✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 402)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 402 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 8,021 ते 8,040 (एकूण 8,690)
प्रश्न #8021 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'कोळश्याला आला दर, जाळून टाकले घर' या म्हणीचा अर्थ सांगा ?
EN Tell me the meaning of the proverb 'The price of coal came, the house was burnt'?
  • (A) चांगल्या वस्तुंबरोबर शुद्र वस्तुंची बरोबरी करणे.
  • (B) नको तेथे नको ती गोष्ट करणे.
  • (C) तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे.
  • (D) मागून येऊन वरचढ होणे.
अचूक उत्तर: पर्याय (C) तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे.

प्रश्न #8022 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"अग अग म्हशी, _______ " ही म्हण पूर्ण करा.
EN Complete the saying "Ag ag buffalo, _______".
  • (A) गवत का खाशी.
  • (B) मला कुठे नेशी.
  • (C) दूध का देशी.
  • (D) यापैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) मला कुठे नेशी.

योग्य उत्तर मला कुठे नेशी आहे • Key Points • "अग अग म्हशी, मला कुठे नेशी" ही मराठी म्हण आहे. • या म्हणीचा अर्थ आहे की, एकाच्या चुकीसाठी इतर लोकांना दोष लावणे. • या म्हणीचा उपयोग आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारण्यासाठी केला जातो. • म्हैस ही माणसाला...

प्रश्न #8023 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणती म्हणीची जोडी चुकीची आहे?
EN Identify which among the following pair of proverbs is incorrect?
  • (A) खाण तशी माती - आईबाबा प्रमाणे मुली
  • (B) गरजेल तो पडेल काय - बडबड करणाऱ्यांच्या हातून काही कार्य होत नाही
  • (C) गर्वाचे घर खाली - गविष्ठ माणसाला अपमानीत होण्याची पाळी येणे
  • (D) घरोघरी मातीच्या चुली - सर्वत्र एक सारख्या चुली असतात
अचूक उत्तर: पर्याय (D) घरोघरी मातीच्या चुली - सर्वत्र एक सारख्या चुली असतात

घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ कोठेही गेले तरी परिस्थिती सामान्यतः सारखीच असते हा होईल. • म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव...

प्रश्न #8024 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील म्हण पूर्ण करा. 'देवाची करणी अन् _______'.
EN Complete the following proverb. 'God's work and _______'.
  • (A) नारळात पाणी
  • (B) नदीत पाणी
  • (C) विहिरीत पाणी
  • (D) घरात पाणी
अचूक उत्तर: पर्याय (A) नारळात पाणी

देवाची करणी अन् नारळात पाणी ही म्हण योग्य होईल. • देवाची करणी अन् नारळात पाणी याचा अर्थ नैसर्गिक गोष्टींना तोड नसते असा होतो. • म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये...

प्रश्न #8025 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील म्हण पूर्ण करा. 'चुली पुढे शिपाई अन घराबाहेर ________'
EN Complete the following proverb. 'Soldier ahead of the stove and out of the house ________'
  • (A) शिकारी
  • (B) कसाई
  • (C) भागूबाई
  • (D) गवई
अचूक उत्तर: पर्याय (C) भागूबाई

चुली पुढे शिपाई अन घराबाहेर भागूबाई ही म्हण योग्य होईल. • चुली पुढे शिपाई अन घराबाहेर भागूबाई याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने घरात तेवढा शूरपणा दाखवायचा पण बाहेर गेल्यावर घाबरायचे असा होतो. • म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर...

प्रश्न #8026 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘आपल्याच माणसाला आपणच शासन कसे करावे' हा अर्थ स्पष्ट करणारी पुढीलपैकी म्हण कोणती?
EN Identify which among the following proverbs explains the meaning of 'How should we rule our own people'?
  • (A) काखेत कळसा गावाला वळसा
  • (B) कोल्हा काकडीला राजी
  • (C) आपलेच दात आणि आपलेच ओठ
  • (D) बैल गेला नि झोपा केला
अचूक उत्तर: पर्याय (C) आपलेच दात आणि आपलेच ओठ

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार...

प्रश्न #8027 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.' - म्हणीचा अर्थ सांगा.
EN 'There is no heaven without death.' - Explain the meaning of the proverb.
  • (A) मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जातो
  • (B) प्रत्येकाचा मृत्यू कधी ना कधी होतोच
  • (C) स्वर्गात जाण्यासाठी पुण्य करावे लागते
  • (D) प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजेच अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. • म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला...

प्रश्न #8028 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'मारून टाकणे' याचा समानार्थी वाक्प्रचार शोधा.
EN Find synonyms for 'to kill'.
  • (A) कंठ फुटणे
  • (B) कंठस्नान घालणे
  • (C) कंठशोष करणे
  • (D) प्राण कंठाशी येणे
अचूक उत्तर: पर्याय (B) कंठस्नान घालणे

Key Points • स्पष्टीकरण: • कंठ फुटणे: आवाज फुटणे किंवा आर्तता व्यक्त होणे, हा वाक्प्रचार मारून टाकण्याशी संबंधित नाही. • कंठस्नान घालणे: एखाद्याला ठार मारणे किंवा हत्या करणे, हा वाक्प्रचार 'मारून टाकणे' या अर्थाशी जुळतो. • कंठशोष करणे: आवाज...

प्रश्न #8029 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'अकरावा गुरू होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातुन निवडा.
EN Choose the meaning of the phrase 'Becoming the Eleventh Guru' from the following options.
  • (A) कामात विघ्न येणे
  • (B) कामात यश येणे
  • (C) बुध्दी न वापरणे
  • (D) भाग्य उजळणे
अचूक उत्तर: पर्याय (D) भाग्य उजळणे

वाक्यात उपयोग - राशीला चांगल्या नोकरीची ऑफर मिळाल्याने तिला अकरावा गुरू प्राप्त झाला असे म्हणता येईल. • वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील...

प्रश्न #8030 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : जीव भांड्यात पडणे -
EN Explain the meaning of the following phrase : Life falls into the pot -
  • (A) संकट टळल्यामुळे बरे वाटणे.
  • (B) जीवन असुरक्षित असणे.
  • (C) जीव सांभाळणे.
  • (D) जीव कासावीस होणे.
अचूक उत्तर: पर्याय (A) संकट टळल्यामुळे बरे वाटणे.

प्रश्न #8031 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
योग्य जोड्या जुळवा. वाक्प्रचार अर्थ 1. दात दाखवणे (अ) फजिती होणे 2. दात वासणे (ब) एखाद्याची टिंगल करून हसणे 3. दात विचकणे (क) नुकसानीमुळे खिन्न होऊन बसणे 4. दात पडणे (ड) एखाद्याला वेडावणे
EN Match the correct pairs. Phrase Meaning 1. show teeth (a) gnash 2. gnash teeth (b) laugh at someone 3. gnash teeth (c) grieve at a loss 4. lose teeth (d) make someone mad
  • (A) 1 - ड, 2 - अ, 3 - ब, 4 - क
  • (B) 1 - क, 2 - ड, 3 - अ, 4 - ब
  • (C) 1 - ब, 2 - क, 3 - ड, 4 - अ
  • (D) 1 - ड, 2 - क, 3 - ब, 4 - अ
अचूक उत्तर: पर्याय (C) 1 - ब, 2 - क, 3 - ड, 4 - अ

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. • Additional Information • दात दाखवणे म्हणजे एखाद्याची टिंगल करून हसणे होय. • वाक्यात उपयोग - सुरेश नेहमी आपल्या मित्रांच्या बोलण्यावर दात दाखवत...

प्रश्न #8032 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा -- खूणगाठ बांधणे.
EN Identify the meaning of the following phrase -- tie the knot.
  • (A) ढोंगीपणा करणे
  • (B) मन घट्ट करणे
  • (C) निश्चय करणे
  • (D) गाठ मारून खून करणे
अचूक उत्तर: पर्याय (C) निश्चय करणे

वाक्यात उपयोग - या परीक्षेत पहिल्या दहात यायचेच अशी साहिलने मनात खूणगाठ बांधली होती. • वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. • Additional Information • मन घट्ट करणे म्हणजे एखाद्या...

प्रश्न #8033 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले.' या वाक्यात कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे?
EN 'Tai had to do all the work as she was alone at home.' Which idiom is hidden in this sentence?
  • (A) अंग चोरणे
  • (B) अंग टाकणे
  • (C) अंगावर पडणे
  • (D) अंगावर काढणे
अचूक उत्तर: पर्याय (C) अंगावर पडणे

अंगावर पडणे याचा अर्थ एखाद्या कामाची जबाबदारी अंगावर पडणे असा होतो. • वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. • Additional Information • अंग चोरणे याचा अर्थ फारच थोडे काम करणे असा होतो...

प्रश्न #8034 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'पळून जाणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
EN Identify the phrase meaning 'run away'.
  • (A) पाठ पुरविणे
  • (B) पाठ दाखविणे
  • (C) पाठ राखणे
  • (D) पाठीशी घालणे
अचूक उत्तर: पर्याय (B) पाठ दाखविणे

वाक्यात उपयोग - संकटाच्या काळात सुयश आपल्या मित्रांना पाठ दाखवून निघून गेला. • वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. • Additional Information • पाठ पुरविणे याचा अर्थ एखाद्या...

प्रश्न #8035 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
या वाक्प्रचारातून चूक अर्थ दिलेली वाक्प्रचाराची जोडी कोणती?
EN Which pair of sentences gives the wrong meaning from this sentence?
  • (A) वाटेस जाणे - खोडी काढणे
  • (B) वाटेस लावणे - रस्त्यावर सोडणे
  • (C) वाट लागणे - नष्ट होणे
  • (D) वाटाण्याच्या अक्षता लावणे - विनंती नाकारणे
अचूक उत्तर: पर्याय (B) वाटेस लावणे - रस्त्यावर सोडणे

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न...

प्रश्न #8036 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील पर्यायांतून, 'जिवाचे रान करणे' या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा.
EN From the following options, identify the statement that shows the correct use of the term 'sacrifice' in the sentence.
  • (A) कडकडून भूक लागली की मी जिवाचे रान करून जेवतो.
  • (B) शेतकरी शेतात उत्तम पीक यावे म्हणून जिवाचे रान करतो.
  • (C) मी काश्मीरला सहलीला जाऊन जिवाचे रान केले.
  • (D) जिवाचे रान करणे शक्य असते का कधी?
अचूक उत्तर: पर्याय (B) शेतकरी शेतात उत्तम पीक यावे म्हणून जिवाचे रान करतो.

जिवाचे रान करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खूप कष्ट सोसणे असा होतो. • वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय)...

प्रश्न #8037 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. जखमेवर मीठ चोळणे
EN Identify the correct meaning of the following phrase. Rub salt in the wound
  • (A) मायेने सांभाळणे.
  • (B) मन घट्ट करणे.
  • (C) उणिवेवर प्रहार करणे.
  • (D) खूप कष्ट करणे
अचूक उत्तर: पर्याय (C) उणिवेवर प्रहार करणे.

वाक्यात उपयोग - अमितने आपल्या मित्राच्या भावना समजून घेतल्या नाहीत पण त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम व्यवस्थित केले. • वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. • Additional...

प्रश्न #8038 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
नामाचा प्रकार ओळखा - "समुद्र"
EN Identify the form of the name - "Sea".
  • (A) विशेषनाम
  • (B) सामान्यनाम
  • (C) भाववाचकनाम
  • (D) समुदायवाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (B) सामान्यनाम

सामान्यनाम - एकाच जातीच्या समान गुणधर्मांमुळे दिल्या जाणाऱ्या नामास सामान्यनाम असे म्हणतात. उदा. मुलगा, शहर, प्राणी इत्यादी • सामान्यनामाचे दोन प्रकार पडतात. • पदार्थवाचक नाम - जे पदार्थ शक्यतो लिटर, मीटर किंवा किलो ग्रॅम मध्ये मोजले जातात किंवा...

प्रश्न #8039 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील दिलेल्या शब्दांतून भाववाचक नाम निवडा.
EN Choose the meaningful noun from the words given below.
  • (A) हुशार
  • (B) हुशारीकणा
  • (C) कुशल
  • (D) हुशारी
अचूक उत्तर: पर्याय (D) हुशारी

प्रश्न #8040 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडा.
EN Select the positional noun option.
  • (A) सौंदर्य
  • (B) शौर्य
  • (C) गरिबी
  • (D) प्रामाणिकपणा
अचूक उत्तर: पर्याय (C) गरिबी

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स