✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 34)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 34 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 661 ते 680 (एकूण 8,690)
प्रश्न #661 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.
अंगबाई! इवलीशी बाहुली ती, आणि तिचा लवाजमा किती मोठा!
  • (A) बाहुली
  • (B) लवाजमा
  • (C) अगंबाई
  • (D) मोठा
अचूक उत्तर: पर्याय (D) मोठा

अंगबाई! इवलीशी बाहुली ती, आणि तिचा लवाजमा किती मोठा! या वाक्यात मोठा हे विशेषण आहे. Confusion Points वरील वाक्यात बाहुली या नामाबद्दल इवलीशी हे सुद्धा विशेषण आहे परंतु पर्यायात मोठा हे उत्तर दिले आहे आणि मोठा हे विशेषण बाहुलीचा लवाजमा यासाठी वापरले...

प्रश्न #662 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील शब्दाचे लिंग ओळखा.
दार
  • (A) पुल्लिंग
  • (B) स्त्रीलिंग
  • (C) नपुसकलिंग
  • (D) उभयलिंग
अचूक उत्तर: पर्याय (C) नपुसकलिंग

उदा. ते दार, ते वासरू, ते काव्य, ते मूल इ. Additional Information लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात. लिंग हे तीन प्रकारचे आहे. 1. पुल्लिंग 2. स्त्रीलिंग 3. नपुंसकलिंग पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट...

प्रश्न #663 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा.
  • (A) विशेषण
  • (B) नाम
  • (C) सर्वनाम
  • (D) भाववाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (D) भाववाचक नाम

नाम :- सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजेच नाम होय. नाम ही संज्ञा वस्तू वाचक आहे अशी वस्तू ही काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते. नाम ही शब्द जाती विकारी असून तिला लिंग वचन विभक्तीचे तसेच शब्दयोगी अव्ययांचे...

प्रश्न #664 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्रस्तुत उताऱ्यातील विवेचनातून कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत ?
  • (A) तंत्रज्ञानातून शांतता व स्वच्छता निर्माण करणे
  • (B) तंत्रज्ञान समाजात रूजले पाहिजे
  • (C) तंत्रज्ञानातून नवनव्या कल्पना सूचल्या पाहिजेत
  • (D) तंत्रज्ञानाकडे नवदृष्टीने पाहण्याची गरज
अचूक उत्तर: पर्याय (D) तंत्रज्ञानाकडे नवदृष्टीने पाहण्याची गरज

प्रस्तुत उताऱ्यात काळानुरूप बदलत जाणारे तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. फिरत्या पट्ट्यापाशी उभी असलेली लहानसहान कामे करणारी माणसांची फौज हे चित्र कालबाह्य झाले आहे म्हणजेच पूर्वी माणसे ही कष्टाची कामे करत. तेव्हा तंत्रज्ञान इतके प्रगत...

प्रश्न #665 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आरंभबिंदू कोणता ?
  • (A) इलेक्ट्रॉनिक शस्त्रे बनविणे
  • (B) एखादी कल्पना सूचणे
  • (C) तंत्रज्ञान समाजाच्या पचनी पडणे
  • (D) कल्पना सत्यात उतरणे
अचूक उत्तर: पर्याय (B) एखादी कल्पना सूचणे

प्रस्तुत उताऱ्यात काळानुरूप बदलत जाणारे तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. तंत्रज्ञानातील प्रगती ही तीन टप्प्यांमध्ये एकमेकांत गुंतलेली वर्तुळाकार साखळी असते. पहिली निर्मिती अवस्था, ज्यामध्ये एखाद्या कल्पनेचा आराखडा असतो म्हणून एखादी कल्पना...

प्रश्न #666 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
युद्ध जिंकण्यासाठी महत्वाचा डावपेच कोणता असू शकतो ?
  • (A) शत्रूसैन्याचा संहार करणे
  • (B) शत्रूसैन्याच्या मानसिकतेवर आघात करणे
  • (C) शत्रूसैन्यावर क्षेपणास्त्र डागणे
  • (D) शत्रूसैन्याशी करार करणे
अचूक उत्तर: पर्याय (B) शत्रूसैन्याच्या मानसिकतेवर आघात करणे

प्रस्तुत उताऱ्यात काळानुरूप बदलत जाणारे तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. युद्धामध्ये शत्रुच्या मानवी शक्तीचे खच्चीकरण करण्यापेक्षा शत्रुसैन्याचे मनोधैर्य खच्ची करणे हे अधिक महत्त्वाचे आहे आणि मनाने हरलेले सैन्य सहज पराभूत होऊ शकते यामुळे...

प्रश्न #667 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
प्रस्तुत उताऱ्यातील चिंतनाचे केंद्र कोणते ?
  • (A) इतिहास
  • (B) अणूविज्ञान
  • (C) अवजड यंत्रसामुग्री
  • (D) इलेक्ट्रॉनिक क्षेत्र
अचूक उत्तर: पर्याय (D) इलेक्ट्रॉनिक क्षेत्र

प्रस्तुत उताऱ्यात काळानुरूप बदलत जाणारे तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. वरील उताऱ्यात अखाती युद्धात वापरली गेलेली इलेक्ट्रॉनिक शस्त्रे अन् क्षेपणास्त्रे यांचा एकत्रितपणे केला गेलेला मुबलक वापर आणि एकविसाव्या शतकात युद्ध झाले, तर...

प्रश्न #668 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
तंत्रज्ञानाच्या परिपूर्ण रूपाचा आविष्कार कोणता ?
  • (A) तंत्रज्ञानाचा व्यवहारात वापर होणे
  • (B) तंत्रज्ञान अंगवळणी पडणे
  • (C) तंत्रज्ञानातून नव कल्पना सूचणे
  • (D) तंत्रज्ञान जीवनाचा भाग बनणे
अचूक उत्तर: पर्याय (D) तंत्रज्ञान जीवनाचा भाग बनणे

प्रस्तुत उताऱ्यात काळानुरूप बदलत जाणारे तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान, पचवूनच वाढते, अधिक पुढे जाते; स्वतःचा उद्धार स्वत:च करू शकते म्हणून तंत्रज्ञान जीवनाचा भाग बनणे हा तंत्रज्ञानाच्या परिपूर्ण रूपाचा आविष्कार...

प्रश्न #669 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘दिगंतर’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधीविग्रह ओळखा.
  • (A) दिक् + अंतर
  • (B) दिक + गंतर
  • (C) दि + अंतर
  • (D) दिग + अंतर
अचूक उत्तर: पर्याय (A) दिक् + अंतर

Important Points संधी : जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंपासून एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. दोन शब्द एकत्र केल्यास त्यास...

प्रश्न #670 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'आपण' या सर्वनामाचा अर्थ जेव्हा 'स्वतः' असा होतो, तेव्हा ते ______ सर्वनाम असते.
  • (A) दर्शक
  • (B) प्रश्नार्थक
  • (C) स्तुतिवाचक
  • (D) आत्मवाचक
अचूक उत्तर: पर्याय (D) आत्मवाचक

आत्मवाचक सर्वनाम :- दिलेल्या वाक्यात आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम होते.आत्मवाचक सर्वनामे वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाहीत कारण ती स्वतः असा कोणताच अर्थ व्यक्त करत नसल्यामुळे त्यांनी नेहमी नामानंतरच...

प्रश्न #671 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत?
  • (A) सामान्यनामे
  • (B) भाववाचक नामे
  • (C) विशेषनामे
  • (D) पदार्थवाचक नामे
अचूक उत्तर: पर्याय (D) पदार्थवाचक नामे

नाम : सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दास नाम असे म्हणतात. उदा : कागद, राग, स्वर्ग नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात . सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम सामान्यनाम : एखाद्या समूहातील प्रत्येक घटकाला त्यांच्या सामान...

प्रश्न #672 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
जोडशब्द नसलेला शब्द निवडा.
  • (A) मोक्षप्राप्ती
  • (B) थांगपत्ता
  • (C) त्रेधातिरपीट
  • (D) फौजफाटा
अचूक उत्तर: पर्याय (A) मोक्षप्राप्ती

प्रश्न #673 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
गळ्यात घोरपड बांधणे -
  • (A) मोठे शौर्य दाखवणे
  • (B) मोठे संकट येणे
  • (C) नसती जबाबदारी लादणे
  • (D) मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे
अचूक उत्तर: पर्याय (C) नसती जबाबदारी लादणे

वाक्यात उपयोग - सुभाषने स्वतःची जबाबदारी झटकून विलासच्या गळ्यात अनेक अवघड कामांची घोरपड बांधली. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. मांजराच्या गळ्यात घंटा...

प्रश्न #674 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सु + अल्प याची संधी काय असेल?
  • (A) सुल्प
  • (B) स्वल्प
  • (C) सुल्पा
  • (D) सल्प
अचूक उत्तर: पर्याय (B) स्वल्प

संधी- जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात. यणादेश संधी: जर इ, उ, ऋ, (र्हस्व किंवा दीर्घ) या...

प्रश्न #675 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'अति तेथे माती' या म्हणीचा अर्थ-
  • (A) माती असते तिथे जाऊ नये.
  • (B) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
  • (C) मातीपासून सावध रहावे.
  • (D) मती भ्रष्ट होणे.
अचूक उत्तर: पर्याय (B) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.

म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य की जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय. अति तेथे माती या...

प्रश्न #676 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वासरू या शब्दाचे लिंग ओळखा.
  • (A) नपुंसकलिंग
  • (B) पुल्लिंग
  • (C) पुल्लिंग आणि नपुंसकलिंग
  • (D) स्त्रीलिंग
अचूक उत्तर: पर्याय (A) नपुंसकलिंग

लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात. लिंग हे ३ प्रकारचे आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग वासरू या शब्दाचे लिंग नपुंसकलिंग आहे. तो किंवा ती वासरू न म्हणता आपण ते वासरू असे म्हणतो. 📌 MPSC परीक्षा टीप: समास...

प्रश्न #677 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'मर्त्य' या शब्दाबद्दल विरुद्ध अर्थ दर्शवणारा अचूक पर्याय शोधा..
  • (A) मृत
  • (B) अमृत
  • (C) अजर
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. मर्त्य या शब्दाला मरण,मृत्यू हे शब्द समानार्थी ठरतात. इतर...

प्रश्न #678 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'कच खाणे' या वाक्प्रचारचा अर्थ-
  • (A) अडचण येणे.
  • (B) माघार घेणे.
  • (C) अडचणीतून पार पडणे.
  • (D) संकटात पडणे.
अचूक उत्तर: पर्याय (B) माघार घेणे.

वाक्यात उपयोग - खूप खोल दरीत उतरताना अमनच्या मनाने कच खाल्ली होती. Additional Information वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. कचाट्यात सापडणे म्हणजे संकटात पडणे होय. संकटातून पार...

प्रश्न #679 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पहिले पद महत्त्वाचे असणारा समास कोणता?
  • (A) तत्पुरुष
  • (B) अव्ययीभाव
  • (C) बहुव्रीही
  • (D) कर्मधारय
अचूक उत्तर: पर्याय (B) अव्ययीभाव

Important Points अव्ययीभाव समास - ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदा. बेमालूम - माहितीशिवाय तत्पुरुष समास - ज्या समासात दुसरे पद महत्वाचे...

प्रश्न #680 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील वाक्यातील आशय एका शब्दात व्यक्त करा.
'कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती...'
  • (A) स्वार्थी वृत्ती
  • (B) कंजूष वृत्ती
  • (C) लबाड वृत्ती
  • (D) कपोत वृत्ती
अचूक उत्तर: पर्याय (D) कपोत वृत्ती

शब्दसमूह - अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय. कपोत वृत्ती - कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करणे. वरील दिलेल्याप्रमाणे 'कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स