✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 9)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 9 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 161 ते 180 (एकूण 8,690)
प्रश्न #161 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'भोजनावसर' हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
  • (A) बहु व्रीही
  • (B) मध्यमपदलोपी
  • (C) तत्पुरुष
  • (D) अव्ययीभाव
अचूक उत्तर: पर्याय (C) तत्पुरुष

प्रश्न #162 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
ग्रंथकार, गृहस्थ, द्विज या शब्दांचा समास कोणता?
  • (A) उपपद तत्पुरुष
  • (B) षष्ठी तत्पुरुष
  • (C) चतुर्थी तत्पुरुष
  • (D) व्याधिकरण तत्पुरुष
अचूक उत्तर: पर्याय (A) उपपद तत्पुरुष

ग्रंथकार - विग्रह - ग्रंथ करणारा गृहस्थ - विग्रह - गृहात राहणारा द्विज - विग्रह - दोनदा जन्मणारा वरील सर्व सामासिक शब्दात दुसरे पद हे प्रधान आहे व ते धातुसाधित आहे तसेच ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही म्हणून येथे उपपद तत्पुरुष...

प्रश्न #163 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य - ही पदे कोणत्या समासाची आहेत?
  • (A) नञ तत्पुरुष समास
  • (B) कर्मधारय समास
  • (C) द्विगु समास
  • (D) अलुक तत्पुरुष समास
अचूक उत्तर: पर्याय (A) नञ तत्पुरुष समास

नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य या सामासिक शब्दातील पहिले पद अनुक्रमे ना, अ, अ, अ यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरु झाली आहेत म्हणून ही सर्व उदाहरणे नञ तत्पुरुष समासाची होतील. नापसंत - विग्रह - पसंत नसलेला अनादर - विग्रह - आदर नसलेला...

प्रश्न #164 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
तुमच्या परीक्षा कधी सुरु होणार? ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
  • (A) विध्यर्थी
  • (B) प्रश्नार्थी
  • (C) उद्गारार्थी
  • (D) विधानार्थी
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रश्नार्थी

वरील वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणून ही वाक्यरचना प्रश्नार्थी होईल. प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. तू कधी येणार? Important Points मराठीत वाक्याचे दोन प्रकारात...

प्रश्न #165 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"गड आला पण सिंह गेला" हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे.
  • (A) मिश्र वाक्य
  • (B) संयुक्त वाक्य
  • (C) साधे वाक्य
  • (D) केवल वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (B) संयुक्त वाक्य

प्रश्न #166 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल ?' या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यरूपांतर कोणते होईल ?
  • (A) मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाणार.
  • (B) मध्यरात्री स्मशानभूमीत जावे.
  • (C) मध्यरात्री स्मशानभूमीत जाऊ नये.
  • (D) मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही.

वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचा, मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रुपांतर करणे होय. Key Points प्रश्नार्थक व विधानार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर - वाक्यपरिवर्तनाच्या दृष्टीने विधानार्थी वाक्य नकारदर्शक...

प्रश्न #167 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
रामूने काठी घेतली. त्याने कुत्र्याला झोडपले. या वाक्याचे केवलवाक्य कोणते होईल?
  • (A) रामूने काठी घेतली व कुत्र्याला झोडपले.
  • (B) रामूने काठी घेवुन कुत्र्याला झोडपले.
  • (C) रामूने काठी घेतली आणि कुत्र्याला झोडपले.
  • (D) यापैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) रामूने काठी घेवुन कुत्र्याला झोडपले.

रामूने काठी घेवुन कुत्र्याला झोडपले. या वाक्यात झोडपले हे शेवटचे क्रियापद कायम ठेऊन, घेतली या पहिल्या क्रियापदाला ऊन हा प्रत्यय जोडून शेवटची एकच मुख्य क्रिया कायम ठेवली आहे म्हणून रामूने काठी घेवुन कुत्र्याला झोडपले हे योग्य केवलवाक्य होईल. केवल...

प्रश्न #168 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी विध्यर्थ क्रियापद असलेले वाक्य-
  • (A) या वर्षी पाऊस पडावा.
  • (B) मुले अभ्यास करतात.
  • (C) एवढे आमचे काम कराचं.
  • (D) मी हे काम करू?
अचूक उत्तर: पर्याय (A) या वर्षी पाऊस पडावा.

वरील वाक्यात पडावा हे विध्यर्थ क्रियापद आहे. Important Points क्रियापद - वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात...

प्रश्न #169 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाही'
या वाक्याचे मिश्रवाक्य रूपांतर असलेले अचूक उदाहरण:
  • (A) मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हताश होत नाही.
  • (B) मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाही.
  • (C) मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष स्वस्थ कधीच नसतात.
  • (D) मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष जसा हताश होत नाही तसा तो स्वस्थही बसत नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष जसा हताश होत नाही तसा तो स्वस्थही बसत नाही.

वरील वाक्यात जसा-तसा या जोडीचे उभयान्वयी अव्यय वापरले आहे म्हणून हे मिश्र वाक्य होईल. मिश्र वाक्य - जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात...

प्रश्न #170 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती.' हे _______ प्रकारातील वाक्य आहे.
  • (A) होकारार्थी
  • (B) संकेतार्थी
  • (C) स्वार्थी
  • (D) विद्यर्थी
अचूक उत्तर: पर्याय (B) संकेतार्थी

वरील वाक्यातील क्रियापादावरून असे केले तर तसे होईल असा अर्थबोध होत आहे म्हणून रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती हे संकेतार्थी वाक्य होईल. Important Points क्रियापदांचे चार अर्थ असतात. स्वार्थ - ज्या क्रियापदावरुन फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच...

प्रश्न #171 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? - 'एकेक विषय संपवीत प्रसादने महिन्या भरात सर्व अभ्यास पूर्ण केला.'
  • (A) मिश्र वाक्य
  • (B) केवल वाक्य
  • (C) संयुक्त वाक्य
  • (D) विध्यर्थी वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (B) केवल वाक्य

एकेक विषय संपवीत प्रसादने महिनाभरात सर्व अभ्यास पूर्ण केला. या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय आहे म्हणून हे केवल वाक्य होईल. उद्देश - प्रसादने विधेय - पूर्ण केला केवल वाक्य - ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा...

प्रश्न #172 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे.
  • (A) वाक्यरूपांतर
  • (B) वाक्यपृथक्करण
  • (C) वाक्य संकलन
  • (D) संयुक्त वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (A) वाक्यरूपांतर

Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचा, मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रुपांतर करणे होय. होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर - होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर करताना...

प्रश्न #173 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'गड आला, पण सिंह गेला ' हे ________ उपवाक्य आहे.
  • (A) परिणामबोधक
  • (B) न्यूनत्वबोधक
  • (C) पर्याय बो धक
  • (D) समुच्चयबोधक
अचूक उत्तर: पर्याय (B) न्यूनत्वबोधक

गड आला, पण सिंह गेला या वाक्यात पण हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पहिले वाक्य - गड आला. दुसरे वाक्य - सिंह गेला. ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी पण या प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे. पण हे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे...

प्रश्न #174 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
घर सोडताना माणुसकीची, निरासक्तीची आणि कष्टाळूपणाची भक्कम शिदोरी डेबुजीजवळ होती. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
  • (A) केवलप्रयोगी
  • (B) उभयान्वयी
  • (C) शब्दयोगी
  • (D) क्रियाविशेषण
अचूक उत्तर: पर्याय (B) उभयान्वयी

आणि हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय या प्रकारात मोडते. वरील वाक्यात आणि या उभयान्वयी अव्ययाने दोन पेक्षा अधिक शब्द जोडले आहेत. Important Points उभयान्वयी अव्यय - दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात...

प्रश्न #175 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पूर्वी शिक्षक चांगले शिकवत.
  • (A) कालवाचक
  • (B) स्थितिवाचक
  • (C) रीतिवाचक
  • (D) परिमाणवाचक
अचूक उत्तर: पर्याय (A) कालवाचक

वरील वाक्यात पूर्वी हा शब्द क्रिया केव्हा घडली हे दर्शवित आहे म्हणून पूर्वी हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय होईल. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रिया किती वेळा किंवा केव्हा घडली हा काळ दर्शविणारा शब्द होय...

प्रश्न #176 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
साप माझ्या समोरून गेला. अव्यय प्रकार ओळखा.
  • (A) स्थलवाचक
  • (B) रीतिवाचक
  • (C) कालवाचक
  • (D) परिमाणवाचक
अचूक उत्तर: पर्याय (A) स्थलवाचक

वरील वाक्यात समोरून हा शब्द क्रियेचे स्थान दर्शवित आहे म्हणून समोरून हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय होईल. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय - स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यामधील क्रिया कोठे घडली हे दर्शवणारा शब्द असतो. स्थलवाचक क्रियाविशेषण...

प्रश्न #177 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता?
  • (A) जलद
  • (B) लगेच
  • (C) पुर्वी
  • (D) सांप्रत
अचूक उत्तर: पर्याय (A) जलद

कालवाचक क्रियाविशेषण अव्यय - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रिया किती वेळा किंवा केव्हा घडली हा काळ दर्शविणारा शब्द होय. उदाहरणे - दिवसा, काल, आता, रात्री, दिवसभर, वेळोवेळी, वारंवार इत्यादी कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन उपप्रकार...

प्रश्न #178 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
रीतिवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता?
  • (A) उगीच
  • (B) खचित
  • (C) ह ळु हळु
  • (D) किंचित
अचूक उत्तर: पर्याय (D) किंचित

रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय - वाक्यामधील क्रिया नेमकी कशाप्रकारे घडते हे दाखवण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय होय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन उपप्रकार पडतात. प्रकारदर्शक - जलद, हळू, सावकाश, तेवी, जेवी, फुकट, व्यर्थ...

प्रश्न #179 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'येणार असेल तर येईना बापडा!' या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
  • (A) येणार
  • (B) येईना
  • (C) बापडा
  • (D) असेल.
अचूक उत्तर: पर्याय (C) बापडा

बापडा हे व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहे. व्यर्थ उद्गारवाची अव्यये - जी उद्गारवाची अव्यये कोणताही भाव व्यक्त करत नाहीत, तसेच त्यांच्या वापराने वाक्याच्या अर्थावर कोणताही परिणाम होत नाही अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणतात. उदा. बापडा, वेडे...

प्रश्न #180 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'अरेच्या' या शब्दाचा केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा.
  • (A) संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय
  • (B) हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
  • (C) आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय
  • (D) शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (C) आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय

Important Points केवलप्रयोगी अव्यय - आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात. केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात. ते केवळ वापरायचे म्हणून वापरले जातात परंतु...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स