जितके कमी असेल तितके हायड्रोजन...

प्रश्न #15 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
1.5M H2SO4 च्या 10 dm3 द्रावणापासून 1.0N H2SO4 चे द्रावण कसे बनवाल ?
EN How is 1.0N H 2 SO 4 solution is prepared from 10 dm3 of 1.5M H 2 SO 4 solution?
  • (A) दिलेल्या द्रावणात 5 dm3 पाणी घालून
  • (B) दिलेल्या द्रावणात 294 ग्रॅम H2SO4 घालून
  • (C) दिलेल्या द्रावणात 20 dm3 पाणी घालून
  • (D) दिलेल्या द्रावणात 174 ग्रॅम H 2 SO 4 घालून
अचूक उत्तर: पर्याय (C) दिलेल्या द्रावणात 20 dm3 पाणी घालून

योग्य उत्तर: पर्याय (3) दिलेल्या द्रावणात 20 dm³ पाणी घालून सविस्तर स्पष्टीकरण: रासायनिक समीकरणाची पद्धतशीर पायरीनुसार गणना: 1. सल्फ्यूरिक आम्लाची (H₂SO₄) आम्लधर्मीयता (Basicity): - $H_2SO_4$ हा द्विक्षारकीय (dibasic) आम्ल आहे, म्हणजेच त्याचा...

प्रश्न #16 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
NH3 आणि BF3 च्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ?
EN Which of the following is correct for the shapes of NH3 and BF3 ?
  • (A) NH3 – पिरॅमिडल आणि BF3 - पिरॅमिडल
  • (B) NH3 – प्लेनर आणि BF3 - प्लेनर
  • (C) NH3 - प्लेनर आणि BF3 - पिरॅमिडल
  • (D) NH3 - पिरॅमिडल आणि BF3 - प्लेनर
अचूक उत्तर: पर्याय (D) NH3 - पिरॅमिडल आणि BF3 - प्लेनर

योग्य उत्तर: पर्याय (4) NH₃ - पिरॅमिडल आणि BF₃ - प्लेनर सविस्तर स्पष्टीकरण: VSEPR (व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन जोडी प्रतिकर्षण) सिद्धांतानुसार रेणूंच्या आकाराचे विश्लेषण: 1. अमोनिया ($NH_3$) चा आकार: - मध्यवर्ती नायट्रोजन ($N$, अणुअंक 7) च्या बाह्य...

प्रश्न #17 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असतो ?

(H = 1, C = 12 )
EN Which of the following hydrocarbon has 80% carbon?

(H = 1, C = 12)
  • (A) बेंझीन
  • (B) मीथेन
  • (C) इथेन
  • (D) सायक्लोहेक्झेन
अचूक उत्तर: पर्याय (C) इथेन

योग्य उत्तर: पर्याय (3) इथेन (Ethane) सविस्तर स्पष्टीकरण: दिलेल्या प्रत्येक हायड्रोकार्बनमधील कार्बनचे वस्तुमान टक्केवारी सूत्रानुसार काढू: $$\text{कार्बनची टक्केवारी (\%)} = \frac{\text{कार्बनचे एकूण अणुवस्तुमान}}{\text{हायड्रोकार्बनचे एकूण...

प्रश्न #18 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
180 ग्रॅम ॲसेटिक आम्ल (CH3COOH) आणि 180 ग्रॅम पाणी (H2O) एकमेकांत मिसळले. तयार झालेल्या द्रावणात ॲसेटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन ________ इतका असेल.

[H = 1, C = 12, O = 16]
EN 180 g of acetic acid (CH3COOH) is mixed with 180g of water (H2O). The mole fraction of acetic acid in the resultant solution is

[H = 1, C = 12, O = 16]
  • (A) 0.23
  • (B) 1.0
  • (C) 0.5
  • (D) वरीलपैकी कोणताही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) 0.23

योग्य उत्तर: पर्याय (1) 0.23 सविस्तर स्पष्टीकरण: मोल फ्रॅक्शनची (Mole Fraction - रेणु अंश) पद्धतशीर गणना: 1. घटकांचे रेणुवस्तुमान (Molar Mass) शोधणे: - ॲसेटिक आम्ल ($CH_3COOH$): $$\text{Molar Mass} = (2 \times 12) + (4 \times 1) + (2 \times 16) = 24...

प्रश्न #19 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
जर 1.0 मोल आदर्श वायुचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वकष वायु स्थिरांक, R ______असतो.
EN If one mole of an ideal gas occupies 22.4 Lit at Standard Temperature and Pressure, then the value of the universal gas constant R is
  • (A) 0.0821 atm Lit mol-1 K-1
  • (B) 8.314 × 107 Joules K-1 mol-1
  • (C) 82.1 atm Lit mol-1 K-1
  • (D) 8.314 erg K-1 mol-1
अचूक उत्तर: पर्याय (A) 0.0821 atm Lit mol-1 K-1

योग्य उत्तर: पर्याय (1) 0.0821 atm Lit mol⁻¹ K⁻¹ सविस्तर स्पष्टीकरण: आदर्श वायू समीकरणावरून (Ideal Gas Equation) वायू स्थिरांक $R$ चे मूल्य: $$PV = nRT \implies R = \frac{PV}{nT}$$ - मानक तापमान व दाबाची (STP) मूल्ये: - दाब ($P$) = $1\text{ atm}$...

प्रश्न #20 📅 Rajyaseva Pre 2023
+1.0 / -0.25
खाली दोन विधाने दिली आहेत त्यापैकी (A) हे प्रतिपादन असून (R) हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा.

(A) कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकावू आहे.

(R) सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते.
EN Given below are two statements one labeled as Assertion (A) and the other labeled as Reason (R). Select the correct answer from the options given below.

(A) Cotton is not a weight-loss pure raw material, besides is light in weight and durable.

(R) The localization of the cotton textile is found either in cotton producing regions or near the market.
  • (A) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण आहे
  • (B) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत परंतु (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण नाही
  • (C) (A) हे बरोबर आहे पण (R) हे चूक आहे
  • (D) (A) हे चूक आहे पण (R) हे बरोबर आहे
अचूक उत्तर: पर्याय (B) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत परंतु (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण नाही

योग्य उत्तर: पर्याय (2) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत परंतु (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण नाही सविस्तर स्पष्टीकरण: योग्य पर्याय '(A) आणि (R) दोन्ही सत्य आहेत पण (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही'. मुख्य मुद्दे प्रतिपादन अ: कापूस हा वजन न घटणारा...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स