✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 11)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 11 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 201 ते 220 (एकूण 8,690)
प्रश्न #201 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कोणता वर्ण महाप्राण आहे?
  • (A) ग्
  • (B) ड्
  • (C) ह्
  • (D) ब्
अचूक उत्तर: पर्याय (C) ह्

स्पष्टीकरण- ज्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेत फेकली जाते त्या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. ‘ह्’ हा महाप्राण आहे. ‘ख्, घ्, छ्, झ्, ठ्, ढ्, थ्, ध्, फ्, भ्, श्, ष्, स्’ या वर्णांत ‘ह्’ या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुद्धा...

प्रश्न #202 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
स्वरमालेतील 'अं आणि अ:' या दोन वर्णांना काय म्हणतात?
  • (A) संयुक्त स्वर
  • (B) स्वरादी
  • (C) दीर्घ स्वर
  • (D) परवर्ण स्वर
अचूक उत्तर: पर्याय (B) स्वरादी

स्वर : जिभेचा मुखातील भागाशी किंवा ओठांचा एकमेकांशी स्पर्श न होता जे ध्वनी हे तोंडावाटे बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. वर्णमालेत एकूण १४ स्वर व २ स्वरादी आहेत. स्वरादी - अनुस्वार व विसर्ग या दोन वर्णाचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा...

प्रश्न #203 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सापाचा खेळ करणाऱ्यास काय म्हणतात.
  • (A) दरवेशी
  • (B) मदारी
  • (C) गारुडी
  • (D) भाट
अचूक उत्तर: पर्याय (C) गारुडी

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. Additional Information अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण- अस्वलाचा खेळ करणाऱ्यास दरवेशी म्हणतात. माकडांचा खेळ करणाऱ्यास मदारी म्हणतात. राजाची स्तुती करणाऱ्यास भाट म्हणतात. 📌...

प्रश्न #204 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे.
  • (A) नाम
  • (B) विशेषण
  • (C) उभयान्वयी
  • (D) केवलप्रयोगी
अचूक उत्तर: पर्याय (A) नाम

नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम भाववाचक नाम : गुणधर्म व भाव दर्शिवणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम असे...

प्रश्न #205 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'कमलनयन' या शब्दातील योग्य समास ओळखा.
  • (A) अव्ययीभाव
  • (B) द्वंद्वसमास
  • (C) कर्मधारय
  • (D) तत्पुरुष
अचूक उत्तर: पर्याय (C) कर्मधारय

Additional Information समास: एखाद्या गोष्टीबद्दल बोलताना सविस्तर रित्या न सांगता आपण थोडक्यात किंवा अल्प शब्दात ती गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपण किमान दोन पदे एकत्र आणून असे शब्द तयार करतो. या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. समासाचे 4...

प्रश्न #206 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'शरत्काल' शब्दाचे खरे संधी ओळखा?
  • (A) शरद + काळ
  • (B) शारद + काळ
  • (C) शराद + कल
  • (D) शरद् + काल
अचूक उत्तर: पर्याय (D) शरद् + काल

शब्द - शरत्काल पोटशब्द - शरद + काल एकत्र येणारी व्यंजने व संधी- द् + क्= त् + क्= त्क् Key Points संधी- जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो...

प्रश्न #207 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
कटाक्ष असणे-
  • (A) ध्येय निश्चित करणे
  • (B) लक्ष्य ठरवणे
  • (C) दुर्लक्ष करणे
  • (D) विशेष लक्ष असणे
अचूक उत्तर: पर्याय (D) विशेष लक्ष असणे

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. कटाक्ष असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ विशेष लक्ष असणे हा होईल. वाक्यात उपयोग - काम वेळेत पूर्ण करण्याकडे अविनाशचा नेहमी कटाक्ष असतो. Additional...

प्रश्न #208 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘धृतराष्ट्र' या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत?
  • (A) आठ
  • (B) नउ
  • (C) सहा
  • (D) सात
अचूक उत्तर: पर्याय (C) सहा

व्यंजन : ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या मागून साहाय्य घेऊन होतो त्यांना व्यंजने असे म्हणतात. व्यंजनाचे सहा प्रकार पडतात. स्पर्श व्यंजने अर्ध स्वर - य,र,ल,व उष्मे - श,ष,स द्रविडीयन - ळ महाप्राण - ह संयुक्त - क्ष,ज्ञ स्पर्श व्यंजने : क् ख् पासून भ् न्...

प्रश्न #209 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल – या वाक्याचा प्रकार ओळखा.
  • (A) केवलवाक्य
  • (B) संयुक्त वाक्य
  • (C) मिश्र वाक्य
  • (D) गौण वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (B) संयुक्त वाक्य

Important Points वाक्यांचे प्रकार: वाक्यांच्या अर्थाप्रमाणे त्यांचे तीन प्रकार पडले आहेत. केवलवाक्य : ज्या विधानात किंवा वाक्यात एकाच विधेय (कर्ता बद्दल अधिक माहिती सांगणारा भाग) आणि एकाच उद्देश (कर्ता) असतो त्या वाक्यांना केवलवाक्ये म्हणतात...

प्रश्न #210 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी प्रयोगाची अयोग्य जोडी ओळखा.
  • (A) माझ्याकडून चहा घेतला गेला - नवीन कर्मणी प्रयोग
  • (B) येथ अवधान एकले देईजे I - प्राचीन कर्मणी प्रयोग
  • (C) आजी दृष्ट काढते - सकर्मक कर्तरी प्रयोग
  • (D) विशालचा आंबा खाऊन झाला - शक्य कर्मणी प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (D) विशालचा आंबा खाऊन झाला - शक्य कर्मणी प्रयोग

विशालचा आंबा खाऊन झाला हे समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. विशालचा आंबा खाऊन झाला या वाक्यात खाऊन झाला या क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्ती दर्शवित आहे, विशाल या कर्त्याला चा हा षष्ठीचा प्रत्यय लागला आहे, आंबा या कर्माला प्रत्यय नाही आहे तसेच वाक्यात...

प्रश्न #211 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'सलगी' चा विरुद्धार्थी शब्द कोणता?
  • (A) असमाधान
  • (B) जवळीक
  • (C) दुरावा
  • (D) सजनी
अचूक उत्तर: पर्याय (C) दुरावा

विरुद्धार्थी शब्द : एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय. सलगी म्हणजे जवळीक असा याचा अर्थ होतो . सलगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुरावा हा योग्य पर्याय आहे . 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार...

प्रश्न #212 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
असला माणूस कामाचा असतो का? नकारार्थी करा.
  • (A) असला माणूस कामाचा नसतो.
  • (B) असला माणूस काम करेल.
  • (C) असला माणूस काम करणारा असतो.
  • (D) असला माणूस कामाचा नसतो असे नाही.
अचूक उत्तर: पर्याय (A) असला माणूस कामाचा नसतो.

असला माणूस कामाचा असतो का? हा होकारार्थी प्रश्न आहे आणि जर प्रश्न होकारदर्शक असेल तर त्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना नकारार्थी होते म्हणून असला माणूस कामाचा नसतो हे योग्य उत्तर होईल. Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका...

प्रश्न #213 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
  • (A) प्रेक्षणीय
  • (B) पौराणिक
  • (C) केसाळ
  • (D) माधुर्य
अचूक उत्तर: पर्याय (D) माधुर्य

नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम भाववाचक नाम : गुणधर्म व भाव दर्शिवणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम असे म्हणतात . उदा...

प्रश्न #214 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
मोजकाच आहार घेणारा
  • (A) खादाड
  • (B) कूपमंडूक
  • (C) मितभोजक
  • (D) अधाशी
अचूक उत्तर: पर्याय (C) मितभोजक

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्याचा एकच शब्द तयार होणे होय. Additional Information खादाड म्हणजे खूप खाणारा होय. कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा होय. अधाशी म्हणजे हावरा किंवा लोभी होय. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील...

प्रश्न #215 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा.
चित्रकाराने चित्र _________
  • (A) रंगवला
  • (B) रंगवली
  • (C) रंगवते
  • (D) रंगवले
अचूक उत्तर: पर्याय (D) रंगवले

कर्म : जो शब्द वाक्यात झालेली क्रिया दर्शवित असतो त्याला कर्म असे म्हणतात. क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वरील चित्रकाराने चित्र रंगवले यात रंगवले हे कर्मानुसार क्रियापदाचे योग्य रूप आहे. 📌 MPSC...

प्रश्न #216 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'नाशिवंत' या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा.
  • (A) क्षणिक
  • (B) जातिवंत
  • (C) दीर्घायुषी
  • (D) अविनाशी
अचूक उत्तर: पर्याय (D) अविनाशी

Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . क्षणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द चिरकाळ हा होईल. दीर्घायुषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अल्पायुषी हा होईल...

प्रश्न #217 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कित्येक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
  • (A) किती + एक
  • (B) कि + त्येक
  • (C) किती + ऐक
  • (D) कि + एक
अचूक उत्तर: पर्याय (A) किती + एक

प्रश्न #218 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
राम वनात गेला होता. प्रस्तुत वाक्यातील काळ ओळखा.
  • (A) रीति भूतकाळ
  • (B) रीति वर्तमानकाळ
  • (C) पूर्ण भूतकाळ
  • (D) अपूर्ण भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) पूर्ण भूतकाळ

काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होतो त्याला काळ असे म्हणतात. मुख्य काळ तीन आहेत- वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ काळाचे ३ उपप्रकार होतात. अपूर्ण काळ पूर्ण काळ रीति काळ Important...

प्रश्न #219 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
बांगडी फुटणे-
  • (A) वैभाव नाहीसे होणे
  • (B) वैधव्य प्राप्त होणे
  • (C) काचेचे सामान फुटणे
  • (D) मरण पावणे
अचूक उत्तर: पर्याय (B) वैधव्य प्राप्त होणे

वाक्यात उपयोग - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे युद्धभूमिवर लाखो बांगड्या फुटल्या. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. वैभाव नाहीसे होणे याचा अर्थ...

प्रश्न #220 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अधोरेखित शब्दाची जात ओळखा - त्याचे बोलणे मना ला लागले आहे.
  • (A) सामान्यनाम
  • (B) भाववाचक नाम
  • (C) विशेषनाम
  • (D) धातुसाधित नाम
अचूक उत्तर: पर्याय (D) धातुसाधित नाम

नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम साधित नामे - विशेषण,अव्यय,धातुसाधिते यांचा वापर नामाप्रमाणे केल्यास त्यांना साधीत नामे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स