⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

सार्वजनिक प्रशासन, शिक्षण व्यवस्था व प्रसारमाध्यमे (पृष्ठ 4)

Public Administration, Education System & Media — Indian Polity & Constitution

'सार्वजनिक प्रशासन, शिक्षण व्यवस्था व प्रसारमाध्यमे' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 177 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 4 / 9
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती 🎯 PCMC पिंपरी-चिंचवड

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 177)
प्रश्न #61 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
”भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये लींग असमानता” या अहवालात डीजिटल माध्यमांमध्ये महिला नेतृत्वाचे प्रमाण किती टक्के दाखविण्यात आले आहे ? (संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार)
EN According to the UN report titled 'Gender Inequality in Indian Media', what is the percentage of women in leadership roles in digital media?
  • (A) 26.30%
  • (B) 13.60%
  • (C) 20.90%
  • (D) 22.40%
अचूक उत्तर: पर्याय (A) 26.30%

अचूक उत्तर: पर्याय (१) 26.30% स्पष्टीकरण व विश्लेषण: * युएन वुमेन (UN Women) आणि न्यूजलाँड्री (Newslaundry) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'जेंडर इनइक्वॅलिटी इन इंडियन मीडिया' (Gender Inequality in Indian Media) या...

प्रश्न #62 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ अमरकंटक, केंव्हा कार्यरत झाले?
EN When did the Indira Gandhi National Tribal University (IGNTU), Amarkantak become functional / start operating?
  • (A) जुलै - 2007
  • (B) जून - 2006
  • (C) जून - 2008
  • (D) जुलै - 2008
अचूक उत्तर: पर्याय (D) जुलै - 2008

अचूक उत्तर: पर्याय (४) जुलै - 2008 स्पष्टीकरण: • इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ (IGNTU): हे केंद्रीय विद्यापीठ अमरकंटक (अनूपपूर जिल्हा, मध्य प्रदेश) येथे स्थित आहे. • संसदेने 'इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ कायदा, २००७' (Indira...

प्रश्न #63 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
सर्व शिक्षा अभियाना' च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) त्याचा प्रारंभ 2001 मध्ये झाला.
ब) त्याचा प्रारंभ हा प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण साध्य करण्यासाठी झालेला आहे.
क) 'पढ़े भारत बढ़े भारत' हा सर्व शिक्षा अभियानाचा उप-कार्यक्रम आहे.
ड) 'शिक्षण' (Shikshan) या नावाचे सरकारी द्वार (portal) हे सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाच्या निरीक्षणासाठी सुरु केले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
EN Consider the following statements regarding 'Sarva Shiksha Abhiyan':
(a) It commenced in 2001.
(b) It was launched to achieve universalisation of elementary education.
(c) 'Padhe Bharat Badhe Bharat' is a sub-programme of Sarva Shiksha Abhiyan.
(d) A government portal named 'Shikshan' was launched for monitoring the Sarva Shiksha Abhiyan programme.
Which of the statements given above are correct?
  • (A) अ, ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) क आणि ड फक्त
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब आणि क

अचूक उत्तर: पर्याय (१) अ, ब आणि क स्पष्टीकरण: सर्व शिक्षा अभियानाबाबत (SSA) विधानांचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात २००१ मध्ये (२००१-०२ या आर्थिक वर्षात) पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झाली. • विधान...

प्रश्न #64 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
अनुसूचित जातीच्या मुलांमध्ये शैक्षणिक मागासलेपणाची कारणे ________ आहेत.
अ) दारिद्रय
ब) शारीरिक व सामाजिक विलगता
क) शाळेमध्ये सहज प्रवेशाचा अभाव
ड) इच्छाशक्तीचा अभाव
इ) निम्न मानसिकता
पर्यायी उत्तरे :
EN The reasons for educational backwardness among Scheduled Caste children are ________.
(a) Poverty
(b) Physical and social isolation
(c) Lack of easy access to schools
(d) Lack of willpower
(e) Inferior mindset
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त ब, ड, इ
  • (C) फक्त ब, क, ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब, क

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ, ब, क स्पष्टीकरण: • अनुसूचित जातीच्या (Scheduled Castes) बालकांमधील शैक्षणिक मागासलेपणाची प्रमुख कारणे सामाजिक-आर्थिक व पायाभूत सुविधांशी निगडित आहेत: - दारिद्र्य (अ): कुटुंबाची आर्थिक विषमता, बालमजुरीची अपरिहार्यता आणि...

प्रश्न #65 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
कोठारी आयोगाने अनुसूचित जमातीच्या शिक्षणाबाबत कोणत्या शिफारशी केल्या आहेत?
अ) करिअर किंवा नोकरीभिमुख अभ्यासक्रमांवर भर दिला पाहिजे.
ब) शिक्षणातील लिंग विषमता दूर करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.
क) पालकांमध्ये दृष्टीकोन बदल घडवून आणण्यासाठी पथनाट्य, शिबीरे, समुपदेशन सत्र यासारख्या जागृती मोहिमा.
ड) जे, आदिवासी संस्कृती आणि पद्धती समजून घेतात आणि त्यांचा आदर करतात अशा शिक्षकांची स्थानिक पातळीवर भरती केली पाहिजे.
वरीलपैकी कोणत्या शिफारशी बरोबर आहेत?
EN Which recommendations were made by the Kothari Commission regarding the education of Scheduled Tribes?
(a) Emphasis should be placed on career- or job-oriented courses.
(b) Greater focus should be placed on eliminating gender disparities in education.
(c) Awareness campaigns such as street plays, camps, and counselling sessions to bring about an attitudinal change among parents.
(d) Teachers who understand and respect tribal culture and practices should be recruited locally.
Which of the above recommendations are correct?
  • (A) अ, ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ आणि ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

अचूक उत्तर: पर्याय (४) वरील सर्व स्पष्टीकरण: कोठारी आयोगाने (१९६४-६६) अनुसूचित जमातींच्या (आदिवासी) शिक्षणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी व्यापक शिफारशी केल्या होत्या: • करिअर व नोकरीभिमुख अभ्यासक्रम (अ): आदिवासी तरुणांसाठी रोजगाराभिमुख आणि व्यावसायिक...

प्रश्न #66 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
पूर्व शालेय शिक्षण आणि नावनोंदणी सुविधा - सर्व शिक्षा अभियानाच्या या उद्देशाची अंमलबजावणी कोणते मंत्रालय करते?
EN Pre-school education and enrollment facility - which Ministry implements this objective of Sarva Shiksha Abhiyan?
  • (A) मनुष्यबळ संसाधन विकास मंत्रालय
  • (B) महिला व बाल विकास मंत्रालय
  • (C) आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) महिला व बाल विकास मंत्रालय

अचूक उत्तर: पर्याय (२) महिला व बाल विकास मंत्रालय स्पष्टीकरण: • सर्व शिक्षा अभियानांतर्गत (SSA) प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी पूर्व-शालेय शिक्षण (Pre-school education) आणि बालकांची पूर्वतयारी ही अत्यंत महत्त्वाची मानली गेली. • मात्र...

प्रश्न #67 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
शिक्षणातील माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाचे तोटे ________ आहेत.
अ) सर्वत्र सुसाध्य नाही
ब) तंत्रज्ञानाचा गैरवापर
क) कागदविरहीत (Paperless)
ड) चूकीची व दिशाभूल करणारी माहिती
योग्य पर्याय :
EN The disadvantages of Information and Communication Technology in education are ________.
(a) Not accessible everywhere
(b) Misuse of technology
(c) Paperless
(d) Incorrect and misleading information
Correct option:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) अ, ब आणि ड
  • (C) ब, क आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (२) अ, ब आणि ड स्पष्टीकरण: शिक्षणातील माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाच्या (ICT) तोट्यांचे विश्लेषण: • विधान (अ) तोटा आहे: सर्वत्र सुसाध्य नाही (डिजिटल डिव्हाईड, ग्रामीण व दुर्गम भागात इंटरनेट आणि उपकरणांची कमतरता). • विधान (ब)...

प्रश्न #68 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
यशपाल समितीने 1993 मध्ये सादर केलेल्या अहवालाचे शीर्षक कोणते होते?
EN What was the title of the report submitted by the Yashpal Committee in 1993?
  • (A) स्कूल चले हम
  • (B) पॉलिसी ऑन स्कूल बॅग
  • (C) लर्निंग विदाऊट बर्डन
  • (D) एज्युकेशन ऑन देअर बॅक्स
अचूक उत्तर: पर्याय (C) लर्निंग विदाऊट बर्डन

प्रश्न #69 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 2019 मसुद्यासाठी स्थापित समितीच्या अध्यक्षस्थानी कोण होते?
EN Who chaired the Committee constituted for drafting the National Education Policy 2019?
  • (A) मंजुळ भार्गव
  • (B) वसुधा कामत
  • (C) के. कस्तुरीरंगन
  • (D) एम.के. श्रीधर
अचूक उत्तर: पर्याय (C) के. कस्तुरीरंगन

अचूक उत्तर: पर्याय (३) के. कस्तुरीरंगन स्पष्टीकरण: • केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जून २०१७ मध्ये भारताचे प्रख्यात अंतराळ शास्त्रज्ञ व इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोलणाच्या...

प्रश्न #70 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या गुणवत्ता हस्तक्षेपाच्या बाबी कोणत्या आहेत?
अ) विज्ञान, गणित व इंग्रजी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणे
ब) अध्यापन अध्ययन सुधारणा
क) शाळेमध्ये महिला शिक्षकांचे आधिक्य
ड) ICT आधारित शिक्षण
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following are the quality intervention components of Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyan (RMSA)?
(a) Focus on science, mathematics and English education
(b) Teaching-learning reforms
(c) Preponderance / excess of female teachers in schools
(d) ICT-aided education
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त अ, ब, ड
  • (C) फक्त अ, क, ड
  • (D) फक्त ब, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त अ, ब, ड

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त अ, ब, ड स्पष्टीकरण: राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत (RMSA) माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी खालील प्रमुख गुणवत्ता हस्तक्षेपांच्या बाबी (Quality Interventions) राबविण्यात आल्या: • विधान (अ) बरोबर: विज्ञान...

प्रश्न #71 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
वंचित घटकाच्या नाव नोंदणी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वृद्धि करण्यासाठी कोणत्या योजना शासनाने राबविल्या आहेत?
अ) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम
ब) सर्व शिक्षा अभियान
क) राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
ड) लोक जुम्बीश
पर्यायी उत्तरे:
EN Which schemes were implemented by the Government to enhance enrollment and quality of education among disadvantaged sections?
(a) District Primary Education Programme (DPEP)
(b) Sarva Shiksha Abhiyan (SSA)
(c) Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyan (RMSA)
(d) Lok Jumbish
Alternative answers:
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त अ, ब, ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

अचूक उत्तर: पर्याय (४) वरील सर्व स्पष्टीकरण: शिक्षणातील वंचित घटकांच्या (SC, ST, मुली, अल्पसंख्याक आणि ग्रामीण दुर्बल घटक) नावनोंदणी आणि गुणवत्तेसाठी शासनाने खालील सर्व प्रमुख योजना राबविल्या: • (अ) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम (DPEP - १९९४)...

प्रश्न #72 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 1968 च्या शिफारसी आहेत :
अ) सर्व 14 वर्षा पर्यंतच्या मुला-मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करुन देणे.
ब) राज्य सरकारांनी शाळा पातळीवर त्रिभाषा सूत्राचा स्वीकार करावा.
क) सामाजिक संक्रमणाला चालना देण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर भर द्यावा.
ड) अंशकालीन शिक्षण व अंशकालीन अभ्यासक्रमांना समान दर्जा देणे.
इ) राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिमान्यता परिषदेची स्थापना करणे.
वरीलपैकी कोणत्या शिफारसी योग्य आहेत?
EN Recommendations of the National Policy on Education, 1968 include:
(a) Providing free and compulsory education to all boys and girls up to 14 years of age.
(b) State Governments should adopt the three-language formula at the school level.
(c) Emphasis on girls' education to promote social transformation.
(d) Equal status for part-time education and correspondence courses.
(e) Establishing the National Assessment and Accreditation Council (NAAC).
Which of the above recommendations are correct?
  • (A) फक्त अ, ब, क, इ
  • (B) फक्त ब, क, ड, इ
  • (C) फक्त अ, क, ड, इ
  • (D) फक्त अ, ब, क, ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ, ब, क, ड

अचूक उत्तर: पर्याय (४) फक्त अ, ब, क, ड स्पष्टीकरण: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९६८ (NPE 1968 - इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात, कोठारी आयोगाच्या अहवालानुसार) मधील शिफारसींचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: १४ वर्षांपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना मोफत व...

प्रश्न #73 📅 Rajyaseva Mains 2020
+1.0 / -0.25
2019 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यानुसार शालेय शिक्षणाचा कोणता आराखडा सुचविण्यात आला आहे?
EN According to the draft National Education Policy 2019, which school education structure was recommended?
  • (A) 6 + 4 + 2 + 3
  • (B) 5 + 3 + 3 + 4
  • (C) 5 + 3 + 2 + 2 + 3
  • (D) 6 + 3 + 3 + 3
अचूक उत्तर: पर्याय (B) 5 + 3 + 3 + 4

अचूक उत्तर: पर्याय (२) 5 + 3 + 3 + 4 स्पष्टीकरण: • डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मसुदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ (Draft NEP 2019) मध्ये जुन्या १०+२ या शालेय आराखड्याऐवजी '५ + ३ + ३ + ४' हा नवीन अभ्यासक्रम आणि शैक्षणिक आराखडा...

प्रश्न #74 📅 ASO Mains 2020
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते नगरपालाच्या बाबतीत सत्य नाही ?
EN Which of the following is NOT true regarding the Sheriff (Nagarpal)?
  • (A) मुंबईच्या नगरपाल (शेरिफ) कार्यालयाची स्थापना लेटर्स पेटंट अॅक्ट 1823 अनुसार झालेली आहे.
  • (B) या पदाचा कार्यकाल एक वर्षा करीता असतो.
  • (C) मुंबईचे नगरपाल हे वैधानिक दर्जा नसलेले परंतु प्रतिष्ठा असलेले पद आहे.
  • (D) भारतातील फक्त मुंबई याच शहरात नगरपाल हे पद आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) भारतातील फक्त मुंबई याच शहरात नगरपाल हे पद आहे.

प्रश्न #75 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
भाषण व मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्यावर कोणत्या कारणासाठी प्रसंगी मर्यादा घालणे अपरिहार्य ठरले?
अ) राज्याच्या सुरक्षिततेसाठी
ब) आणिबाणीच्या अंमलबजावणीसाठी
क) सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नितीमत्ता यासाठी
ड) सार्वजनिक निवडणूका काटेकोर व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी
पर्यायी उत्तरे:
EN On what grounds has it been deemed necessary to place reasonable restrictions on the freedom of speech and expression?
a) For the security of the State
b) For the implementation of emergency
c) For public order, decency, and morality
d) For conducting public elections strictly and impartially
Alternative answers:
  • (A) अ, क आणि ड विधाने बरोबर आहेत.
  • (B) अ, ब आणि ड विधाने बरोबर आहेत.
  • (C) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.
  • (D) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (४) वरील सर्व विधाने बरोबर आहेत. स्पष्टीकरण व विश्लेषण: भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील (कलम १९(१)(क)) घटनात्मक व कायदेशीर बंधने: * विधान (अ) व (क) बरोबर: भारतीय राज्यघटनेच्या कलम १९(२) नुसार भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर...

प्रश्न #76 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
जानेवारी 2016, मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीप्रमाणे येथील केंद्रीय बौद्ध अभ्यास संस्थेला पाच वर्षासाठी अस्थायी स्वरूपात अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.
EN As per news published in January 2016, the Central Institute of Buddhist Studies located here was granted deemed university status provisionally for five years:
  • (A) पाटणा
  • (B) बोधगया
  • (C) लेह (लडाख)
  • (D) हैद्राबाद
अचूक उत्तर: पर्याय (C) लेह (लडाख)

अचूक उत्तर: पर्याय (३) लेह (लडाख) स्पष्टीकरण: • केंद्रीय बौद्ध अभ्यास संस्था (Central Institute of Buddhist Studies - CIBS): ही स्वायत्त संस्था लेह (लडाख) येथे स्थित आहे. • मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जानेवारी २०१६ मध्ये UGC कायदा १९५६ च्या कलम ३...

प्रश्न #77 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य कोणत्या संघटनेशी संबंधित आहे?
EN With which organization is the motto 'Educate, Agitate and Organise' for the development of the backward class society associated?
  • (A) बहिष्कृत हितकारणी सभा
  • (B) दलित शोषित समाज संघर्ष समिती
  • (C) समता सैनिक दल
  • (D) यांपैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) बहिष्कृत हितकारणी सभा

अचूक उत्तर: पर्याय (१) बहिष्कृत हितकारणी सभा स्पष्टीकरण: • बहिष्कृत हितकारणी सभा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. • या संस्थेचे जगप्रसिद्ध ब्रीदवाक्य 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा'...

प्रश्न #78 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींसाठी पुढीलपैकी कोणती कारणे जबाबदार आहेत?
अ) देशाच्या दुर्गम भागांमध्ये शाळांची उपलब्धता नसणे.
ब) शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधांचा अभाव
क) इयत्ता चौथीच्या आसपास शाळा सोडण्याचे अतिरिक्त प्रमाण, विशेषत: मुलींमधील
ड) शैक्षणिक दर्जातील घसरण
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following reasons are responsible for the deficiencies in the post-independence education system in India?
(a) Non-availability of schools in remote parts of the country.
(b) Lack of necessary basic amenities in schools.
(c) Excessive dropout rate around Class IV, especially among girls.
(d) Decline in academic standards.
Alternative answers:
  • (A) वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत.
  • (B) वरीलपैकी सर्व पर्याय चुकीचे आहेत.
  • (C) केवळ अ, ब व क बरोबर आहेत.
  • (D) केवळ ब, क व ड बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (१) वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. स्पष्टीकरण: स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि आव्हानांचे विश्लेषण: • (अ) दुर्गम भागांत शाळांची अनुपलब्धता: देशातील ग्रामीण, डोंगरी आणि आदिवासी भागात पुरेशा प्राथमिक व...

प्रश्न #79 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
शिक्षणाचा अधिकार, 2009 नुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेत समावेश आहे :
अ) 50% महिला सदस्य
ब) दोन विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थीनी
क) आर्थिक व सामाजिक मागास पालकांचे प्रतिनिधित्व
ड) शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
इ) उच्च शिक्षित व्यक्तींचे प्रतिनिधित्व
योग्य पर्याय निवडा:
EN According to the Right to Education Act, 2009, the composition of the School Management Committee includes:
(a) 50% women members
(b) Participation of two students (including a girl student)
(c) Representation of economically and socially disadvantaged parents
(d) Education Officer (Primary)
(e) Representation of highly educated individuals
Select the correct option:
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त क, ड, इ
  • (D) फक्त ब, ड, इ
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब, क

अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त अ, ब, क स्पष्टीकरण: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ च्या कलम २१ नुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) रचनेचे विश्लेषण: • विधान (अ) समाविष्ट आहे: समितीतील सदस्यांपैकी किमान ५०% सदस्य महिला असणे...

प्रश्न #80 📅 Rajyaseva Mains 2019
+1.0 / -0.25
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची (RMSA) अंमलबजावणी कोणत्या साली सुरू झाली?
EN In which year did the implementation of Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyan (RMSA) begin?
  • (A) 2008
  • (B) 2009
  • (C) 2010
  • (D) 2011
अचूक उत्तर: पर्याय (B) 2009

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स