✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 5)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 5 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 81 ते 100 (एकूण 8,690)
प्रश्न #81 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सर्वनामाचा प्रकार ओळखा : 'जो'
  • (A) पुरुषवाचक सर्वनाम
  • (B) दर्शक सर्वनाम
  • (C) संबंधी सर्वनाम
  • (D) अनिश्चित सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (C) संबंधी सर्वनाम

संबंधी सर्वनाम - गौण वाक्यातील जो, जी, जे ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत कारण ती उल्लेख केलेल्या एखाद्या नामाशी संबंधीत असतात तर मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या ही अनुसंबंधी सर्वनामे आहेत. कारण अनु चा अर्थ नंतरचा असा होतो त्यामुळे दर्शक सर्वनामे...

प्रश्न #82 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल?
  • (A) प्रथम पुरुषवाचक
  • (B) तृतीय पुरुषवाचक
  • (C) संबंधी सर्वनाम
  • (D) द्वितीय पुरुषवाचक
अचूक उत्तर: पर्याय (D) द्वितीय पुरुषवाचक

द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम :- समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात ती द्वितीय पुरुष वाचक सर्वनामे असतात. उदाहरणार्थ :- तू ,तुम्ही, आपण, स्वतः इत्यादी. तू एवढे काम करून टाक. तुम्ही एवढे काम करा आपण आलात,बरे वाटले (तुम्ही )...

प्रश्न #83 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सर्वनामांचे मुख्य प्रकार किती?
  • (A) पाच
  • (B) सहा
  • (C) आठ
  • (D) नऊ
अचूक उत्तर: पर्याय (B) सहा

पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम सर्वनाम :- नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामांचे कार्य होय. सर्वनामांना...

प्रश्न #84 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा. 'स्वतः'
  • (A) संबंधी सर्वनाम
  • (B) आत्मवाचक सर्वनाम
  • (C) दर्शक सर्वनाम
  • (D) प्रश्नार्थक सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (B) आत्मवाचक सर्वनाम

प्रश्न #85 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'आपण' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
  • (A) सर्वनाम
  • (B) विशेषण
  • (C) भाववाचक नाम
  • (D) क्रियापद
अचूक उत्तर: पर्याय (A) सर्वनाम

प्रश्न #86 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सुज्ञास अधिक सांगणे नलगे . या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा खाली दिलेल्या पर्यायातून प्रकार ओळखा.
  • (A) प्रयोजक क्रियापद
  • (B) उभयविध क्रियापद
  • (C) अनियमित क्रियापद
  • (D) अकर्तृक क्रियापद
अचूक उत्तर: पर्याय (C) अनियमित क्रियापद

क्रियापद - क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. उदा. बसणे. धावणे, चालणे इ. क्रियापदाचा विचार करतांना क्रियापदांच्या अन्य प्रकारांचा ही विचार करावा लागतो. जसे की- संयुक्त-सहायक क्रियापदे सिद्ध व साधित क्रियापदे प्रयोजक व शक्य...

प्रश्न #87 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
हा रुमाल आईला नेऊन दे.
  • (A) शयक
  • (B) संयुक्त
  • (C) शक्य
  • (D) द्विकर्मक
अचूक उत्तर: पर्याय (B) संयुक्त

हा रुमाल आईला नेऊन दे या वाक्यात नेऊन हे धातुसाधीत आहे जे ने या धातुपासून बनलेले आहे आणि दे हे सहाय्यक क्रियापद आहे आणि या दोन्ही शब्दांमधून एकच क्रियेचा बोध होत आहे म्हणून नेऊन दे हे संयुक्त क्रियापद आहे. Important Points संयुक्त क्रियापद...

प्रश्न #88 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दिलेल्या धातूचे 'कृदंत' (साधित) रूप ओळखा.
खाणे
  • (A) खातो
  • (B) खाते
  • (C) खात
  • (D) खते
अचूक उत्तर: पर्याय (C) खात

खाणे या धातुपासून खात हे कृदंत (साधित) रूप बनले आहे आणि खात हे धातुसाधित कोणत्याही वाक्याचा अर्थ पूर्ण करु शकत नाही म्हणून खात हे कृदंत होईल. उदा. तो आंबा खात होता. या वाक्यात खात हे कृदंत आहे. तो आंबा खातो . या वाक्यात खातो हे क्रियापद आहे...

प्रश्न #89 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दिलेल्या धातूचे शक्य क्रियापद ओळखा.
बोलणे
  • (A) बोलतात
  • (B) बोलवते
  • (C) बोलणे
  • (D) बोलतो
अचूक उत्तर: पर्याय (B) बोलवते

क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे विविध प्रकार स्थिती व स्तुत्यन्तरदर्शक क्रियापदे सकर्मक क्रियापदे अकर्मक क्रियापदे व्दिकर्मक क्रियापदे उभयविध क्रियापदे संयुक्त क्रियापदे सिद्ध क्रियापदे...

प्रश्न #90 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
मी घरी जाण्यापूर्वी सांजावले .
  • (A) कृदंत
  • (B) भावकर्तुक
  • (C) शक्य
  • (D) प्रयोजक
अचूक उत्तर: पर्याय (B) भावकर्तुक

क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे विविध प्रकार स्तिती व स्तुत्यन्तरदर्शक क्रियापदे सकर्मक क्रियापदे अकर्मक क्रियापदे व्दिकर्मक क्रियापदे उभयविध क्रियापदे संयुक्त क्रियापदे सिद्ध क्रियापदे...

प्रश्न #91 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
आजोबांनी नातवाला कथा सांगितली .
  • (A) द्विकर्मक
  • (B) सकर्मक
  • (C) अकर्मक
  • (D) सहायक
अचूक उत्तर: पर्याय (A) द्विकर्मक

आजोबांनी नातवाला कथा सांगितली या वाक्यात आजोबा हे कर्ता आहेत आणि कर्त्याकडून म्हणजेच आजोबांकडून एकाच वेळी दोन घटकांवर क्रिया घडत आहे तसेच या वाक्यात दोन कर्मे आहेत. कथा हे वस्तुवाचक म्हणजे प्रत्यक्ष कर्म आहे तर व्यक्तिवाचक (नातू) हे अप्रत्यक्ष कर्म...

प्रश्न #92 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
विदुषकाचे काम पाहून तो खूप हसला .
  • (A) साधित
  • (B) संयुक्त
  • (C) अकर्मक
  • (D) सकर्मक
अचूक उत्तर: पर्याय (C) अकर्मक

वरील वाक्यात तो हा कर्ता आहे आणि हसण्याची क्रिया कर्त्यापासून सुरु होत आहे आणि कर्त्यापाशीच थांबत आहे म्हणून वाक्यात हसला हे अकर्मक क्रियापद आहे. अकर्मक क्रियापद - ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते, म्हणजे क्रिया कर्त्यापासून...

प्रश्न #93 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
  • (A) मुलगा
  • (B) मुलगी
  • (C) मुली
  • (D) मूल
अचूक उत्तर: पर्याय (A) मुलगा

मुलगा या नामावरुन त्याचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते म्हणून मुलगा हा पुल्लिंगी शब्द आहे. मुलगी हा स्त्रीलिंगी शब्द आहे तर मूल हा नपुंसकलिंगी आहे. Important Points लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात. लिंग हे...

प्रश्न #94 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पर्यायात दिलेल्यापैकी कोणत्या नामाचे बहुवचन ए कारान्त होत नाही?
  • (A) दांडा
  • (B) ओढा
  • (C) पंखा
  • (D) दगड
अचूक उत्तर: पर्याय (D) दगड

वचन म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्यालाच वचन म्हणतात . त्याचे एकवचन व अनेकवचन असे दोन प्रकार पडतात . अनेकवचनाला बहुवचन असे सुद्धा म्हणतात . वचनाचे प्रकार : एकवचन अनेकवचन एकवचन : जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे...

प्रश्न #95 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन या कारान्त होते, या नियमात बसणारा शब्द निवडा.
  • (A) हत्ती
  • (B) चांदणी
  • (C) पक्षी
  • (D) विहीर
अचूक उत्तर: पर्याय (B) चांदणी

चांदणी या ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन चांदण्या असे होईल. Important Points आकारांतशिवाय इतर पुल्लिंगी नामची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात. उदा. हत्ती - हत्ती, पक्षी - पक्षी, देव - देव काही अ कारा न्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन आ कारान्त...

प्रश्न #96 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
कोणत्या शब्दाचे लिंग बदलताना इतरांपेक्षा वेगळा बदल होतो?
  • (A) भगवान
  • (B) कुंभार
  • (C) पाटील
  • (D) मालक
अचूक उत्तर: पर्याय (A) भगवान

संस्कृतमधून मराठीत आलेल्या भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप भगवती हे होईल तर कुंभार , पाटील आणि मालक या प्राणिवाचक शब्दास ईण प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रूपे अनुक्रमे कुंभारीण , पाटलीण आणि मालकीण अशी होतील म्हणून भगवान हे बरोबर उत्तर येईल...

प्रश्न #97 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दिवाळीत पणत्या लावतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा.
  • (A) एकवचन
  • (B) बहुवचन
  • (C) द्विवचन
  • (D) एकवचन आणि बहुवचन
अचूक उत्तर: पर्याय (B) बहुवचन

पणत्या हा अनेकवचन किंवा बहुवचन असलेला शब्द आहे. पणती या एकवचनी शब्दाचे अनेकवचन पणत्या असे होते. Key Points ई-कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन या - कारांत होते. उदा. नदी - नद्या, काठी - काठ्या, पणती - पणत्या, स्त्री - स्त्रिया इ. Additional...

प्रश्न #98 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील शब्दाचे लिंग ओळखा.
बर्फ
  • (A) पुल्लिंग
  • (B) स्त्रीलिंग
  • (C) नपुसकलिंग
  • (D) उभयलिंग
अचूक उत्तर: पर्याय (A) पुल्लिंग

Important Points लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात. लिंग हे तीन प्रकारचे आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे...

प्रश्न #99 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मान या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते?
  • (A) मान
  • (B) मानी
  • (C) माना
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) माना

उत्तर व स्पष्टीकरण - माना वचन- नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात. 'वचन' या शब्दाचा शब्दश: अर्थ बोलणे असा होतो. वचनाचे मुख्य २ प्रकार असतात- एकवचन अनेकवचन Important Points नियम- अ-कारान्त...

प्रश्न #100 📅 Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'वाचनालय' या शब्दाची संधी कशी सोडवाल?
  • (A) वाच + नालय
  • (B) वाचन + आलय
  • (C) वाचना + आलय
  • (D) वाचन + अलय
अचूक उत्तर: पर्याय (B) वाचन + आलय

वाचनालय हे दीर्घत्व स्वरसंधीचे उदाहरण आहे. वाचनालय = वाचन + आलय (अ + आ = आ) वरील उदाहरणात दोन सजातीय स्वर लागोपाठ आले आहेत म्हणून हे दीर्घत्व स्वरसंधीचे उदाहरण होईल. दीर्घत्व संधी - दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स