🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

संभाव्यता व संच सिद्धांत (Probability & Sets)

Probability & Set Theory — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'संभाव्यता व संच सिद्धांत (Probability & Sets)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 33 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 1 / 2
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 33)
प्रश्न #1 📅 Combine Group B Mains 2024
+1.0 / -0.25
30% विद्यार्थी सकाळ वृत्तपत्र वाचतात आणि 40% विद्यार्थी लोकमत वृत्तपत्र वाचतात, जर 15% विद्यार्थी दोन्ही वृत्तपत्र वाचत असतील तर किती टक्के विद्यार्थी कुठलेच वृत्तपत्र वाचत नाहीत ?
EN 30% of students read Sakaal newspaper and 40% of students read Lokmat newspaper. If 15% of students read both newspapers, what percentage of students do not read any newspaper?
  • (A) 20%
  • (B) 30%
  • (C) 45%
  • (D) 55%
अचूक उत्तर: पर्याय (C) 45%

दिलेले: • सकाळ वृत्तपत्र वाचणारे विद्यार्थी $n(S) = 30\%$ • लोकमत वृत्तपत्र वाचणारे विद्यार्थी $n(L) = 40\%$ • दोन्ही वृत्तपत्रे वाचणारे विद्यार्थी $n(S \cap L) = 15\%$ पायरी 1: किमान एक वृत्तपत्र वाचणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी $n(S \cup L)$...

प्रश्न #2 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकुण टक्केवारी 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल?
EN In a class, 40% of boys received a scholarship. If 50% of all students received a scholarship and the percentage of girls in the class is 60%, what is the percentage of girls who received a scholarship?
  • (A) 60.1%
  • (B) 56.67%
  • (C) 30%
  • (D) 55.6%
अचूक उत्तर: पर्याय (B) 56.67%

वर्गातील एकूण विद्यार्थी = 100 मानू. दिलेल्या माहितीनुसार: • वर्गातील एकूण मुलींची टक्केवारी = 60% $\implies$ मुलींची संख्या = 60 $\implies$ मुलांची संख्या = $100 - 60 = 40$ • एकूण विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. $\implies$...

प्रश्न #3 📅 Group C Mains 2023
+1.0 / -0.25
एका गावात मराठी जाणणारे 82%, हिन्दी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत, जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर त्या गावाची लोकसंख्या किती ?
EN In a village, 82% of people know Marathi, 76% know Hindi, and 2,244 people know both languages. If 8% of people in the village do not know either language, what is the population of the village?
  • (A) 2200
  • (B) 3200
  • (C) 3400
  • (D) 3500
अचूक उत्तर: पर्याय (C) 3400

दिलेले: • मराठी जाणणारे $n(M) = 82\%$ • हिन्दी जाणणारे $n(H) = 76\%$ • दोन्ही भाषा न जाणणारे = $8\%$ • दोन्ही भाषा जाणणाऱ्या लोकांची संख्या = 2244 पायरी 1: किमान एक भाषा जाणणाऱ्या लोकांची टक्केवारी: दोन्ही भाषा न जाणणारे 8% असल्याने: $$n(M \cup H) =...

प्रश्न #4 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नाहीत. एका वेळी दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषा काढल्या, तर अशा किती रेषा काढता येतील ?
EN There are 8 points in a plane, such that no three points are collinear. If lines are drawn connecting two points at a time, how many such lines can be drawn?
  • (A) 25
  • (B) 29
  • (C) 27
  • (D) 28
अचूक उत्तर: पर्याय (D) 28

दिलेले: • प्रतलातील एकूण बिंदूंची संख्या ($n$) = 8 • कोणतेही तीन बिंदू एकरेषीय (collinear) नाहीत. सूत्र: कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नसताना, $n$ बिंदूंमधून दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या एकूण रेषांची संख्या संचयन (Combination) सूत्राने काढली जाते...

प्रश्न #5 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
खालील संख्यांमधून विसंगत संख्या शोधा : 343, 324, 3375, 10648, 64
EN Find the odd man out from the following numbers:

343, 324, 3375, 10648, 64
  • (A) 64
  • (B) 3375
  • (C) 324
  • (D) 10648
अचूक उत्तर: पर्याय (C) 324

दिलेल्या संख्या: 343, 324, 3375, 10648, 64 प्रत्येक संख्येचे विश्लेषण करू: • $343 = 7^3$ (7 चा घन / Perfect cube) • $3375 = 15^3$ (15 चा घन / Perfect cube) • $10648 = 22^3$ (22 चा घन / Perfect cube) • $64 = 4^3$ (4 चा घन / Perfect cube)...

प्रश्न #6 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
एका 100 विद्यार्थ्याच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर किती विद्यार्थी दोन्हीही विषयात उत्तीर्ण झाले ?
EN In a class of 100 students, 40 students passed in Mathematics and 60 students passed in English. 8 students failed in both Mathematics and English. How many students passed in both subjects?
  • (A) 5
  • (B) 15
  • (C) 8
  • (D) 16
अचूक उत्तर: पर्याय (C) 8

दिलेले: • एकूण विद्यार्थी ($N$) = 100 • गणितात उत्तीर्ण विद्यार्थी $n(M) = 40$ • इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी $n(E) = 60$ • दोन्ही विषयात अनुत्तीर्ण (नापास) विद्यार्थी = 8 पायरी 1: किमान एका विषयात उत्तीर्ण विद्यार्थी $n(M \cup E)$: दोन्ही विषयात...

प्रश्न #7 📅 STI Mains 2019
+1.0 / -0.25
वर्णाक्षरांच्या LEFGHI या गटापासून टोकाला L व I ही अक्षरे असलेल्या विविध वर्णाक्षर गटांची संख्या निवडा.
EN Select the number of different letter arrangements that can be formed from the group of letters LEFGHI such that L and I are always at the two ends.
  • (A) 4!
  • (B) 3! x 2!
  • (C) 2!
  • (D) 4! x 2!
अचूक उत्तर: पर्याय (D) 4! x 2!

दिलेला वर्णाक्षर गट: L, E, F, G, H, I (एकूण 6 अक्षरे) अट: दोन्ही टोकांना L आणि I हीच अक्षरे असली पाहिजेत. पायरी 1: टोकांची स्थाने (End Positions): एकूण 6 स्थाने आहेत: [_ _ _ _ _ _] पहिले व शेवटचे स्थान L आणि I ने भरले पाहिजे. टोकाच्या 2 स्थानांवर L...

प्रश्न #8 📅 ASO Mains 2019
+1.0 / -0.25
गुलाबी रंगाचे 19 आणि निळ्या रंगाचे सतरा एकसारखे फुगे, दोन निळे फुगे एकत्र येणार नाहीत अशा पद्धतीने बांधायचे झाले तर ते जितक्या प्रकारे करता येईल ती संख्या निवडा.
EN Select the number of ways in which 19 identical pink balloons and seventeen identical blue balloons can be tied such that no two blue balloons are adjacent to each other.
  • (A) 20C17
  • (B) 19C17
  • (C) 20C16
  • (D) 19C16
अचूक उत्तर: पर्याय (A) 20C17

दिलेले: • गुलाबी रंगाचे एकसारखे फुगे = 19 • निळ्या रंगाचे एकसारखे फुगे = 17 • अट: कोणतेही दोन निळे फुगे एकत्र (शेजारी) येणार नाहीत. गॅप पद्धत (Gap Method): 1. गुलाबी फुगे एकसारखे (identical) असल्यामुळे, त्यांना एका ओळीत बांधण्याचा फक्त 1 प्रकार...

प्रश्न #9 📅 STI Mains 2019
+1.0 / -0.25
एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ?
EN In an examination, 70% of students passed in English, 65% passed in Mathematics, and 25% failed in both subjects. If 3000 students passed in both subjects, how many students in total appeared for the examination?
  • (A) 7500
  • (B) 5000
  • (C) 6000
  • (D) 8000
अचूक उत्तर: पर्याय (B) 5000

प्रश्न #10 📅 ASO Mains 2019
+1.0 / -0.25
वर्गातील 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी आणि 70% भूगोलासाठी नावे नोंदवली आहेत. जर 15% विद्यार्थ्यांनी गणित व भूगोल या दोन्हीसाठी नावे नोंदवलेली असतील तर, दोन्ही विषयांपैकी एकाहीसाठी नाव न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी निवडा.
EN 40% of the students in a class enrolled for Mathematics and 70% for Geography. If 15% of students enrolled for both Mathematics and Geography, select the percentage of students who did not enroll for either of the two subjects.
  • (A) 5
  • (B) 15
  • (C) 20
  • (D) 25
अचूक उत्तर: पर्याय (A) 5

दिलेले: • गणितासाठी नाव नोंदवलेले विद्यार्थी $n(M) = 40\%$ • भूगोलासाठी नाव नोंदवलेले विद्यार्थी $n(G) = 70\%$ • दोन्ही विषयांसाठी नाव नोंदवलेले विद्यार्थी $n(M \cap G) = 15\%$ पायरी 1: किमान एका विषयासाठी नाव नोंदवणारे विद्यार्थी $n(M \cup G)$...

प्रश्न #11 📅 Group C Pre 2019
+1.0 / -0.25
परिसंवादासाठी जमलेल्या सहभागींपैकी 32 व्यक्ती चहा पितात, 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा.
EN Among the participants gathered for a symposium, 32 drink tea, 35 drink coffee, and 22 drink both tea and coffee. Select the total number of persons gathered for the symposium.
  • (A) 44
  • (B) 41
  • (C) 55
  • (D) 45
अचूक उत्तर: पर्याय (D) 45

दिलेले: • चहा पिणाऱ्या व्यक्ती $n(T) = 32$ • कॉफी पिणाऱ्या व्यक्ती $n(C) = 35$ • चहा आणि कॉफी दोन्ही पिणाऱ्या व्यक्ती $n(T \cap C) = 22$ पायरी: परिसंवादासाठी जमलेल्या एकूण व्यक्तींची संख्या: परिसंवादातील प्रत्येक व्यक्ती चहा किंवा कॉफी यांपैकी किमान...

प्रश्न #12 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा.
6, 24, 72, 240, 726
EN Identify the incorrect term in the given number series: 6, 24, 72, 240, 726
  • (A) 24
  • (B) 72
  • (C) 240
  • (D) 726
अचूक उत्तर: पर्याय (B) 72

दिलेली मालिका: 6, 24, 72, 240, 726 मालिकेतील पदांमधील संबंध (Logic/Pattern) तपासू: • 1 ले पद = 6 • 2 रे पद: $(6 \times 3) + 6 = 18 + 6 = 24$ • 3 रे पद: $(24 \times 3) + 6 = 72 + 6 = 78$ (परंतु मालिकेत 72 दिले आहे) • 4 थे पद: जर 78 गृहीत धरले, तर...

प्रश्न #13 📅 ASO Mains 2018
+1.0 / -0.25
जर एका विशेष मुलाचा कायम समावेश करायचा असेल आणि दोन विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचे असेल तर प्रकल्पाचे काम करण्यासाठी 15 मुलांतून तीन मुलांची निवड करण्याच्या मार्गांची संख्या निवडा.
EN Select the number of ways to choose three boys from 15 boys to work on a project if one particular boy is always to be included and two particular boys are always to be excluded.
  • (A) 105
  • (B) 91
  • (C) 76
  • (D) 66
अचूक उत्तर: पर्याय (D) 66

दिलेले: • एकूण मुले = 15 • निवडायची मुले = 3 • अटी: 1. एक विशेष मुलगा कायम निवडायचा आहे. 2. दोन विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचे (exclude) आहे. पायरीनिहाय विश्लेषण: 1. 1 विशेष मुलगा कायम निवडायचा असल्याने, तो आधीच संघात समाविष्ट झाला. आता आणखी फक्त...

प्रश्न #14 📅 PSI Mains 2018
+1.0 / -0.25
एका संयुक्त कुटुंबातील सर्वापैकी 8 सदस्य चिकू खात नाहीत, 9 सदस्य पपई खात नाहीत, 8 सदस्य पेरू खात नाहीत, 6 जण पपई व पेरू खात नाहीत, 4 जण चिकू व पेरू खात नाहीत, 4 जण पपई व चिकू खात नाहीत, 3 जण येथे उल्लेखिलेली 3 फळे खात नाहीत. या सर्व कुटुंब सदस्यांची एकूण संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.
EN In a joint family, out of all members, 8 members do not eat chikoo, 9 members do not eat papaya, 8 members do not eat guava, 6 members do not eat papaya and guava, 4 members do not eat chikoo and guava, 4 members do not eat papaya and chikoo, and 3 members do not eat all 3 fruits mentioned here. Select the option indicating the total number of members in this family.
  • (A) 25
  • (B) 14
  • (C) 17
  • (D) हे सदस्य कोणती फळे खातात ही माहिती नसल्यामुळे अपेक्षित संख्या शोधणे शक्य नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) 14

दिलेली माहिती फळे न खाणाऱ्या सदस्यांची आहे: • चिकू न खाणारे $n(C') = 8$ • पपई न खाणारे $n(P') = 9$ • पेरू न खाणारे $n(G') = 8$ • पपई व पेरू न खाणारे $n(P' \cap G') = 6$ • चिकू व पेरू न खाणारे $n(C' \cap G') = 4$ • पपई व चिकू न खाणारे...

प्रश्न #15 📅 STI Mains 2018
+1.0 / -0.25
इयत्ता 7 मधील प्रत्येक विद्यार्थ्यी फक्त एका खेळात आनंद घेतो. नेमके 30 विद्यार्थी वगळून सर्वजण कबड्डीचा आनंद घेतात. नेमके 31 विद्यार्थी वगळून सर्वजण फुटबॉलचा आनंद घेतात आणि नेमके फुटबॉलचा आनंद न घेणाऱ्याइतकेच विद्यार्थी वगळून सर्वजण खो-खोचा आनंद घेतात. नेमके 37 खेळाडू वगळून सर्वजण हॉकीचा आनंद घेतात. एकही विद्यार्थी इथे उल्लेख न केलेल्या इतर कोणत्याही खेळाचा आनंद घेत नाही. हॉकी खेळाचा आनंद घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणाऱ्या सर्वात योग्य पर्यायाची निवड करा.
EN Every student in Class 7 enjoys only one sport. Everyone except exactly 30 students enjoys Kabaddi. Everyone except exactly 31 students enjoys Football, and everyone except the same number of students who do not enjoy Football enjoys Kho-Kho. Everyone except exactly 37 players enjoys Hockey. No student enjoys any sport other than those mentioned here. Select the most appropriate option indicating the number of students who enjoy Hockey.
  • (A) खो-खोचा आनंद न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निम्मे संख्या.
  • (B) फुटबॉलचा आनंद न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एक पंचमांश संख्या.
  • (C) कबड्डीचा आनंद न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एक पंचमांश संख्या.
  • (D) नेमकी संख्या निश्चित करण्यासाठी सामग्री पुरेशी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) कबड्डीचा आनंद न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एक पंचमांश संख्या.

दिलेले: • इयत्ता 7 मधील प्रत्येक विद्यार्थी फक्त आणि फक्त एकाच खेळात आनंद घेतो (Disjoint sets). • खेळांचे प्रकार: कबड्डी ($K$), फुटबॉल ($F$), खो-खो ($Kh$), हॉकी ($H$). • एकूण विद्यार्थी $T$ मानू. दिलेल्या अटींनुसार: 1. नेमके 30 विद्यार्थी वगळून...

प्रश्न #16 📅 ASO Mains 2018
+1.0 / -0.25
एका बसमधून काही व्यक्ती प्रवास करत आहेत. 6 व्यक्ती तमीळ बोलतात, 15 व्यक्ती हिन्दी बोलतात आणि 6 व्यक्ती गुजराती बोलतात. त्या गटात काही व्यक्ती उल्लेखिलेल्या इतर भाषाही बोलतात. जर गटातील दोन व्यक्ती दोन भाषा बोलत असतील आणि एक व्यक्ती तीन भाषा बोलत असेल तर त्या बसमध्ये किती प्रवासी आहेत?
EN Some people are traveling in a bus. 6 people speak Tamil, 15 speak Hindi, and 6 speak Gujarati. In that group, some people also speak the other mentioned languages. If two people in the group speak two languages and one person speaks three languages, how many passengers are in that bus?
  • (A) 21
  • (B) 23
  • (C) 22
  • (D) 24
अचूक उत्तर: पर्याय (B) 23

दिलेले: • तमीळ बोलणाऱ्या व्यक्ती $n(T) = 6$ • हिन्दी बोलणाऱ्या व्यक्ती $n(H) = 15$ • गुजराती बोलणाऱ्या व्यक्ती $n(G) = 6$ • दोन भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या ($x_2$) = 2 • तिन्ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या ($x_3$) = 1 वेन आकृती व संच...

प्रश्न #17 📅 STI Mains 2017
+1.0 / -0.25
1, 3, 5, 7 व 9 या अंकांची पुनरावृत्ती होऊ न देता या अंकांचा वापर करून पाच अंकी संख्या तयार केल्या. अशा सर्व शक्य संख्यांची बेरीज दर्शवणारा पर्याय निवडा.
EN Five-digit numbers are formed using the digits 1, 3, 5, 7, and 9 without repetition. Select the option that represents the sum of all such possible numbers.
  • (A) 6666666
  • (B) 6666660
  • (C) 6666600
  • (D) 6666000
अचूक उत्तर: पर्याय (C) 6666600

दिलेले अंक: 1, 3, 5, 7, 9 (एकूण $n = 5$ अंक) अट: पुनरावृत्ती न करता सर्व शक्य 5-अंकी संख्या तयार करून त्यांची बेरीज करायची आहे. सूत्र: पुनरावृत्ती न करता $n$ अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या सर्व $n$-अंकी संख्यांची बेरीज खालील सूत्राने काढली जाते...

प्रश्न #18 📅 Group C Pre 2017
+1.0 / -0.25
4 मुले व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. तर समितीमध्ये कमीतकमी एक मुलगी असण्याची संभाव्यता किती?
EN A committee of two is to be formed from 4 boys and 2 girls. What is the probability that the committee contains at least one girl?
  • (A) 1/2
  • (B) 3/5
  • (C) 2/5
  • (D) 7/15
अचूक उत्तर: पर्याय (A) 1/2

दिलेले: • मुले = 4 • मुली = 2 • एकूण व्यक्ती = $4 + 2 = 6$ • समिती सदस्यांची संख्या = 2 • घटना: समितीमध्ये कमीतकमी एक मुलगी असणे. पायरी 1: एकूण संभाव्य नमुना अवकाश $n(S)$: 6 व्यक्तींमधून 2 व्यक्ती निवडण्याचे एकूण प्रकार: $$n(S) = ^6C_2 = \frac{6...

प्रश्न #19 📅 PSI Mains 2017
+1.0 / -0.25
शाळेत एक पक्षी निरीक्षकांचे, दुसरे स्टँप गोळा करणाऱ्यांचे आणि एक पुस्तके वाचणाऱ्यांचे अशी तीन मंडळे आहेत. त्यांचे अनुक्रमे 47, 53 व 68 सदस्य आहेत. 13 विद्यार्थी या सर्व मंडळांचे सदस्य आहेत आणि 77 जण फक्त एकाच मंडळाचे सदस्य आहेत. फक्त दोन मंडळाचे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा.
EN In a school, there are three clubs: Bird Watchers, Stamp Collectors, and Book Readers, having 47, 53, and 68 members respectively. 13 students are members of all these clubs and 77 are members of only one club. Select the number of students who are members of exactly two clubs.
  • (A) पुरेशा सामग्रीच्या अभावी संख्या निश्चित करता येत नाही.
  • (B) 52
  • (C) 26
  • (D) 24
अचूक उत्तर: पर्याय (C) 26

दिलेले: • पक्षी निरीक्षक मंडळ $n(A) = 47$ • स्टँप गोळा करणारे मंडळ $n(B) = 53$ • पुस्तके वाचणारे मंडळ $n(C) = 68$ • सर्व तीन मंडळांचे सदस्य ($x_3$) = 13 • फक्त एकाच मंडळाचे सदस्य ($x_1$) = 77 • फक्त दोन मंडळांचे सदस्य ($x_2$) = ? संच सिद्धांतानुसार...

प्रश्न #20 📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
पाण्याच्या कमतरतेच्या समस्येबाबत चर्चा करण्यासाठी एक गट जमला आहे. यातील 7 व्यक्ती कन्नड बोलतात, 15 तामीळ बोलतात आणि 8 मराठी बोलतात. यातील सर्वांना इंग्रजी समजते पण कोणीही ती बोलू शकत नाहीत. यापैकी प्रत्येक येथे उल्लेख केलेल्यापैकी एक वा अधिक प्रादेशिक भाषा बोलू शकतात. जर या गटातील 3 व्यक्ती दोन भाषा बोलत असतील आणि फक्त दोन व्यक्ती सर्व भाषा बोलू शकत असतील तर गटातील व्यक्तींची संख्या किती ?
EN A group has gathered to discuss the problem of water scarcity. 7 persons speak Kannada, 15 speak Tamil, and 8 speak Marathi. Everyone in this group understands English, but none can speak it. Each person can speak one or more of the regional languages mentioned here. If 3 persons in this group speak two languages and only two persons can speak all languages, what is the total number of persons in the group?
  • (A) 22
  • (B) 23
  • (C) 24
  • (D) 25
अचूक उत्तर: पर्याय (B) 23

दिलेले: • कन्नड बोलणारे $n(K) = 7$ • तामीळ बोलणारे $n(T) = 15$ • मराठी बोलणारे $n(M) = 8$ • दोन भाषा बोलणाऱ्या व्यक्ती ($x_2$) = 3 • तिन्ही भाषा बोलणाऱ्या व्यक्ती ($x_3$) = 2 (टीप: इंग्रजी सर्व समजतात पण कोणी बोलत नाही, त्यामुळे प्रादेशिक भाषांचाच...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स