✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 37)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 37 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 721 ते 740 (एकूण 8,690)
प्रश्न #721 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
जे खरे असेल, ते तू बोलावेस. या वाक्याचा प्रकार ओळखा.
  • (A) संयुक्त वाक्य
  • (B) केवल वाक्य
  • (C) मिश्र वाक्य
  • (D) विधानार्थी वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (C) मिश्र वाक्य

प्रश्न #722 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वियोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
  • (A) संयोग
  • (B) योग्य
  • (C) विषम
  • (D) सुदैव
अचूक उत्तर: पर्याय (A) संयोग

विरुद्धार्थी शब्द- विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात. विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते. वियोग शब्दाचा योग्य...

प्रश्न #723 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'खुशाल चेंडू' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
  • (A) जन्मापासून श्रीमंत
  • (B) मूर्खपणाचा सल्ला देणारा
  • (C) अपशब्दाने खरडपट्टी काढणे
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

आलंकारिक शब्द: मराठी भाषेची गोडी ही अवीट आहे. असंख्य शब्दरूप या भाषेत वसलेले आहेत. मराठी भाषेतील शब्दसंपदा अफाट आहे आणि हेच ह्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मराठी भाषेत एखादी भावना आहे ती त्या शब्दाने न सांगता त्यासाठी विशिष्ट रचनात्मक शब्दांचा...

प्रश्न #724 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्रस्तुत पर्यायांपैकी व्याकरणिकदृष्टया योग्य शब्द निवडा.
  • (A) अत्याधिक
  • (B) अत्यदिक
  • (C) अत्यधिक
  • (D) अत्यधीक
अचूक उत्तर: पर्याय (C) अत्यधिक

शुद्धलेखनाचे महत्त्व- मराठी भाषेत शुद्धलेखनाला अत्यंत महत्त्व आहे. एका अक्षराच्या फरकानेसुद्धा अर्थाचा अनर्थ होतो किंवा शब्दाचा अर्थ बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने भाषेचा वापर करीत असतांना किंवा लिहित असताना खासकरून मराठी भाषा लिहिताना शुद्धलेखन हे...

प्रश्न #725 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता?
  • (A) उत्कर्ष
  • (B) पथिक
  • (C) इनामदार
  • (D) त्यागी
अचूक उत्तर: पर्याय (A) उत्कर्ष

उपसर्ग घटित शब्द- शब्दाच्या अगोदर उपसर्ग लागून जे शब्द तयार झालेले असतात त्या शब्दांना उपसर्गघटित शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ- अप शब्द, अभि मान, सु विचार, अनु रूप, प्रति दिन, आ जन्म, स प्रेम, परि पूर्ण, परा जय इ. Important Points प्रस्तुत...

प्रश्न #726 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'डोळ निवणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
  • (A) अनुभवाने सावध होणे
  • (B) पाळत ठेवणे
  • (C) झोप येणे
  • (D) समाधान होणे
अचूक उत्तर: पर्याय (D) समाधान होणे

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. डोळे निवणे या वाक्प्रचाराचा अर्थ समाधान होणे असा होतो. वाक्यात उपयोग - परदेशातून बऱ्याच दिवसांनी आलेल्या आपल्या मुलाला पाहून आईचे डोळे निवले...

प्रश्न #727 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
जाणून घेण्याची इच्छा असलेला या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द येईल ?
  • (A) अनुयायी
  • (B) जिज्ञासू
  • (C) मनमौजी
  • (D) मनकवडा
अचूक उत्तर: पर्याय (B) जिज्ञासू

समूहदर्शक शब्द- भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दांचा वापर न करता त्यासाठी एकच शब्द वापरला जातो त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात. मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो...

प्रश्न #728 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'डोळेझाक करणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
  • (A) डोळे झाकून ठेवणे
  • (B) सावध होणे
  • (C) दुर्लक्ष करणे
  • (D) बदला घेणे
अचूक उत्तर: पर्याय (C) दुर्लक्ष करणे

वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात. प्रस्तुत पर्यायांपैकी 'डोळेझाक करणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दुर्लक्ष करणे असा होतो. वाक्यात उपयोग- आपण आपल्या आवडत्या आणि...

प्रश्न #729 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
संधी सोडवा - गणेश
  • (A) गाण + ईश
  • (B) गण + ईश
  • (C) गण + एश
  • (D) गण + ऐश
अचूक उत्तर: पर्याय (B) गण + ईश

संधी- गणेश संधी विग्रह- गण + ईश संधी प्रकार- गुणसंधी स्वरसंधी - जवळ येणारे वर्ण जर स्वर असतील, तर त्यास ‘स्वरसंधी' असे म्हणतात. उदा. ग्रंथ + आलय = ग्रंथालय नियम - अ किंवा आ या स्वरापुढे इ किंवा ई आल्यास ‘ए’ स्वर येतो व उ किंवा ऊ आल्यास ‘ओ’ हा स्वर...

प्रश्न #730 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
घराच्या अंगणात झाडे लावण्याचे कोणते मुख्य प्रयोजन लेखकाने सांगितले आहे?
  • (A) मन प्रसन्न राहावे म्हणून
  • (B) मनासारखे वाढू देण्यासाठी
  • (C) पाखरांना धांदल करता यावी म्हणून
  • (D) खायला फळं मिळतील म्हणून
अचूक उत्तर: पर्याय (A) मन प्रसन्न राहावे म्हणून

प्रस्तुत उतार्यात लेखकाने पाखरांच्या म्हणजेच पक्षांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. त्या जोडीलाच बागेच्या सौंदर्याचे ही प्रकटीकरण केलेले आहे. लेखक म्हणतात फुलं फुललीत, झाडं हिरव्यागार पानांनी नटलीत. एकमेकांना बघता बघता त्यांचा दिवस जातो...

प्रश्न #731 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'घाला घालणे' या वाक्यप्रचाराचा नेमका आशय काय आहे?
  • (A) मुक्तसंचार करू देणे
  • (B) घाट घालणे
  • (C) निर्बंध लादणे
  • (D) स्वैरपणा करू देणे
अचूक उत्तर: पर्याय (C) निर्बंध लादणे

वाक्प्रचार :- मराठीतील काही शब्दसमूहांचा वापर करताना जेव्हा त्यांना त्यांचा नेहमीचा अर्थ न राहता दुसरा अर्थ प्राप्त होतो, तेव्हा त्यांना वाक्प्रचार असे म्हणतात. घाला घालणे- याचा अर्थ निर्बंध लादणे होय. मुक्त संचार करू देणे, घाट घालणे, स्वैरपणा करू...

प्रश्न #732 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लेखक प्रामुख्याने कोणाशी संवाद साधत आहे, अनुमान करा.
  • (A) वडाचा बुंधा
  • (B) पोपट
  • (C) फुलं झाडे
  • (D) वेली फुलं
अचूक उत्तर: पर्याय (B) पोपट

प्रस्तुत उतारा एका अनामिक मित्राविषयी, त्याच्या स्वच्छंदी आयुष्याच्या आवश्यकते विषयी चर्चा करणारा आहे. लेखक सुरुवातीलाच आपल्या बागेचे वर्णन करताना म्हणतात की, मनाने प्रसन्न राहावे म्हणून घराच्या अंगणात झाडे लावली. खत खाऊ घातले, त्यांना त्यांच्या...

प्रश्न #733 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लेखकाने 'त्याला' देऊ केलेल्या घटकांमध्ये कोणती गोष्ट नाहीये?
  • (A) आंदण
  • (B) फूलं
  • (C) पानं
  • (D) खत
अचूक उत्तर: पर्याय (D) खत

लेखकाने प्रस्तुत उताऱ्यात पाखरांच्या अनिर्बंध जीवनाचे त्यांच्या स्वच्छंदी आयुष्याचे महत्त्व वर्णन केलेले आहे. लेखक म्हणतात फुलं फुललीत, झाडं हिरव्यागार पानांनी नटलीत. या फुलझाडांचा. वेलीफुलांचा डोळ्याने आनंद घ्यावा. मनाने प्रसन्न राहावे म्हणून...

प्रश्न #734 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अंगणातल्या बागेत यावे असे लेखकाला कोणाबद्दल वाटत असावे?
  • (A) फुलं
  • (B) पानं
  • (C) तो अनाम मित्र
  • (D) वेल
अचूक उत्तर: पर्याय (C) तो अनाम मित्र

सदर उताऱ्यात लेखकाने पक्षांच्या स्वच्छंदी जीवनाचे वर्णन केलेले आहे. लेखक म्हणतात फुलं फुललीत, झाडं हिरव्यागार पानांनी नटलीत. एकमेकांकडे बघता बघता त्यांचा दिवस जातो. फुलझाडांचा, वेलीफुलांचा आनंद घ्यावा.मनाने प्रसन्न राहावे म्हणून घराच्या अंगणात झाडे...

प्रश्न #735 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
माधवीने सफरचंद खाल्ले - या वाक्यतील वाक्यातील प्रयोगाचा अचूक प्रकार ओळखा..
  • (A) कर्तरी
  • (B) कर्मणी
  • (C) भावे
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) कर्मणी

प्रश्न #736 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आई मुलाला हसविते. या वाक्यातील ‘हसविते’ हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ?
  • (A) भावकर्तृक
  • (B) प्रयोजक
  • (C) शक्य
  • (D) अनियमित
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रयोजक

साधित धातूवरून दोन प्रकारची क्रियापदे असतात. प्रयोजक क्रियापदे शक्य क्रियापदे प्रयोजक क्रियापद- मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून, ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावीत आहे, असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला...

प्रश्न #737 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पर्याय दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापराल ?
  • (A) संयोग
  • (B) प्रश्न
  • (C) अवतरण
  • (D) विकल्प
अचूक उत्तर: पर्याय (D) विकल्प

Important Points आपण आपले विचार मांडताना भाषेचा वापर करतो. व्यक्त होताना कित्येकदा आपण थांबतो. कधी कधी आपण थोडा वेळ तर कधी खूप वेळ मध्ये थांबतो. या थांबण्यालाच विराम घेणे असे देखील म्हणतात. हा विराम दर्शविण्यासाठी आपण काही चिन्हांचा वापर करतो...

प्रश्न #738 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'रोग्याची शुश्रूषा करणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता?
  • (A) निवेदिता
  • (B) दाई
  • (C) उपचारिका
  • (D) परिचारिका
अचूक उत्तर: पर्याय (D) परिचारिका

शब्दसमूह - अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. परिचारिका - रोग्याची शुश्रुषा करणारी स्त्री,नर्स, रुग्णपरिचारिका उदा - माझी काकू ह्या रुग्णालयात रुग्णपरिचारिका आहे. अशा प्रकारे वरील परिचारिका हा...

प्रश्न #739 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी लेखननियमानुसार अचूक शब्द कोणता?
  • (A) ऊन्मत्त
  • (B) उन्मत्त
  • (C) उम्नत्त
  • (D) उन्मत
अचूक उत्तर: पर्याय (B) उन्मत्त

Important Points शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. नियम - मराठी अ-कारान्त शब्दाचे उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार व उकार दीर्घ लिहावेत. उदा - कठीण, नीट, रतीब, विहीर तत्सम (मुळात संस्कृत...

प्रश्न #740 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मी गाणे गात असतो.हे पुढीलपैकी कोणत्या काळातील वाक्य आहे?
  • (A) रीती भूतकाळ
  • (B) पूर्ण भूतकाळ
  • (C) पूर्ण वर्तमानकाळ
  • (D) रिती वर्तमानकाळ
अचूक उत्तर: पर्याय (D) रिती वर्तमानकाळ

काळ- वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होतो त्याला काळ असे म्हणतात. मुख्य काळ हे तीन प्रकारचे आहे. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ काळाचे ३ उपप्रकार होतात. अपूर्ण काळ पूर्ण काळ रीति काळ...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स