⚖️ भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था • TOPIC PRACTICE HUB

सार्वजनिक प्रशासन, शिक्षण व्यवस्था व प्रसारमाध्यमे (पृष्ठ 8)

Public Administration, Education System & Media — Indian Polity & Constitution

'सार्वजनिक प्रशासन, शिक्षण व्यवस्था व प्रसारमाध्यमे' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 177 MCQs
विषय विभाग राज्यशास्त्र व पंचायत राज
पृष्ठ क्रमांक 8 / 9
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 महानगरपालिका 🎯 BMC मुंबई भरती 🎯 PCMC पिंपरी-चिंचवड

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 141 ते 160 (एकूण 177)
प्रश्न #141 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
पुढील विधाने वाचून 'प्रसार भारती' विषयी योग्य विधाने निवडा.
अ) वैधानिक स्वायत्त मंडळ आहे.
ब) 1977 मध्ये प्रसार भारतीची स्थापना झाली.
क) आकाशवाणी, दूरदर्शन आणि FM केंद्रे प्रसारभारतीच्या स्थापनेनंतर तिचे घटक बनले आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN Read the following statements and select the correct statement(s) regarding 'Prasar Bharati':
a) It is a statutory autonomous corporation.
b) Prasar Bharati was established in 1977.
c) All India Radio, Doordarshan, and FM stations became its constituents upon the establishment of Prasar Bharati.
Alternative answers:
  • (A) अ, ब, क
  • (B) अ
  • (C) क आणि ब
  • (D) अ आणि ब
अचूक उत्तर: पर्याय (B) अ

अचूक उत्तर: पर्याय (२) अ स्पष्टीकरण व विश्लेषण: प्रसार भारती (Prasar Bharati - Broadcasting Corporation of India) संदर्भातील तथ्ये: * विधान (अ) बरोबर: प्रसार भारती ही संसदेच्या 'प्रसार भारती कायदा, १९९०' अन्वये स्थापन झालेली भारताची वैधानिक स्वायत्त...

प्रश्न #142 📅 ASO Mains 2014
+1.0 / -0.25
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचलनालय ....... मध्ये आहे.
EN The Directorate of Technical Education (DTE), Maharashtra State is located in .........
  • (A) मुंबई
  • (B) पुणे
  • (C) नागपूर
  • (D) वाशी
अचूक उत्तर: पर्याय (A) मुंबई

अचूक उत्तर: पर्याय (१) मुंबई स्पष्टीकरण: • महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचलनालय (Directorate of Technical Education - DTE, Maharashtra): • हे संचलनालय महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कार्यरत असून त्याचे मुख्य प्रशासकीय कार्यालय...

प्रश्न #143 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींच्या शिक्षणासंबंधी पुढील विधाने वाचून त्यापैकी अयोग्य विधान शोधा.
EN Read the following statements regarding the education of persons with disabilities and identify the incorrect statement:
(1) Under the Deendayal Disabled Rehabilitation Scheme, the Department of Social Justice and Empowerment provides financial assistance to NGOs for running special schools.
(2) 500 fresh scholarships are awarded every year from the National Fund for People with Disabilities.
(3) The Rajiv Gandhi National Fellowship is a scholarship scheme for disabled students to pursue primary education along with medical aid.
(4) Inclusive Education for the Disabled at Secondary Stage (IEDSS) was launched replacing the earlier scheme of Integrated Education for Disabled Children (IEDC).
  • (A) दीनदयाळ अपंगत्व पुनर्वसन योजनेअंतर्गत विशेष शाळा सुरू करण्यासाठी बिगर शासकीय संघटनांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खाते आर्थिक सहाय्य देत आहे.
  • (B) अपंग लोकांसाठीच्या राष्ट्रीय निधीमधून प्रत्येक वर्षी 500 नव्या शिष्यवृत्ती देण्यात येतात.
  • (C) राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण, वैद्यकीय मदतीसह घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना आहे.
  • (D) माध्यमिक स्तरावर अपंगांना शिक्षणात समाविष्ट करणारी योजना सुरू करण्यात आली असून ही योजना पूर्वीच्या अपंग मुलांना एकात्मिक शिक्षण या योजनेऐवजी सुरू करण्यात आली आहे.
अचूक उत्तर: पर्याय (C) राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण, वैद्यकीय मदतीसह घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना आहे.

अचूक उत्तर: पर्याय (३) राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण, वैद्यकीय मदतीसह घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना आहे. स्पष्टीकरण: दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणासंबंधी विधानांचे विश्लेषण: • विधान १, २ आणि ४ बरोबर...

प्रश्न #144 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा.
अ) सावित्रीबाई ज्योतीराव फुले पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांना दिला जातो.
ब) हा पुरस्कार सावित्रीबाई फुलेंच्या 150 व्या जयंतीचा योग साधून सुरू करण्यात आला.
क) हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी वय 50 वर्ष पूर्ण असावे लागले.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
EN Consider the following statements:
(a) The Savitribai Jyotirao Phule Award is conferred upon men and women who have done substantial work in the educational sphere.
(b) This award was instituted on the occasion of the 150th birth anniversary of Savitribai Phule.
(c) The candidate must have completed 50 years of age to receive this award.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) क आणि अ
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) ब आणि क

अचूक उत्तर: पर्याय (२) ब आणि क स्पष्टीकरण: सावित्रीबाई फुले पुरस्काराबाबत विधानांचे विश्लेषण: • विधान (अ) चुकीचे आहे: महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हा केवळ शिक्षण, समाजसेवा व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय...

प्रश्न #145 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) ज्या चित्रपटांना 'UA' दाखला आहे ते 12 ते 18 वयाची मुले केवळ आई/वडिलांसोबत पाहू शकतात.
ब) ज्या चित्रपटांना 'S' दाखला आहे ती केवळ विशिष्ट गटांसाठीच असतात.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements is correct?
(a) Films certified 'UA' can be viewed by children aged 12 to 18 only along with parents.
(b) Films certified 'S' are restricted to specialized audiences only.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्हीही नाही
  • (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब स्पष्टीकरण: केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC - सेन्सॉर बोर्ड) प्रमाणपत्रांचे वर्गीकरण: • विधान (अ) चुकीचे आहे: सिनेमॅटोग्राफ कायदा, १९५२ नुसार 'UA' (Unrestricted Public Exhibition with Parental Guidance)...

प्रश्न #146 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
खालील वाक्ये पहा.
अ) सर्व शिक्षा अभियान 2001 साली सुरू करण्यात आले.
ब) सर्व शिक्षा अभियानाचा एक उद्देश 80% नोंदणी करणे हा आहे.
क) 'प्राथमिक शिक्षणात मुले आणि मुली यांच्यातील तफावत भरून काढणे' हाही सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश आहे.
कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements:
(a) Sarva Shiksha Abhiyan was launched in the year 2001.
(b) One objective of Sarva Shiksha Abhiyan is to achieve 80% enrolment.
(c) 'Bridging gender and social category gaps in elementary education' is also an objective of Sarva Shiksha Abhiyan.
Which statements are correct?
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क

अचूक उत्तर: पर्याय (३) अ आणि क स्पष्टीकरण: सर्व शिक्षा अभियानाबाबत (SSA) विधानांचे विश्लेषण: • विधान (अ) बरोबर आहे: सर्व शिक्षा अभियान अधिकृतपणे २००१ मध्ये सुरू करण्यात आले. • विधान (ब) चुकीचे आहे: सर्व शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट ८०% नोंदणी नसून १००%...

प्रश्न #147 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
व्यावसायिक शिक्षणसंस्थामधील रिक्त जागांचे विश्लेषण करण्यास्तव स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींबाबत पुढील दोन विधानांपैकी काय खरे आहे?
अ) नव्या तंत्रशिक्षण संस्थांना परवानगी देऊ नये, केवळ सद्यस्थिती संस्थांना जागा वाढविण्यास अनुमती द्यावी.
ब) हॉटेल व्यवस्थापन व कॅटरिंग तंत्रशिक्षण वगळूण इतर एमबीए अभ्यासक्रमातील प्रवेश क्षमता कमी करावी.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following two statements is true regarding the recommendations of the committee appointed to analyse vacant seats in professional educational institutions?
(a) New technical education institutions should not be granted permission; only existing institutions should be permitted to increase seats.
(b) Except for hotel management and catering technology, intake capacity in other MBA courses should be reduced.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) एकही नाही
  • (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (C) एकही नाही

अचूक उत्तर: पर्याय (३) एकही नाही स्पष्टीकरण: • महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन व व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त राहणाऱ्या जागांचे विश्लेषण करण्यासाठी शासनाने तज्ज्ञ समिती नेमली होती. • विधाने (अ) आणि (ब) चुकीची आहेत...

प्रश्न #148 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा :
अ) महाकवी कालिदास संस्कृत साधन पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे संस्कृत दिनी दिला जातो हा दिवस बुद्ध पौर्णिमेला पडतो.
ब) संपूर्ण महाराष्ट्रातून सात आणि महाराष्ट्राबाहेरील एक अशा एकूण आठ व्यक्तींना पुरस्कार दिले जातात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements:
(a) Mahakavi Kalidas Sanskrit Sadhana Award is conferred by the Government of Maharashtra on Sanskrit Day, which falls on Buddha Purnima.
(b) A total of eight individuals are conferred the award: seven from Maharashtra and one from outside Maharashtra.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) एकही नाही
  • (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब स्पष्टीकरण: • विधान (अ) चुकीचे आहे: महाराष्ट्र शासनाचा 'महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार' हा संस्कृत दिनी प्रदान केला जातो; परंतु संस्कृत दिन हा श्रावण पौर्णिमेला (रक्षाबंधन) येतो, 'बुद्ध पौर्णिमेला' (वैशाख...

प्रश्न #149 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
'एक शैक्षणिक पोर्टल (प्रवेशद्वार)' या स्वरूपात देशातील नागरिकांचे अध्यापन आणि शिकण्याची क्रिया सुधारण्यासाठी आजवर वंचित राहिलेल्या समाजगटांपर्यंत, ग्रामीण/अल्पविकसित भागात पोहोचवण्यासाठी आणि एकूणच उच्च शिक्षणातील नावनोंदणी संख्या वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पोर्टलचे नाव.
EN What is the name of the portal launched as 'an educational portal' to improve teaching and learning for citizens, reach previously marginalized sections and rural/underdeveloped areas, and enhance overall enrolment in higher education?
  • (A) 'साक्षर'
  • (B) 'शिक्षा'
  • (C) 'साक्षत'
  • (D) 'सशक्त'
अचूक उत्तर: पर्याय (C) 'साक्षत'

अचूक उत्तर: पर्याय (३) 'साक्षत' स्पष्टीकरण: • 'साक्षात' (SAKSHAT) शैक्षणिक पोर्टल: केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ३० ऑक्टोबर २००६ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते 'साक्षात' या मोफत शैक्षणिक पोर्टलचे...

प्रश्न #150 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
सर्व शिक्षा अभियाना (SSA) संबंधी पुढील विधाने वाचा आणि त्याविषयी चुकीचे विधान पुढील विधानांतून शोधा.
EN Read the following statements regarding Sarva Shiksha Abhiyan (SSA) and identify the incorrect statement:
(1) It is the primary vehicle for implementing the Right to Education Act and is the largest initiative of its kind in the world.
(2) The aim behind implementing this mission is to bridge social and gender gaps across primary, secondary, and higher education.
(3) Special efforts have been made to reach girls and boys belonging to SC/ST and Muslim minority communities.
(4) Teacher training regarding autism and remedial support has also been incorporated into it.
  • (A) शिक्षेचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीचे हे प्रमुख साधन आहे आणि हा या स्वरूपाचा जगातील सर्वात मोठा उपक्रम आहे.
  • (B) हे अभियान राबविण्या मागचा हेतू प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणातील सामाजिक आणि लिंगावर आधारीत दरी कमी करणे हा आहे.
  • (C) एस.सी/एस.टी आणि मुस्लिम अल्पसंख्यांक समुदायाशी संबंधित मुली आणि मुले यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.
  • (D) या मध्ये ऑटिझम (Autism) आणि रोग निवारक सहकार्य यासंबधी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) हे अभियान राबविण्या मागचा हेतू प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणातील सामाजिक आणि लिंगावर आधारीत दरी कमी करणे हा आहे.

अचूक उत्तर: पर्याय (२) हे अभियान राबविण्या मागचा हेतू प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणातील सामाजिक आणि लिंगावर आधारीत दरी कमी करणे हा आहे. स्पष्टीकरण: सर्व शिक्षा अभियानाबाबत (SSA) विधानांचे विश्लेषण: • विधान १, ३ आणि ४ बरोबर आहेत: SSA हे RTE...

प्रश्न #151 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) सन 1964 साली नियुक्त झालेल्या मुदलियार आयोगाने प्रथम 15 वर्षाच्या त्रिस्तरीय अभ्यासक्रमाबाबत शिफारशी केल्या.
(1) पहिली ते दहावी प्राथमिक व माध्यमिक
(2) अकरावी व बारावी उच्च माध्यमिक
(3) पदवी शिक्षण तीन वर्षीय
ब) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आयोगाने विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रमाबाबत शिफारशी केल्या.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following two statements is correct?
(a) The Mudaliar Commission appointed in 1964 first recommended a 15-year three-tier curriculum structure: (1) Classes 1 to 10 primary and secondary, (2) Classes 11 and 12 higher secondary, (3) 3-year undergraduate degree education.
(b) Dr. Sarvepalli Radhakrishnan Commission made recommendations regarding university-level curricula.
Alternative answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) एकही नाही
  • (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब

अचूक उत्तर: पर्याय (२) फक्त ब स्पष्टीकरण: • विधान (अ) चुकीचे आहे: १०+२+३ (पहिली ते दहावी + अकरावी-बारावी + तीन वर्षांची पदवी) या १५ वर्षांच्या त्रिस्तरीय अभ्यासक्रमाची शिफारस १९६४ मध्ये नियुक्त झालेल्या कोठारी आयोगाने केली होती (मुदलियार आयोगाने...

प्रश्न #152 📅 Rajyaseva Mains 2014
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने शिक्षण शुल्क समिती आणि प्रवेश नियंत्रण समितीची स्थापना केली.
ब) प्रवेश नियंत्रण समितीमध्ये एक सदस्य चार्टर्ड अकाऊटंट असावेत.
क) प्रवेश शुल्क समितीमध्ये एक सदस्य विद्यापीठाचे कुलगुरू असावेत.
ड) प्रत्येक समितीत 5 पेक्षा जास्त सदस्य असू नयेत.
योग्य पर्याय निवडा :
EN Which of the following statements are correct?
(a) Pursuant to Supreme Court orders, the Government of Maharashtra established the Shikshan Shulka Samiti (Fee Regulatory Committee) and Pravesh Niyantran Samiti (Admission Regulatory Committee).
(b) One member in the Admission Regulatory Committee must be a Chartered Accountant.
(c) One member in the Fee Regulatory Committee must be a University Vice-Chancellor.
(d) Each committee shall not have more than 5 members.
Select the correct option:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) क आणि ड
  • (D) अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (४) अ आणि ड स्पष्टीकरण: • विधान (अ) बरोबर आहे: सर्वोच्च न्यायालयाच्या 'इस्लामिक ॲकॅडमी' (२००३) आणि 'पी. ए. इनामदार' (२००५) निकालांनुसार खाजगी विनाअनुदानित व्यावसायिक महाविद्यालयांमधील अनिर्बंध शुल्क आकारणी आणि प्रवेश प्रक्रियेवर...

प्रश्न #153 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालील बाबींचा विचार करा.
अ) राष्ट्रीय साक्षरता मोहीम आता साक्षर भारत म्हणून ओळखली जाते.
ब) प्रमुख भर प्रौढ साक्षरतेवर आहे.
क) प्रधान लक्ष्य 15 वर्षावरील प्रौढ गटाच्या कार्यान्वित (Functional) साक्षरतेवर आहे.
ड) व्यावसायिक कार्यक्रमांपेक्षा मुळ शैक्षणिक कार्यक्रमांवर अधिक भर देणे हे सहउद्दिष्ट आहे.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements:
(a) The National Literacy Mission is now known as Saakshar Bharat.
(b) The primary focus is on adult literacy.
(c) The primary target is functional literacy for the adult group aged 15 years and above.
(d) A co-objective is giving greater emphasis to core academic programmes rather than vocational programmes.
Which statements above are correct?
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) क आणि ड
  • (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ आणि क

अचूक उत्तर: पर्याय (४) अ आणि क स्पष्टीकरण: • विधान (अ) बरोबर आहे: तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी (८ सप्टेंबर २००९) राष्ट्रीय साक्षरता मोहिमेचे (NLM) पुनर्गठन करून 'साक्षर भारत' (Saakshar Bharat) अभियान सुरू...

प्रश्न #154 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
राष्ट्रीय छात्र सेनेच्या (नॅशनल कॅडेट कोर्सच्या) पदवीधरांना लोक सेवा आयोगाची एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा (कम्बाइन्ड डिफेन्स सर्वीस परीक्षा) न देता केवळ (सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड) सेवा निवड मंडळाच्या मौखिक परीक्षेवर आधारून (कमिशन ऑफिसर) अधिकारी होता येते परंतु त्यांना पुढील बाबी आवश्यक आहेत.
EN National Cadet Corps (NCC) graduates can become commissioned officers without appearing for the UPSC Combined Defence Services Examination (CDSE), purely based on the Services Selection Board (SSB) interview; however, they require certain qualifications. Which of the following conditions is NOT required?
1: NCC 'C' Certificate
2: Minimum 'B' Grade in NCC
3: Degree with Physics and Mathematics
4: 60% marks in the degree examination
  • (A) राष्ट्रीय छात्र सेनेचा C दाखला.
  • (B) किमान B दर्जा
  • (C) भौतिकशास्त्र व गणितासह पदवी
  • (D) पदवी परीक्षेत 60% गुण वरील कोणती बाब आवश्यक नाही?
अचूक उत्तर: पर्याय (D) पदवी परीक्षेत 60% गुण वरील कोणती बाब आवश्यक नाही?

अचूक उत्तर: पर्याय (४) पदवी परीक्षेत 60% गुण वरील कोणती बाब आवश्यक नाही? स्पष्टीकरण: • NCC विशेष प्रवेश योजना (NCC Special Entry Scheme): NCC कॅडेट्सना UPSC ची CDS लेखी परीक्षा न देता थेट SSB मुलाखतीद्वारे लष्करात अधिकारी होण्याची संधी मिळते. • या...

प्रश्न #155 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालील विधानांचा विचार करा. आरक्षण योजना स्वयंसेवी संस्थांना लागू केली जात आहे ज्यांना
अ) भारताच्या कान्सॉलिडेटेड फंडमधून रु. 2 लाखापेक्षा अधिक ग्रांट मिळते.
ब) ज्या 10 पेक्षा अधिक इसमांना नियमीतपणे रोजगार देतात.
क) किमान 50% आवर्ती खर्च हा केंद्र शासनाच्या ग्रांट इन एड मधून होतो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements. The reservation scheme is applicable to non-governmental voluntary organizations which:
(a) Receive a grant of more than Rs. 2 lakh from the Consolidated Fund of India.
(b) Regularly employ more than 10 persons.
(c) Have at least 50% of recurring expenditure funded from Central Government grants-in-aid.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क

अचूक उत्तर: पर्याय (३) अ आणि क स्पष्टीकरण: • केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) नियमांनुसार स्वयंसेवी संस्थांमध्ये (NGOs) अनुसूचित जाती व जमातींसाठी आरक्षण धोरण लागू करण्याच्या अटी: - विधान (अ) बरोबर आहे: ज्या संस्थांना भारताच्या...

प्रश्न #156 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा.
अ) शिक्षण हे घटनेच्या सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूचीत अंतर्भूत आहे.
ब) उच्च शिक्षणात एकसमानता रहावी म्हणून केंद्र सरकार संस्थांना अनुदान देते.
क) अभिमत विद्यापीठांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळत नाही.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements:
(a) Education is included in the Concurrent List of the Seventh Schedule of the Constitution.
(b) The Central Government provides grants to institutions to maintain uniformity in higher education.
(c) Deemed universities do not receive grants from the Central Government.
Alternative answers:
  • (A) अ आणि ब बरोबर आहेत.
  • (B) ब आणि क बरोबर आहेत.
  • (C) अ आणि क बरोबर आहेत.
  • (D) अ, ब आणि क तिन्ही बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब बरोबर आहेत.

अचूक उत्तर: पर्याय (१) अ आणि ब बरोबर आहेत. स्पष्टीकरण: • विधान (अ) बरोबर आहे: भारतीय राज्यघटनेच्या ४२ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९७६ द्वारे शिक्षण हा विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीमध्ये (Concurrent List - प्रविष्टी २५) समाविष्ट करण्यात आला. • विधान...

प्रश्न #157 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
खालील विधाने पहा.
अ) राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना संशोधनात्मक अभ्यासासठी आर्थिक मदत देते.
ब) मनुष्य बळ विकास मंत्रालय ही योजना राबवणारी अग्रभागी संस्था आहे.
क) संशोधनात्मक अभ्यास एम.फिल आणि पी.एच.डी. साठी करता येऊ शकेल.
वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements:
(a) The Rajiv Gandhi National Fellowship scheme provides financial assistance to Scheduled Caste students for research studies.
(b) The Ministry of Human Resource Development is the nodal agency implementing this scheme.
(c) Research studies can be undertaken for M.Phil. and Ph.D.
Which of the statement(s) given above is/are correct?
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क

अचूक उत्तर: पर्याय (३) अ आणि क स्पष्टीकरण: • राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप (RGNF for SC Students): - विधान (अ) व (क) बरोबर आहेत: ही योजना अनुसूचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये एम.फिल. (M.Phil.) आणि पीएच.डी. (Ph.D.) या उच्च...

प्रश्न #158 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
पुढील दोन वाक्यांचा विचार करा. पहीले विधान आहे व दुसरे त्याचे कारण दिले आहे.
अ) स्वामी नारायण तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे स्थापन झाले.
ब) 14 जानेवारी 1994 पासून मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून झाले.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following two statements. The first is an assertion and the second is its reason:
Assertion (A): Swami Ramanand Teerth Marathwada University was established at Nanded.
Reason (R): From 14 January 1994, Marathwada University was renamed as Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University.
Alternative answers:
  • (A) अ बरोबर आहे व ब त्याचे योग्य कारण आहे.
  • (B) अ बरोबर आहे व ब त्याचे योग्य कारण नाही
  • (C) अ बरोबर ब नाही
  • (D) ब बरोबर अ नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) अ बरोबर आहे व ब त्याचे योग्य कारण आहे.

अचूक उत्तर: पर्याय (१) अ बरोबर आहे व ब त्याचे योग्य कारण आहे. स्पष्टीकरण: • ऐतिहासिक पार्श्वभूमी: १४ जानेवारी १९९४ रोजी तत्कालीन महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा नामविस्तार केला...

प्रश्न #159 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा भर खालीलपैकी कोणत्या विषयांवर आहे?
EN The Rashtriya Madhyamik Shiksha Abhiyan (RMSA) places special emphasis on which of the following subjects?
1: Science, Mathematics, Regional Language
2: Science, English Education, Computers
3: Science, Mathematics, Computers
4: Science, Mathematics, English Education
  • (A) विज्ञान, गणित, प्रादेशिक भाषा
  • (B) विज्ञान, इंग्रजी शिक्षण, संगणक
  • (C) विज्ञान, गणित, संगणक
  • (D) विज्ञान, गणित, इंग्रजी शिक्षण
अचूक उत्तर: पर्याय (D) विज्ञान, गणित, इंग्रजी शिक्षण

अचूक उत्तर: पर्याय (४) विज्ञान, गणित, इंग्रजी शिक्षण स्पष्टीकरण: • राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (RMSA): मार्च २००९ मध्ये सुरू झालेल्या या अभियानांतर्गत माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी (Quality Interventions) अभ्यासक्रमात तीन प्रमुख...

प्रश्न #160 📅 Rajyaseva Mains 2013
+1.0 / -0.25
स्त्रियांच्या स्थानाबाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
EN Which of the following statements is incorrect regarding the status of women?
(1) In the Vedic period, the status of women was superior to men.
(2) Matriarchal system was prevalent in some places.
(3) Restrictions were imposed on women as a result of Manusmriti.
(4) The status of women changed ever since the principle of division of labour was accepted.
  • (A) वैदिक काळात स्त्रियांचे स्थान पुरुषांपेक्षा श्रेष्ठ होते.
  • (B) मातृसत्ताक पद्धती काही ठिकाणी चालू होती.
  • (C) मनुस्मृतीचा परिणाम म्हणून स्त्रियांवर बंधने लादली गेली.
  • (D) कामाच्या विभाजनाचे तत्त्व मान्य केल्यापासून स्त्रियांच्या स्थानात बदल पडला.
अचूक उत्तर: पर्याय (A) वैदिक काळात स्त्रियांचे स्थान पुरुषांपेक्षा श्रेष्ठ होते.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स