📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

सहकार चळवळ, सहकारी संस्था व ग्रामीण अर्थव्यवस्था (पृष्ठ 3)

Cooperative Movement & Rural Development — Indian Economy & Planning

'सहकार चळवळ, सहकारी संस्था व ग्रामीण अर्थव्यवस्था' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 80 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 3 / 4
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 60 (एकूण 80)
प्रश्न #41 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
भारतातील सहकारी चळवळीच्या दृष्टीने खालील विधाने विचारात घ्या.
(a) लहान शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करण्याच्या उद्दिष्टासह भारतातील सहकारी चळवळीची सुरूवात झाली.
(b) 1905 मध्ये प्रथमतः सहकारी संस्था कायदा संमत झाला.
(c) सहकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट ‘एक गाव एक संस्था' हे आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत?
EN Consider the following statements in terms of co-operative movement in India. (a) Co-operative movement in India started with the objective of providing short-term credit to small farmers. (b) The Co-operative Societies Act was first passed in 1905. (c) The main objective of the Co-operative movement is 'One Village One Institution'. Which of the above statement(s) is/are true?
  • (A) (a) आणि (c)
  • (B) (b) आणि (c)
  • (C) (a) आणि (b)
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) आणि (c)

योग्य उत्तर पर्याय १ ((a) आणि (c)) आहे. विधानांचे सविस्तर विश्लेषण: • विधान (a) सत्य: भारतातील सहकारी चळवळीची औपचारिक सुरुवात ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांना सावकारी पाशातून सोडवून अल्पकालीन शेती पतपुरवठा करण्याच्या प्राथमिक उद्देशाने झाली. • विधान...

प्रश्न #42 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
ग्रामीण सहकारी पतपुरवठ्यासाठी दीर्घकालीन कर्जासाठी राज्यात कार्यरत असणारी सहकारी बँक कोणती?
EN Which is the cooperative bank operating in the state for long term loans for rural cooperative credit?
  • (A) सहकारी कृषी पतसंस्था . (CAC's).
  • (B) जिल्हा सहकारी बँक . (DCC's)
  • (C) राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक (SCARDB's)
  • (D) राज्य सहकारी बँक .(SCB's).
अचूक उत्तर: पर्याय (C) राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक (SCARDB's)

योग्य उत्तर पर्याय ३ (राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक - SCARDBs) आहे. ग्रामीण सहकारी पतपुरवठा रचना: भारतातील ग्रामीण सहकारी पतपुरवठ्याची दुहेरी रचना असते: १. अल्प व मध्यम मुदत पतपुरवठा (त्रिस्तरीय रचना): • राज्य स्तर: राज्य सहकारी बँक (SCB...

प्रश्न #43 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
1904 च्या सहकार कायद्याऐवजी 1912 साली नवीन सहकार कायदा लागू करण्यामागे खालीलपैकी कोणती बाब कारणीभूत होती?
(a) ह्या कायद्यानुसार फक्त प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करण्यास मूभा होती.
(b) पतसंस्थेव्यतीरिक्त इतर संस्थाची स्थापना 1904 च्या कायद्याच्या कक्षेबाहेर होती.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following factors led to the introduction of the new Co-operative Act in 1912 instead of the Co-operative Act of 1904? (a) Only primary co-operative societies were allowed to be formed under this Act. (b) Formation of institutions other than credit societies was outside the ambit of the Act of 1904. Alternative Answers :
  • (A) (a) फक्त
  • (B) (b) फक्त
  • (C) दोन्ही
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही

योग्य उत्तर पर्याय ३ (दोन्ही (a) आणि (b)) आहे. १९०४ चा कायदा आणि १९१२ च्या सहकार कायद्याची आवश्यकता: • १९०४ चा सहकारी पतसंस्था कायदा (Act X of 1904): - हा कायदा केवळ प्राथमिक स्तरावरील पतसंस्थांच्या (Credit Societies) स्थापनेपुरताच मर्यादित होता...

प्रश्न #44 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
सहकारी कृषी पणनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
(a) भारताचा राष्ट्रीय शेती सहकार विपणन संघ ही राष्ट्रीय पातळीवरील शिखर सहकारी संस्था आहे.
(b) नाफेड हे शेती उत्पादनाच्या आंतर-राज्य आणि निर्यात व्यापारास प्रोत्साहन देते.
(c) 1974 मध्ये राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची स्थापना झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
EN Consider the following statements regarding cooperative agricultural marketing.(a) National Agricultural Cooperative Marketing Association of India is the apex cooperative organization at the national level.(b) NAFED promotes inter-state and export trade of agricultural produce.(c) National Cooperative Development Corporation was established in 1974. Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (b) आणि (c)
  • (C) (a) आणि (c)
  • (D) फक्त (b)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) आणि (b)

प्रश्न #45 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
राज्य सहकारी बँक पुढीलपैकी कोणत्या मार्गाने भांडवल उभारणी करत नाही?
EN State Co-operative Bank does not raise capital by which of the following means?
  • (A) सभासदांना भाग विक्री करून.
  • (B) रिझर्व बँक व राज्य सरकारकडून कर्ज घेऊन.
  • (C) बाजारात रोखे विक्री करून.
  • (D) सभासद व बिगर सभासदांकडून ठेवी स्वीकारून.
अचूक उत्तर: पर्याय (C) बाजारात रोखे विक्री करून.

योग्य उत्तर पर्याय ३ (बाजारात रोखे विक्री करून) आहे. राज्य सहकारी बँकेचे (SCB) भांडवल उभारणीचे मार्ग: • भागभांडवल विक्री: सभासद जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी संस्था व राज्य सरकार यांना समभागांची (Shares) विक्री करून. • ठेवी स्वीकारणे: सभासद व...

प्रश्न #46 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाहीत?
(a) सहकार ही सामाईक उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली अनैच्छीक संघटना आहे.
(b) सहकार म्हणजे वितरण, उत्पादन यांमध्ये स्पर्धेचा अभाव आणि मध्यस्थांच अस्तित्व नाकारणे.
(c) सहकार लोकशाहीचा पाया मजबूत करते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are NOT correct?
(a) Cooperation is an involuntary organisation formed to achieve common objectives.
(b) Cooperation means absence of competition in distribution and production and elimination of middlemen.
(c) Cooperation strengthens the foundation of democracy.
Alternative Answers:
  • (A) (a) फक्त
  • (B) (b) फक्त
  • (C) वरीलपैकी सर्व
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) फक्त

योग्य उत्तर पर्याय १ ((a) फक्त) आहे. विधानांचे सविस्तर परीक्षण: • विधान (a) चुकीचे आहे: सहकार ही ऐच्छिक (Voluntary) संघटना असते, 'अनैच्छिक' (Involuntary) नव्हे. कोणत्याही व्यक्तीवर सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी सक्ती केली जात नाही; व्यक्ती आपल्या...

प्रश्न #47 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या बाबींचा सहकाराची आधुनिक तत्त्वे म्हणून विचार केला जातो?
(a) ऐच्छिक आणि खुले सभासदत्व.
(b) अधिक नफेखोरी.
(c) लोकशाहीवर आधारित व्यवस्थापन.
(d) आंतरराष्ट्रीय सहकार्य
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following are considered as modern principles of co-operation? (a) Voluntary and open membership. (b) Greater profiteering. (c) Management based on democracy. (d) International cooperation Alternative Answers :
  • (A) (a) आणि (c)
  • (B) (a) आणि (b)
  • (C) (b) आणि (c)
  • (D) (b) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) आणि (c)

योग्य उत्तर पर्याय १ ((a) आणि (c)) आहे. सहकाराची आधुनिक तत्त्वे (ICA तत्त्वे): • (a) ऐच्छिक आणि खुले सभासदत्व (Voluntary & Open Membership): सहकाराचे मूलभूत तत्त्व. • (b) अधिक नफेखोरी (Greater Profiteering): सहकारात नफेखोरीला कोणताही वाव नसतो...

प्रश्न #48 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
(a) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने सहकारांतर्गत सहकार हेच नवीन तत्त्व स्वीकारले.
(b) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने भांडवलावर मर्यादीत व्याज हे नवीन तत्त्व स्वीकारले आहे.
(c) 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाने समाजाबद्दलचे कर्तव्य हे नवीन सहकाराचे तत्त्व म्हणून स्वीकारले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
EN Consider the following statements. (a) In 1966 the Council of International Co-operatives adopted the new principle of co-operation within co-operatives.(b) In 1966 the Council of International Co-operatives adopted the new principle of limited interest on capital.(c) In 1995 the International Co-operatives adopted the new principle of duty to society.Which of the above statement/s is/are correct?
  • (A) (a) व (c)
  • (B) (a) व (b)
  • (C) (b) व (c)
  • (D) सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) व (c)

योग्य उत्तर पर्याय १ ((a) व (c)) आहे. विधानांचे सविस्तर परीक्षण: • विधान (a) बरोबर: १९६६ मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाने (ICA) प्रा. डी. जी. कर्वे (D. G. Karve) यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाने 'सहकारांतर्गत सहकार' (Cooperation among...

प्रश्न #49 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
सहकारी तत्त्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत?
EN Which of the following states is leading in cooperative marketing?
  • (A) मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि आसाम
  • (B) महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू
  • (C) जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि आसाम
  • (D) झारखंड, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (B) महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू

योग्य उत्तर पर्याय २ (महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू) आहे. सहकारी विपणनातील अग्रेसर राज्ये: • भारतातील सहकारी विपणन (Cooperative Agricultural Marketing) व्यवस्थेचा सर्वाधिक विकास महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या...

प्रश्न #50 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(a) 1904 चा सहकार कायदा स्व-मदत आणि सहकार्याची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने संमत करण्यात आला होता.
(b) 1904 चा मध्यवर्ती कायदा अजूनही भारतीय सहकार विषयक कायद्याचा आधार मानला जातो.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct?
(a) The Cooperative Credit Societies Act of 1904 was passed with the objective of fostering self-help and mutual cooperation.
(b) The Central Act of 1904 is still considered the foundational basis of cooperative legislation in India.
Alternative Answers:
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (b)
  • (C) दोन्ही
  • (D) कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही

योग्य उत्तर पर्याय ३ (दोन्ही) आहे. १९०४ चा सहकार कायदा (Cooperative Credit Societies Act, 1904): • विधान (a) बरोबर: हा कायदा शेतकऱ्यांमध्ये आणि कारागिरांमध्ये स्वावलंबन (Self-help), काटकसर (Thrift) आणि परस्पर सहकार्याची (Mutual aid) भावना वाढीस...

प्रश्न #51 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
पुढील विधानांचा विचार करा. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या विकासाबाबत :
विधान (I) : महाराष्ट्र राज्यातील एकूण रोजगारात सहकारी क्षेत्राचा वाटा 12.5% आहे.
विधान (II) : महाराष्ट्रात 229 सहकारी शेती संस्था असून त्याने 11000 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणले आहे.
आता सांगा:
EN Consider the following statements. Regarding Development of Co-operative Sector in Maharashtra: Statement (I) : Co-operative sector contributes 12.5% to the total employment in Maharashtra State. Statement (II) : There are 229 cooperative farming societies in Maharashtra which have brought 11000 hectares of area under cultivation. Now say:
  • (A) विधान (I) बरोबर, (II) चूक
  • (B) विधान (II) बरोबर, (I) चूक
  • (C) दोन्ही विधाने बरोबर
  • (D) दोन्ही विधाने चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही विधाने बरोबर

योग्य उत्तर पर्याय ३ (दोन्ही विधाने बरोबर) आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची आकडेवारी: • विधान (I) बरोबर: महाराष्ट्रातील एकूण संघटित व असंघटित रोजगारात, साखर कारखाने, सूतगिरण्या, बँकिंग, दुग्धव्यवसाय, ग्राहक भांडारे आणि पणन संस्थांच्या माध्यमातून...

प्रश्न #52 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
प्राथमिक सहकारी पत संस्थांना खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते :
(a) त्या त्या खेड्यातील रहिवासी असणारे किमान दहा किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य आवश्यक असतात.
(b) या पतसंस्थांचे खेळते भांडवल हे सदस्यांकडून आकारलेले शुल्क किंवा ठेवींच्या स्वरुपात असावे.
(c) या पतसंस्था शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज देतात.
(d) या पतसंस्था फक्त लहान शेतकऱ्यांना कर्ज देतात.
पर्यायी उत्तरे :
EN Primary Co-operative Credit Institutions are required to fulfill the following conditions : (a) At least ten or more members are required who are residents of that village. (b) The working capital of these credit institutions should be in the form of fees or deposits from the members. (c) These credit institutions provide loans to farmers at subsidized rates.
  • (A) (a) व (b)
  • (B) (b), (c) व (d)
  • (C) (a), (b) व (c)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) व (c)

योग्य उत्तर पर्याय ३ ((a), (b) व (c)) आहे. प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या (PACS) अटी व वैशिष्ट्ये: • (a) बरोबर: एकाच गावातील किंवा लगतच्या खेड्यातील रहिवासी असणारे किमान १० किंवा त्यापेक्षा जास्त सज्ञान व्यक्ती एकत्र येऊन प्राथमिक पतसंस्था स्थापन करू...

प्रश्न #53 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंजाबमध्ये झेंग येथे स्थापन झाली.
(b) फ्रेडरिक निकोल्सन यांनी 1895-1900 मध्ये प्रस्ताव दिला की भारतात जर्मनीमध्ये ज्याप्रमाणे सहकारी संस्था स्थापल्या गेल्या आहेत त्याप्रमाणे स्थापण्यात याव्यात.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following two statements is correct?
(a) India's first District Central Cooperative Bank was established at Jhang in Punjab.
(b) Sir Frederick Nicholson proposed during 1895-1897 that cooperative societies should be set up in India on the lines of those in Germany.
Alternative Answers:
  • (A) केवळ (a)
  • (B) केवळ (b)
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ (b)

योग्य उत्तर पर्याय २ (केवळ (b)) आहे. विधानांचे सविस्तर परीक्षण: • विधान (a) चुकीचे आहे: झांग (Jhang - पंजाब) येथे भारतातील पहिली 'जमीन तारण बँक' (Land Mortgage Bank) १९२० मध्ये स्थापन झाली होती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नव्हे. • विधान (b) बरोबर...

प्रश्न #54 📅 ASO Pre 2014
+1.0 / -0.25
(a) स्वसहाय्यता गट हा ग्रामीण गरीब लोकांचा असायला हवा.
(b) गटात 25 ते 30 सदस्य असतात.
(c) केवळ सामाजिक दृष्ट्या मागास कुटुंबातील सदस्य असतात.
पर्यायी उत्तरे :
EN (a) SHGs should be of rural poor people. (b) Groups have 25 to 30 members. (c) Only socially backward family members. Alternative Answers :
  • (A) (a) बरोबर आणि (b) आणि (c) चूक
  • (B) (a),(b), (c) हे सर्व बरोबर.
  • (C) (a), (b), (c) सर्व चूक
  • (D) (a) आणि (c) बरोबर आणि (b) चूक
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) बरोबर आणि (b) आणि (c) चूक

अचूक उत्तर: पर्याय (1) - (a) बरोबर आणि (b) आणि (c) चूक MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #55 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
सहकारी साखर कारखान्यातील शेतकरी, राज्यसरकार आणि वित्तीय संस्था यांचे भांडवल गुंतवणूकीच्या टक्केवारीचे गुणोत्तर खालील प्रमाणे आहे. योग्य पर्याय शोधा:
EN The percentage ratio of capital investment by farmers, state government and financial institutions in cooperative sugar mills is as follows. Find the correct option:
  • (A) 10 : 25 : 65
  • (B) 15 : 30 : 55
  • (C) 30 : 30 : 40
  • (D) 20 : 20 : 60
अचूक उत्तर: पर्याय (A) 10 : 25 : 65

योग्य उत्तर पर्याय १ (10 : 25 : 65) आहे. सहकारी साखर कारखान्यांचे भांडवली गुणोत्तर: महाराष्ट्रात आणि भारतात सहकारी साखर कारखाने स्थापन करण्यासाठी पारंपारिकपणे निश्चित करण्यात आलेला भांडवली आकृतिबंध खालीलप्रमाणे आहे: १. शेतकरी सभासद भागभांडवल: १०%...

प्रश्न #56 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
(a) महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीची सुरुवात प्राथमिक शेती पतसंस्थेच्या स्थापनेने 1910 मध्ये झाली.
(b) अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा येथे पहिला सहकारी साखर कारखाना 1959 मध्ये स्थापन झाला.
(c) महानंदा डेअरीची स्थापना 1980 मध्ये मुंबईत दूध विक्रीसाठी झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधाने/ने सत्य आहे/आहेत'
EN Consider the following statements : (a) The co-operative movement in Maharashtra started with the establishment of a primary agricultural credit institution in 1910. (b) The first co-operative sugar factory was established in 1959 at Prawara in Ahmednagar district. (c) Mahananda Dairy was established in 1980 to sell milk in Mumbai. Which of the above statements is/are true?
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (b) आणि (c)
  • (C) (a) आणि (c)
  • (D) फक्त (a)
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त (a)

योग्य उत्तर पर्याय ४ (फक्त (a)) आहे. विधानांचे सविस्तर परीक्षण: • विधान (a) सत्य: महाराष्ट्रात सहकारी चळवळीची संस्थात्मक सुरुवात १९१० च्या सुमारास प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या स्थापनेने झाली. • विधान (b) असत्य: प्रवरा (प्रवरानगर - अहमदनगर) येथील...

प्रश्न #57 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
(a) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने ‘सहकारांतर्गत सहकार' या नवीन तत्त्वाचा स्वीकार केला.
(b) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने 'भांडवलावर मर्यादित व्याज' या नवीन तत्वाचा स्वीकार केला.
(c) 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने 'समाजाबद्दलचे कर्तव्य' हे नवीन तत्त्व स्वीकारले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
EN Consider the following statements. (a) In 1966, the Council of International Co-operatives adopted the new principle of 'Co-operation within Co-operatives'. (b) In 1966, the Council of International Co-operatives adopted the new principle of 'Limited Interest on Capital'. (c) In 1995, the International Co-operatives adopted the new principle of 'Duty to Society'. Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) (a) आणि (c)
  • (B) (b) आणि (c)
  • (C) (a) आणि (b)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर पर्याय ४ (वरील सर्व) आहे. सहकार तत्त्वांची आंतरराष्ट्रीय वाटचाल: • विधान (a) बरोबर: १९६६ च्या व्हिएन्ना काँग्रेसमध्ये प्रा. डी. जी. कर्वे यांच्या शिफारशीनुसार 'सहकारांतर्गत सहकार' (Cooperation among Cooperatives) हे तत्त्व अधिकृतपणे...

प्रश्न #58 📅 Rajyaseva Pre 2013
+1.0 / -0.25
भारतातील भूअधिकार सुधारणा धोरणाचे खालीलपैकी कोणते ध्येय नव्हते?
EN Which of the following was not the goal of land rights reform policy in India?
  • (A) कूळवहिवाट सुधारणा
  • (B) मध्यस्थांचे निर्मूलन
  • (C) शेतीविषयक वित्त
  • (D) सहकारी शेती
अचूक उत्तर: पर्याय (C) शेतीविषयक वित्त

प्रश्न #59 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणते महाराष्ट्र सहकारी संस्था (दुरुस्ती) अध्यादेश 2013 चे/ची वैशिष्ट्य/विशेष्ट्ये आहे/आहेत?
(a) संस्थेच्या व्यवस्थापकीय समिती वर अनुसुचीत जाती/जमाती व स्त्रियांना योग्य प्रतिनिधीत्व देणे.
(b) कर्तव्यास चुकलेल्या सदस्यांना नोटिस देण्याबाबत अधिकार सहकारी गृह संस्थाना देण्यात आले.
(c) राज्य सरकार सहकारी संस्थेवर प्रशासक नियुक्त करू शकते.
(d) राज्य सरकार ‘राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरण' स्थापीत करेल.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following is/are the feature/s of the Maharashtra Co-operative Societies (Amendment) Ordinance 2013? (a) Proper representation of Scheduled Castes/Tribes and women on the managing committee of the organization. (b) Powers given to co-operative housing societies to issue notices to delinquent members. (c) State government can appoint administrators over the co-operative society. (d) State government will set up 'State Co-operative Election Authority'. Alternative Answers:
  • (A) (a), (b), (d)
  • (B) (a), (b)
  • (C) (a) फक्त
  • (D) (a), (b) आणि (c)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a), (b), (d)

योग्य उत्तर पर्याय १ ((a), (b), (d)) आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (दुरुस्ती) अध्यादेश/कायदा २०१३: ९७ व्या घटनादुरुस्ती (२०११) च्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० मध्ये २०१३ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या: • (a) बरोबर...

प्रश्न #60 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील सहकारी संस्था खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत?
EN Co-operative societies in Maharashtra are famous for selling which of the following items?
  • (A) कापूस
  • (B) तंबाखू
  • (C) फळे व भाज्या
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर पर्याय ४ (वरील सर्व) आहे. महाराष्ट्रातील सहकारी पणन व्यवस्था: महाराष्ट्रात विविध कृषी उत्पादनांच्या सहकारी विक्रीसाठी अग्रगण्य संस्था कार्यरत आहेत: १. कापूस: 'महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ' (Cotton Federation) याद्वारे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स