⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

केंद्र-राज्य संबंध (कायदेविषयक, प्रशासकीय व आर्थिक) (पृष्ठ 2)

Centre-State Relations: Legislative, Administrative & Financial — Indian Polity & Constitution

'केंद्र-राज्य संबंध (कायदेविषयक, प्रशासकीय व आर्थिक)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 65 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 2 / 4
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 65)
प्रश्न #21 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
राष्ट्रीय महिला आयोग तक्रारीकडे लक्ष देते व स्वतः प्रकरणाची दखल घेते, त्या अशा बाबी आहेत :
अ) महिलांना हक्का पासून वंचित ठेवणे
ब) महिलांच्या संरक्षणासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी न करणे
क) घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करणे
ड) समानता व विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी न करणे
पर्यायी उत्तरे:
EN The National Commission for Women looks into complaints and takes suo-moto notice of matters relating to :

(a) Deprivation of women's rights

(b) Non-implementation of laws enacted to provide protection to women

(c) Violation of the provisions of the Constitution

(d) Non-implementation of laws enacted to achieve the objective of equality and development
  • (A) फक्त अ , ब
  • (B) फक्त क, ड
  • (C) फक्त अ, ब, ड
  • (D) फक्त अ, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, ब, ड

योग्य उत्तर पर्याय (३) फक्त अ, ब, ड हे आहे. स्पष्टीकरण: * राष्ट्रीय महिला आयोग कायदा, १९९० (National Commission for Women Act, 1990): * या कायद्याच्या कलम १०(१)(f) अन्वये राष्ट्रीय महिला आयोग तक्रारींची दखल घेतो व खालील बाबींमध्ये स्वतःहून...

प्रश्न #22 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी ________ ने ठराव मंजूर केला तर.
EN Parliament can legislate with respect to any matter in the State List in national interest if a resolution is passed by ________:
  • (A) लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने
  • (B) लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने
  • (C) राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने
  • (D) राज्यसभेने हजर राहून करणाऱ्या दोन-तृतीयांश दस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने
अचूक उत्तर: पर्याय (D) राज्यसभेने हजर राहून करणाऱ्या दोन-तृतीयांश दस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने

योग्य उत्तर पर्याय (४) राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या दोन-तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने हे आहे. स्पष्टीकरण: * अनुच्छेद २४९ (Article 249): * संविधानाच्या अनुच्छेद २४९(१) नुसार, जर राज्यसभेने (Council of States) हजर राहून...

प्रश्न #23 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) नागपूर करार हा सप्टेंबर 1953 मध्ये झाला त्याने मराठी भाषिकांचे लगतच्या प्रदेशांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्मितीला चालना मिळाली.
ब) नागपूर करारातील सर्वात प्रमुख कलमानुसार महाराष्ट्र राज्य विधानसभेचे दरवर्षी नागपूर येथे अधिवेशन घेणे आवश्यक होते.
क) मुख्यमंत्री वाय.बी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1मे, 1956 रोजी झाली
ड) एस्.एम्. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या विविध पक्षांच्या बैठकीत पुणे येथे 6 फेब्रुवारी, 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली.
वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत ?
EN Consider the following statements:
a) Nagpur Pact was signed in September 1953, giving momentum to the formation of Maharashtra State comprising contiguous Marathi-speaking areas.
b) Under the most prominent clause of the Nagpur Pact, it was required to hold an annual session of the Maharashtra State Legislative Assembly in Nagpur.
c) The bilingual Bombay State was established on 1 May 1956 under the leadership of Chief Minister Y. B. Chavan.
d) Samyukta Maharashtra Samiti was formed on 6 February 1956 in Pune in an all-party meeting chaired by S. M. Joshi.
Which of the above statements are correct?
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) अ, ब आणि क
  • (C) ब, क आणि ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ आणि ब

योग्य उत्तर पर्याय (१) फक्त अ आणि ब हे आहे. स्पष्टीकरण: * विधान अ बरोबर आहे: २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार (Nagpur Pact) झाला, ज्यावर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या तिन्ही मराठी भाषिक भागांच्या नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या कराराने...

प्रश्न #24 📅 Group C Pre 2020
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते कलम केंद्रसरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानांशी संबंधित आहे ?
EN Which of the following Articles relates to Grants-in-aid given by the Union to the States?
  • (A) कलम 270
  • (B) कलम 280
  • (C) कलम 275
  • (D) कलम 265
अचूक उत्तर: पर्याय (C) कलम 275

योग्य उत्तर पर्याय (३) कलम २७५ हे आहे. स्पष्टीकरण: * मदत अनुदाने (Grants-in-Aid): * कलम २७५ (वैधानिक अनुदाने - Statutory Grants): संसदेने कायद्याद्वारे निश्चित केलेल्या आणि आवश्यक वाटणाऱ्या राज्यांना केंद्र सरकारच्या भारताच्या संचित निधीमधून...

प्रश्न #25 📅 STI Mains 2020
+1.0 / -0.25
सरकारीया कमिशन हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
(a) केंद्र-राज्य संबंध (b) निवडणूक सुधारणा
(c) बँकींग व वित्तीय विभाग
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा
EN Sarkaria Commission is related to which of the following?
(a) Centre-State relations (b) Electoral reforms
(c) Banking and financial sector
Select the correct option from the above:
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (b)
  • (C) (a) आणि (b)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (a)

प्रश्न #26 📅 ASO Mains 2020
+1.0 / -0.25
अयोग्य कथन ओळखा :
(a) आंतर-राज्य परिषद 28 मे, 1990 रोजी स्थापन झाली.
(b) आंतर-राज्य परिषदेची पुनर्रचना 11 नोव्हेंबर, 1999 मध्ये करण्यात आली.
(c) राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 1950 मध्ये झाली.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the INCORRECT statement:
(a) The Inter-State Council was established on 28 May 1990.
(b) The Inter-State Council was reconstituted on 11 November 1999.
(c) The National Development Council was established in 1950.
Alternative Answers:
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (b)
  • (C) फक्त (c)
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (c)

प्रश्न #27 📅 Rajyaseva Pre 2020
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतर-राज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे?
EN Which of the following matters is excluded from the purview of the Inter-State Council in India?
  • (A) राज्या-राज्यांमध्ये जे तंटे उद्भवले असतील त्या बाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे.
  • (B) कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णया करता तरतूद करणे.
  • (C) राज्यांपैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघ-राज्य व एक किंवा अधिक राज्ये यांचा ज्यात समाईक हितसंबंध आहे अशा विषयाबाबत अन्वेषण करणे आणि चर्चा करणे.
  • (D) अशा कोणत्यही विषयावर शिफारशी आणि, विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकार समन्वय साधण्याकरिता शिफारशी करणे.
अचूक उत्तर: पर्याय (B) कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णया करता तरतूद करणे.

योग्य उत्तर पर्याय (२) कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णया करता तरतूद करणे हे आहे. स्पष्टीकरण: * अनुच्छेद २६३ अन्वये आंतर-राज्य परिषदेची कार्ये: 1. राज्या-राज्यांमध्ये...

प्रश्न #28 📅 Rajyaseva Pre 2020
+1.0 / -0.25
महाराष्ट्र व कर्नाटक यांतील सीमाविवादा विषयी अयोग्य विधाने शोधा.
(अ) बेळगाव वर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा केलेला आहे.
(ब) बेळगाव हे स्वातंत्र्यापूर्वी हैद्राबाद संस्थानाचा भाग होते.
(क) सध्या बेळगाव हा कर्नाटक मधील जिल्हा आहे.
(ड) गेली अनेक वर्षापासून बेळगावचा सीमा प्रश्न विवाद मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Find the INCORRECT statements regarding the border dispute between Maharashtra and Karnataka:
(a) Maharashtra has staked its claim over Belgaum on linguistic grounds.
(b) Before independence, Belgaum was part of the princely state of Hyderabad.
(c) Currently, Belgaum is a district in Karnataka.
(d) For many years, the Belgaum border dispute has been pending before the Bombay High Court.
Alternative Answers:
  • (A) (अ), (ब), (क), (ड)
  • (B) (ब), (क)
  • (C) (ब), (ड)
  • (D) (अ), (ब)
अचूक उत्तर: पर्याय (C) (ब), (ड)

योग्य उत्तर पर्याय (३) (ब), (ड) हे आहे. स्पष्टीकरण: * महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute): * विधान (अ) बरोबर आहे: बेळगाव, निपाणी, कारवार आणि लगतच्या ८६५ गावांवर मराठी भाषिक बहुसंख्येच्या आधारावर महाराष्ट्राने दावा केला...

प्रश्न #29 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
केंद्र आणि राज्यांमधील संबंधांबाबतच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या ________ भागात नोंदविलेल्या आहेत.
EN Which of the following Parts of the Indian Constitution mentions about the relations between the Union and the States?
  • (A) 13 व्या
  • (B) 11 व्या
  • (C) 10 व्या
  • (D) 12व्या
अचूक उत्तर: पर्याय (B) 11 व्या

प्रश्न #30 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
भारतात सार्वजनिक धोरण आणि प्रशासकीय बाबींशी निगडीत केंद्र-राज्य सहकार्यासाठी यंत्रणा उपलब्ध आहे. याबाबतीत योग्य विधान कोणते?
अ) केंद्र-राज्य या दरम्यान कार्यकारी अधिकारांबाबतीत परस्पर प्रदत्तीकरण होऊ शकते.
ब) राज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दरम्यान कार्यकारी अधिकारांबाबतीत परस्पर प्रदत्तीकरण होऊ शकते.
क) केंद्र सरकारच्या पूर्व संमतीने राज्य सरकार स्वतःची काही कार्ये केंद्र सरकारकडे सोपवू शकते.
पर्यायी उत्तरे:
EN In India, mechanisms exist for Centre-State cooperation regarding public policy and administrative matters. Which of the following is/are correct statements?
a) Mutual delegation of executive functions can take place between the Centre and the States.
b) Mutual delegation of executive functions can take place between the States and local self-government institutions.
c) The State Government can entrust some of its functions to the Central Government with the prior consent of the Centre.
Alternative Answers:
  • (A) अ बरोबर
  • (B) अ आणि ब बरोबर
  • (C) अ आणि क बरोबर
  • (D) अ, ब आणि क बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क बरोबर

प्रश्न #31 📅 ASO Mains 2019
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) संसदेने केलेला कोणताही कायदा राज्यक्षेत्राबाहेर अंमलात येवू शकेल या कारणावरून तो अवैध असल्याचे मानले जाणार नाही.
ब) संसदेला एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाकरिता कोणत्याही बाबीसंबंधी मग अशी बाब राज्यसूचीत नमूद केलेली बाब असली तरी कायदे करण्याचा अधिकार आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements:
a) No law made by Parliament shall be deemed to be invalid on the ground that it would have extra-territorial operation.
b) Parliament has the power to make laws with respect to any matter for any part of the territory of India not included in a State, notwithstanding that such matter is a matter enumerated in the State List.
Alternative Answers:
  • (A) विधान अ बरोबर
  • (B) विधान ब बरोबर
  • (C) दोन्हीही विधाने चूकीची
  • (D) दोन्हीही विधाने बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) दोन्हीही विधाने बरोबर

योग्य उत्तर पर्याय (४) दोन्हीही विधाने बरोबर हे आहे. स्पष्टीकरण: * विधान अ बरोबर आहे [अनुच्छेद २४५(२)] : * अनुच्छेद २४५(२) स्पष्ट करते की, संसदेने केलेला कोणताही कायदा तो भारताच्या राज्यक्षेत्राबाहेर अंमलात येईल (Extra-territorial operation) या...

प्रश्न #32 📅 ASO Mains 2019
+1.0 / -0.25
संसद राज्य सूचीतील विषयाबाबत कायदा करू शकते जेंव्हा
अ) आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली असेल.
ब) एक किंवा अधिक राज्यांनी राज्य सूचीतील विषयासंबंधी कायदा करावा अशी संसदेला विनंती केल्यास.
क) राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या विषयाबाबत राज्यसभेने तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर केल्यास.
वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे:
EN Parliament can make laws with respect to a matter in the State List when:
a) A Financial Emergency is in operation.
b) One or more States request Parliament to make a law on a matter in the State List.
c) Rajya Sabha passes a resolution by simple majority that a matter is of national importance.
Which of the above statement(s) is/are correct?
Alternative Answers:
  • (A) अ, ब, क
  • (B) फक्त अ
  • (C) फक्त ब आणि क
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही

योग्य उत्तर पर्याय (४) वरीलपैकी एकही नाही हे आहे. स्पष्टीकरण: * संसदेला राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचे अधिकार खालील विशिष्ट परिस्थितीत मिळतात: * विधान (अ) चुकीचे आहे: आर्थिक आणीबाणी (कलम ३६०) लागू असताना संसदेला राज्य सूचीतील विषयांवर कायदे...

प्रश्न #33 📅 Clerk Typist Mains 2019
+1.0 / -0.25
केंद्र व घटकराज्य यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी 1983 साली भारत सरकारने कोणत्या आयोगाची नेमणूक केली होती?
EN Which Commission was appointed by the Government of India in 1983 to improve relations between the Centre and the States?
  • (A) राजमन्नार आयोग
  • (B) स्वर्णसिंग आयोग
  • (C) सरकारिया आयोग
  • (D) वेंकटचलैय्या आयोग
अचूक उत्तर: पर्याय (C) सरकारिया आयोग

योग्य उत्तर पर्याय (३) सरकारिया आयोग हे आहे. स्पष्टीकरण: * सरकारिया आयोग (Sarkaria Commission): * केंद्र आणि घटकराज्ये यांच्यातील वाढता तणाव दूर करण्यासाठी आणि संबंध सुधारण्यासाठी भारत सरकारने ९ जून १९८३ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश...

प्रश्न #34 📅 Tax Assistant Mains 2018
+1.0 / -0.25
राज्य सूचीतील विषयासंबंधी केन्द्र सरकार विधिनियम करू शकते
EN The Central Government (Parliament) can legislate on a subject in the State List:
  • (A) जर संसदेने बहुमताने ठराव करून जाहीर केले की राज्यसूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असेल तर
  • (B) जर राज्यसभेने दोन तृतीयांश बहुमताने ठराव करून जाहीर केले की राज्यसूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असेल तर
  • (C) जर राष्ट्रपतीने आदेश दिला तर
  • (D) जर केन्द्रीय मंत्रीमंडळाने तसे करण्याचे ठरविले तर
अचूक उत्तर: पर्याय (B) जर राज्यसभेने दोन तृतीयांश बहुमताने ठराव करून जाहीर केले की राज्यसूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असेल तर

योग्य उत्तर पर्याय (२) जर राज्यसभेने दोन तृतीयांश बहुमताने ठराव करून जाहीर केले की राज्यसूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असेल तर हे आहे. स्पष्टीकरण: * अनुच्छेद २४९ (Article 249): * संविधानाच्या कलम २४९(१) नुसार, जर राज्यसभेने (Council of...

प्रश्न #35 📅 Forest Service Mains 2018
+1.0 / -0.25
राज्यघटनेने राज्यसूची' तील कोणत्याही विषयाबाबत 'संसदेला' खालील परिस्थितीमध्ये कायदे करण्याचा अधिकार बहाल केला आहे:
अ) जर लोकसभेने राज्यसूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे घोषित केले तर.
ब) जर दोन किंवा अधिक राज्यांच्या विधिमंडळांनी तसा ठराव मंजूर केला तर.
क) जर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंमलात असेल तर.
ड) जर आंतरराष्ट्रीय तह आणि करारांची अंमलबजावणी करावयाची असेल तर.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN The Constitution empowers Parliament to make laws with respect to any matter in the State List under which of the following circumstances:
a) If Lok Sabha declares that a subject in the State List is of national importance.
b) If the legislatures of two or more States pass a resolution to that effect.
c) If a Proclamation of National Emergency is in operation.
d) To implement international treaties and agreements.
Which of the above statements are correct?
  • (A) अ, ब, क
  • (B) ब, क, ड
  • (C) अ, क, ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) ब, क, ड

योग्य उत्तर पर्याय (२) ब, क, ड हे आहे. स्पष्टीकरण: * राज्यघटनेने संसदेला राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचे अधिकार खालील परिस्थितीत दिले आहेत: * विधान अ चुकीचे आहे: लोकसभेने नव्हे, तर राज्यसभेने (कलम २४९) २/३ बहुमताने ठराव संमत केल्यास संसदेला हा...

प्रश्न #36 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
समवर्ती सुचीतील विषयाबाबत राज्याने मंजूर केलेला कायदा केंद्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो.
EN A law enacted by a State on a subject in the Concurrent List prevails over a Central law:
  • (A) जर तो केंद्रीय कायद्याच्या अगोदर मंजूर झाला असेल तर.
  • (B) जर राज्यविधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीने मान्यता दिलेला कायदा केंद्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर असल्यास.
  • (C) जर सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिल्यास.
  • (D) जर बहुसंख्य राज्यांच्या विधिमंडळांनी तसा निर्णय घेतल्यास.
अचूक उत्तर: पर्याय (B) जर राज्यविधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीने मान्यता दिलेला कायदा केंद्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर असल्यास.

योग्य उत्तर पर्याय (२) जर राज्यविधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीने मान्यता दिलेला कायदा केंद्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर असल्यास हे आहे. स्पष्टीकरण: * अनुच्छेद २५४ (Article 254 - विसंगतीचा नियम): * समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र आणि राज्य...

प्रश्न #37 📅 ASO Mains 2018
+1.0 / -0.25
केंन्द्र-राज्य संबंधाबाबतच्या शिफारशीसंबंधी योग्य जोडी ओळखाः (आयोग/समिती शिफारस)
EN Identify the correctly matched pair regarding recommendations on Centre-State relations: (Commission/Committee — Recommendation)
  • (A) सरकारिया आयोग --- अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात
  • (B) राजमन्नार समिती --- आरोग्य, शिक्षण, अभियांत्रिकी आणि न्यायिक अशा अखिल भारतीय सेवा --- निर्माण कराव्यात.
  • (C) पुंछी आयोग --- अखिल भारतीय सेवा अधिक प्रबळ कराव्यात.
  • (D) आनंदपूर साहिब ठराव --- केंन्द्राकडे फक्त संरक्षण,परराष्ट्र व्यवहार, दळणवळण आणि चलन इतकेच मर्यादित विषय असावेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) आनंदपूर साहिब ठराव --- केंन्द्राकडे फक्त संरक्षण,परराष्ट्र व्यवहार, दळणवळण आणि चलन इतकेच मर्यादित विषय असावेत.

योग्य उत्तर पर्याय (४) आनंदपूर साहिब ठराव --- केंद्राकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण आणि चलन इतकेच मर्यादित विषय असावेत हे आहे. स्पष्टीकरण: * योग्य जोडी (पर्याय ४): * आनंदपूर साहिब ठराव (Anandpur Sahib Resolution - 1973): अकाली दलाने...

प्रश्न #38 📅 PSI Mains 2017
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ) केंद्र आणि राज्ये यामधील कायदेविषयक संबंध राज्य-घटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद 245 ते 255 मध्ये सांगितलेले आहेत.
ब) केंद्र आणि राज्ये यामधील आर्थिक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-256 ते 263 मध्ये सांगितलेले आहेत.
क) केंद्र आणि राज्ये यामधील प्रशासकीय संबंध राज्यघटनेच्या बाराव्या भागातील अनुच्छेद-268 ते 293 मध्ये सांगितलेले आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following statements:
a) Legislative relations between the Centre and the States are dealt with in Articles 245 to 255 in Part XI of the Constitution.
b) Financial relations between the Centre and the States are dealt with in Articles 256 to 263 in Part XI of the Constitution.
c) Administrative relations between the Centre and the States are dealt with in Articles 268 to 293 in Part XII of the Constitution.
Alternative Answers:
  • (A) फक्त विधान अ बरोबर
  • (B) विधाने अ आणि ब बरोबर
  • (C) विधाने अ,ब आणि क बरोबर
  • (D) विधाने ब आणि क बरोबर.
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त विधान अ बरोबर

योग्य उत्तर पर्याय (१) फक्त विधान अ बरोबर हे आहे. स्पष्टीकरण: * विधान (अ) बरोबर आहे: केंद्र आणि राज्ये यांमधील कायदेविषयक संबंध (Legislative Relations) हे भारतीय राज्यघटनेच्या भाग ११ मधील प्रकरण १ (अनुच्छेद २४५ ते २५५) मध्ये सविस्तर दिलेले आहेत. *...

प्रश्न #39 📅 Forest Service Mains 2017
+1.0 / -0.25
विधान अ : सरकारिया आयोगाने अनुच्छेद 356 चा क्वचितच वापर करण्याची शिफारस केली होती.
कारण ब : केंद्रस्थानी जे राजकीय पक्ष सत्ता स्थापन करतात ते अनुच्छेद 356 चा दुरुपयोग करतात.
EN Assertion A: The Sarkaria Commission recommended that Article 356 should be used very sparingly and as a matter of last resort.
Reason R: Political parties in power at the Centre frequently misuse Article 356.
  • (A) अ आणि ब दोन्हीही विधाने सत्य आहेत आणि ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
  • (B) अ हे सत्य आहे, परंतू ब हे चुकीचे आहे.
  • (C) ब हे सत्य आहे, परंतू अ हे चुकीचे आहे.
  • (D) अ आणि ब दोन्हीही विधाने सत्य आहेत, परंतू ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब दोन्हीही विधाने सत्य आहेत आणि ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

योग्य उत्तर पर्याय (१) अ आणि ब दोन्हीही विधाने सत्य आहेत आणि ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे हे आहे. स्पष्टीकरण: * विधान अ सत्य आहे: सरकारिया आयोगाने (१९८८) आपल्या अहवालात स्पष्ट शिफारस केली होती की, अनुच्छेद ३५६ (राष्ट्रपती राजवट) चा वापर अत्यंत...

प्रश्न #40 📅 Excise SI Pre 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या जोड्या बिनचूक आहेत?
अ) कलम 248 --- कायदा करण्याचा शेषाधिकार.
ब) कलम 268 --- केंद्राने लागू केलेले मात्र राज्यांनी गोळा आणि विनियोजन केलेले शुल्क.
क) कलम 256 --- ठराविक प्रकरणांमध्ये संघाचे राज्यांवरील नियंत्रण.
ड) कलम 258 --- केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये लागू होणारे आणि वितरित केले जाणारे कर.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following pairs are correctly matched?
a) Article 248 --- Residuary powers of legislation.
b) Article 268 --- Duties levied by the Union but collected and appropriated by the States.
c) Article 256 --- Control of the Union over States in certain cases.
d) Article 258 --- Taxes levied and distributed between Union and States.
Alternative Answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) क आणि ड
  • (C) अ आणि क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स