✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 31)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 31 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 601 ते 620 (एकूण 8,690)
प्रश्न #601 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘निरागस’ या शब्दाचा विरुद्ध अर्थ दर्शवणारा अचूक पर्याय शोधा..
  • (A) क्रोधी
  • (B) चतुर
  • (C) अपरिपक्व
  • (D) गोजिरवणा
अचूक उत्तर: पर्याय (B) चतुर

Key Points विरुद्धार्थी शब्द : भाषेमध्ये एखाद्या शब्दाचा बरोब्बर उलटा अर्थ दर्शविण्यासाठी आपण वेगळा शब्द वापरतो त्यालाच विरुद्धार्थी शब्द म्हणतात. असे विरुद्धार्थी शब्द अनेकदा वेगळे नवीनच शब्द असतात किंवा आहे त्याच शब्दाला 'अ' किंवा 'नि' उपसर्ग...

प्रश्न #602 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील शब्दातील भाववाचक शब्द ओळखा –
  • (A) राघव
  • (B) विशाल
  • (C) शहाणपणा
  • (D) हिमालय
अचूक उत्तर: पर्याय (C) शहाणपणा

उत्तर व स्पष्टीकरण - शहाणपणा भाववाचक नाम – ज्या शब्दाने प्राणी वा व्यक्ती अथवा वस्तूच्या गुण, धर्म, किंवा भाव याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात. भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते. भाववाचक नामे ही एकवचनीय असतात. स्थिती किंवा क्रिया ही भाववाचक...

प्रश्न #603 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.
झाड
  • (A) मोहक
  • (B) सुंदर
  • (C) काटेरी
  • (D) खारट
अचूक उत्तर: पर्याय (D) खारट

खारट हे विशेषण एखाद्या खाद्य पदार्थाची चव दर्शविते म्हणून ते झाड या नामाला योग्य विशेषण ठरणार नाही. Important Points विशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे प्रमुख तीन प्रकार पडतात. गुणवाचक विशेषण संख्यावाचक...

प्रश्न #604 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'वाघ्या' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
  • (A) वाघीण
  • (B) मुरळी
  • (C) वाघी
  • (D) मुरळीण
अचूक उत्तर: पर्याय (B) मुरळी

प्रश्न #605 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'साखरेचे खाणार त्याला देव देणार' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
  • (A) साखर खाणारा माणूस सुखी राहतो.
  • (B) एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणे
  • (C) जो वेळेवर हजार राहील त्यालाच फायदा मिळेल.
  • (D) भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते.
अचूक उत्तर: पर्याय (D) भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते.

प्रश्न #606 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
सराव झाल्यावर कोणतेही कठीण काम सहज जमते.
  • (A) प्रश्नार्थी
  • (B) मिश्र वाक्य
  • (C) संयुक्त वाक्य
  • (D) केवल वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (D) केवल वाक्य

खालील चार प्रकार हे वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडले आहेत. केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य Important Points केवलवाक्य - ज्या वाक्यात एकच विधान म्हणजे एकच उद्देश व एकच विधेय असेल तर त्या वाक्याला केवलवाक्य असे म्हणतात.यात एकच मुख्य...

प्रश्न #607 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी अचूक पर्याय निवडा..
आजी श्रियाला गोष्ट सांगत आहे. (साधा भविष्यकाळ)
  • (A) सांगत असेल
  • (B) सांगेल
  • (C) सांगितली
  • (D) सांगितली होती
अचूक उत्तर: पर्याय (B) सांगेल

आजी श्रियाला गोष्ट सांगेल हे साध्या भविष्यकाळातील योग्य वाक्य होईल. आजी श्रियाला गोष्ट सांगेल या वाक्यात सांगेल या क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होत आहे म्हणून सांगेल हे साध्या भविष्यकाळातील क्रियापदाचे योग्य रूप होईल. साधा...

प्रश्न #608 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दिलेल्या शब्दगटातून विरुद्ध अर्थ दर्शवणारा अचूक पर्याय शोधा..
विद्यार्थी - पास × -------
  • (A) हुशार
  • (B) नापास
  • (C) मूर्ख
  • (D) मठ्ठ
अचूक उत्तर: पर्याय (B) नापास

विरुद्धार्थी शब्द : एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय. विध्यार्थी - पास × नापास वरील दिलेल्या प्रमाणे पास शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नापास असा होतो. अशा प्रकारे वरील दिलेल्या शब्दगटातून नापास हा शब्द योग्य पर्याय...

प्रश्न #609 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.
या परीक्षेत पहिल्या दहात यायचेच, असा त्याने निश्चय केला.
  • (A) मनाशी खुनगाठ बांधणे
  • (B) ओनामा करणे
  • (C) पाचवीला पूजणे
  • (D) निकष लावणे
अचूक उत्तर: पर्याय (A) मनाशी खुनगाठ बांधणे

निश्चय करणे याचा अर्थ मनाशी खुनगाठ बांधणे असा होतो. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे होय. पाचवीला पूजणे म्हणजे एखादी गोष्ट...

प्रश्न #611 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
हत्तीला वश करण्याचे हत्यार कोणते?
  • (A) भाला
  • (B) वज्र
  • (C) अंकुश
  • (D) तलवार
अचूक उत्तर: पर्याय (C) अंकुश

समूहदर्शक शब्द - भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दांचा वापर न करता त्यासाठी एकच शब्द वापरला जातो त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात. प्रस्तुत पर्यायांपैकी हत्तीला वश करण्याचे हत्यार अंकुश हे आहे. माहूत हत्तीला अंकुश याद्वारे वश करतो. 📌 MPSC परीक्षा...

प्रश्न #612 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोणाचे प्रमाण कमी झालं आहे?
  • (A) सारड्यांचे
  • (B) बगळ्यांचे
  • (C) पारव्यांचे
  • (D) काजव्यांचे
अचूक उत्तर: पर्याय (B) बगळ्यांचे

कमी होणारा पाऊस आणि त्याचे विविध परिणाम लेखकाने या उतार्यातून मांडण्याचा प्रयत्न केकेला आहे. लेखक म्हणतात असमान पावसाने झाडावरची साल निम्मी-अर्धी ओलीसुकी झालेली आहे. त्यांच्या सालीवरती सूरपारंब्या खेळणारे तिखट मुंगळे अजूनही एकाच रांगेत चालत आहेत...

प्रश्न #613 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
  • (A) केवल वाक्य
  • (B) संयुक्त वाक्य
  • (C) गौण वाक्य
  • (D) मिश्र वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (D) मिश्र वाक्य

खालील तीन प्रकार हे वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडले आहेत. केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य Important Points मिश्र वाक्य : एक प्रधानवाक्य व एक किंवा एकपेक्षा अधिक गौणवाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे संमिश्र वाक्य तयार...

प्रश्न #614 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'रात्र' या शब्दास योग्य तो विरूद्धार्थी शब्द ओळखा.
  • (A) रजनी
  • (B) प्रभात
  • (C) विभावरी
  • (D) शर्वरी
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रभात

स्पष्टीकरण: स्पष्टीकरण: रात्र या शब्दांचे पुढील काही अर्थ आहेत: समानार्थी शब्द: रजनी, विभावरी, शर्वरी, ई. विरूद्धार्थी शब्द: सकाळ, पहाट, प्रभात, ई म्हणून ' प्रभात ' हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय...

प्रश्न #615 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे?
  • (A) हा
  • (B) कोण
  • (C) स्वत:
  • (D) ती
अचूक उत्तर: पर्याय (C) स्वत:

योग्य उत्तर स्वतः आहे. Key Points आपण आणि स्वतः हे दोन आत्मवाचक सर्वनामे आहेत. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा 'स्वतः' असा होतो, तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. आत्मवाचक सर्वनामाला स्वतःवाचक सर्वनाम असेही म्हणतात. उदाहरणार्थ: तू स्वतः ला काय समजतो?...

प्रश्न #616 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत.
  • (A) धातुसाधित नाम
  • (B) भाववाचक नाम
  • (C) सामान्यनाम
  • (D) सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (C) सामान्यनाम

नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग इ. नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम सामान्यनाम : एखाद्या समूहातील प्रत्येक घटकाला त्यांच्या सामान...

प्रश्न #617 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'हितवादी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
  • (A) दुष्ट
  • (B) हितचिंतक
  • (C) हितेच्छु
  • (D) हितैषी
अचूक उत्तर: पर्याय (A) दुष्ट

Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . दुष्ट म्हणजे दुसऱ्याचा राग किंवा मत्सर करणारा तर हितवादी म्हणजे दुसऱ्याचे कल्याण करणारा होय. हितचिंतक म्हणजे...

प्रश्न #618 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
केवढी उंच इमारत ही ! या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्यपरिवर्तन कसे होईल?
  • (A) ही इमारत खूप उंच आहे.
  • (B) ही इमारत उंचच उंच आहे.
  • (C) शेजारील इमारतीपेक्षा ही इमारत उंच आहे.
  • (D) ही तर फार उंच इमारत आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) ही इमारत खूप उंच आहे.

केवढी उंच इमारत ही ! या उद्गारार्थी वाक्यातील केवढी हा उद्गारवाचक शब्द काढून टाकून व उंची साठी खूप हा शब्द वापरला आहे. म्हणून ही इमारत खूप उंच आहे. हे योग्य विधानार्थी वाक्य होईल. Important Points वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या...

प्रश्न #619 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘गळ घालणे’ म्हणजे काय?
  • (A) गळ्यात घालणे
  • (B) फार आग्रह करणे
  • (C) मासे धरणे
  • (D) बुडालेली वस्तू शोधणे
अचूक उत्तर: पर्याय (B) फार आग्रह करणे

प्रश्न #620 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील शब्दसमूह अचूक शब्दाने पूर्ण करा. माणसांचा जमाव तसे सैनिकांचे ________
  • (A) पथक
  • (B) तुकडी
  • (C) पलटण
  • (D) तिन्ही बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) तिन्ही बरोबर

समूहदर्शक शब्द- समूहदर्शक शब्द म्हणजे एखाद्या वस्तूंचा किंवा गोष्टींच्या एकत्रित गटाला दिलेली उपमा होय. माणसांचा जमाव असतो त्याचप्रमाणे सैनिकांचे पथक, तुकडी व पलटण हे तिन्हीही असते. अशा प्रकारे तिन्ही बरोबर हा पर्याय योग्य आहे. 📌 MPSC परीक्षा टीप...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स