✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 410)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 410 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 8,181 ते 8,200 (एकूण 8,690)
प्रश्न #8181 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी" हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा.
  • (A) अटकळ्या देवा दंडवत
  • (B) आदपाव भोपळा आणि अडीच शेर तेल
  • (C) अवसबाई तुझ्याकडे, पुनवबाई तुझ्याकडे
  • (D) अस्वलाआधी आरोळी
अचूक उत्तर: पर्याय (D) अस्वलाआधी आरोळी

"अस्वलाआधी आरोळी" ही म्हण दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. या म्हणीचा अर्थ असा आहे की दुसऱ्याने आपल्या विरोधात काही कारवाई करण्यापूर्वी आपणच त्याच्या विरोधात कारवाई करावी. या म्हणीने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आधी कृती करावी असा संदेश दिला आहे...

प्रश्न #8182 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
' येई येई विठाबाई I माझे पंढरीची आई' या काव्यपंक्तीतील अधोरेखित साधित शब्दाचा प्रकार ओळखा.
  • (A) पूर्णाभ्यस्त शब्द
  • (B) नामसाधित शब्द
  • (C) अंशाभ्यस्त शब्द
  • (D) अनुकरण वाचक शब्द
अचूक उत्तर: पर्याय (A) पूर्णाभ्यस्त शब्द

Important Pointsअभ्यस्त शब्दाचे खालील तीन प्रकार पडतात. • पूर्णाभ्यस्त - एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतात. उदा. हळहळ, बडबड • अंशाभ्यस्त - जेव्हा पूर्ण शब्द पुन्हा जशाच्या तसा न येता एखादे अक्षर...

प्रश्न #8183 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द ओळखा.
  • (A) कानन
  • (B) स्वल्प
  • (C) रक्षक
  • (D) निष्पाप
अचूक उत्तर: पर्याय (D) निष्पाप

निष्पाप या शब्दात नि हा संस्कृत उपसर्ग लागला आहे. • रक्षक हे अक प्रत्यय लागून तयार झालेले कृदंत आहे. • उपसर्गघटित शब्द - शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्गघटित शब्द म्हणतात. • आमरण, अनुरूप...

प्रश्न #8184 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'नक्षा उतरणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
  • (A) सुरुवात होणे
  • (B) निरर्थक बडबड करणे
  • (C) गर्व नष्ट होणे
  • (D) तारांबळ उडणे
अचूक उत्तर: पर्याय (C) गर्व नष्ट होणे

वाक्यात उपयोग - शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंचा लढाईत पराभव करून त्यांचा नक्षा उतरविला. • वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. • Additional Information • उगम होणे याचा अर्थ सुरुवात...

प्रश्न #8185 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'कणिक तिंबणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
  • (A) खल करणे
  • (B) निश्चय करणे
  • (C) मार देणे
  • (D) फसवणे
अचूक उत्तर: पर्याय (C) मार देणे

वाक्यात उपयोग - वर्गात खूप मस्ती करताना पाहून गुरुजींनी सर्व विद्यार्थ्याच्या पाठीवर कणीक तिंबली. • वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. • Additional Information • खल करणे म्हणजे...

प्रश्न #8186 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'संताप' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
  • (A) लढाई
  • (B) नाराजी
  • (C) संतोष
  • (D) रहस्य
अचूक उत्तर: पर्याय (C) संतोष

संताप या शब्दाचा अर्थ राग असा होतो तर संतोषचा अर्थ आनंद असा होतो. • विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते. • Additional Information • लढाई या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द समेट हा...

प्रश्न #8187 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'कवन' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
  • (A) नृत्य
  • (B) गायन
  • (C) चर्चा
  • (D) काव्य
अचूक उत्तर: पर्याय (D) काव्य

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. • Additional Information • नृत्य म्हणजे नाचणे किंवा गायनांतील रस व भाव, मुखराग व अंगप्रत्यंग यांच्याद्वारा अभिनय करून, अनेक तालांमध्ये नियमबद्ध नाचणे होय. • गायन...

प्रश्न #8188 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'काल जोरदार पाऊस पडला.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
  • (A) आज्ञार्थी
  • (B) विधानार्थी
  • (C) प्रश्नार्थी
  • (D) उद्गारार्थी
अचूक उत्तर: पर्याय (B) विधानार्थी

वरील वाक्यात पाऊस हा कर्ता आहे, कर्त्यांने केवळ विधान केलेले आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे म्हणून हे वाक्य विधानार्थी होईल. • Important Pointsमराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. • अर्थावरून पडणारे प्रकार • वाक्यात असणार्या...

प्रश्न #8189 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी प्रमाणलेखनाच्या दृष्टीने अचूक पर्याय निवडा.
  • (A) पाणी गरम करण्यासाठी सौर फलकाचा वापर केला जातो.
  • (B) शेवाळे म्हणजे पाण्यावर उगवणारा वनस्पती.
  • (C) पौलिसांचा लाठीहल्ला सूर झाल्यावर कार्यकर्ते सैरावैरा पळाला.
  • (D) त्या वैभवशालि वाड्याचा जीर्ण अवस्था पाहून वाईट वाटले.
अचूक उत्तर: पर्याय (A) पाणी गरम करण्यासाठी सौर फलकाचा वापर केला जातो.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. • Additional Informationशेवाळ म्हणजे पाण्यावर उगवणारी वनस्पती. हे योग्य वाक्य होईल. • पोलिसांचा लाठीहल्ला सुरु झाल्यावर कार्यकर्ते...

प्रश्न #8190 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गमावण्याची पाळी येते' या आशयाची म्हण कोणती ?
  • (A) घरात शूर बाहेर नेभळट
  • (B) असंगाशी संग, प्राणाशी गाठ
  • (C) अल्प बुद्धी, बहु गर्वी
  • (D) आठ पुरभय्ये नि नऊ चौबे
अचूक उत्तर: पर्याय (B) असंगाशी संग, प्राणाशी गाठ

म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार...

प्रश्न #8191 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'हादरणे' या आशयाचा वाक्यात योग्य उपयोग असलेला पर्याय निवडा.
  • (A) रस्त्यावर झालेला अपघात पाहून रीमाला मानसिक धक्का बसला.
  • (B) कैलास पर्वत पाहिल्यावर सोहनला अपरिमित आनंद झाला
  • (C) मला त्याचा विचार सयुक्तिक वाटला.
  • (D) ज्ञानेश्वरी हा गीतेवरील भाष्य असलेला ग्रंथ आहे, ही गोष्ट सर्वश्रुत आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) रस्त्यावर झालेला अपघात पाहून रीमाला मानसिक धक्का बसला.

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. • हादरणे म्हणजे एखादा मानसिक धक्का बसणे होय. • Additional Information • अपरिमित आनंद होणे म्हणजे खूप खुश किंवा आनंदित होणे होय. • सयुक्तिक म्हणजे...

प्रश्न #8192 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मोबदला न देता कामास जुंपणे ही भावना कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होते?
  • (A) लक्ष वेधून घेणे
  • (B) शिकस्त करणे
  • (C) वेठीस धरणे
  • (D) शरपंजरी पडणे
अचूक उत्तर: पर्याय (C) वेठीस धरणे

वेठीस धरणे म्हणजे अडवून ठेवणे होय. • वाक्यात उपयोग - जमीनदार नेहमी शेतमजुरांना वेठीस धरण्याचे काम करत असत. • वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. • Additional Information • लक्ष...

प्रश्न #8193 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'अपकर्ष' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
  • (A) निष्कर्ष
  • (B) उत्कर्ष
  • (C) समर्थ
  • (D) विमर्श
अचूक उत्तर: पर्याय (B) उत्कर्ष

प्रश्न #8194 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'ओहोटी' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
  • (A) ऱ्हास
  • (B) उतार
  • (C) घसरण
  • (D) भरती
अचूक उत्तर: पर्याय (D) भरती

विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते. • Additional Information • ऱ्हास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उत्कर्ष किंवा विकास हा होईल. • उतार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द चढ हा...

प्रश्न #8195 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'संचित' या शब्दाचा योग्य उपयोग असलेले वाक्य शोधा.
  • (A) होऊ घातलेल्या स्पर्धांसाठी क्रीडांगण सचिंत झाले होते.
  • (B) मुलगा बोर्डात आल्याचे कळल्यावर त्याचे वडील सचिंत झाले.
  • (C) आगाशे गुरुजींनी आपल्या मुलीच्या लग्नात जन्मभराची जमापूंजी खर्च केली.
  • (D) येत्या महिन्यात परीक्षा आहे असे कळल्यावर प्रदीप सचिंत झाला.
अचूक उत्तर: पर्याय (C) आगाशे गुरुजींनी आपल्या मुलीच्या लग्नात जन्मभराची जमापूंजी खर्च केली.

संचित या शब्दाचा अर्थ गोळा किंवा संचय केलेले असा होईल. • वरील वाक्यात जन्मभराची जमापूंजी याचा अर्थ गोळा किंवा संचय केलेले पैसे मुलीच्या लग्नात खर्च केले असा होतो. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि...

प्रश्न #8196 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
जेव्हा कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून एका समुच्चयाचा अर्थ सूचित केला जातो, तेव्हा कोणता समास होतो?
  • (A) द्वंद्व
  • (B) बहुव्रीही
  • (C) द्विगू
  • (D) अव्ययीभाव
अचूक उत्तर: पर्याय (C) द्विगू

द्विगू समास - ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगू समास म्हणतात. उदा. सप्ताह - सात दिवसांचा समूह • Important Pointsसमास - मराठी व्याकरणामधी दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दामधील...

प्रश्न #8197 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'बाका' शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
  • (A) खिडकी
  • (B) पटाईत
  • (C) ताट
  • (D) पाट
अचूक उत्तर: पर्याय (B) पटाईत

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. • Additional Information • खिडकी म्हणजे वातायन किंवा झरोका किंवा बारी किंवा हवा व उजेडाकरिता केलेले लहान दार होय. • ताट हे एक पसरट, गोलाकार पाकसाधन आहे ज्यामध्ये...

प्रश्न #8198 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'संवेदना, चेतना नसलेला' हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो?
  • (A) मुर्दाड
  • (B) मुरब्बी
  • (C) मुलामा
  • (D) मुद्दाम
अचूक उत्तर: पर्याय (A) मुर्दाड

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. • Additional Information • मुरब्बी म्हणजे कैवारी, आश्रयदाता किंवा पक्ष घेऊन बोलणारा होय. • मुलामा म्हणजे अलकारांचा पातळ थर होय. • मुद्दाम म्हणजे जाणूनबुजून किंवा...

प्रश्न #8199 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'शैशव' या शब्दाचा आशय असलेला पर्याय निवडा.
  • (A) पर्वत
  • (B) प्रसाद
  • (C) लहानपण
  • (D) वेदना
अचूक उत्तर: पर्याय (C) लहानपण

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. • Additional Information • अचल, नग, गिरी, अद्री, शैल हे पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. • प्रसाद म्हणजे कृपा, अनुग्रह किंवा कृपा म्हणून देव, गुरु, साधु...

प्रश्न #8200 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
उंटावरचा शहाणा या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?
  • (A) उच्चस्थानावरील हुशार व्यक्ती
  • (B) प्राणीशास्त्रातला जाणकार
  • (C) वाळवंटातील तज्ञ
  • (D) मूर्खपणाची मसलत देणारा
अचूक उत्तर: पर्याय (D) मूर्खपणाची मसलत देणारा

उंटावरचा शहाणा या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ आहे "मूर्खपणाची मसलत देणारा". • स्पष्टीकरण: या वाक्प्रचारामध्ये असा आशय आहे की, ज्याप्रमाणे उंटाला केवळ त्याच्या उंचीमुळे शहाणे मानता येत नाही, त्याप्रमाणेच काही लोक स्वत:ला शहाणे समजतात परंतु त्यांच्या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स