🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning) (पृष्ठ 63)

General Mental Ability & Logical Reasoning — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 2,907 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 63 / 146
🎯 जलसंपदा व PWD (WRD) 🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning))

18 उपघटक
संख्या मालिका व तर्कसंगत संख्या क्रम
Number Series & Sequential Number Logic
147 प्रश्न
अक्षर मालिका व वर्णमाला क्रम
Alphabet Series & Letter Coding Sequences
44 प्रश्न
सांकेतिक भाषा व कूट संदेश (Coding - Decoding)
Coding - Decoding & Cipher Transformations
77 प्रश्न
विसंगत घटक / वर्गीकरण (Odd One Out)
Odd One Out & Logical Classification
106 प्रश्न
सहसंबंध व समानता (Analogy)
Analogy & Conceptual Relationship Matching
47 प्रश्न
नातेसंबंध व कौटुंबिक नाते विश्लेषण
Blood Relations & Family Tree Deduction
87 प्रश्न
दिशा व अंतर ज्ञान चाचणी
Direction & Distance Sense Test
98 प्रश्न
कालमापन, वार व दिनदर्शिका (Calendar)
Calendar, Days, Dates & Leap Year Calculations
76 प्रश्न
घड्याळ: वेळ, काटे व कोनांचे मोजमाप
Clocks: Angles, Coincidences & Time Calculation
53 प्रश्न
रांगेतील स्थान, क्रम व मांडणी (Ranking & Order)
Ranking, Linear Sequence & Position in Row
41 प्रश्न
तुलनात्मक विश्लेषण व क्रमवारी
Comparison Analysis, Height/Weight Ordering
34 प्रश्न
कोडी, बैठक व्यवस्था व तार्किक रचना (Puzzles)
Puzzles, Floor & Circular Seating Arrangements
110 प्रश्न
विधाने, युक्तिवाद व तर्कशुद्ध निष्कर्ष
Statements, Assumptions & Logical Deductions
54 प्रश्न
तर्कसंगती, विधाने व वेन आकृत्या (Syllogism)
Syllogism, Venn Diagrams & Set Inclusion Logic
17 प्रश्न
खरे-खोटे व तार्किक सत्यता शोध
Truth & Falsehood Analytical Logic
46 प्रश्न
घनाकृती ठोकळा, फासा व त्रिमितीय रचना
Cubes, Dices & 3D Spatial Structures
6 प्रश्न
आकृती विश्लेषण व नमुना शोध
Pattern Completion & Visual Diagram Logic
25 प्रश्न
यंत्र इनपुट-आउटपुट व्यवस्था (Input-Output)
Machine Input - Output Step Processing
2 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,241 ते 1,260 (एकूण 2,907)
+1.0 / -0.25
एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वा. ते बरोबर लावले. त्याच दिवशी दुपारी घड्याळात सवाचार ही वेळ दाखवत असेल तर ती खरी वेळ कोणती ?
EN A clock gains 5 seconds every 3 minutes. It was set right at 7:00 AM. On the same day, if the clock shows quarter past four (4:15) in the afternoon, what is the correct time?
  • (A) 4 : 05 P.M.
  • (B) 4:00 P.M.
  • (C) 3 :45 P.M.
  • (D) 4:10 P.M.
अचूक उत्तर: पर्याय (B) 4:00 P.M.

दर १८५ सेकंद घड्याळ वेळेसाठी खरा वेळ = १८० सेकंद (प्रमाण ३६/३७). * दुपारी सवाचार म्हणजे ५५५ मिनिटे घड्याळ वेळ. * खरा वेळ $= ५५५ \times \frac{३६}{३७} = ५४०$ मिनिटे $= ९$ तास. * खरी वेळ $= ७:०० + ९$ तास $= ४:००$ PM. पर्याय (२) हे योग्य उत्तर आहे. 📌...

+1.0 / -0.25
शिवूला त्याच्या चार चुलत भावेडांतील प्रत्येकाला त्यांच्या निवडीनुसार A, B, C व D ही पुस्तके भेट द्यायची आहेत. या पुस्तकांच्या किमती ₹ 450, ₹ 520, ₹ 545 व ₹ 551 अशा आहेत, मात्र त्या क्रमानेच असतील असे नाही. ही पुस्तके T1, T2 T3 व T4 या पुस्तक दुकानात उपलब्ध आहेत, मात्र ती दिलेल्या क्रमाने असतील असे नाही. या पुस्तकांबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे; C ची किंमत ₹ 551 आहे. D ची किंमत ₹ 545 असून ते T3 दुंकानात उपलब्ध नाही. A हे T1 दुकानात उपलब्ध आहे आणि ₹ 450 या किमतीचे पुस्तक T4 या दुकानात उपलब्ध आहे. ₹ 520 किंमत असलेल्या पुस्तकाचा योग्य तपशील निवडा.
EN Shivu wants to gift books A, B, C, and D to his four cousins according to their preferences. The prices of these books are ₹ 450, ₹ 520, ₹ 545, and ₹ 551, though not necessarily in that order. These books are available in bookshops T1, T2, T3, and T4, not necessarily in that order. Details: Price of C is ₹ 551. Price of D is ₹ 545 and it is not available in shop T3. A is available in shop T1, and the book priced at ₹ 450 is available in shop T4. Select the correct details for the book priced at ₹ 520.
  • (A) पुस्तक B व ते T2 मध्ये उपलब्ध आहे.
  • (B) पुस्तक A व ते T1 मध्ये उपलब्ध आहे.
  • (C) पुस्तक B व ते T3 मध्ये उपलब्ध आहे.
  • (D) पुस्तक B व ते T4 मध्ये उपलब्ध आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) पुस्तक A व ते T1 मध्ये उपलब्ध आहे.

दिलेली पुस्तके: A, B, C, D किमती: ₹ 450, ₹ 520, ₹ 545, ₹ 551 दुकाने: T1, T2, T3, T4 दिलेल्या अटींचे विश्लेषण करू: 1. C ची किंमत $= ₹ 551$ 2. D ची किंमत $= ₹ 545$ (दुकान T3 मध्ये उपलब्ध नाही) 3. A हे दुकान T1 मध्ये उपलब्ध आहे. 4. ₹ 450 चे पुस्तक...

+1.0 / -0.25
एका कुटुंबातील सहा सदस्य P, Q, R, A, B व C हे चित्रकार, इंजिनीअर, व्यवस्थापक, कलाकार, नृत्यकार व लिपिक (अनुक्रमे नाही) आहेत. A नृत्यकार असून 'P' ची आई आहे, B हे इंजिनीअरचे वडील आहेत मात्र ते कलाकार नाहीत. Q हे 'R' ह्या इंजिनीअरचे आजोबा आहेत. 'B' चा विवाह 'P' ह्या चित्रकारासोबत झाला आहे. 'C' ही 'A' ची नात असून ती व्यवस्थापक आहे, तर 'A' चे पति कोण आहेत ?
EN Six members of a family P, Q, R, A, B, and C are Painter, Engineer, Manager, Artist, Dancer, and Clerk (not respectively). A is a dancer and the mother of 'P'. B is the father of the Engineer but is not an artist. Q is the grandfather of 'R' who is an engineer. 'B' is married to 'P' who is a painter. 'C' is the granddaughter of 'A' and is a manager. Who is the husband of 'A'?
  • (A) कलाकार
  • (B) इंजिनीअर
  • (C) व्यवस्थापक
  • (D) सांगता येत नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) कलाकार

कुटुंबातील 6 सदस्य: P, Q, R, A, B, C व्यवसाय: चित्रकार, इंजिनीअर, व्यवस्थापक, कलाकार, नृत्यकार, लिपिक दिलेल्या माहितीचे विश्लेषण: 1. A नृत्यकार असून P ची आई आहे: - A = नृत्यकार (स्त्री) 2. 'B' चा विवाह 'P' ह्या चित्रकारासोबत झाला आहे: - P = चित्रकार...

+1.0 / -0.25
P, Q, R,S व T या गटातील व्यक्ती आहेत. पैकी एक शेतकरी, एक मुक्त व्यावसायिक व एक शिक्षक आहे. पैकी P व S या अविवाहित मुली व्यवसाय करत नाहीत. यातील T हा यातल्या जोडप्यातील नवरा आहे. R हा P चा भाऊ असून तो शेतकरी नाही वा मुक्त व्यावसायिक नाही. तर यातील कोणती व्यक्ती शिक्षक आहे?
EN P, Q, R, S, and T are persons in a group. Among them, one is a farmer, one is a freelancer, and one is a teacher. P and S are unmarried girls and do not practice any profession. T is the husband in the married couple. R is P's brother and is neither a farmer nor a freelancer. Which person is the teacher?
  • (A) R
  • (B) Q
  • (C) T
  • (D) अधिक माहिती आवश्यक आहे
अचूक उत्तर: पर्याय (A) R

गटातील व्यक्ती: P, Q, R, S, T (एकूण 5 व्यक्ती). व्यवसाय: शेतकरी, मुक्त व्यावसायिक, शिक्षक (एकूण 3 व्यवसाय). दिलेल्या अटींचे विश्लेषण: 1. P व S या अविवाहित मुली कोणताही व्यवसाय करत नाहीत (व्यवसाय नाही). 2. T हा जोडप्यातील नवरा आहे (पुरुष). 3. R हा P...

+1.0 / -0.25
सात मुली वर्तुळाकारात केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. तानी, वाणी, रइसा, कॅटी, जया, पन्ना आणि साथी आझी त्यांची नावे असून ही यादी त्यांच्या बैठकीच्या क्रमानुसार आहे, असे नाही. तानी आणि जया वगळता कोणीतरी साथी व कॅटीच्या दरम्यान बसली आहे. पन्ना ही वाणीच्या डावीकडून दुसरी आहे आणि रइसा पन्नाच्या उजवीकडून पाचवी आहे. जया, पन्ना किंवा वाणी बरोबर जोडी करू शकते. जर जया व रइसा यांनी जागांची अदलाबदल केली तर पुढे दिलेल्या कोणत्या दोन मुली एकत्र काम करण्यासाठी जोडी करू शकणार नाहीत ?
EN Seven girls are seated in a circle facing the center: Tani, Vani, Raisa, Katy, Jaya, Panna, and Sathi. Someone other than Tani and Jaya sits between Sathi and Katy. Panna is second to the left of Vani, and Raisa is fifth to the right of Panna. Jaya can partner with Panna or Vani. If Jaya and Raisa swap their seats, which of the following two girls will not be able to pair up to work together?
  • (A) कॅटी - जया
  • (B) साथी - जया
  • (C) जया - तानी
  • (D) रइसा - पन्ना
अचूक उत्तर: पर्याय (C) जया - तानी

+1.0 / -0.25
कुटुंबात M, N, O, P, Q आणि R हे सहा सदस्य आहेत. O हा N चा मुलगा आहे, परंतु N ही व्यक्ती O ची आई नाही. N व P हे विवाहित जोडपे आहे. R हा N चा भाऊ आहे आणि Q ही P ची बहीण आहे. जर उरलेले सर्व सदस्य विवाहित जोडप्याची मुले असतील, तर P च्या अपत्यांची संख्या सांगणारा पर्याय निवडा.
EN A family has six members M, N, O, P, Q, and R. O is the son of N, but N is not the mother of O. N and P are a married couple. R is the brother of N, and Q is the sister of P. If all the remaining members are children of the married couple, select the option indicating the number of children of P.
  • (A) 1
  • (B) 2
  • (C) 3
  • (D) 1,2, 3 पैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) 2

+1.0 / -0.25
दिलेली माहिती वाचून त्यासंदर्भातील चुकीचे विधान निवडा. A, B, C, D, E, F, G, व H ही चित्रे समान अंतरावर वर्तुळाकार सभागाराच्या भिंतीवर प्रदर्शित केली आहेत. B हे G आणि D च्या दरम्यान आहे. H हे B च्या डावीकडे तिसरे आणि A च्या उजवीकडे दुसरे आहे. C हे A आणि G च्या दरम्यान प्रदर्शित केले असून B व E व्यासाच्या परस्परविरुद्ध नाहीत.
EN Read the given information and select the incorrect statement. Pictures A, B, C, D, E, F, G, and H are displayed at equal intervals along the wall of a circular auditorium. B is between G and D. H is third to the left of B and second to the right of A. C is displayed between A and G, and B and E are not diametrically opposite each other.
  • (A) C व E ही व्यासाच्या परस्परविरुद्ध प्रदर्शित केलेली आहेत.
  • (B) G हे A व B च्या दरम्यान आहे पण E हे A व B च्या दरम्यान नाही.
  • (C) E हे G च्या डावीकडून तिसरे आहे.
  • (D) A व F यांच्या दरम्यान चित्र प्रदर्शित केलेले नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) G हे A व B च्या दरम्यान आहे पण E हे A व B च्या दरम्यान नाही.

8 चित्रे (A ते H) वर्तुळाकार सभागाराच्या भिंतीवर प्रदर्शित केली आहेत. - B हे G आणि D च्या दरम्यान आहे. - H हे B च्या डावीकडे तिसरे आणि A च्या उजवीकडे दुसरे आहे. - C हे A आणि G च्या दरम्यान आहे. पर्याय 2 तपासून पाहू: - "G हे A व B च्या दरम्यान आहे पण...

+1.0 / -0.25
शिबिराथीनी एका क्षेत्रात A, B, C, D, E, F, G, H व I हे 9 तंबू उभारले आहेत. G हा H च्या पश्चिमेला 1 किमी आहे तर D हा G च्या पूर्वेला 3 किमी अंतरावर आहे आणि F हा G च्या उत्तरेला 2 किमी अंतरावर आहे. I हा B व C यांच्या मधोमध आहे, तर E नेमका हा H व D यांच्या मधोमध आहे. C हा B च्या पूर्वेला 2 किमी अंतरावर आहे. A हा B च्या उत्तरेला 1 किमी अंतरावर आहे आणि H हा A च्या दक्षिणेला 2 किमी अंतरावर आहे G च्या संदर्भात I जवळपास ज्या दिशेला आहे, ती दिलेल्या पर्यायांमधून निवडा.
EN Campers have pitched 9 tents A, B, C, D, E, F, G, H, and I in an area. G is 1 km west of H, D is 3 km east of G, and F is 2 km north of G. I is midway between B and C, while E is exactly midway between H and D. C is 2 km east of B. A is 1 km north of B, and H is 2 km south of A. Select from the options the approximate direction of I relative to G.
  • (A) ईशान्य
  • (B) आग्रेय
  • (C) दक्षिण
  • (D) उत्तर
अचूक उत्तर: पर्याय (A) ईशान्य

तंबूंची निर्देशक भूमितीनुसार (Cartesian Coordinates) मांडणी करू: समजा G चे स्थान मूळ बिंदू $(0, 0)$ आहे. 1. "G हा H च्या पश्चिमेला 1 किमी आहे": - $H = (1, 0)$ 2. "D हा G च्या पूर्वेला 3 किमी अंतरावर आहे": - $D = (3, 0)$ 3. "F हा G च्या उत्तरेला 2...

+1.0 / -0.25
20 माणसांसाठी भाताचे 20 वाडगे उपलब्ध आहेत. प्रत्येक माणसाने तीन वाडम्यांपेक्षा कमी वा जास्त वाडगे भात खायचा नाही, असे ठरवले. सर्व स्त्रियांनी ठरवले की त्यांच्यापैकी प्रत्येकीने अ्ध्यापेक्षा जास्त किंवा कमी वाडगा भात खायचा नाही. मुलांना दोनपेक्षा कमी किंवा जास्त वाडगा भात खायचा नाही. अशी मुभा दिली. तर अनुक्रमे पुरुष, स्त्रिया व मुले असे एकूण 20 व्यक्ती असलेला असा गट निवडा, की जो भाताचे सर्व वाडगे संपवेल.
EN 20 bowls of rice are available for 20 people. Each man decided to eat no more or less than three bowls of rice. All women decided that each would eat no more or less than half a bowl of rice. Children were allowed no more or less than two bowls of rice. Select the group containing men, women, and children respectively totaling 20 persons that finishes all the rice bowls.
  • (A) 1, 16 and 3
  • (B) 2, 12 and 6
  • (C) 1, 14 and 5
  • (D) 1, 12 and 7
अचूक उत्तर: पर्याय (C) 1, 14 and 5

दिलेल्या माहितीनुसार: - एकूण व्यक्ती $= 20$ - एकूण भाताचे वाडगे $= 20$ - प्रत्येक पुरुष $= 3$ वाडगे खातो - प्रत्येक स्त्री $= \frac{1}{2}$ वाडगा खाते - प्रत्येक मूल $= 2$ वाडगे खाते समजा पुरुष $= M$, स्त्रिया $= W$, मुले $= C$. समीकरण 1...

+1.0 / -0.25
"लुटूया आनंद उन्हाळी अध्ययनाचा" या प्रकल्पाच्या प्रमुखांना A, B, C, D, E, F, G व H या आठ स्वेच्छेने पुढे आलेल्या आठजणांतून चार विद्यार्थ्यांची निवड करायची आहे. निवडलेली प्रत्येक व्यक्ती निवड केलेल्या किमान एका तरी अन्य व्यांक्तच्या आवडीत सहभागी असेल तसेच ईतरांच्या आवडीबद्दल नावड वाटत असूनही विद्याथ्यांनी त्या व्यक्तिशी सहकार्य करायला शिकावे अशी इच्छा असल्यामुळ निवडलेल्या प्रत्येक व्यक्तिला अन्य तीन व्यक्तिच्या किमान एका तरी आवडीबाबत नावड असायला हवी असा त्यांनी निर्णय घेतला.
प्रत्येक व्यक्तिच्या आवडी व नावडीबाबतची पुढील सामग्री अभ्यासा व दिलेल्या अटींचे समाधान करणारा चमू निवडा.
A ला रंग कला, वाचन आवडते व पाऊला वाटा चालण्याचा तिटकारा वाटतो. B ला वाचनाची व चित्रपट पाहण्याची आवड आहे पण चालण्याचा तिटकारा आहे. C चालण्याचा आनंद लुटते पण तिला वाचनाची आवड नाही. D ला पक्षी निरीक्षण आवडते पण ती चित्रपट पाहण्याचा तिटकारा करते. E चित्रपट पाहण्याचा आनंद लुटते पण वाचन व पक्षी निरीक्षणाचा तिटकारा करते. F ला रंग कला आवडते पण ती वाचन व पक्षी निरीक्षणाचा तिटकारा करते. G ला चालणे व पक्षी निरीक्षण आवडते पण ती रंगकलेचा आनंद लुटत नाही. H वाचनाचा आणि चालण्याचा आनंद लुटते पण तिला पक्षी निरीक्षण आवडत नाही.
EN The head of the 'Enjoy Summer Learning' project wishes to select four students from eight volunteers A, B, C, D, E, F, G, and H. Each selected student must share an interest with at least one other selected student; furthermore, to teach students to cooperate despite differences, each selected student must have a dislike for at least one of the interests of the other three members.
Study the interests and dislikes of each person:
A likes painting and reading, hates walking trails.
B likes reading and watching movies, hates walking.
C enjoys walking, dislikes reading.
D likes bird watching, hates watching movies.
E enjoys watching movies, hates reading and bird watching.
F likes painting, hates reading and bird watching.
G likes walking and bird watching, does not enjoy painting.
H enjoys reading and walking, dislikes bird watching.
Select the team that satisfies the given conditions:
  • (A) A, B, E, F
  • (B) C, D, E, F
  • (C) D,E, F, H
  • (D) A, B, D, G
अचूक उत्तर: पर्याय (D) A, B, D, G

8 स्वेच्छेने पुढे आलेले विद्यार्थी: A, B, C, D, E, F, G, H. 4 विद्यार्थ्यांचा चमू निवडायचा आहे. अटी: 1. निवडलेली प्रत्येक व्यक्ती इतर किमान एका व्यक्तीच्या आवडीत सहभागी असायला हवी (समान आवड). 2. प्रत्येक व्यक्तीला इतर तिघांच्या किमान एका आवडीबद्दल...

+1.0 / -0.25
M, T, J, R, D, W आणि Q या व्यक्ती A, B आणि C या गाड्यांतून प्रवास करत आहेत. प्रत्येक गाडीत किमान दोन व्यक्ती आहेत. यात तीन महिला असून प्रत्येक गाडीत एक महिला आहे. T या व्यक्तिला फक्त Q या व्यक्तिबरोबरच प्रवास करायचा आहे व त्या B गाडीतून प्रवास करत आहेत. M ही व्यक्ती A या गाडीतून प्रवास करत आहे. D आणि W या व्यक्ती C गाडीतून प्रवास करत नाहीत. J ही व्यक्ती महिला नाही तर W ही व्यक्ती महिला आहे. तर J ही व्यक्ती कोणत्या गाडीतून प्रवास करत आहे?
EN Persons M, T, J, R, D, W, and Q are travelling in three cars A, B, and C. There are at least two persons in each car. Among them are three females, with exactly one female in each car. T wants to travel only with Q and they travel in car B. M travels in car A. D and W do not travel in car C. J is not female, while W is female. In which car is J travelling?
  • (A) A
  • (B) B
  • (C) C
  • (D) यापैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) C

7 व्यक्ती: M, T, J, R, D, W, Q 3 गाड्या: A, B, C (प्रत्येक गाडीत किमान 2 व्यक्ती, 3 महिला असून प्रत्येक गाडीत 1 महिला). दिलेल्या अटींचे विश्लेषण करू: 1. "T या व्यक्तीला फक्त Q या व्यक्तीबरोबरच प्रवास करायचा आहे व त्या B गाडीतून प्रवास करत आहेत"...

+1.0 / -0.25
ऐशा व तिच्या नवऱ्याने काल त्यांचे शेजारी असलेल्या दोन भिन्न लिंगी जोडप्यांना इफ्तार मेजवानीचे निमंत्रण दिले होते. ते सर्वजण वर्तुळाकार बसले होते व मध्यभागी अन्न ठेवले होते. ऐशाने तुम्हाला पुढील तथ्ये सांगितली आहेत. डॅनी एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो अनुच्या डावीकडे बसला आहे. ईशा एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी माझ्या नवऱ्याच्या डावीकडे बसली आहे. दिनू एका स्त्रीच्या डाव्या बाजूला बसला आहे जी राजाच्या डावीकडे बसली आहे. मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी बसलेली नाही. दिलेल्या पर्यायांतून माझ्या नवऱ्याचे नाव निवडा -
EN Yesterday, Aisha and her husband invited two neighbor heterosexual couples for an Iftar feast. All of them sat in a circle with food placed in the center. Aisha told you the following facts: Danny sits to the left of a woman who sits to the left of a man who sits to the left of Anu. Isha sits to the left of a man who sits to the left of a woman who sits to the left of a man who sits to the left of a woman who sits to the left of my husband. Dinu sits to the left of a woman who sits to the left of Raja. I do not sit adjacent to my husband. From the given options, select the name of my husband:
  • (A) इतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांच्या शेजारी बसल्या आहेत वा नाहीत याची माहिती आवश्यक आहे
  • (B) राजा
  • (C) दिनू
  • (D) डॅनी
अचूक उत्तर: पर्याय (B) राजा

ऐशा आणि तिचा नवरा, अधिक दोन शेजारी जोडपी (एकूण 6 व्यक्ती = 3 पुरुष व 3 स्त्रिया). सर्वजण वर्तुळाकार बसले आहेत. माहितीचे विश्लेषण: - ऐशा म्हणते: "मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी बसलेली नाही." - दिलेल्या विधानांनुसार: - दिनू, राजा, डॅनी हे पुरुष आहेत...

+1.0 / -0.25
शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे. राजू चारूपेक्षा उंच आहे परंतु ती बालापेक्षा ठेंगणा आहे. स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे. चारू शिरीषपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण आहे ?
EN Shirish is taller than Spandan. Raju is taller than Charu but shorter than Bala. Spandan is shorter than Charu. Charu is taller than Shirish. Who is the tallest?
  • (A) शिरीष
  • (B) बाला
  • (C) स्पंदन
  • (D) राजू
अचूक उत्तर: पर्याय (B) बाला

दिलेल्या विधानांनुसार उंचीचा क्रम मांडू: 1. शिरीष हा स्पंदनपेक्षा उंच आहे: $$\text{शिरीष} > \text{स्पंदन}$$ 2. राजू हा चारूपेक्षा उंच आहे परंतु बालापेक्षा ठेंगणा आहे: $$\text{बाला} > \text{राजू} > \text{चारू}$$ 3. स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे...

+1.0 / -0.25
केट ही युगपेक्षा वयाने तीनपट मोठी आहे. मिनी ही वयाने झरिनच्या निम्मे आहे. युग मिनीपेक्षा वयाने मोठा आहे. सत्य अनुमानाची निवड करा.
EN Kate is three times as old as Yug. Mini is half as old as Zarin. Yug is older than Mini. Select the true conclusion.
  • (A) केट कदाचित झरिनपेक्षा वयाने लहान असेल
  • (B) युग वयाने झरिनपेक्षा मोठा आहे
  • (C) केट वयाने झरिनपेक्षा मोठी आहे
  • (D) वरील सर्व अनुमाने सत्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) केट वयाने झरिनपेक्षा मोठी आहे

दिलेली माहिती समीकरणात मांडू: 1. केट ($K$) ही युग ($Y$) पेक्षा तीनपट मोठी आहे: $$K = 3Y$$ 2. मिनी ($M$) ही झरिन ($Z$) च्या निम्मे आहे: $$M = \frac{1}{2} Z \implies Z = 2M$$ 3. युग ($Y$) हा मिनी ($M$) पेक्षा मोठा आहे: $$Y > M$$ तुलना: समीकरण (3) च्या...

+1.0 / -0.25
जर p > q आणि r < 0, तर पुढीलपैकी कोणती राशी सत्य आहे ?
EN If p > q and r < 0, then which of the following expressions is true?
  • (A) pr < qr
  • (B) p +r < q + r
  • (C) p - r < q - r
  • (D) कोणतीहि सत्य नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) pr < qr

दिलेले: • $p > q$ • $r < 0$ ($r$ ही ऋण संख्या आहे) असमानतेचा मूलभूत नियम: जेव्हा कोणत्याही असमानतेच्या दोन्ही बाजूंना ऋण संख्येने गुणले जाते, तेव्हा असमानतेचे चिन्ह उलट होते (Reverses). $$p > q \quad \text{आणि} \quad r < 0$$ $$\implies p \times r <...

+1.0 / -0.25
जर मला आणखी एक भाऊ असता, तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असले असते. जर मला आणखी एक बहीण असली असती, तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती. तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या अनुक्रमे दर्शविणारा पर्याय निवडा.
EN If I had one more brother, I would have twice as many brothers as sisters. If I had one more sister, the number of each would be equal. Select the option showing the number of my brothers and sisters respectively.
  • (A) 2,3
  • (B) 3,2
  • (C) 2,2
  • (D) 3, 3
अचूक उत्तर: पर्याय (B) 3,2

+1.0 / -0.25
दोरखंड खेचण्याच्या चढाओढीत, चार टोका पाच मोकांइतकाच जोर लावतात परंतु दोन मोका व एक टोका मिळून एका जोकाइतकाच जोर लावतात जर एक जोका आणि दोन मोका हे चार टोकांविरोधात असतील आणि निवडलेल्या व्यक्ती कोणत्याही विशिष्ट गटानुसार समानतेने ताकदवान व कुशल असतील तर या चढाओढीचा सर्वात उचित निकाल निवडा.
EN In a tug-of-war competition, four Tokas exert the same force as five Mokas, but two Mokas and one Toka together exert the same force as one Joka. If one Joka and two Mokas are matched against four Tokas, and all individuals within any specific group are equally strong and skilled, select the most appropriate outcome of this contest.
  • (A) एक जोका व दोन मोका यांचा संघ जिंकेल.
  • (B) एक जोका व दोन मोका यांचा संघ जिंकणार नाही.
  • (C) दोन संघ तुल्यबल ठरतील
  • (D) चार टोकांचा संघ जिंकेल.
अचूक उत्तर: पर्याय (A) एक जोका व दोन मोका यांचा संघ जिंकेल.

+1.0 / -0.25
मनू, मानी, मंजू व माली यांनी अर्थविज्ञान व इतिहास चाचण्या दिल्या. पुढे दिलेली तथ्ये वापरून इतिहासात सर्वात कमी गुण मिळवणारी व्यक्ती निवडा.
तथ्ये :
- मनू एकटीच अर्थविज्ञानात अनुत्तीर्ण असून तिने इतिहासात सर्वाधिक गुण मिळवून त्याची कसर भरून काढली आहे.
- मानीने अर्थविज्ञानात मंजूवर मात केली आहे तर मंजू इतिहासात मानीपेक्षा उत्तम ठरली आहे.
- मालीने तिची अर्थविज्ञानातील कामगिरी सुधारून त्यात ती इतिहासापेक्षा एक क्रम वर आली आहे व मंजूला लागून वर आहे.
EN Manu, Mani, Manju, and Mali appeared for tests in Economics and History. Using the facts given below, select the person who scored the lowest marks in History.
Facts:
- Manu alone failed in Economics, but compensated for it by scoring the highest marks in History.
- Mani outperformed Manju in Economics, whereas Manju performed better than Mani in History.
- Mali improved her performance in Economics, ranking one position higher than her History rank, and placed immediately above Manju.
  • (A) मनू
  • (B) मानी
  • (C) मंजू
  • (D) माली
अचूक उत्तर: पर्याय (B) मानी

चार व्यक्ती: मनू, मानी, मंजू, माली. विषय: अर्थविज्ञान व इतिहास. तथ्यांचे विश्लेषण: 1. मनू: अर्थविज्ञानात अनुत्तीर्ण आहे, परंतु इतिहासात तिने सर्वाधिक गुण मिळवले आहेत. $$\implies \text{इतिहास 1 ला क्रमांक} = \text{मनू}$$ 2. मानी व मंजू: - मानीने...

+1.0 / -0.25
पुढे पाच विधाने दिली आहेत व त्यापुढे विशिष्ट क्रमाने तीन विधाने असलेले पर्याय दिले आहेत. सुरुवातीच्या दोन विधानांच्या आधारे तिसरे विधान हे यथार्थ निष्कर्ष ठरते असा पर्याय निवडा.
विधाने :
(a) वाहतुकीची कोंडी हवेतील कार्बन मोनॉक्साईड वाढवते.
(b) वाहतुकीची कोंडी आरोग्याला घातक आहे.
(c) वाहतुकीची कोंडी नेहमीच आरोग्याला घातक नसते.
(d) वाहतुकीची कोंडी नेहमीच कार्बन मोनॉक्साईडमध्ये भर पडायला कारणीभूत ठरत नाही.
(e) कार्बन मोनॉक्साईडमध्ये पडणारी भर आरोग्याला घातक असते.
पर्यायी उत्तरे :
EN Five statements are given below followed by options containing three statements in a specific sequence. Select the option in which the third statement is a valid deduction from the first two statements.
Statements:
(a) Traffic congestion increases carbon monoxide in the air.
(b) Traffic congestion is hazardous to health.
(c) Traffic congestion is not always hazardous to health.
(d) Traffic congestion does not always cause an increase in carbon monoxide.
(e) The increase in carbon monoxide is hazardous to health.
Alternative answers:
  • (A) (c), (b), (e)
  • (B) (a), (e), (b)
  • (C) (e), (b), (a)
  • (D) (c), (d), (e)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a), (e), (b)

पाच विधाने दिली असून त्यातून सप्रमाण निष्कर्ष शोधायचा आहे. पर्याय (2) मधील क्रम (a), (e), (b) तपासू: - विधान (a) आणि विधान (e) या दोन गृहीतकांवरून विधान (b) हे सप्रमाण अनुमान म्हणून तार्किकदृष्ट्या सिद्ध होते. त्यामुळे पर्याय (2) हे योग्य उत्तर आहे...

+1.0 / -0.25
20 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी दोन तथ्ये ओळखा.
तथ्ये :
(a) 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले.
(b) 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण झाले नाहीत.
(c) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपिक्षा 2: 1 ने जास्त आहे.
(d) अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा पूर्ण न करणाऱ्यांपेक्षा 5: 1 ने जास्त आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Identify the two facts that make the conclusion "20 students failed the examination" always true.
Facts:
(a) 40 students passed the examination.
(b) 10 students did not complete the examination, so they neither passed nor failed.
(c) The ratio of students who passed to students who failed is 2 : 1.
(d) The ratio of students who failed to students who did not complete the examination is 5 : 1.
Alternative answers:
  • (A) (a), (b)
  • (B) (a), (c)
  • (C) (b), (c)
  • (D) (b), (d)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a), (c)

निष्कर्ष: "20 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले." (अनुत्तीर्ण $= 20$). तथ्यांची पडताळणी: - तथ्य (a): 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. (उत्तीर्ण $= 40$). - तथ्य (c): उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा $2 : 1$...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स