विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातत्त्वविद्येच्या क्षेत्रात नवीन विचारप्रवाह सुरू झाले. भौतिकशास्त्रात लागलेले शोध आणि पुरातत्त्वविद्येसाठी होणारा त्यांचा उपयोग यामुळे पुरातत्त्वविद्या अधिकाधिक शास्त्र शाखेकडे झुकली. अमेरिकन पुरातत्त्वज्ञ लुईस बिनफर्ड यांनी पुरातत्त्वीय संशोधनासाठी विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाची पद्धत अनुसरण्यास सुरुवात केली. इंग्लंडमध्ये डेव्हिड क्लार्क यांनी मानवशास्त्र, भूगोल, पर्यावरणशास्त्र या विद्याशाखांतील संकल्पनांचा पुरातत्त्वीय पुराव्यासाठी कसा वापर करून नवपुरातत्त्वाच्या पद्धतीने कितीतरी अधिक माहिती मिळवता येते हे सप्रमाण दाखवून दिले.
नवपुरातत्त्व म्हणजे शास्त्रशुद्ध पुरातत्त्व असे म्हणता येईल. जुन्या पठडीतील पुरातत्त्वज्ञांचे, उत्खनन करून मानवी संस्कृतीचा घटनाक्रम लिहिणे हे मुख्य उद्दिष्ट होते. परंतु नवपुरातत्त्वाच्या दृष्टीने हे चूक आहे; कारण पुरातत्त्वविद्या म्हणजे केवळ घटनाक्रम नव्हे, तर खोलात जाऊन इतिहासातील प्रत्येक घटनेचा कार्यकारणभाव शास्त्रोक्त पद्धतीने विश्वसनीय पुराव्याच्या आधारे स्पष्ट करणे हे पुरातत्त्वज्ञांचे कर्तव्य होय. याचे एक सोपे उदाहरण म्हणजे मोहेंजोदारो उत्खननाचा अहवाल. तिथे एकामागून एक सात वेळा वस्ती झाली आणि शेवटी सिंधु संस्कृतीचा अंत झाला. आर्यांनी भारतावर आक्रमण करून त्यांच्या मुख्य देवाने-इंद्राने-तिचा विध्वंस केला असा समज होता. हा ऋग्वेदातील म्हणजे वाङ्गमयातील पुरावा, केवळ त्यावर कसा विश्वास ठेवायचा; आर्यांचे आक्रमण झाल्याचा भौतिक पुरावाच नाही. उलट पर्यावरणीय बदलामुळे सिंधु संस्कृती लयाला गेली असे दिसून येते. त्याचा शास्त्रीय पुरावा उपलब्ध झाला आहे. नवपुरातत्त्वाचा मुख्य भर कार्यकारणभावावर आहे.
नवपुरातत्त्वाला आता विरोध होऊ लागला आहे. केंब्रिज विद्यापीठातील प्रा. इयान हॉडर हे त्याचे मुख्य विरोधक आहेत. त्यांच्या मते, सांस्कृतिक बदलांच्या स्पष्टीकरणासाठी केवळ शास्त्रीय पुराव्यांवर विसंबून राहणे योग्य नव्हे, तर उत्खनित वस्तूंचा योग्य अन्वयार्थ लावण्यासाठी त्या वस्तूंचा संदर्भ महत्त्वाचा आहे. म्हणून या विचारसरणीस संदर्भप्रणीत पुरातत्त्व (Contextual Archaeology) असे नाव पडले आहे.
अलीकडे काही पुरातत्त्वज्ञ याच्याही पुढे गेले आहेत. मानवाच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास तर होतोच आहे. परंतु आता प्राचीन मानवाच्या मनोव्यापाराच्या अभ्यासास सुरुवात झाली आहे. धर्माचा, तत्त्वज्ञानाचा उगम कसा झाला, चित्रे काढताना प्राचीन कलाकाराच्या डोक्यात काय विचार घोळत असावेत, याचा अभ्यास आता सुरू आहे. एकविसाव्या शतकातील पुरातत्त्व खूप वेगळे असण्याची शक्यता आहे.
जोड्या लावा :
स्तंभ 'अ' (विचारसरणी/पुरातत्त्वज्ञ)स्तंभ 'ब' (प्रमुख योगदान/विचार)
(a) जुनी विचारसरणी(i) प्राचीन मानवाचा मनोव्यापार
(b) डेव्हिड क्लार्क(ii) संस्कृतीचा घटनाक्रम लिहिणे
(c) इयान हॉडर(iii) संदर्भप्रणीत पुरातत्त्व
(d) आधुनिक विचारसरणी(iv) नवपुरातत्त्व
Later half of the twentieth century witnessed emergence of new trends in Archaeology. New discoveries in physical sciences and their application in archaeology resulted in an inclination towards sciences. American archaeologist Lewis Binford pioneered the use of the methodology of Scientific Philosophy in archaeological research. While in England, David Clarke proved that the New Archaeological method of using concepts from disciplines such as anthropology, geography and environmental sciences in furnishing archaeological evidences can extract much more information.
New Archaeology can be termed as scientific archaeology. The main aim of the old school archaeologists was to establish the chronology of human culture with the help of excavations. New Archaeology considers this a mistake; as archaeology is not just about chronology. It considers that it is the duty of the archaeologists to delve deep so as to establish with reliable evidence, the cause and effect relationship behind every historical event. A simple example of this can be the report of the Mohenjodaro excavation. There were seven successive layers of habitation before the Indus civilisation finally perished. It was believed that the Aryans invaded India and destroyed the Indus civilisation under the leadership of Indra, their chief deity. This was a Rigvedic evidence of literary nature and how could it be completely relied upon ? There is no physical evidence of the Aryan Invasion. It can be seen that the Indus civilisation died away because of climatic changes. Scientific evidences conclusively proving this have been found. New Archaeology focuses on the relationship between cause and effects.
New Archaeology has recently invited some criticism. Professor Ian Hodder from the Cambridge University is a major critic. According to him, it is not enough to depend only on scientific evidences for an explanation of cultural changes, but the context of excavated remains is very important for their proper interpretation. This ideology, has therefore been called as Contextual Archaeology.
Now some Archaeologists have moved ahead of this ideology. Socio-economic conditions of man have always been studied, and now a study of the mentalities of ancient humans is gaining momentum. How did religion and philosophy emerge, what were the thoughts in the minds of the ancient painters - such and other things are being studied. Archaeology in the twenty-first century is indeed going to be very different.
Match the pairs :
Column 'A' (Ideology/Archaeologist)Column 'B' (Key Contribution/Concept)
(a) Old school archaeology(i) Mentalities of ancient humans
(b) David Clarke(ii) Establishing chronology of human culture
(c) Ian Hodder(iii) Contextual archaeology
(d) Modern ideology(iv) New archaeology
- (A) (a) - (ii), (b) - (iv), (c) - (iii), (d) - (i)
- (B) (a) - (iv), (b) - (i), (c) - (iii), (d) - (ii)
- (C) (a) - (ii), (b) - (iii), (c) - (i), (d) - (iv)
- (D) (a) - (ii), (b) - (i), (c) - (iii), (d) - (iv)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) - (ii), (b) - (iv), (c) - (iii), (d) - (i)
उताऱ्यातील पुराव्यांच्या आधारे अचूक जोड्यांचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे: 1. (a) जुनी विचारसरणी: उताऱ्यात नमूद केले आहे की, जुन्या पठडीतील पुरातत्त्वज्ञांचे मुख्य उद्दिष्ट उत्खनन करून मानवी संस्कृतीचा घटनाक्रम (Chronology) लिहिणे हे होते...