⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

राज्य विधिमंडळ: विधानसभा व विधानपरिषद (पृष्ठ 4)

State Legislature: Legislative Assembly & Council — Indian Polity & Constitution

'राज्य विधिमंडळ: विधानसभा व विधानपरिषद' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 180 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 4 / 9
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 180)
प्रश्न #61 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत?
EN Which of the following statements is incorrect?
  • (A) राज्यातील मुख्य सचिवा समान असे पद संघ सरकारमध्ये नाही.
  • (B) मुख्य सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रमुख आहे तर केंद्रीय स्तरावरील मंत्रिमंडळ सचिव (Cabinet Secretary) हा केंद्रीय सचिवालयाचा प्रमुख आहे.
  • (C) मुख्य सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख आहे तर केंद्रीय स्तरावरील मंत्रिमंडळ सचिव हा केंद्रीय सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख नसतो.
  • (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) मुख्य सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रमुख आहे तर केंद्रीय स्तरावरील मंत्रिमंडळ सचिव (Cabinet Secretary) हा केंद्रीय सचिवालयाचा प्रमुख आहे.

अचूक उत्तर: पर्याय (२) मुख्य सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रमुख आहे तर केंद्रीय स्तरावरील मंत्रिमंडळ सचिव (Cabinet Secretary) हा केंद्रीय सचिवालयाचा प्रमुख आहे. सविस्तर विश्लेषण: • मुख्य सचिव व केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव (Cabinet Secretary) यांची तुलना...

प्रश्न #62 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
संचालनालयाच्या कार्यांबाबत योग्य पर्यायांची निवड करा.
अ) मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणे.
ब) जिल्हा पातळीवरील खात्यातील कर्मचाऱ्यांच्या कार्याची तपासणी करणे.
क) विभागातील कर्मचाऱ्यांकरिता सेवा अंतर्गत प्रशिक्षण आयोजित करणे.
ड) दुय्यम पदावरील अधिकाऱ्यांवर नियमानुसार शिस्तविषयक अधिकार अंमलात आणणे.
पर्यायी उत्तरे :
EN Select the correct option(s) regarding the functions of the Directorate:
a) Giving technical advice to the Ministers.
b) Inspecting the work of departmental staff at the district level.
c) Organizing in-service training for departmental staff.
d) Exercising disciplinary authority over subordinate officers according to rules.
Alternative answers:
  • (A) अ आणि ड केवळ
  • (B) ब आणि क केवळ
  • (C) अ, ब, क आणि ड
  • (D) अ, क आणि ड केवळ
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, क आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (३) अ, ब, क आणि ड सविस्तर विश्लेषण: • कार्यकारी संचालनालयाची (Directorate) कार्ये: - राज्य प्रशासनात मंत्रालय (सचिवालय) हे धोरणनिर्मिती करते, तर संचालनालय (Directorate) हे धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी क्षेत्रीय...

प्रश्न #63 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घा.
अ) सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणूकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही.
ब) विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जाऊ शकतो.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following statements:
a) No discussion shall take place in the Legislature of a State with respect to the conduct of any Judge of the Supreme Court or of a High Court in the discharge of his duties.
b) The validity of any proceedings in the Legislature of a State can be called in question on the ground of any alleged irregularity of procedure.
Alternative answers:
  • (A) विधान अ बरोबर
  • (B) विधान ब बरोबर
  • (C) दोन्हीही विधाने बरोबर
  • (D) दोन्हीही विधाने चुकीची
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान अ बरोबर

अचूक उत्तर: पर्याय (१) विधान अ बरोबर सविस्तर विश्लेषण: • अनुच्छेद २११ व २१२ मधील घटनात्मक तरतुदी: - विधान (अ) बरोबर आहे: भारतीय राज्यघटनेच्या कलम २११ (राज्य विधिमंडळातील चर्चेवरील निर्बंध) नुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा कोणत्याही उच्च...

प्रश्न #64 📅 PSI Mains 2018
+1.0 / -0.25
अयोग्य विधान (कथन) ओळखा.
अ) विधान परिषदेतील सदस्यांची एकूण संख्या त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांशहून अधिक असणार नाही.
ब) जम्मू आणि काश्मिरच्या विधान सभेत 108 सदस्य आहेत.
क) जम्मू आणि काश्मिरच्या विधान परिषदेत 36 सदस्य आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the incorrect statement:
a) The total number of members in the Legislative Council of a State shall not exceed one-third of the total number of members in the Legislative Assembly of that State.
b) There are 108 members in the Legislative Assembly of Jammu and Kashmir.
c) There are 36 members in the Legislative Council of Jammu and Kashmir.
Alternative answers:
  • (A) अ
  • (B) ब
  • (C) क
  • (D) यापैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) ब

अचूक उत्तर: पर्याय (२) ब सविस्तर विश्लेषण: • विधानांचे विश्लेषण: - विधान (अ) बरोबर आहे: अनुच्छेद १७१(१) नुसार विधान परिषदेतील सदस्यांची एकूण संख्या विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या १/३ पेक्षा जास्त असणार नाही. - विधान (ब) चुकीचे आहे...

प्रश्न #65 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which of the following statements is incorrect regarding the Maharashtra Legislature?
  • (A) विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्याकारणाने रद्द होत नाही.
  • (B) विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही.
  • (C) जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होवून विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते.
  • (D) यापैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी एकही नाही

अचूक उत्तर: पर्याय (४) यापैकी एकही नाही स्पष्टीकरण व विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या कलम १९६ मध्ये विधिमंडळातील विधेयके रद्द होण्याबाबत (Lapse of Bills) स्पष्ट तरतुदी दिलेल्या आहेत: * विधान १: कलम १९६(३) नुसार राज्य विधिमंडळात प्रलंबित असलेले विधेयक...

प्रश्न #66 📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद-332 मध्ये राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली आहे.
ब) सध्या महाराष्ट्रात 29 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
क) सध्या महाराष्ट्रात 25 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत?
EN Consider the following statements:
(a) Article 332 of the Constitution of India provides for the reservation of seats for Scheduled Castes and Scheduled Tribes in the Legislative Assemblies of the States.
(b) Currently in Maharashtra, 29 assembly constituencies are reserved for Scheduled Caste candidates.
(c) Currently in Maharashtra, 25 assembly constituencies are reserved for Scheduled Tribe candidates.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) अ, ब
  • (C) ब, क
  • (D) अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क

अचूक उत्तर: पर्याय (४) अ, ब, क सविस्तर विश्लेषण: • विधानांची छाननी: - विधान (अ) बरोबर आहे: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३३२ नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींसाठी (ST) त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा...

प्रश्न #67 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो?
EN Who is the head of the State Secretariat?
  • (A) प्रधान सचिव
  • (B) मुख्य सचिव
  • (C) सह सचिव
  • (D) अतिरिक्त मुख्य सचिव
अचूक उत्तर: पर्याय (B) मुख्य सचिव

अचूक उत्तर: पर्याय (२) मुख्य सचिव सविस्तर विश्लेषण: • राज्याचा मुख्य सचिव (Chief Secretary): - राज्याच्या संपूर्ण सचिवालयाचा (मंत्रालयाचा) सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख हा मुख्य सचिव (Chief Secretary) असतो. - मुख्य सचिव हे राज्य नागरी सेवेचे प्रमुख...

प्रश्न #68 📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
सचिवालय विभागाची योग्य पदसोपान परंपरा (hierarchy) अशी आहे.
EN What is the correct hierarchy of administrative positions in a Secretariat department?
  • (A) सचिव - सह-सचिव - अतिरिक्त सचिव - अवर सचिव - उप-सचिव - सहाय्यक सचिव
  • (B) सचिव - अतिरिक्त सचिव - अवर सचिव - सह-सचिव - उप-सचिव - सहाय्यक सचिव
  • (C) सचिव - सह-सचिव - उप-सचिव - अवर सचिव - कक्ष अधिकारी
  • (D) सचिव - सह-सचिव - अतिरिक्त सचिव - अवर सचिव - सहाय्यक सचिव - उप-सचिव
अचूक उत्तर: पर्याय (C) सचिव - सह-सचिव - उप-सचिव - अवर सचिव - कक्ष अधिकारी

अचूक उत्तर: पर्याय (३) सचिव - सह-सचिव - उप-सचिव - अवर सचिव - कक्ष अधिकारी सविस्तर विश्लेषण: • सचिवालय विभागाची प्रशासकीय पदसोपान रचना (Administrative Hierarchy): - सचिवालय (मंत्रालय) विभागाची योग्य उतरती पदसोपान परंपरा खालीलप्रमाणे असते: १. सचिव...

प्रश्न #69 📅 Forest Service Mains 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसभागृही विधिमंडळ नाही?
EN Which of the following states does not have a bicameral legislature?
  • (A) बिहार
  • (B) गुजरात
  • (C) कर्नाटक
  • (D) उत्तर प्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (B) गुजरात

अचूक उत्तर: पर्याय (२) गुजरात सविस्तर विश्लेषण: • भारतातील द्विसभागृही व एकसभागृही विधिमंडळे: - संविधानाच्या कलम १६८ नुसार सध्या भारतातील ६ राज्यांमध्ये द्विसभागृही विधिमंडळ (विधानसभा आणि विधानपरिषद) अस्तित्वात आहे: १. आंध्र प्रदेश २. बिहार ३...

प्रश्न #70 📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
योग्य कथन/कथने ओळखा.
अ) सिक्कीमच्या विधानसभेत 32 सदस्य आहेत.
ब) विधानसभेत कमीत कमी सदस्य संख्या 60 असते.
EN Identify the correct statement(s):
a) The Legislative Assembly of Sikkim has 32 members.
b) The minimum membership of a Legislative Assembly is 60.
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब दोन्हीही
  • (D) अ आणि ब दोन्हीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब दोन्हीही

अचूक उत्तर: पर्याय (३) अ आणि ब दोन्हीही सविस्तर विश्लेषण: • विधानसभेच्या रचनेबाबतच्या तरतुदी: - विधान (अ) बरोबर आहे: ३६ व्या घटनादुरुस्ती कायदा (१९७५) द्वारे समाविष्ट करण्यात आलेल्या कलम ३७१F(f) अन्वये सिक्कीम विधानसभेचे संख्याबळ ३२ सदस्य निश्चित...

प्रश्न #71 📅 Agriculture Service Pre 2017
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ) 1975 साली 36 वी घटनादुरूस्ती करून सिक्कीमला भारतीय पूर्ण घटकराज्याचा दर्जा देण्यात आला.
ब) भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 (फ) नुसार सिक्कीम विधानसभेची सदस्य संख्या 30 पेक्षा कमी असणार नाही असे ठरविण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements:
a) By the 36th Constitutional Amendment Act of 1975, Sikkim was given the status of a full-fledged State of India.
b) According to Article 371F of the Constitution of India, it is provided that the Sikkim Legislative Assembly shall consist of not less than 30 members.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

अचूक उत्तर: पर्याय (३) अ आणि ब सविस्तर विश्लेषण: • सिक्कीम आणि कलम ३७१F बाबतच्या तरतुदी: - विधान (अ) बरोबर आहे: ३६ व्या घटनादुरुस्ती कायदा (१९७५) अन्वये सिक्कीमला भारताचे २२ वे पूर्ण घटक राज्य म्हणून समाविष्ट करण्यात आले (यापूर्वी ३५ व्या...

प्रश्न #72 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो. इंडियन समुहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करतो?
EN Under which Article did the Governor nominate a representative of the Anglo-Indian community to the State Legislative Assembly?
  • (A) कलम-333
  • (B) कलम-350
  • (C) कलम-360
  • (D) कलम-352
अचूक उत्तर: पर्याय (A) कलम-333

अचूक उत्तर: पर्याय (१) कलम-333 सविस्तर विश्लेषण: • अनुच्छेद ३३३ - विधानसभेत अँग्लो-इंडियन जमातीचे प्रतिनिधित्व: - भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३३ नुसार, जर राज्यपालांचे असे मत झाले की राज्याच्या विधानसभेत अँग्लो-इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व...

प्रश्न #73 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
महाराष्ट्र विधानसभा नियमावली ......... ला कार्यान्वित झाली.
EN The Maharashtra Legislative Assembly Rules came into force on ________.
  • (A) 2 ऑक्टोबर 1960
  • (B) 25 ऑगस्ट 1962
  • (C) 23 ऑगस्ट 1960
  • (D) 1 मे 1960
अचूक उत्तर: पर्याय (C) 23 ऑगस्ट 1960

अचूक उत्तर: पर्याय (३) 23 ऑगस्ट 1960 सविस्तर विश्लेषण: • महाराष्ट्र विधानसभा नियमावलीची अंमलबजावणी: - भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २०८ अन्वये राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहाला आपल्या कार्यपद्धतीचे आणि कामकाजाचे नियमन करण्यासाठी नियम बनविण्याचा...

प्रश्न #74 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा:
अ) अनुच्छेद 164 (1) नुसार मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपालाकडून केली जाते.
ब) अनुच्छेद 164 (2) नुसार मंत्रिमंडळ विधानसभेस सामुहिकरित्या जबाबदार असते.
पर्यायी उत्तरे :
EN Choose the correct statement(s):
a) Under Article 164(1), the Chief Minister is appointed by the Governor.
b) Under Article 164(2), the Council of Ministers is collectively responsible to the Legislative Assembly.
Alternative answers:
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही

अचूक उत्तर: पर्याय (३) दोन्ही सविस्तर विश्लेषण: • अनुच्छेद १६४ मधील तरतुदी: - विधान (अ) बरोबर आहे: अनुच्छेद १६४(१) नुसार, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालांकडून...

प्रश्न #75 📅 Tax Assistant Pre 2017
+1.0 / -0.25
खालील वाक्य काळजीपूर्वक वाचून योग्य उत्तर निवडा.
अ) विधानपरिषदेची सभासद संख्या ही विधानसभेच्या सदस्य संख्येवर अवलंबून असते.
ब) विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे.
क) विधानपरिषदेचे सर्व सदस्य निर्वाचित असतात.
ड) महाराष्ट्र विधान परिषदेत 288 सदस्य आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN Read the following statements carefully and choose the correct option:
a) The strength of the Legislative Council depends on the strength of the Legislative Assembly.
b) The Legislative Council is a permanent house.
c) All members of the Legislative Council are elected.
d) There are 288 members in the Maharashtra Legislative Council.
Alternative answers:
  • (A) अ, ब
  • (B) ब, क
  • (C) क, ड
  • (D) ब, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब

अचूक उत्तर: पर्याय (१) अ, ब सविस्तर विश्लेषण: • विधानांचे विश्लेषण: - विधान (अ) बरोबर आहे: अनुच्छेद १७१(१) नुसार विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी; म्हणजेच परिषदेचे संख्याबळ...

प्रश्न #76 📅 Tax Assistant Pre 2017
+1.0 / -0.25
राज्य विधानसभेची जास्तीत जास्त संख्या काय ठरविण्यात आली आहे?
EN What is the maximum strength fixed for a State Legislative Assembly?
  • (A) 250
  • (B) 550
  • (C) 500
  • (D) 100
अचूक उत्तर: पर्याय (C) 500

अचूक उत्तर: पर्याय (३) 500 सविस्तर विश्लेषण: • अनुच्छेद १७०(१) - विधानसभेची कमाल मर्यादा: - भारतीय राज्यघटनेच्या कलम १७०(१) नुसार, प्रत्येक राज्याची विधानसभा ही जास्तीत जास्त ५०० (Five Hundred) आणि किमान ६० (Sixty) सदस्यांची मिळून बनेल. - सध्या...

प्रश्न #77 📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे?
अ) बिहार ब) कर्नाटक
क) तेलंगणा ड) मध्यप्रदेश
पर्यायी उत्तरे :
EN In which of the following States of India does a Legislative Council exist?
a) Bihar b) Karnataka
c) Telangana d) Madhya Pradesh
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त अ, ब, ड
  • (C) फक्त ब, क, ड
  • (D) फक्त अ, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब, क

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ, ब, क स्पष्टीकरण व विश्लेषण: भारतात सध्या केवळ ६ राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ (विधानपरिषद) अस्तित्वात आहे: १. उत्तर प्रदेश (१०० जागा) २. महाराष्ट्र (७८ जागा) ३. बिहार (७५ जागा) - विधान (अ) बरोबर ४. कर्नाटक (७५ जागा)...

प्रश्न #78 📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
विधान परिषदेची निर्मिती अथवा रद्द करण्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) विधान परिषद निर्मिती करणे अथवा रद्द करण्याबाबतचे अधिकार अनुच्छेद 169 अन्वये संसदेला आहे.
ब) जेथे विधान परिषद निर्माण करावयाची आहे अथवा असलेली रद्द करावयाची आहे त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर करणे आवश्यक असते.
क) संसदेमध्ये तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर केला जातो.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements regarding the creation or abolition of a Legislative Council:
a) Under Article 169, Parliament has the power to create or abolish a Legislative Council.
b) The Legislative Assembly of the concerned state where the Council is to be created or abolished must pass a resolution by a simple majority.
c) Such a bill is passed in Parliament by a simple majority.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) अ, ब, क
  • (C) ब, क
  • (D) अ, क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, क

अचूक उत्तर: पर्याय (४) अ, क स्पष्टीकरण व विश्लेषण: भारतीय राज्यघटनेच्या कलम १६९ अन्वये विधानपरिषदेची निर्मिती किंवा बरखास्ती करण्याबाबतची प्रक्रिया विहित आहे: * विधान (अ) बरोबर: कलम १६९(१) नुसार संसदेला कायद्याद्वारे कोणत्याही राज्यात विधानपरिषद...

प्रश्न #79 📅 STI Pre 2016
+1.0 / -0.25
भारतातील राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे?
EN What is the maximum membership of a State Legislative Assembly as fixed by the Constitution of India?
  • (A) 550
  • (B) 250
  • (C) 100
  • (D) 500
अचूक उत्तर: पर्याय (D) 500

प्रश्न #80 📅 ASO Pre 2016
+1.0 / -0.25
संसद राज्यातील विधान परिषद ....... च्या शिफारशीवरून रद्द करू शकते.
EN Parliament can abolish or create a Legislative Council in a State on the recommendation of the ________.
  • (A) राष्ट्रपती
  • (B) राज्यपाल
  • (C) राज्य मंत्रिमंडळ
  • (D) राज्य विधानसभा
अचूक उत्तर: पर्याय (D) राज्य विधानसभा

अचूक उत्तर: पर्याय (४) राज्य विधानसभा सविस्तर विश्लेषण: • अनुच्छेद १६९ - विधान परिषद निर्माण करणे किंवा रद्द करणे: - भारतीय राज्यघटनेच्या कलम १६९(१) नुसार, संसदेला कोणत्याही राज्यात विधान परिषद निर्माण करण्याचा किंवा अस्तित्वात असलेली विधान परिषद...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स