✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 35)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 35 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 681 ते 700 (एकूण 8,690)
प्रश्न #681 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.
घरातल्या वातावरणात तीचा कोंडमारा होतो.
  • (A) जीव खालीवर होणे
  • (B) घुसमट होणे
  • (C) उघडे पडणे
  • (D) तंद्री लागणे
अचूक उत्तर: पर्याय (B) घुसमट होणे

वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वरील वाक्य घरातल्या वातावरणात तीचा कोंडमारा होतो म्हणजेच घुसमट होणे होय. घुसमट होणे म्हणजेच...

प्रश्न #682 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
रिकाम्या जागी योग्य जोडशब्दल लिहा.
या वर्षी___चांगला झाल्यामुळे पीक चांगले झाले.
  • (A) पाऊसपाणी
  • (B) वादळपाणी
  • (C) औषधपाणी
  • (D) चहापाणी
अचूक उत्तर: पर्याय (A) पाऊसपाणी

या वर्षी पाऊसपाणी चांगला झाल्यामुळे पीक चांगले झाले. हे योग्य वाक्य होईल. पाऊसपाणी म्हणजे पर्जन्यमान होय. जोडशब्द - दोन शब्द एकत्र जोडून लिहिणे म्हणजे जोडशब्द होय. जोड़शब्द हा दोन किंवा अधिक शब्दांना एकत्र करुन बनवला जातो परंतु त्या शब्दाचा अर्थ हा...

प्रश्न #683 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आपद् + काल याची संधी काय असेल?
  • (A) आपादकाल
  • (B) आपत्काल
  • (C) आपकाल
  • (D) आपात्काल
अचूक उत्तर: पर्याय (B) आपत्काल

प्रश्न #684 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील पर्यायी उत्तरांतून केवल वाक्य कोणते ते सांगा?
  • (A) तो जोराने धावत होता आणि धावता-धावता तो पडला.
  • (B) तो जोराने धावत होता म्हणून तो पडला.
  • (C) तो जोराने धावत होता. तो पडला.
  • (D) तो जोराने धावत असताना पडला.
अचूक उत्तर: पर्याय (D) तो जोराने धावत असताना पडला.

तो जोराने धावत असताना पडला. या वाक्यात तो जोराने धावतो ही मोठी क्रिया आहे आणि या मोठ्या क्रियेच्या दरम्यान तो पडला ही छोटी क्रिया घडली आहे तसेच मोठी क्रिया दर्शविणाऱ्या क्रियापदाला असताना हा प्रत्यय जोडला आहे म्हणून तो जोराने धावत असताना पडला हे...

प्रश्न #685 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा.
  • (A) स्फूर्तिस्थान
  • (B) स्फुर्तीस्थान
  • (C) स्फुर्तिस्थान
  • (D) स्फूर्तीस्थान
अचूक उत्तर: पर्याय (A) स्फूर्तिस्थान

वरील स्फूर्तिस्थान हा लेखन नियमांनुसार शुद्ध शब्द आहे. व बाकी सर्व पर्याय लेखनदृष्ट्या अशुद्ध शब्द आहेत. अशा प्रकारे वरील दिलेल्यास प्रमाणे स्फूर्तिस्थान हा योग्य पर्याय आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: प्रयोग ओळखताना सोपी पद्धत: कर्त्याला प्रत्यय नसेल तर...

प्रश्न #687 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
नवजात बाळाचं नाव ठेवण्याचा मान कोणाला दिला जातो?
  • (A) कुलकर्णी मास्तर
  • (B) बाळाची आई
  • (C) नेमण्णा
  • (D) आत्याबाई
अचूक उत्तर: पर्याय (D) आत्याबाई

स्पष्टीकरण- प्रस्तुत उतार्यात गावाकडील समाज जीवन ग्रामीण भाषेत मांडण्यात आले आहे. यात लेखक म्हणतात घरात तान्हुलं जन्माला आलं की, आत्याबाई त्याचं नाव ठेवतात. पाळणा हलवतात. आलेल्या सुवासिनींना हळदी-कुंकु लावतात. कानात गुडगुडू करतात. पाळणा हलवतात...

प्रश्न #688 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पाळण्याच्या सजावटीत कोणती वस्तू वापरली जात नाही?
  • (A) फुले
  • (B) फुगे
  • (C) कापडी चिमण्या
  • (D) खण
अचूक उत्तर: पर्याय (D) खण

प्रस्तुत उतार्यात लेखकाने गावाकडील वातावरणाचे वर्णन केलेले आहे. यात उतार्याच्या सुरूवातीलाच लेखक म्हणतात, घरात तान्हुलं जन्माला आलं की आत्याबाई त्याचं नाव ठेवतात, पाळणा हलवतात, आलेल्या सुवासिनींना हळदी-कुंकु लावतात. कानात गुडूगुडू करतात. पाळणा...

प्रश्न #689 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पाटलाची कोणती महत्वाकांक्षा अपुरी राहिली?
  • (A) बिनपैशांचा खेळ खेळण्याची
  • (B) मल्लखांब खेळण्याची
  • (C) टाळ कुटण्याची
  • (D) गावात पहेलवान जन्मावा
अचूक उत्तर: पर्याय (D) गावात पहेलवान जन्मावा

प्रस्तुत उतार्यात लेखकाने गावाकडील वातावरणाचे वर्णन केलेले आहे. यात लेखक आणि त्यांचे सवंगडी जे विविध खेळ खेळत त्याचे देखील वर्णन आढळते. लेखक म्हणतात एक वडाचं झाड होतं . असंख्य पारंब्या त्याला फुटलेल्या होत्या. लेखक आणि त्यांचे सवंगडी तिथ सुरपारंब्या...

प्रश्न #690 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
गावात कोणती परंपरा निर्माण झाली?
  • (A) बारशाची
  • (B) गुळवणी वाटण्याची
  • (C) पखावज वादनाची
  • (D) घंटा वादनाची
अचूक उत्तर: पर्याय (B) गुळवणी वाटण्याची

प्रस्तुत उतार्यात गावाकडील समाज जीवन ग्रामीण भाषेत मांडण्यात आले आहे. यात लेखक म्हणतात घरात तान्हुल जन्माला आलं कि आत्याबाई त्याचं नाव ठेवतात. पाळणा हलवतात. आलेल्या सुवासिनिंना हळदी-कुंकु लावतात. कानात गुडगुडू करतात. पाळणा हलवतात. त्या निमित्ताने घर...

प्रश्न #691 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी अचूक पर्याय निवडा..
लोक स्वतः चा नेता निवडतात. (रीति भविष्यकाळ)
  • (A) निवडत
  • (B) निवडत जातील
  • (C) निवडत असेल
  • (D) निवडतील
अचूक उत्तर: पर्याय (B) निवडत जातील

लोक स्वतःचा नेता निवडत जातील हे रीती भविष्यकाळातील योग्य वाक्य होईल. लोक स्वतःचा नेता निवडत जातील या वाक्यात भविष्यकाळात नेता निवडण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविले आहे म्हणून निवडत जातील हे रीती भविष्यकाळातील क्रियापदाचे योग्य रूप होईल...

प्रश्न #692 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
ससेमिरा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.
  • (A) नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे
  • (B) सशाने मिरे खाणे
  • (C) ससा भाजणे, मिरे लावून खाणे
  • (D) तिखट लागण्याने सूं सूं आवाज करणे
अचूक उत्तर: पर्याय (A) नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे

वाक्प्रचार - वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो. वाक्प्रचाराचा अर्थ - ससेमिरा लावणे म्हणजे नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे ,भुणभुण लावणे...

प्रश्न #693 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'पित्राज्ञा' या शब्दाची संधी सोडवा.
  • (A) पि + त्राज्ञा
  • (B) पिता + आज्ञा
  • (C) पितर + आज्ञा
  • (D) पितृ + आज्ञा
अचूक उत्तर: पर्याय (D) पितृ + आज्ञा

पित्राज्ञा हे यणादेश स्वरसंधीचे उदाहरण आहे. पित्राज्ञा = पितृ + आज्ञा = ऋ + आ = र् + आ = रा इ, उ, ऋ (ह्रस्व किंवा दीर्घ) यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास इ/ई बद्दल य् , उ/ऊ बद्दल व् तर ऋ बद्दल र् वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळून संधी तयार...

प्रश्न #694 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
चंद्रावरची विवर कायम तशीच कशामुळे राहतात?
  • (A) भूशास्त्रीय घटनांमुळे
  • (B) चंद्रावर उल्का आणि अशनी पडल्यामुळे
  • (C) आपल्याला भास होतो
  • (D) कारण तिथे पाऊस पडत नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) चंद्रावर उल्का आणि अशनी पडल्यामुळे

सदर उतारा पृथ्वीभोवती फिरणार्या चंद्रावर आधारित आहे. लेखक म्हणतात,चंद्र टेलिस्कोपमधून किंवा भरपूर झूम असलेल्या कॅमेऱ्यातून पाहिला, तर चंद्रावरची खोल विवरं आणि चंद्रावरचे पसरट डाग छान स्पष्ट दिसतात. हे डाग म्हणजे चंद्रावरच्या खोलगट भागातला थंड झालेला...

प्रश्न #695 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
चंद्रावरचे डाग म्हणजे __________
  • (A) लाव्हारस
  • (B) घनरूप
  • (C) अशनी
  • (D) इंद्रधनुष्य
अचूक उत्तर: पर्याय (A) लाव्हारस

सदर उतारा पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रह असणार्या चंद्रचे वर्णन करणारा आहे. लेखक म्हणतात,चंद्र टेलिस्कोपमधून किंवा भरपूर झूम असलेल्या कॅमेऱ्यातून पाहिला, तर चंद्रावरची खोल विवरं आणि चंद्रावरचे पसरट डाग छान स्पष्ट दिसतात.पृथ्वीवर जसा अग्निजन्य खडक असतो...

प्रश्न #696 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लोणारचं विवर कशामुळे तयार झालं असावं?
  • (A) स्फोट झाल्यामुळे
  • (B) अतिवृष्टी झाल्यामुळे
  • (C) अशनी आदळल्यामुळे
  • (D) नैसर्गिकरित्या
अचूक उत्तर: पर्याय (C) अशनी आदळल्यामुळे

प्रस्तुत उतारा पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या चंद्रावर आधारित आहे. यात विविध खगोलीय घटनांचे रोचक वर्णन आलेले आहे. लेखक म्हणतात चंद्र निर्मितीच्या सध्या सर्वाधिक मान्यता असलेल्या सिद्धांतानुसार अंदाजे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक मोठा गोळा येऊन...

प्रश्न #697 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पृथ्वीवर होणारी कोणती क्रिया चंद्रावर होत नाही?
  • (A) दिवस रात्र
  • (B) थंडी-गरमी
  • (C) विवर भरणं
  • (D) ग्रहण
अचूक उत्तर: पर्याय (C) विवर भरणं

उपरोक्त उतारा पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावर आधारित आहे. लेखक म्हणतात,चंद्र टेलिस्कोप मधून किंवा भरपूर झूम असलेल्या कॅमेरातून पाहिला तर चंद्रावरची खोल विवर आणि चंद्रावरचे पसरट डाग छान स्पष्ट दिसतात. पृथ्वीवर जशा उल्का येऊन आदळतात तशा...

प्रश्न #698 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शशांक नावाचा पर्यायवाची नसलेला शब्द शोधा.
  • (A) मृगांक
  • (B) सुधाकर
  • (C) दिवाकर
  • (D) सुधांशु
अचूक उत्तर: पर्याय (C) दिवाकर

पर्यायवाची शब्द :- जेव्हा एखादी गोष्ट अथवा आशय एकाहून अधिक शब्दांनी व्यक्त करता येतो तेव्हा त्या शब्दांना परस्परांचे पर्यायवाची शब्द असे म्हटले जाते. उदाहरणार्थ :- हरीण या शब्दाचे मृग, कुरंग,सारंग हे शब्द पर्यायवाची आहेत. याप्रमाणे चंद्रासाठी शशांक...

प्रश्न #699 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेत असते व वाक्य वर्तमानकाळी असते.
  • (A) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
  • (B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
  • (C) दोन्ही चूक
  • (D) दोन्ही बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (B) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

उत्तर पर्याय २ पूर्वार्ध बरोबर , उत्तरार्ध चूक Key Points कर्मणी प्रयोग : या प्रकारामध्ये क्रियापद कर्माप्रमाणे आपले रूप बदलते. म्हणजेच कर्म धातु रुपेश असतो. याची खूण अशी आहे की या प्रयोगात कर्म प्रथामांत (अप्रत्ययी द्वितीयेत) असते. कर्ता प्रथामांत...

प्रश्न #700 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
रीति भूतकाळातील क्रियापद कोणते?
  • (A) सोडवले
  • (B) सोडवले होते
  • (C) सोडवत असे
  • (D) सोडवत होता
अचूक उत्तर: पर्याय (C) सोडवत असे

मुख्य काळ ३ आहेत- वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ काळांचे उपप्रकार- अपूर्ण काळ पूर्ण काळ रीति काळ Important Points रीतिकाळ- रीतिकाळ हा तिन्ही काळामध्ये लागू होतो. एखादी क्रिया भूतकाळात सतत करण्याची कर्त्याची रीत असेल तर तो रीतिभूतकाळ असतो. उदा- मधु लाडू...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स