✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 33)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 33 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 641 ते 660 (एकूण 8,690)
प्रश्न #641 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मुलगी पुस्तक वाचत असते.
  • (A) रीती वर्तमानकाळ
  • (B) रीती भविष्यकाळ
  • (C) रीती भूतकाळ
  • (D) पूर्ण वर्तमानकाळ
अचूक उत्तर: पर्याय (A) रीती वर्तमानकाळ

मुलगी पुस्तक वाचत असते या वाक्यात पुस्तक वाचण्याची क्रिया वर्तमानकाळात सतत घडत असल्याची दर्शविली आहे म्हणून हे वाक्य रीती वर्तमानकाळाचे होईल. रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ - वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला...

प्रश्न #642 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
नीटनेटका - या शब्दाच्या विरुद्ध अर्थ दर्शवणारा अचूक पर्याय शोधा..
  • (A) ओबडधोबड
  • (B) गचाळ
  • (C) अजागळ
  • (D) गबाळा
अचूक उत्तर: पर्याय (D) गबाळा

Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. नीटनेटका ह्या शब्दाला व्यवस्थित,टापटीप हे शब्द समानार्थी ठरतात...

प्रश्न #643 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘करावे तसे भरावे’ या म्हणीचा अर्थ -
  • (A) मागून येऊन वरचढ होणे.
  • (B) देहाप्रमाणे आहार असणे.
  • (C) आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा.
  • (D) जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
अचूक उत्तर: पर्याय (D) जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.

म्हण ज्यात लोक परंपरेने आलेला अनुभव व ज्ञान ग्रथित झालेले असते अश्या वाक्यांना म्हण असे म्हणतात. Important Points जेव्हा आपण एखादी कृती किंवा काम करतो त्या कामाचे जेव्हा आपल्याला चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात त्यालाच करावे तसे भरावे असे म्हणतात...

प्रश्न #644 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
हरि-हर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते?
  • (A) प्रश्नचिन्ह
  • (B) उद्गारवाचक चिन्ह
  • (C) संयोग चिन्ह
  • (D) अवतरण चिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (C) संयोग चिन्ह

संयोगचिन्ह [ - ] - वाक्यामध्ये दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्ह [-] वापरतात. उदा. विद्यार्थी-भांडार Additional Information विरामचिन्हे - आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो तेव्हा आपल्याला मधूनमधून थांबावे लागते. या...

प्रश्न #645 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्रस्तुत पर्यायांपैकी शुद्ध असलेला शब्द ओळखा.
  • (A) दृढमुल
  • (B) दृडमूल
  • (C) दृढमूल
  • (D) धृढमूल
अचूक उत्तर: पर्याय (C) दृढमूल

शुद्धलेखनाचे महत्त्व- मराठी भाषेत शुद्धलेखनाला अत्यंत महत्त्व आहे. एका अक्षराच्या फरकानेसुद्धा अर्थाचा अनर्थ होतो किंवा शब्दाचा अर्थ बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने भाषेचा वापर करीत असतांना किंवा लिहित असताना खासकरून मराठी भाषा लिहिताना शुद्धलेखन हे...

प्रश्न #646 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
संस्कृतीच्या कोणत्या प्रमुख वैशिष्ट्याची चर्चा लेखकाने केली आहे?
  • (A) कृषिजीवन
  • (B) सामूहिक जीवनशैली
  • (C) अभिजन संस्कृती
  • (D) पूजा विधी
अचूक उत्तर: पर्याय (B) सामूहिक जीवनशैली

प्रस्तुत उताऱ्यात लेखकाने निसर्ग व मानव यांच्यातील परस्पर संबंध व लोकसमूहाचे महत्त्व पटवून दिलेले आहे. मानव हा निसर्गाशी किती निगडीत आहे आणि त्याच्या मनातील निसर्गबद्दलची कृतज्ञता येथे अतिशय सुंदर मांडण्यात आलेली आहे. निसर्ग व मानवाचे संबंध सांगत...

प्रश्न #647 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
उपकाराच्या जाणिवेतून लोकसंस्कृतीत कोणते विधी केले जातात?
  • (A) निसर्गाच्या विविध घटकांची पूजा
  • (B) निसर्गाचे अनुकरण
  • (C) विहीर खणणे
  • (D) धनधान्य अर्जित करणे
अचूक उत्तर: पर्याय (A) निसर्गाच्या विविध घटकांची पूजा

प्रस्तुत उताऱ्यात लेखकाने निसर्ग व मानव यांच्यातील परस्पर संबंध व लोकसमूहाचे महत्त्व पटवून दिलेले आहे. मानव हा निसर्गाशी किती निगडीत आहे आणि त्याच्या मनातील निसर्गबद्दलची कृतज्ञता येथे अतिशय सुंदर मांडण्यात आलेली आहे. मानव व निसर्गातील परस्पर संबंध...

प्रश्न #648 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लेखकाच्या मते शहरी जीवनशैलीत कोणत्या गोष्टीला मोकळीक नसते?
  • (A) समूह जीवन
  • (B) आधुनिक जीवनशैली
  • (C) मनोरंजनाची साधने
  • (D) सहजीवनाची अपरिहार्यता
अचूक उत्तर: पर्याय (A) समूह जीवन

प्रस्तुत उताऱ्यात लेखकाने निसर्ग व मानव यांच्यातील परस्पर संबंध व लोकसमूहाचे महत्त्व पटवून दिलेले आहे. मानव हा निसर्गाशी किती निगडीत आहे आणि त्याच्या मनातील निसर्गबद्दलची कृतज्ञता येथे अतिशय सुंदर मांडण्यात आलेली आहे. निसर्ग व मानवाचे संबंध सांगत...

प्रश्न #649 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लोकसंस्कृतीतल्या माणसांना कोणत्या गोष्टीचे ज्ञान नसते?
  • (A) जमिनीत पाण्याची उपलब्धता
  • (B) वनस्पतीचे गुणधर्म
  • (C) प्राण्यांचे वय जाणणे
  • (D) अभिजन संस्कृती
अचूक उत्तर: पर्याय (D) अभिजन संस्कृती

प्रस्तुत उताऱ्यात लेखकाने निसर्ग व मानव यांच्यातील परस्पर संबंध व लोकसमूहाचे महत्त्व पटवून दिलेले आहे. मानव हा निसर्गाशी किती निगडीत आहे आणि त्याच्या मनातील निसर्गबद्दलची कृतज्ञता येथे अतिशय सुंदर मांडण्यात आलेली आहे. माणूस हा जात्याच समूहप्रिय...

प्रश्न #650 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लोकमानसाच्या संदर्भाने लेखकाने निसर्गाला कोणती उपमा नाही दिली?
  • (A) मार्गदर्शक
  • (B) संरक्षक
  • (C) उपदेशक
  • (D) संहारक
अचूक उत्तर: पर्याय (C) उपदेशक

प्रस्तुत उताऱ्यात लेखकाने निसर्ग व मानव यांच्यातील परस्पर संबंध व लोकसमूहाचे महत्त्व पटवून दिलेले आहे. मानव हा निसर्गाशी किती निगडीत आहे आणि त्याच्या मनातील निसर्गबद्दलची कृतज्ञता येथे अतिशय सुंदर मांडण्यात आलेली आहे. मानव व निसर्गातील परस्पर संबंध...

प्रश्न #651 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील वाक्यातील काळ ओळखा? - लतादीदी सुरेल भाव गीत गात होत्या.'
  • (A) पूर्ण भूतकाळ
  • (B) साधा भूतकाळ
  • (C) अपूर्ण भूतकाळ
  • (D) रीती भूतकाळ
अचूक उत्तर: पर्याय (C) अपूर्ण भूतकाळ

काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात. साधा अपूर्ण पूर्ण रीती Important Points अपूर्ण भूतकाळ /...

प्रश्न #652 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा अचूक पर्याय निवडा..
  • (A) एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात
  • (B) अति मूर्ख माणूस
  • (C) सगळेच मुसळ केरात
  • (D) निरूपयोगी मनुष्य
अचूक उत्तर: पर्याय (D) निरूपयोगी मनुष्य

प्रश्न #653 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.
बाईंनी वर्गात सांगितलेल्या सूचना सगळ्यांची व्यवस्थित ऐकल्या.
  • (A) डंका पिटवणे
  • (B) कान देऊन ऐकणे
  • (C) पाठपुरावा करणे
  • (D) आव्हान स्वीकारणे
अचूक उत्तर: पर्याय (B) कान देऊन ऐकणे

कान देऊन ऐकणे याचा अर्थ लक्षपूर्वक ऐकणे असा होतो. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. डंका पिटवणे म्हणजे प्रचार करणे किंवा एखाद्या गोष्टीचा प्रभाव जमवणे होय...

प्रश्न #654 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'उत्क्रांती' या शब्दासाठी अचूक शब्दसमूह कोणता ? अचूक पर्याय निवडा..
  • (A) कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल.
  • (B) कोणत्याही क्षेत्रात वेळोवेळी क्रांती होऊन इष्ट बदल होणे.
  • (C) कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल.
  • (D) कोणत्याही क्षेत्रात इष्ट बदल होण्याची स्थिती.
अचूक उत्तर: पर्याय (C) कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल.

शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. उत्क्रांती म्हणजे हळूहळू घडून येणार बदल. वरील पर्यायांमध्ये उत्क्रांती या शब्दासाठी कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणार इष्ट बदल हा योग्य शब्दसमूह आहे...

प्रश्न #655 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'ज्येष्ठ' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?
  • (A) धाकटा
  • (B) छोटा
  • (C) लहान
  • (D) कनिष्ठ
अचूक उत्तर: पर्याय (D) कनिष्ठ

ज्येष्ठ म्हणजे मोठा तर कनिष्ठ म्हणजे लहान होय. Additional Information विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते . धाकटा, छोटा, लहान हे सर्व कनिष्ठ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत...

प्रश्न #656 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
ज्याची खावी पो ळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा
  • (A) उपकार कर्त्या वरतीच उलटणे.
  • (B) उपकार करण्यासाठी टाळी वाजवणे.
  • (C) उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे.
  • (D) केलेला उपकार विसरून निषेधार्थ टाळी वाजवणे.
अचूक उत्तर: पर्याय (C) उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे.

प्रश्न #657 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.
तो प्रसंग माझ्या कायमचा लक्षात आहे.
  • (A) उरी फुटून मरणे
  • (B) मनात घर करणे
  • (C) गुंग होणे
  • (D) मोहोर उमटवणे
अचूक उत्तर: पर्याय (B) मनात घर करणे

मनात घर करणे म्हणजे कायमचे लक्षात राहणे होय. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. उरी फुटून मरणे म्हणजे अतिश्रमाने मरण येणे होय. गुंग होणे म्हणजे एखाद्या कामात...

प्रश्न #658 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दिलेल्या धातूचे योग्य रूप निवडा.
सूर्य पूर्वेस (उगवणे). (साधा वर्तमानकाळ)
  • (A) उगवत असेल
  • (B) उगवला होता
  • (C) उगवतो
  • (D) उगवणार
अचूक उत्तर: पर्याय (C) उगवतो

सूर्य पूर्वेस उगवतो हे साध्या वर्तमानकाळातील योग्य वाक्य होईल. शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकालसत्य, सुविचार हे नेहमी साध्या वर्तमानकाळातच असतात. सूर्य पूर्वेस उगवतो ही एक नित्य घटना आहे म्हणून हे साध्या वर्तमानकाळाचे वाक्य आहे. साधा वर्तमान काळ...

प्रश्न #659 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
गो + ईश्वर या संधी विग्रहाची संधी काय होईल?
  • (A) गौश्वर
  • (B) गवीश्वर
  • (C) गविश्वर
  • (D) गौविश्वर
अचूक उत्तर: पर्याय (B) गवीश्वर

संधीचे मुख्य ३ प्रकार पडतात. स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी स्वर संधीतही प्रकार पडतात. नियम- ए, ऐ, ओ, औ स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय, आय, अव, आव अशी संधी होऊन त्यातील पुढील स्वर मिळून ती अक्षरे पूर्ण होतात. पोटशब्द जवळ...

प्रश्न #660 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'निमंत्रण आले, तर मी येईन.' या वाक्यातील अर्थ- '
  • (A) स्वार्थ
  • (B) आज्ञार्थ
  • (C) विध्यर्थी
  • (D) संकेतार्थ
अचूक उत्तर: पर्याय (D) संकेतार्थ

क्रियापदाच्या रुपावरुन वाक्याचे खालील प्रमाणे चार प्रकार पडतात. स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विध्यर्थी वाक्य संकेतार्थ वाक्य Important Points संकेतार्थ : . यात क्रियापदावरून एक गोष्ट दुसरी वर अवलंबून आहे अशा प्रकारचा बोध होतो . संकेत म्हणजे अट...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स