✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 408)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 408 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 8,141 ते 8,160 (एकूण 8,690)
प्रश्न #8141 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शंख या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
  • (A) वरीलपैकी सर्व
  • (B) मूढ
  • (C) मूर्ख
  • (D) अडाणी
अचूक उत्तर: पर्याय (A) वरीलपैकी सर्व

समानार्थी शब्द- • एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. • सम + अर्थी(समान...

प्रश्न #8142 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मावसभाऊ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
  • (A) नञ तत्पुरूष
  • (B) अलुक तत्पुरूष
  • (C) उपपद तत्पुरूष
  • (D) मध्यमपद लोपी
अचूक उत्तर: पर्याय (D) मध्यमपद लोपी

समास- • सामासिक शब्द म्हणजे दोन किंवा अधिक शब्द(पदे) जोडून जो जोडशब्द तयार होतो. त्यास सामासिक शब्द म्हणतात. • समासाचा विग्रह- • एखादा सामासिक शब्द ज्या शब्दांपासून बनतो त्यांचा परस्पर संबंध हे विशद करून दाखवणे म्हणजेच समासाचा विग्रह करणे होय...

प्रश्न #8143 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
धाबे दणाणणे या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शविणारा अचूक पर्याय निवडा.
  • (A) सुट्टी करणे
  • (B) नक्षा उतरवणे
  • (C) निंदा करणे
  • (D) अतिशय घाबरणे
अचूक उत्तर: पर्याय (D) अतिशय घाबरणे

वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. • प्रस्तुत पर्यायांपैकी धाबे दणाणणे या वाक्प्रचाराचा अर्थ अतिशय घाबरणे असा होतो. • वाक्यात उपयोग- कॉपी करतांना सरांनी पाहिल्याने...

प्रश्न #8144 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
गयावया करणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणता अर्थ असेल ?
  • (A) निरर्थक बडबड करणे
  • (B) केविलवाणी विनंती करणे
  • (C) क्षमा करणे
  • (D) दोष देणे
अचूक उत्तर: पर्याय (B) केविलवाणी विनंती करणे

वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. • प्रस्तुत पर्यायांपैकी गयावया करणे या वाक्प्रचाराचा अर्थ केविलवाणी विनंती करणे असा होतो. • वाक्यात उपयोग- राम सावकाराकडे...

प्रश्न #8145 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील पैकी कोणता पर्याय उष्म या वर्ण प्रकाराचा नाही ?
  • (A) श्र्
  • (B) स्
  • (C) श्
  • (D) ष्
अचूक उत्तर: पर्याय (A) श्र्

उष्म व्यंजन- • नावावरूनच जाणवत आहे, उष्मा म्हणजे - गरम. • म्हणजेच उच्चार करताना तोंडातून बाहेर पडणारी व्यंजने उष्ण वायू किंवा घासल्याने हवेच्या मार्गात उष्ण वायू निर्माण होते, त्याला उबदार व्यंजन असे म्हणतात. • ही हवा उच्चार करताना तोंडाच्या आतील...

प्रश्न #8146 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मनोरथ या शब्दाचा संधीविग्रह पुढीलपैकी कोणता ?
  • (A) मन:+ रथ
  • (B) मन +अर्थ
  • (C) मनो+रथ
  • (D) मग+अनर्थ
अचूक उत्तर: पर्याय (A) मन:+ रथ

संधी- मनोरथ • संधी विग्रह- मन:+ रथ • संधी- • संधी चा शब्दश: अर्थ जोडणे असा होतो. • एकापुढे एक बोलताना शब्द हे एकमेकांत मिसळतात, त्यालाच संधी म्हणतात. शेवटच्या वर्णात पुढील शब्दाचा पहिला वर्ण मिसळून संधी बनते. • विसर्ग संधी- • एकत्र येणार्या वर्णातील...

प्रश्न #8147 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
  • (A) बहुमोल
  • (B) ज्ञानी
  • (C) अज्ञात
  • (D) अज्ञान
अचूक उत्तर: पर्याय (C) अज्ञात

विरुद्धार्थी शब्द- • विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. • मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात. • विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते. • Important...

प्रश्न #8148 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?
  • (A) वरीलपैकी सर्व
  • (B) काक
  • (C) एकाक्ष
  • (D) वायस
अचूक उत्तर: पर्याय (A) वरीलपैकी सर्व

समानार्थी शब्द- • एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. • सम + अर्थी(समान...

प्रश्न #8149 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
विजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला - या वाक्यातील हार हा शब्द ______ आहे
  • (A) न. पुं. लिंगी
  • (B) स्त्रीलिंगी
  • (C) पुल्लिंगी
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) पुल्लिंगी

प्रश्न #8150 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दोन्हीही पदे प्रधान नसणारा समास ______ आहे
  • (A) द्वंद्व
  • (B) अव्ययीभाव
  • (C) बहुव्रीही
  • (D) तत्पुरुष
अचूक उत्तर: पर्याय (C) बहुव्रीही

समास- • बर्याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच समास असे म्हणतात. • अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात. • Important...

प्रश्न #8151 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
तुम्हाला नेहमी असेच यश मिळो. या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते ? अचूक पर्याय निवडा.
  • (A) विध्यर्थ
  • (B) स्वार्थ
  • (C) आज्ञार्थ
  • (D) संकेतार्थ
अचूक उत्तर: पर्याय (A) विध्यर्थ

क्रियापद: क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. • क्रियापदाचे चार अर्थ आहेत : • स्वार्थ - ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो आणि क्रियापदाचा केवळ स्वतः चा अर्थ समजतो, त्याला स्वार्थी क्रियापद म्हणतात. उदा...

प्रश्न #8152 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम वापरलेले आहे ?
  • (A) आपण सर्व या घटनेचे साक्षीदार आहोत
  • (B) आपण मला खूप मोठा मान दिला आहे
  • (C) आपण असे करायला नको होते
  • (D) ते आपणहून पदावरून पायउतार झाले
अचूक उत्तर: पर्याय (D) ते आपणहून पदावरून पायउतार झाले

सर्वनाम- • एखाद्या वाक्यात वारंवार नाव वापरावे लागत असेल तर अशा वेळी आपण नामाऐवजी सर्वनामाचा वापर करतो. • नामाऐवजी जेव्हा आपण त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरतो तेव्हा त्यांस सर्वनाम असे म्हणतात. • सर्वनामांना प्रतिनामे असेही म्हणतात. • Key...

प्रश्न #8153 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
गुलामगिरी हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे ?
  • (A) विशेषण
  • (B) विशेषनाम
  • (C) सर्वनाम
  • (D) भाववाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (D) भाववाचक नाम

नामाचे तीन प्रकार पडतात. • सामान्यनाम • विशेषनाम • भाववाचकनाम • भाववाचक नाम- • ज्या शब्दाने प्राणी वा व्यक्ती अथवा वस्तूच्या गुण, धर्म, किंवा भाव याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात. • भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते. भाववाचक नामे ही एकवचनीय...

प्रश्न #8154 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
धनको या शब्दाचा पुढीलपैकी कोणता अर्थ घेता येईल ?
  • (A) पैसे कर्जाऊ घेणारा
  • (B) पैसे कर्जाऊ देणारा
  • (C) वरीलपैकी दोन्ही
  • (D) दोन्ही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) पैसे कर्जाऊ देणारा

समूहदर्शक शब्द - भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दांचा वापर न करता त्यासाठी एकच शब्द वापरला जातो, त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात. • प्रस्तुत पर्यायांपैकी धनको या शब्दाचा योग्य अर्थ पैसे कर्जाऊ देणारा असा होतो. • त्यामुळे पैसे कर्जाऊ देणारा हा...

प्रश्न #8155 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
निंदा या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थ दर्शवणारा अचूक पर्याय शोधा.
  • (A) स्थिती
  • (B) स्तुती
  • (C) नीति
  • (D) मति
अचूक उत्तर: पर्याय (B) स्तुती

विरुद्धार्थी शब्द- • विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. • मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात. • विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते. • निंदा या शब्दाचा...

प्रश्न #8156 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'एकदा', 'दोनदा', 'तीनदा', 'हजारदा' ही कोणती क्रियाविशेषणे आहेत ?
  • (A) स्थितिवाचक
  • (B) सातत्यवाचक
  • (C) आवृत्तीवाचक
  • (D) गतिवाचक
अचूक उत्तर: पर्याय (C) आवृत्तीवाचक

क्रियाविशेषण अव्यये- क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. • क्रियाविशेषण अव्यायाचे प्रकार पडतात- • अर्थमूलक प्रकार • स्वरूपमूलक प्रकार • अर्थमूलक प्रकार- • कालवाचक क्रियाविशेषण अव्यये...

प्रश्न #8157 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.
  • (A) की
  • (B) मी
  • (C) जा
  • (D) नि
अचूक उत्तर: पर्याय (B) मी

सर्वनाम- नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. • सर्वनामाचे एकंदर सहा प्रकार पडतात. • पुरुषवाचक सर्वनाम • दर्शक सर्वनाम • संबंधी सर्वनाम • प्रश्नार्थक सर्वनाम...

प्रश्न #8158 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
धारा + उष्ण या शब्दाची कशी संधी होईल?
  • (A) धारोष्ण
  • (B) धरुष्ण
  • (C) धारोष्न
  • (D) धृष्ण
अचूक उत्तर: पर्याय (A) धारोष्ण

शब्द- धारोष्ण • संधी विग्रह - धारा + उष्ण • स्वरसंधी - जवळ येणारे वर्ण जर स्वर असतील, तर त्यास ‘स्वरसंधी' असे म्हणतात. • उदा. ग्रंथ + आलय = ग्रंथालय • नियम - अ किंवा आ या स्वरापुढे इ किंवा ई आल्यास ‘ए’ स्वर येतो व उ किंवा ऊ आल्यास ‘ओ’ हा स्वर येतो...

प्रश्न #8159 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'असला नवरा नको ग बाई' या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
  • (A) गुणविशेषण
  • (B) सार्वनामिक विशेषण
  • (C) संख्याविशेषण
  • (D) साधित विशेषण
अचूक उत्तर: पर्याय (B) सार्वनामिक विशेषण

विशेषण- नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. • नामे, सर्वनामे, धातुसाधिते व अव्ययसाधिते यांचाही विशेषणासारखा उपयोग केला जातो. • Important Pointsसार्वनामिक विशेषण- सर्वनामापासून बनलेले विशेषण...

प्रश्न #8160 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
महात्मा शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?
  • (A) महान
  • (B) लहान
  • (C) दुरात्मा
  • (D) धाकटा
अचूक उत्तर: पर्याय (C) दुरात्मा

विरुद्धार्थी शब्द- • विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. • मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात. • विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते. • महात्मा या शब्दाचा...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स