📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP) (पृष्ठ 30)

MPSC Combined Prelims Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,000 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 30 / 50
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 जिल्हा न्यायालय 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 समाज कल्याण

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in MPSC संयुक्त पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))

14 उपघटक
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मूळ पेपर (दि. ०२ फेब, २०२५)
MPSC Group B Combined Preliminary Exam 2024 Official Paper (Held On: 02 Feb, 2025)
50 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर १ (मराठी व इंग्रजी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- I Marathi & English) Official Paper
75 प्रश्न
MPSC संयुक्त गट-ब व गट-क पूर्व परीक्षा २०२३ मूळ पेपर (दि. ३० एप्रिल, २०२३)
MPSC Group-B & Group-C Combined Preliminary Exam Official Paper (Held On 30 April, 2023)
65 प्रश्न
MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर २ (सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी)
MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- II General Awareness & Mental Ability) Official Paper
अभ्यासक्रम
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०५ नोव्हेंबर, २०२२)
MPSC Group C (2022) Prelims Official Paper (Held On: 5 Nov 2022)
95 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०८ ऑक्टोबर, २०२२)
MPSC Group B (2022) Prelims Official Paper (Held On: 8 Oct 2022)
71 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. ०३ एप्रिल, २०२२)
MPSC Group C (2021) Prelims Official Paper (Held On: 3 April 2022)
98 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. २६ फेब, २०२२)
MPSC Group B (2021) Prelims Official Paper (Held On: 26 Feb 2022)
60 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. १६ जून, २०१९)
MPSC Group C (2019) Prelims Official Paper (Held On: 16 June 2019)
100 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० मूळ पेपर (दि. ०४ सप्टें, २०२१)
MPSC Group B (2020) Prelims Official Paper (Held On: 4 Sep 2021)
96 प्रश्न
MPSC गट क पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १० जून, २०१८)
MPSC Group C (2018) Prelims Official Paper (Held On: 10 June 2018)
97 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ मूळ पेपर (दि. २४ मार्च, २०१९)
MPSC Group B (2019) Prelims Official Paper (Held On: 24 Mar 2019)
71 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१८ मूळ पेपर (दि. १३ मे, २०१८)
MPSC Group B (2018) Prelims Official Paper (Held On: 13 May 2018)
34 प्रश्न
MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१७ मूळ पेपर (दि. १६ जुलै, २०१७)
MPSC Group B (2017) Prelims Official Paper (Held On: 16 July 2017)
88 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 581 ते 600 (एकूण 1,000)
+1.0 / -0.25
अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त ______ इलेक्ट्रॉन असू शकतात.
EN The third shell of an atom can have a maximum of ______ electrons.
  • (A) 3
  • (B) 18
  • (C) 8
  • (D) 32
अचूक उत्तर: पर्याय (B) 18

📐 वापरलेले सूत्र: बोहर-बारी नियमानुसार कक्षेतील कमाल इलेक्ट्रॉन क्षमता (Maximum Electrons in a Shell): $N = 2n^2$ येथे तिसऱ्या कक्षेसाठी (M-कक्षा, $n = 3$): $N = 2 \times (3)^2 = 2 \times 9 = 18\text{ इलेक्ट्रॉन}$. योग्य उत्तर 18 आहे. 📌 Key Points...

+1.0 / -0.25
एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठाचे मिलर निर्देशांकाचे परिगणन करा:

2a, 3b, 4c
EN Calculate the Miller Indices of the Face having the following intercepts with the three axes perpendicular to each other :

2a, 3b, 4c
  • (A) 6, 4, 3
  • (B) 2, 3, 4
  • (C) 4, 6, 8
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) 6, 4, 3

📐 वापरलेले सूत्र: मिलर निर्देशांक परिगणन पद्धती (Miller Indices Calculation): १. स्फटिक अक्षांवरील अंतःछेद (Intercepts) $= 2a, 3b, 4c \implies 2, 3, 4$ २. छेदांचे व्यस्तांक (Reciprocals) $= \frac{1}{2}, \frac{1}{3}, \frac{1}{4}$ ३. अपूर्णांक...

+1.0 / -0.25
जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराइड मधून 100 A विद्युत प्रवाह 965 से, करिता प्रवाहित केला, तर (Na = 23, Cl = 35.5)
EN When a current of 100 A is passed through molten sodium chloride for 965 s, then( Na=23, Cl=35.5)
  • (A) 23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा कॅथोडवर निकास होईल.
  • (B) 23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा एनोड निकास होईल.
  • (C) 23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 17.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा एनोड निकास होईल.
  • (D) 23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 71 ग्रॅ. क्लोरीन वायुचा एनोड निकास होईल
अचूक उत्तर: पर्याय (C) 23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 17.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा एनोड निकास होईल.

📐 वापरलेले सूत्र: फॅराडेचा विद्युत अपघटनाचा पहिला नियम (Faraday's First Law of Electrolysis): विद्युतभार $Q = I \times t$ येथे, $I = 100\text{ A}, \; t = 965\text{ s}$ $Q = 100 \times 965 = 96,500\text{ C} = 1\text{ Faraday (F)}$ • कॅथोडवरील...

+1.0 / -0.25
प्लेटिहेल्मिंथसचे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे:
EN Platyhelminthes are best described as :
  • (A) फ्लॅटवर्म्स, ट्रिपलोब्लास्टिक, असिलोमेट प्राणी
  • (B) फ्लॅटवर्म्स, डिप्लोब्लाटिक, असिलोमेट प्राणी
  • (C) फ्लॅटवर्म्स, ट्रिपलोब्लास्टिक, सिलोमेट प्राणी
  • (D) फ्लॅटवर्म्स, ट्रिपलोब्लास्टिक, स्यूडोसिलोमेट प्राणी
अचूक उत्तर: पर्याय (A) फ्लॅटवर्म्स, ट्रिपलोब्लास्टिक, असिलोमेट प्राणी

योग्य उत्तर पर्याय 1 आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • संघ प्लेटिहेल्मिंथस हे ॲनिमॅलिया राज्याचे आहे. • जीवांना फ्लॅटवर्म्स असेही म्हणतात. • हे एकोलोमेट्स आहेत आणि त्यात अनेक मुक्त-जिवंत आणि परजीवी जीवन प्रकारांचा समावेश आहे...

+1.0 / -0.25
कुप्फरच्या पेशी यामध्ये आढळतात:
EN Kupffer’s cells occur in
  • (A) मेंदू
  • (B) मुत्रपिंड
  • (C) यकृत
  • (D) प्लीहा
अचूक उत्तर: पर्याय (C) यकृत

योग्य उत्तर यकृत आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): • यकृतामध्ये असलेल्या कुप्फरच्या पेशी अमीबॉइड आकाराच्या असतात, ते साइनसॉइडल एंडोथेलियल पेशींशी संलग्न असतात. त्यामुळे पर्याय 3 योग्य आहे. • कुप्फरच्या पेशींच्या पृष्ठभागावर स्यूडोपोडिया...

+1.0 / -0.25
किटकनाशकांचा वापर करतांना खलीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा?

(a) किटकनाशक प्रकाराची योग्य निवड

(b) किटकनाशकाची कार्यक्षमता

(c) किटकनाशकाची मात्रा

(d) किटकनाशकाचा रंग

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?
EN Which of the following things should be considered important while using insecticides?

(a) Choice of insecticide’s type

(b) Efficiency of insecticides

(c) Dose of insecticides

(d) Colour of insecticides

Which of the given above statement/s is/are correct?
  • (A) (a) फक्त
  • (B) (a) आणि (b) फक्त
  • (C) (a), (b) आणि (c) फक्त
  • (D) (a), (b), (c), (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) आणि (c) फक्त

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता घटक आणि त्याचे वनस्पतींमधील कार्य चुकीच्या पद्धतीने जोडलेले आहे?
EN Which of the following element and its function in plants is paired incorrectly ?
  • (A) नायट्रोज (नत्र) - केंद्रकाम्ले, प्रथिने, संप्रेरके आणि सहविकरे यांचा घटक
  • (B) मॅग्नेशियम - हरित द्रव्याचा घटक
  • (C) फॉस्फोरस -केंद्रकाम्ले, ATP, सहविकरे यांचा घटक
  • (D) गंधक - केंद्रकाम्लांचा घटक
अचूक उत्तर: पर्याय (D) गंधक - केंद्रकाम्लांचा घटक

योग्य उत्तर गंधक - केंद्रकाम्लांचा घटक हे आहे.📌 Key Points • वनस्पतींना अनेक असेंद्रिय पोषक तत्वांची आवश्यकता असते. यापैकी काही बृहतपोषक द्रवे आहेत, ज्यांची वनस्पतींना तुलनेने मोठ्या प्रमाणात गरज असते, आणि इतर सूक्ष्म पोषक द्रवे असतात, ज्यांची अल्प...

+1.0 / -0.25
_______ हे सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे.
EN _______ microorganism is useful for asymbiotic nitrogen fixation in monocot plants.
  • (A) अॅझोटोबॅक्टर
  • (B) रायझोबियम
  • (C) दोन्ही (1) आणि (2)
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) अॅझोटोबॅक्टर

योग्य उत्तर अझोटोबॅक्टर आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): नायट्रोजन निर्धारण - • ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्याद्वारे वायुमंडलीय नायट्रोजन सेंद्रिय संयुगेमध्ये मिसळले जाते, विशेषत: नायट्रोजन चक्राचा भाग म्हणून काही सूक्ष्मजीवांद्वारे होते...

+1.0 / -0.25
जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास ________ प्रदान करतात.
EN Nutrient Dense Foods are those that provide body with _____.
  • (A) कॅलरिज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म पोषक घटक
  • (B) कमी कॅलरिज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज (सूक्ष्म पोषक घटक)
  • (C) काही प्रमाणात जीवनसत्व आणि जास्त कॅलरिज
  • (D) फक्त कॅलरिज
अचूक उत्तर: पर्याय (B) कमी कॅलरिज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज (सूक्ष्म पोषक घटक)

योग्य उत्तर पर्याय 2 आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): पौष्टिक-दाट अन्न - • जे अन्न ते पुरवतात त्या कॅलरीजच्या तुलनेत एक किंवा अधिक पोषक तत्वांचा उदार प्रमाणात पुरवठा करतात त्यांना पोषक-दाट म्हणतात. • पौष्टिक-दाट पदार्थांच्या याद्या आहेत, जे...

+1.0 / -0.25
DOTS कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे?
EN DOTS programme is an important component of which of the following national programme ?
  • (A) राष्ट्रीय धनुर्वात नियंत्रण कार्यक्रम
  • (B) राष्ट्रीय विषमज्वर नियंत्रण कार्यक्रम
  • (C) राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
  • (D) राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
अचूक उत्तर: पर्याय (C) राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

योग्य उत्तर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे. 📌 Key Points • राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम: राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम (NTP) हा भारत सरकारने 1962 मध्ये BCG लसीकरण आणि क्षयरोग उपचारांसह जिल्हा क्षय केंद्र मॉडेलच्या रूपात सुरू केला...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंवेदनावाहक म्हणून प्रमाणित केले आहेत?

(a) अॅसीटाईल कोलीन व गॅमा अमीनो ब्यूटीरीक अॅसीड

(b) डोपामाईन व नॉरअॅड्रीनॅलीन

(c) लायसीन व हिस्टामाईन

(d) पायरुव्हीक अॅसिड व अॅसीटाईल कोए
EN Which of the following chemical substances are authenticated as Neurotransmitters?

(a) Acetylcholine and Gamma-aminobutyric acid

(b) Dopamine and noradrenalin

(c) Lysine and Histamine

(d) Pyruvic acid and Acetyl CoA
  • (A) केवळ (a)
  • (B) केवळ (c)
  • (C) (a) आणि (b)
  • (D) (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a) आणि (b)

योग्य उत्तर (a) आणि (b) आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): न्यूरोट्रांसमीटर- • न्यूरोट्रांसमीटरला रासायनिक ट्रान्समीटर किंवा रासायनिक संदेशवाहक देखील म्हणतात. • शेजारच्या न्यूरॉन्स किंवा स्नायू किंवा ग्रंथी पेशींना उत्तेजित करण्यासाठी न्यूरॉन्स...

+1.0 / -0.25
राम आणि शाम दोघेही 'A' बिंदुपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहे. 'A' बिंदुपासून राम 3 मी. व शाम 4 मी. चालले. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मी. चालला आणि शाम सुद्धा डावीकडे वळून 5 मी. चालला. आता त्यांच्यामधिल अंतर किती?
EN Ram and Shyam both are walking in opposite direction from point ‘A’, Ram walked 3 m and Shyam walked 4 m from point A. Then Ram turned left & walked 4 m and Shyam too turned left & walked 5 m. What is the distance between them now ?
  • (A) 19.5 मी.
  • (B) 10 मी.
  • (C) 16 मी.
  • (D) 11.40 मी.
अचूक उत्तर: पर्याय (D) 11.40 मी.

📐 वापरलेले सूत्र: पायथागोरस प्रमेयानुसार दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर (Shortest Displacement): $d = \sqrt{(\Delta x)^2 + (\Delta y)^2}$ येथे क्षैतिज अंतर $\Delta x = 3 + 4 = 7\text{ मी.}$ उभ्या दिशेतील अंतर $\Delta y = 4 + 5 = 9\text{ मी.}$...

+1.0 / -0.25
वरील आकृतीत कोपऱ्यातील आयताचे मापन 4 सेमी × 8 सेमी आहे. तर वर्तुळाची सेमी मध्ये त्रिज्या दर्शवणारा पर्याय निवडा.
EN In above figure the rectangle at the corner measures 4 cm × 8 cm. Select the option which indicates the radius of the circle in cm.
  • (A) 20
  • (B) 24
  • (C) 16
  • (D) 08
अचूक उत्तर: पर्याय (A) 20

📐 वापरलेले सूत्र: काटकोन त्रिकोणात पायथागोरस प्रमेय किंवा वर्तुळाचे समीकरण: $(x - h)^2 + (y - k)^2 = r^2$ येथे वर्तुळाच्या केंद्रापासून आयताच्या कोपऱ्यातील बिंदूचे अंतर $= r$: $(r - 4)^2 + (r - 8)^2 = r^2$...

+1.0 / -0.25
खलील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या:

P, Q, R, S, T, U आणि V हे सात प्राध्यापक आहेत. प्रत्येकजण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र व भूगोल यापैकी परंतु वेगवेगळी विषय शिकवितात तथापि याच क्रमाने शिकवितील असे नाही. प्रत्येकजण सोमवार ते रविवारपर्यंत एका-एका दिवशी शिकावितात परंतु याच क्रमाने शिकवतात असे नाही. R हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवितो, जो प्राध्यापक भौतिकशास्र हा विषय शिकवितो, त्याच्या आदल्या दिवशी, Q हा गणित शिकवितो. V हा रविवारी शिकवितो परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवित नाही. U हा ज्या दिवशी शिकवितो, त्याच्या आदल्या दिवशी S हा अर्थशास्त्र शिकवितो. P हा मंगळवारी भूगोल शिकवितो. T हा इंग्रजी शिकवत नाही. तर 'T' हा कोणता विषय शिकवितो?
EN Read the information carefully and answer the question based on it.

The seven lecturers P, Q, R, S, T, U and V, teach seven subjects viz. Physics, Chemistry, Biology, English, Mathematics, Economics and Geography. These seven lecturers teach different subjects but not necessarily in the same order. Every teacher teaches only one day from Monday to Sunday but not necessarily in the same order. R teaches Biology on Friday. One who teaches Physics immediate on previous day of which, Q teaches Mathematics. V teaches on Sunday but not Chemistry or English. U teaches on which day, immediate on previous day of which S teaches Economics, P teaches Geography on Tuesday. T does not teach English.

Which subject does 'T’ teach ?
  • (A) रसायनशास्त्र
  • (B) भौतिकशास्त्र
  • (C) रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र
  • (D) गणित
अचूक उत्तर: पर्याय (A) रसायनशास्त्र

+1.0 / -0.25
P, Q. R, S, T, U, V आणि W हे मध्याकडे तोंड करुन वर्तुळाकार बसलेले आहेत. खलील विधाने लक्षात घेऊन प्रश्नाचे उत्तर निवडा:

(a) P हा T च्या उजवीपासून दुसरा आहे तसेच तो R आणि V चा सलग शेजारी आहे.

(b) S हा P चा शेजारी नाही.

(c) V हा U चा शेजारी आहे.

(d) 'Q' हा S आणि W च्या मध्ये नाही, 'W' हा U आणि S च्या मध्ये नाही.

खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाहीत?
EN P, Q, R, S, T, U, V and W are sitting around a circle and are facing at the centres.

Read the following statements and answer the questions:

(a) P is second to the right of T. Also, he is immediate neighbour of R and V.

(b) S is not a neighbour of P

(c) V is a neighbour of U.

(d) ‘Q' is not in between S and W, ‘W’ is not in between U and S.

Which of the two are not immediate neighbour ?
  • (A) UV
  • (B) RP
  • (C) SW
  • (D) RV
अचूक उत्तर: पर्याय (D) RV

📐 वापरलेले सूत्र / तार्किक नियम: वर्तुळाकार बैठक व्यवस्था नियम (Circular Seating Arrangement Rule): केंद्राकडे तोंड करून बसताना: उजवी बाजू = घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा (Anti-clockwise), डावी बाजू = घड्याळाच्या काट्याची दिशा (Clockwise)...

+1.0 / -0.25
बाजू P, Q, R, S व T ही पाच पिके घेतो. T हे R पेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून ते T पेक्षा जादा पैदास करते. P हे R पेक्षा जादा पैदास करते आणि Q पेक्षा वेगाने वाढते. Q हे T पेक्षा अधिक पाणी मागते पण जे सर्वात कमी पैदास करणा ऱ्या दुसरे आहे. S सर्वात मंदगतीने वाढणारे आणि सर्व पिकांत कमी पाण्याची मागणी करणारे आहे पण सर्वात जास्त पैदास करते. R हे P पेक्षा अधिक पाणी मागणारे आणि वेगाने वाढणारे पीक आहे. ज्याच्या पेक्षा, अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत आणि तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास देणारी पिके आहेत असे पीक व पिके निवडा.
EN P, Q, R, Sand T are five crops that Babu grows. T is fast growing and more water demanding than R which gives more yield than T. P gives more yield than R and grows faster than Q. Q is more water demanding than T but is second lowest yielder, S is the slowest growing and least water demanding of all crops but gives highest yield. R is more water demanding and grows faster than P. Select the crop or crops that has/ have as many as crops that are more water demanding and as many as crops that give less yield than it.
  • (A) S, P आणि R
  • (B) फक्त Q
  • (C) फक्त R
  • (D) फक्त P
अचूक उत्तर: पर्याय (A) S, P आणि R

+1.0 / -0.25
तळ्यात एक स्तंभ आहे. निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे. त्याच्या वर एक तृतीयांश भाग पाण्यात बुडलेला आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे, तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा.
EN There is a pole in a pond. Half of the pole is embedded in the mud at the bottom of the pond, above that one third part is covered by water, and the part having length 7 units is out of the water. Select the option that indicates total length of the pole.
  • (A) 42
  • (B) 35
  • (C) 28
  • (D) 26
अचूक उत्तर: पर्याय (A) 42

📐 वापरलेले सूत्र: अपूर्णांक समीकरण पद्धती (Fractional Part of Whole): एकूण स्तंभाची लांबी $= L$ एकक चिखलातील भाग $= \frac{L}{2}$, पाण्यातील भाग $= \frac{L}{3}$, हवेतील भाग $= 7\text{ एकक}$ $\implies L = \frac{L}{2} + \frac{L}{3} + 7$...

+1.0 / -0.25
दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले तीन हेर आहेत. त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती खोटे बोलतात आणि इतर मध्यस्थ खरे बोलतात. त्या तिघांत फक्त एक फितूर आहे. जर चौकशीला त्यांनी पुढील प्रतिसाद दिले असतील तर फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा.

अली: " बेला फितूर आहे." बेला: "सारा फितूर आहे." सारा" "बेला खोटे बोलते."
EN Three spies suspected as double agents and it is certain that the moles lie and other agents speak truth, and there is only one mole among three. Select the option that indicates the mole if on interrogation they replied as follows.

Ali: “Bela is a mole.” Bela: “Sara is a mole.” Sara : “Bela is lying.”
  • (A) सारा
  • (B) अली
  • (C) बेला
  • (D) त्यांच्या प्रतिसादात तार्किक संगती नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) बेला

📐 वापरलेले सूत्र / तार्किक नियम: सत्य-असत्य फितूर सिद्धांत (Truth-Teller vs Liar Logic): अट: फक्त १ फितूर आहे जो खोटे बोलतो; उर्वरित २ खरे बोलतात. पडताळणी: • बेला = फितूर (खोटे बोलते): 'सारा फितूर आहे' हे विधान असत्य ठरते. • अली = खरा: 'बेला फितूर...

+1.0 / -0.25
अजय आणि विकास यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:11 आहे. विकास हा मिनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. मिनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. जर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष अजय पेक्षा जास्त आहे, तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती?
EN The ratio between the present ages of Ajay and Vikas is 3 : 11. Vikas is 12 years younger than Meena. Meena’s age after 7 years will be 85 years. What is present age of Ajay’s father, who is 25 years older than Ajay ?
  • (A) 67 वर्ष
  • (B) 43 वर्ष
  • (C) 45 वर्ष
  • (D) 84 वर्ष
अचूक उत्तर: पर्याय (B) 43 वर्ष

📐 वापरलेले सूत्र: वयावरील गणितीय समीकरणे: १. मीनाचे आजचे वय $= 85 - 7 = 78\text{ वर्षे}$ २. विकासचे आजचे वय $= 78 - 12 = 66\text{ वर्षे}$ ३. अजय व विकासचे गुणोत्तर $= 3 : 11$ $\implies \text{अजयचे वय} = 66 \times \frac{3}{11} = 18\text{ वर्षे}$ ४...

+1.0 / -0.25
X ही बाटली पूर्णपणे लिंबूरसाने भरलेली आहे. त्यात 1 लीटर लिंबूरस आहे. हंसाने Y व Z या दोन रिकाम्या बाटल्यांत X मधला रस ओतला. Y बाटलीची धारकता X या बाटलीच्या निम्मे आहे. यानंतर X बाटलीत आणखी 0.6 लीटर रस शिल्लक आहे; Y या बाटलीची आहे; Y या बाटलीची 1/5 तर Z या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे. हंसाने Z ही बाटली पाण्याने पूर्णपणे भरली.

Z बाटलीतील द्रवाची राशी लीटरमध्ये निवडा.
EN A bottle X is filled entirely with lemon juice. It contains 1 litre of lemon juice. Hansa pours juice from this bottle X into two empty bottles Y and Z. Bottle Y is half as big as bottle X with respect to the capacity. After the filling operation, bottle X still contains 0.6 litre of juice; 1/5 capacity of bottle Y and half capacity of bottle Z is full of juice. Hansa fills bottle Z with water until the bottle is full.

Select the quantity of liquid bottle Z has in litre :
  • (A) 0.1
  • (B) 0.3
  • (C) 0.4
  • (D) 0.6
अचूक उत्तर: पर्याय (D) 0.6

📐 वापरलेले सूत्र: धारकता व प्रमाण पद्धती (Capacity and Volume Relation): • X ची धारकता $= 1\text{ लिटर}$ • Y ची धारकता $= \frac{1}{2} = 0.5\text{ लिटर}$ • X मधून ओतलेला एकूण रस $= 1 - 0.6 = 0.4\text{ लिटर}$ • Y मध्ये भरलेला रस...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स